जय हो!! ए आर रहमान जय हो!! आणि पिंकी फायनली स्माइल्ड!ऑस्कर फिव्हर…

आज महाशिवरात्र. शाळांना सुटी. तरी पण सकाळी ६ चा अलार्म लाउन माझी ९ व्या वर्गातली  मुलगी  सकाळी  उठली, तेंव्हा मला जरा आश्चर्यच वाटले, विचारलं, काय ग, क्लास आहे का? पण माझ्याकडे तिने कुठल्या ग्रहावरचा प्राणी आहे हा अशा नजरेने पाहिलं आणि  पण घाई घाई ने फ्रेश होऊन जेंव्हा परत आली आणि टिव्ही समोर बसली आणि   टिव्ही सुरु केला.  म्हणजे ही  सगळी घाई फक्त टीव्ही पहाण्यासाठी होती तर!!

टीव्हीच्या पडद्यावर ’ऑस्कर च्या बाहुली’ सोबत इंग्रजी ८ , आणि समोर १ चा  चा आकडा दिसला ,म्हणजे ८१ ऑस्कर अवॉर्ड्स…, तेंव्हाच लक्षात आलं- सुट्टीच्या दिवशी पण लवकर उठण्याचं कारण पण समजलं!

आज ऑस्कर  विजेता चित्रपट कुठला   ते डिक्लीयर होणार. बरेच ओळखीचे ( फक्त चेहऱ्याने बरं, एकाचेही नांव लक्षात रहात नाही माझ्या इंग्रजी चित्रपट पहातांना..) अभिनेते ऑडियन्स मधे दिसत होते. अगदी फुल्ल कोरम म्हणा ना हवं तर. माहौल  एकदम इलेक्ट्रिफाइंग … ( याला मराठीत काय म्हणायचं बरं?)

ऑस्करला  नामांकन झाल्या पासून स्लमडॉग मिलिओनियर हा एकदम लाइम लाइट मधे आला. इथे बऱ्याच संस्थांनी, आणि व्यक्तींनी व्यक्तीशः ह्याचा विरोध केला. अभिव्यक्ती चे स्वातंत्र्य , वगैरे गोष्टींचा उहापोह नेहेमी प्रमाणेच झाला. अर्थात , हे माहीत होतेच- की ह्या सगळ्या गोष्टींचा काही एक फायदा होणार नाही. फक्त निषेध नोंदवून स्वतःला प्रकाशात  चमकवून घ्यायचं कामं पण व्यवस्थित करुन घेतलं. भारता मधे पण हा चित्रपट सेन्सॉरकडून एकही कट न सुचवता प्रसिद्धीचा परवानगी दिली, ह्यातच सगळं काय ते आलं.

आजही आफ्रीका म्हंटलं, की डोळ्यापुढे जे चित्र  उभं रहातं .. तसंच.. भारताचं पण होणार आहे लवकरच.. स्लमडॉग सुपरहिट झालाय अमेरिकेत, त्यामुळे भारत म्हंटलं की मग ज्या लोकांनी भारत पाहिलेला नाही, त्याच्या डोळ्यापुढे कुठले चित्र उभे राहिलं?

भारतामधल्या पॉव्हर्टी चा अशा प्रकारे उपयोग करुन घेणे कितपत योग्य? हा प्रश्न निराळा.  माझ्या मते , फाटलेल्या कपड्या मधे बोटं घालुन तॊ फाटलेला भाग अजुन मोठा करुन  आणि फक्त हीच रिऍलिटी आहे म्हणुन दाखवणे .आणि मग त्याला एक सुंदर सोशल चित्रपट नावाचे जरतारी ठिगळ लावुन मल्टीप्लेक्स मधे ही पॉव्हर्टी पॉपकॉर्न  खात आणि कोला पित एंजॉय करणं – त्याचं बाजारीकरण करणे -हे योग्य आहे कां?

अशा चित्रपटामुळे आणि भारत विषयक बातम्या ( गारुडी, नंगे साधू, कुंभ मेळा, हत्ती, उंटाच्या गाड्या ) हाच खरा भारत आहे म्हणुन पोर्ट्रेट केलं जातं . ह्या मुळे परदेशात रहाणाऱ्या भारतियांचे त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरेमधे किती डीव्हॅल्युएशन होतं ते इथे भारता मधे रहाणाऱ्यांच्या लक्षात येणार नाही.

असो.. आत्ता पर्यंत भारतामधे सकाळचे १० वाजले आहेत. अजुनही सगळॆ अवॉर्ड्स डिक्लिअर व्हायचे आहेत. पण जितके काही डीक्लिअर झालेत, त्या मधे स्लमडॉग हा क्लिअर स्विप.. दिसतोय.

भारताच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे ए आर रहमान आणि गुलझार ला मिळालेले अवॉर्ड . ही दोन्ही अवॉर्ड्स इंडीव्हिज्युअल अचिव्हमेंट्स ह्या सदरात मोडतात . आणि त्याकरता भारतियांना अभिमानच वाटेल.अर्थात काही ठिकाणि हे पण डिस्कशन सुरु आहे की रहमानची ही बेस्ट कलाकॄती आहे का? पण जे काही असेल ते असेल.. ही कलाकॄती रहमानची बेस्ट असो किंवा  नसो.. हिच कलाकृतीजगभरातिल कला क्रीटिक्सनी सामुहिक दृष्ट्य़ा वन ~ऒफ द बेस्ट म्हणुन ऍकनॉलेज केली आहे.

बेस्ट लिरिक्स.. म्हणुन जागतिक पातळिवरच्या ऍक्सेप्टन्स ने गुल्जार ह्यांना पण एका वेगळ्या पातळिवर नेउन पोहोचवले आहे.  आता जावेद अख्तर ह्यांच्या प्रमाणे मेडिया सॅव्ही नसल्यामुळे भारतामधे ह्या गुणी गितकाराच्या शब्दांची खरी ओळख पटली नव्हती. पण अजुनही वाटतं ’आंधी ’ मधली गाणी एकदम सुपर्ब होती ह्यांची.तेंव्हा रहमान आणि गुलजारचे मनःपुर्वक अभिनंदन.

ह्या सोबतच डॅनी बॉयल ला पण बेस्ट डायरेक्टरचे पारितोषक मिळाले आहे.इतरही नॉमिनेशन्स मधे स्लम्डॉग ला बरिच पारितोषकं मिळाली आहेत.
बेस्ट अडाप्टेड स्क्रिन प्ले,बेस्ट पिक्चर,बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ओरिजल स्कोअर,बेस्ट एइईटींग, बेस्ट साउंड मिक्सींग,  हे सगळे अवॉर्ड्स मिळाले ह्या चित्रपटासाठी.

ह्या सगळ्यावरुन एक गोष्ट सिध्द होते, की जो पर्यंत चित्रपट हा मेन स्ट्रिम सिनेमा म्हणुन नॉमिनेट होत नाही, आणि अगदी ग्रास रुट लेव्हलला जाउन अमेरिकन ऑडीअन्स जो पर्यंत ऍक्सेप्ट करित नाही , तो पर्यंत ऑस्कर मिळवणे शक्य नाही.

या पुर्वी पण लगान नॉमिनेट झाला होता,तेंव्हा उगिच एक वेडी आशा होती, की एकदा तरी भारतिय चित्रपटाला ऑस्कर मीळेल आणी ही मल्टी बिलियन डॉलर्सची ईंडस्ट्री हॉलिवुड प्रमाणे आपल्या कामाच्या क्वालिटी मुळे प्रसिध्द होईल, पण , तसे होणे नव्हते..

पण आता  डॅनी बॉयलच्या साथिने का होइना पण रहमान आणी गुल्जार ने हे करुन दाखवले आहे.
एकच म्हणावंसं वाटतंय.. जय हो!!!!!
..

डॉक्युमेंट्री सेक्शन मधे ,स्माइल पिंकी स्माइल ला पण बेस्ट डॉक्युमेट्री चं पारितोषक मिळालं आहे..

जेंव्हा पिंकीची डॉक्युमेंट्री ऑस्कर ला नॉमिनेट झाली होती, तेंव्हाच , ह्या विषयावर एक लहानसं स्फुट लिहिलं होतं , ह्याच ब्लॉग वर.. त्याची लिंक इथे आहे..

जय हो!!!!!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s