एक्स्ट्रॉ मॅरिशिअल सेक्स आणि एड्स अवेअरनेस

दादरच्या वेस्टर्न लाइन च्या ३ नंबर प्लॅटफॉर्म च्या इंडिकेटर खाली मी एका मित्राची वाट पहात  उभा होतो. इथूनच दोघांनी सोबत एका कस्टमर कडे जायचं होतं. कोणालाही भेटायचं असलं म्हणजे मुंबईकरांची रेल्वे स्टेशनवरची ठरलेली जागा म्हणजे  रेल्वे प्लॅटफॉर्मवरील इंडीकेटर्स खाली.करण्यासारखं काही नव्हतं म्हणून इकडे तिकडे बघू लागलो, एक मुलींचा ग्रुप उभा होता मोठ्याने खिदळत.. कानामधे आय पॉड/एफ एम रेडिओ ची बुचं घातलेल्या. ह्या जगाशी काही एक घेणं नाही अशा आविर्भावात. हल्ली मी म्हातारा झालोय असं वाटतं. अहो , एखादी मुलगी दिसली तर आपल्या मुलीची आठवण येते……! :) जोक अपार्ट, पण हे खरंय..   :)

मागे दोन भैय्ये उभे होते. दोघांचं बोलणं सुरु होतं. अरे कल वो “उसके” पास गया था, क्या चिज थी… वगैरे बोलण्यावरून कशाबद्दल बोलणे सुरू आहे ह्याचा लगेच अंदाज आला.अजुन कान टवकारले. मानवी स्वभाव! अशा गोष्टी कानावर पडल्या तर दुर्लक्ष करणे सहज शक्य होत नाही. उलट ’पुढे काय झालं असेल’ हे जाणून घ्यायची उत्सुकता मात्र जास्त बळावते.त्याचं बोलणं ऐकू लागलो. हा काही सेक्स ला वाहिलेला ब्लॉग नाही, म्हणून काय ऐकलं ते डीटेल्स मधे लिहित नाही.एक भैय्या दुसऱ्याला फक्त ५० रुपयात कशी मजा येते ते सांगत होता अगदी इत्यंभूत पणे.  दुसरा मात्र थोडा सेन्सिबल दिसत होता. म्हणाला, भैया एड्स होता है ना ऐसा करनेसे… तर लगेच पहिल्या चे एक्स्पर्ट ओपिनियन कानवर पडलं, ’अरे कुछ  नहीं होता है एडस वेड्स…. देखा नहीं क्या वो जगह जगह दिवार पर लिखा है ना… कंड्म युज करनेसे एड्स नहीं होता”

कपाळावर हात मारुन घ्यायची इच्छा झाली. अहो या एन जी ओ’ज ज्या पद्धतिने एड्स  च्या जाहिराती करित आहेत , त्या पद्धतीमुळे गैरसमज जास्त पसरून समाज स्वास्थ्य खराब होण्याची शक्यता जास्त आहे.

एड्स फक्त सेक्स्युअल संबंधातून होत नाही. इतरही बरीच कारणे आहेत.  जर त्या स्त्री च्या तोंडामधे अल्सर/जखमा – मे बी पान मसाला खाल्यामुळे झालेल्या  वगैरे असतील तर सलायवा मुळे पण एड्स होऊ शकतो ही गोष्ट सोयिस्करपणे दुर्लक्षली जाते . या एन जी ओ’ज ला आपलं कॅंपेन दुरुस्त करायला लिहावं लागेल ! बॅक ऑफ द माइंड रेकॉर्ड झालं.. म्हणजे आता एन जी ओ चा पत्ता वगैरे शोधा…

दोघांच्या बोलण्यातून लक्षात आलं , की ते दोघंही एकाच गावचे, मुंबईला काम करायला आलेले. एक जण दुसऱ्याला सांगत होता, गाव जाएगा तो कुछ समान ले जाना घरवा्ली के लिये.. म्हणजे हा गृहस्थ लग्न झालेला आहे तर, मनातल्या मनात बोललो ह्या माणसाला अजिबात गिल्टी कॉन्शस नाही??

विचार करु लागलॊ, ह्या माणसाचे गैरसमज दुर करुन  ह्याला समजाऊन सांगू ?   की सोडून देउ? मला काय करायचं आहे? माझा काय संबंध? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जर ह्याला काही सांगायला  गेलो , आणि ह्या माणसाने जर मलाच उलटा भोसडला तर काय करायचं? शेवटी ग्रे हेअर्स चा फायदा घेउन  त्या माणसाशी बोलणं सुरू केलं.. भैया,  ने शांतपणे सगळं ऐकुन घेतलं, आणि म्हणतो, साब क्या करेंगा, साल मे एक बार गांव जाता हुं इसलिये ये सब करना पडता है..  तरी  पण त्याला अशा संबंधांमुळे होणाऱ्या रोगाचा सिरियसनेस समजावून सांगितला!  तोंडात अल्सर असल्यास, इव्हन किसिंग मुळे पण एड्स होऊ शकतो हे जेंव्हा त्याला सांगितलं तेंव्हा  त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य तो काही लपवू शकला नाही. म्हंटलं , माझं काम मी केलं, पुढे तू, आणि  तुझं नशीब .

फक्त एकच गोष्ट झाली, त्याच्या डोळ्यामधे मला भीतीचे एक सावट दिसले. थोडा विचारात पडलेला दिसला तो..ह्या पुढे तरी कमीत कमी दूर रहा रे बाबा अशा गोष्टींच्या पासुन असा मनातल्या मनात विचार करित बाजुला झालो.

ह्या एकाच प्रसंगानी माझं अंतरंग ढवळून निघालं. डोळ्यासमोर त्या भैय्याची बायको, डोक्यावर घुंघट घेतलेली आली. आणि  कसंसंच झालं.  मध्यंतरी असंही वाचण्यात आलं होतं की एड्स चे भारतामध्ये सगळ्यात जास्त  रोगी युपी आणि बिहार मधल्या खेड्यात आहेत. ज्या स्त्रियांची  काहीच चूक नसतांना ते या रोगाचे बळी पडले आहेत. मन उदास झालं…  अजूनही अशी परिस्थिती असावी?? स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी??

सरकारने बिहार आणि यु पी मधे काहीच  केलेलं नाही. ह्या दोन्ही राज्यात  केवळ राजकारणच चालतं. इथे तो मुद्दा नाही, पण जर बिहार मधे गरीब लोकांच्या साठी रोजी रोटी ची सोय केली तर त्या लोकांना इथे मुंबईला यावे लागणार नाही. बेसिक इन्फ्रास्ट्रकचर नसल्या मुळे फारशी डेव्हलपमेंट झालेली नाही. हे सगळे भैय्ये लोकं , आपल्या बायकांना गावी ठेवून इकडे  येतात आणि मग अशा वासनेच्या खेळाचे बळी ठरतात.

परत आठवलं, कालच मलाड स्टेशन च्या ब्रिज वर एक गोंदवणारा माणुस बसला होता. सहज, कुतुहल म्हणुन जाता जाता नजर टाकली तर, एका माणसाच्या हातावर काहीतरी लिहित होता. गोंदवणे हा प्रकार पण एडस च्या ट्रान्स्फर साठी कारणीभूत होऊ शकतो. इथे कोकणातला फार मोठा वर्किंग क्लास आहे मुंबईला.ह्यांच्या पैकी बरीच मंडळी कुरार व्हिलेज, किंवा अप्पापाडा ह्या भागात मालाड इस्ट ला रहातात. हे लोकं स्वतःला फार सुधारले ले समजतात .पण प्रत्यक्षात  तसं नाही. अजूनही अमावस्येला कोहळं रात्री चौकात टाकणे, लिंबू उतरवणे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा क्लास आहे हा.  अशीच कोंकणी मंडळी बसली होती , गोंदून घेत.. एकाला हातावरचं नांव जे आधी पासूनच गोंदवलं होतं त्या भोवती नक्षी काढून हवी होती. इथे मात्र मी काहीही न बोलता पाय काढता घेतला. हातावर शंकराचे नांव गोंदवल्यामूळे शंकर प्रसन्न होणार आहे कां? अशा गोष्टी करुन लोकांना काय मिळते कोणास ठाउक.हे असे प्रसंग पाहिले की मग आपल्या समाजाच्या संकुचित मनोवृत्तीची जाणिव होते.

हल्ली मला हा एक चाळाच लागलाय. कुठेही काहीही पाहिलं की ते डोक्यामधे असं रजिस्टर होतं. २-३ दिवसा पूर्वी, कशाला, टु बी प्रिसाइझ रविवारी,  मी आणि बायकॊ दोघंही मार्केट ला गेलो होतो. ऍज युजवल पार्किंग मिळालं नाही, म्हणून सौ. ला म्हणालो, तू उतर आणि काय आणायचं ते आण, मी इथेच गाडीत बसतो.

सहज शेजारच्या हार्डवेअरच्या दुकानाकडे नजर टाकली, आठवलं, पडद्याचे रिंग्ज पण घ्यायच्या आहेत.शेजारीच एक धोपटी घेउन कटींग वाला न्हावी बसला होता. एकाची दाढी करित. हो…. मुंबईला पण असे न्हावी रस्त्यावर बसलेले दिसतिल तुम्हाला. म्हंटलं, ह्या न्हाव्याने नविन ब्लेड वापरले असेल कां? की ते एकच ब्लेड ४-५ लोकांना वापरत असेल? काय करावं? काहिही न करता गाडीमधे किशोरी आमोणकरांची नविन सिडी ऐकत बसलो….एका सभ्य मराठी माणसाने करावे ते केले.. आपल्याच दुनियेत मश्गुल झालॊ.

मला माहीत  आहे, तुम्हाला हे सगळे माझे मनाचे खेळ म्हणजे एक वेडेपणा वाटत असेल. पण खरंच .. अगदी देवा शपथ सांगतो.. मला एकच गोष्ट माहीत आहे ती म्हणजे.

“माणसाचं मन म्हणजे कसं असतं? “अ ड्रंकन मंकी स्टंग विद द स्कॉर्पियो..”

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

19 Responses to एक्स्ट्रॉ मॅरिशिअल सेक्स आणि एड्स अवेअरनेस

 1. milindarolkar says:

  आपण एड्स साठी काम करणा-या NGOच्या कार्यपध्दती बद्दल लिहिलं आहे ते योग्यचं आहे. पण खरा प्रकार अजून भयानक आहे. यापैकी बहुतांश NGO चर्च मिशन संबंधी ग्रुप चालवतात. त्यांना बाहेरून फंडींगही मिळते. या NGO आधी एड्स ग्रस्ताचा त्रास अधिक वाढेल अशी ऒषधं देतात. त्याला असह्य झालं की येशूचं नाव घे, येशूची प्रार्थना कर असं सांगून योग्य ती ऒषधं देतात. याचा परिणाम हा होतो कि येशूच्या नावानेच हा चमत्कार झाला हे रोग्याच्या गळी उतरवणं सोपं जातं. त्यातून त्याचं धर्मांतर सहज करता येतं…हा प्रकार या NGO मध्ये काम करणा-या मित्राने सांगितलाय…..

 2. fanfare says:

  Leave alone the barber on the roadsise- Women/men going to beauty parlors/ salons for manicure/ pedicure need to be careful. These procedures involve scrubbing of feet/ using some hard surfaced ‘polishing’ instruments. A very valid chance of infected transfer exists.

 3. sanjay jawale says:

  In this india there is no information about aids.NGO & Govt.will awareness to village peoples

  • संजय
   आपले मत अगदी योग्य आहे. जेंव्हा मुंबई सारख्या महानगरात पण लोकं असे निष्काळजी पणे वागतांना दिसतात की बरेचदा इथे तरी अवेअरनेस आहे की नाही असा संशय येतो. एड्स हा एक अतिशय जिवघेणा आजार असुनही आपल्यादेशात अगदी टूकार जाहिराती- जसे कंडोम कब कब – यौन संबंध जब जब.. अशा लागलेल्या दिसतात. त्यामुळे कंडॊम वापरला की झालं एड्स होत नाही अशी मनोवृत्ती तयार होते- जी पुर्णपणे चुक आहे. .

 4. deven phadnis says:

  good artical also my religion is marathi plz. send me detail about adis

 5. sourabh says:

  @sanjay
  what you mean by IN THIS “INDIA” ??? We are also a part of country. If that was not intentionally then OK. Otherwise RETHINK over it.

  • सौरभ

   फार जूनी पोस्ट आहे ही, कदाचित संजय पुन्हा येऊन पहाणार पण नाही इथे.. 🙂
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार. 🙂

 6. MAHADEV MANE says:

  यामध्ये एड्सची बरीच कारणे नाहीत
  MANE MAHADEV

  • महादेव
   प्रतिक्रियेसाठी आभार.. उरलेली कारणं तुम्ही पण इथे कॉमेंट मधे लिहू शकता…. 🙂

 7. laxmi says:

  chan ahe

 8. WAGHMARE UTTARESHWAR says:

  THANKS YOU PROVIDE A GOOD INFORMATION FOR SOCIETY

 9. sarika says:

  एड्सबद्द्ल एवढा कधी विचारच केला नव्हता…खूप माहिती मिळाली…पण हे सगळं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे…

  तेव्हाच सावधगिरी बाळगली जाईल…

 10. manoj says:

  thanks for ur blog , you r right , i also think always this way…

 11. prashant says:

  thanks for informeation

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s