स्त्रियांना खरंच काय हवं असतं??

खरंच.इतका गहन प्रश्न आहे की  या विषयावर बरीच पुस्तके प्रकाशित झालीत, बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रथितयश  लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत या विषयावर. पैसा, प्रसिद्धी, नोकरी, यश, कीर्ती, प्रेम- काय हवं असेल बरं स्त्रियांना??

असं म्हणतात की स्त्रियांना काय हवं आहे हे शोधायला मार्कंडेय ऋषींचं आयुष्य पण पुरणार नाही.तरी पण ह्या लहानशा आयुष्यात शोधायचा केलेला प्रयत्न!

संध्याकाळी आम्ही सगळे म्हणजे सौ, मी आणि धाकटी मुलगी मार्केटला  गेलो होतो. मोठी मुलगी तर टाळते आजकाल आमच्या बरोबर ( म्हणजे आई बाबांबरोबर) बाहेर यायला. म्हणते आम्ही आता लहान राहिलो नाही, तुमच्या बरोबर, किराणा किंवा भाजी आणायला.

हीच गोष्ट पूर्वी दोघींना पण खूप आवडायची. किराणा खरेदी म्हणजे तर सगळ्यात आवडतं काम. डी मार्ट च्या दुकानात गेल्यावर इकडे तिकडे धावा धाव,किंवा तार स्वरात किंचाळून विचारणे.. आई… आपल्याला मटर पनीर घ्यायचं आहे कां रात्री साठी? किंवा केलॉग्ज कुठला फ्लेवर घेऊ गं? जर दोघींना पण डिसीजन पॉवर दिली असती , की तुम्ही तुमच्या आवडीचा फ्लेवर घ्या, तर मला खात्री आहे दररोज आम्हाला केलॉग्ज चोकोज, खावे लागले असते आणि जेवणात मटर पनिर ची भाजी :)

चॉकलेट म्हणजे जीव की प्राण आहे मुलींचे..”ग्रूव्ह” सुरु झालं, गोरेगावला. आम्ही एकदा तिकडे गेलो होतो. त्या दिवसात एक नवीन कन्सेप्ट आला होता. “हरेक माल दस रुपये” च्या धरतीवर -डॉलर शॉप, म्हणजे हरेक माल ४९ या ९९ हे दुकान सुरु झालं होतं. त्या दुकानात प्रिंगल्स वेफर्स आणि त्रिकोणी चॉकलेट टॉब्लेरॉन मिळणे सुरु झाले होते.पूर्वी आठवतं ही चॉकलेट्स फक्त कोणि अमेरिकेहुन किंवा इंग्लंड हुन येणार असेल तरच मिळायची .पण आता भारतामधे सगळंच मिळतं. तर ह्या दुकानात गेलो की कमित कमी ३००-४०० रुपये खर्च व्हायचे .या दुकानात जायला तर मुली कधिही तयार.  मी तर शक्यतो टाळतोच हे दुकान.पण हल्ली ह्या दुकानात जायचं म्हंटलं तरिही मुली नाहीच म्हणतात.

मुलींच्या आवडीनिवडीतला हा बदल, तर सुरुवातीला पचवणे जरा जडच गेले. अहो, ज्या मुली तुमच्यावर संपुर्ण अवलंबून हो त्या, त्या आकस्मित पणे स्वतःचे व्यक्तित्व वेगळे मेंटेन करण्याचा प्रयत्न करतांना बघून , कधी बरं वाटायचं… तर कधी एकटे पणा वाटायचा.

बरं मुलींनी येत नाही म्हंटलं की मग मला राग येतो. केवळ बाबांना राग येतो म्हणून काही वेळेस त्या दोघीही  आमच्या बरोबर येतात. परंतु त्यांची  बॉडी लॅंग्वेज इतकी बोअर झाल्यासारखी असते, की मलाच  गिल्टी वाटायला लागतं.

अजुन ही कुठल्याही दुकानात मी आणि सौ. गेलो तर (मुलींना घरी ठेवून) तर खुप चुकल्या सारखं होतं. धाकटी पण आता मोठीच्या पावलावर पाउल टाकुन बरोबर यायला नाही म्हणते. एखाद्या मैत्रिणीने बघितले आई बाबांसोबत फिरतांना तर मग कित्ती प्रॉब्लेम नं??असं जेंव्हा ती म्हणाली तेंव्हा आमच्या लक्षात आलं, की त्या दोघी मोठ्या झाल्या आहेत ’ऍंड नाउ दे निड देअर ओन स्पेस…ऍंड इफ, ऍट धिस जंक्चर  वी मस्ट अलाउ देम टु डेव्हलप देअर ओन पर्सनॅलिटी, वी मस्ट अलाउ देम टू टेक देअर ओन डिसिजन्स टू सम एक्स्टेंट..ऍट लिस्ट इन सच स्मॉल  मॅटर्स.. लुज द ऑर एल्स दे मे लुज द सेल्फ एस्टिम .…

हा सृष्टीचा नियम आहे. मुलं तरुण होणार – आपण म्हातारे होणार!

आता, जाणवतंय की , सौ. ला चांगली हूशार आणि शिकलेली असतांना पण मुली लहान आहेत, आणि मला टूरला जावं लागतं, म्हणून मी नोकरी करू दिली नाही. मुली मोठ्या झाल्यावर फार एकटेपणा वाटतो, ह्या सबबीवर वयाच्या ४२ वर्षानंतर तिने घराबाहेर जाउन नोकरी सुरूकेली. केवळ माझी इच्छा म्हणून, मुलींकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून,  तिने सगळं मान्य पण केलं.स्त्रियांना तसंही आयुष्यात बरंच कॉम्प्रोमाइझ करावं लागतं.

मला असं वाटतं प्रत्येक घरामधे निर्णय पुरुषच घेतात. बरेचसे निर्णय एककल्ली पण असतात, परंतु निर्णय घेतांना स्त्रियांना पण तुम्हाला विचारुन सगळं काही करतोय , असं भासवण्याचा पुरुष वाकबगार असतात. 🙂

वरचा हसरा स्माइली बघून , तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला हसू येइल, आणि तुम्ही स्त्री असाल तर राग येइल.. खरं की नाही??पण हीच  परिस्थिती थोड्या फार फरकाने सगळी कडे आहे.

बरं शेवटी पुन्हा एकदा मोठ्ठा प्रश्न!. …..सगळ्यात मोठा प्रश्न.. स्त्रियांना काय हवं असतं?

इव्हन १३-१४ वर्षाची मुलगी सुद्धा   स्वतःच्या जीवनावर ,स्वतःच्या निर्णयावर ताबा असावा, अशी अपेक्षा करते..  आणि म्हणून मला असं वाटतं की हेच खरं उत्तर आहे ह्या प्रश्नाचं…. स्त्रियांना  फक्त एक गोष्ट हवी असते ती म्हणजे स्वातंत्र्य! “स्वतःच्या  जीवनावर स्वतःचा ताबा” & “स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची इच्छा शक्ती!”

हो इच्छा शक्ती ह्या साठी म्हणतोय की सध्या ती इच्छा शक्ती अजिबात शिल्लक राहिलेली नाही . . काहीही निर्णय घ्यायचा असेल तर, थांबा हं!! ह्यांना विचारुन सांगते .. मग ती ऑफिस ची पिकनिक असो की एखादी लहानशी गोष्ट विकत घ्यायची असो..!

.“स्वतःच्या  जीवनावर स्वतःचा ताबा” & “स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची इच्छा शक्ती!”म्हणून म्हणतो ह्या दोन गोष्टीच स्त्रियांना हव्या असतील आजच्या जगात असे मला वाटते.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged . Bookmark the permalink.

11 Responses to स्त्रियांना खरंच काय हवं असतं??

 1. bhaanasa says:

  kaahI disat naahI. gadbad aahe.

  madat havi aahe-blog dhwajankit zaala aahe. Adhwajankit kasa karaycha? khoop praytna kela pan jamat nahi.

  thanks.

  • मला तर बरोबर दिसतंय सगळं. मी आत्ताच तुमचा ब्लॉग वाचला. काहीच प्रॉब्लेम नाही.

 2. मुक्ता says:

  हा विषय तसा vague आहे.
  स्त्रीला पीता,पति,पुत्र,बंधु आणि समाज ह्या सगळ्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा असतात.
  त्या बहुतांशी एका पुरुषाला आपल्या आई,पत्नी,पुत्री,बहिण आणि समाजाकडुन ज्या अपेक्षा आहेत त्याच प्रमाणे असतात.

  थोडक्यात स्त्री वा पुरुषांचे दोन प्रकार असतात आणि त्यानुसार त्यांच्या काय हवे काय नको ह्याची वर्गवारी आपण करु शकतो.
  १. जे आहे त्यात समाधानी असणारे
  २. जे आहे त्यात असमाधानी असणारे

 3. fanfare says:

  About decision making/ icchshakti: I really think both mean and women need some kind of ‘sounding board’ when they say something like ” I will consult him/ her ” before making the decision. it is not so much a matter of ‘permission’.

  As for liberty ‘swtantrya’ whatever we see in urban india is mostly because of the need for women to take a equal share in terms of economic responsibilities. PLUS and IMPORTANT – what they do is in addition to their traditional roles, and not SUBSTITUTIONAl, so it is so much easier on the men if women are liberated:-))they do everything your mothers/ grandmothers did at home plus they do everything that men can do in offices/ workplaces and earn money..

  Unless you are a control freak, there is indeed very little reason for men to accept this kind of liberation deal right??

  Some men have a good intention- they think that it is too much of work to do both the roles – and insist that women do only their traditional roles. but I seriously wonder if this is a pragmatic choice these days, what if the man is not able to continue to work / gets fired for example, and the family needs to eb supported? And by then her ( wife’s) resume is so rusted thta she cannot take up anything decent outside of home? Things are so speedy these days, knowldege gets obsolete very fast.
  It is not correct on our part to stop women from pursuing their careers, we need to provide the support system.

 4. fanfare says:

  Apologies, A correction:

  I said :
  “Unless you are a control freak, there is indeed very little reason for men to accept this kind of liberation deal right??”

  I actually meant :

  Unless you are a control freak, there is indeed very little reason for men to REJECT this kind of liberation deal ; right??

 5. .“स्वतःच्य जीवनावर स्वतःचा ताबा” & “स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची इच्छा शक्ती!”म्हणुन म्हणतो ह्या दोन गोष्टीच स्त्रियांना हव्या असतिल आजच्या जगात असे मला वाटते.

  अनुभवातुन लिहिलेलं दिसतयं एकंदरीत मी सहमत आहे …. हां… मला ही असं वाटतंय…
  पण खरं सांगु – तुम्ही “अगं बाई, अरेच्चा!” सिनेमा पहिलाय का? …. एकदा तरी तशी शक्ती मिळाल्याशिवाय [.. ही ही ही ] पुर्णतः सांगणे कठीण आहे.

  • हो, अनुभवातुनच शिकतो आपण. आणि आपले विचार नेहेमी बदलू शकतात. आज जे बरोबर वाटतं, तेच उद्या चुकिचे वाटते.
   अगबाई अरेच्च्या.. माझा फेवरेट चित्रपट आहे तो. अगदी मनापासुन आवडलेल्या सिनेमांपैकी आहे तो. मराठी मधला डॊंबिवली फास्ट आणि हा अगबाइ… इज द बेस्ट..

 6. Sanchita says:

  स्रि…….. ह्या शब्दाचा फक्त आधार हि खुप मोठ्ठा आहे. तिला काय हवे आहे काय नको यापेक्षा तिच सुख कशात आहे, हेच गरजेच. सुखाची व्याख्या खुप मोठि नसति किँवा त्याला व्याख्याच नसावि.

 7. tejali says:

  100% right conclusion..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s