मुंबई लोकल ऍक्सिडॆंट व्हिडीओ..

रोज लोकलने तुम्ही प्रवास करता. न टाळता येण्यासारखी गर्दी. वेळेत ऑफिस ला पोहोचायचे , लेट मार्क चे टेन्शन, किंवा, कॉलेज ला वेळेत पोहोचायचे. ह्या सगळ्या परिस्थीतीनुसार मधे इच्छा असो वा नसॊ, तुम्ही- आम्ही अशा परिस्थितीमध्ये प्रवास करत असतोच.  कारण,   एकच टेन्शन असतं, वेळेत ऑफिस, कॉलेज ला पोहोचायचं.

बरेचदा, दुपारच्या वेळेस पहाण्यात आलंय, की सगळा कोच रिकामा असतांना बरेच लोक लोकलच्या दारात लटकत प्रवास करतांना दिसतात. नसिरुद्दीन शहाचा मुलगा पण असाच ट्रेन  मधू प्रवास करतांना खाली पडला होता, असं आठवतं…

लोकलच्या दोन्ही बाजुला जे खांब आहेत ते इतक्या जवळ आहेत की तुमची थोडी जरी हालचाल इकडे तिकडे झाली तरीही  त्यामुळे तुम्ही खाली पडू शकता.
हार्बर लाइन च्या बद्दल तर न बोललेलेच बरे. ह्या खांबांच्या व्यतिरिक्त , अनधिकृत झोपडपट्ट्या, त्यांचे पत्र्याचे छत,.( पन्हाळी पत्र्याचे),  तर नेहेमीच प्रवास करणाऱ्यांना एक मोठा धोका असतात.    तसंही एक गोष्ट बरी, की हार्बर लाइन ला अजूनही वेस्टर्न किंवा सेंट्रल लाइन सारखी गर्दी नसते.खरोखरंच इतकी रिस्क घेणं आवश्यक आहे का?
ह्या झोपडपट्ट्यांचे प्रश्न हा नेहेमी साठी एक मोठा डोकेदुखीचा प्रश्न  बनून राहिलेला आहे. . मला आठवतं, की २ वर्षा पुर्वी व्हीटी जवळच्या झोपड्या पाडण्यात आल्या होत्या पण, केवळ २ दिवसानंतर तिथे पुन्हा नवीन झोपड्या तयार होतांना दिसल्या. आपल्या इथे रेल्वे पोलीस बल, नावाचे एक डीपार्टमेंट आहे, खरं तर अनऑथराइझड बांधकाम रेल्वेच्या प्रॉपर्टीवर निर्माण होतांना दिसलं तर  ते थांबवण्याचं   काम  त्यांचंच!!  जे कधीच केलं जात नाही.
[youtube=http://www.youtube.com/watch?v=7zCQDUruF_s]

पण… हेच आर पी एफ चे जवान जेंव्हा अजमल कसाब ने २६/११ ला हल्ला केला, तेंव्हा आपल्या जिवावर उदार होऊन मुंबईचे रक्षण करतांना दिसतात. सांगण्याचा अर्थ हा, की ह्या लोकांमध्ये कॅपऍबलिटीज आहेत, शूर आहेत, म्हणून तर हातात बोअर ३२ ची दुनाली बंदुका घेउन एके ५६ शी लढतांना दिसतात. हा व्हिडीओ बघा.. पटेल मला काय म्हणायचे आहे ते.
[youtube=http://www.youtube.com/watch?v=GrPcSRUFeZs]

एकच आहे, जो पर्यंत, दे आर नॉट सबजेक्टेड टु द टास्क , दे वोन्ट पर्फॉर्म.. थोडं अतिशयोक्ती पुर्ण वाटेल हे स्टेटमेंट.. पण सध्यस्थितीत मला तरी तसेच वाटते..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged . Bookmark the permalink.

1 Response to मुंबई लोकल ऍक्सिडॆंट व्हिडीओ..

  1. सोनु says:

    मला फिरायचे फार कंटाळा येतोय

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s