अडवाणीजी-बाळासाहेब कृपया भांडणं थांबवा..

आज मुंबईला आलेले असतांना अडवाणीजींनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली . पण बाळासाहेबांनी स्पष्ट नकार कळवला.कालच्याच पेपरला बाळासाहेबांनी केलेलं वक्तव्य.. कमळाबाई प्रीतीची.. चा अर्थ मला तरी कळेनासा झाला आहे. एक दिवसा पूर्वी बाळासाहेबांनी एक स्टेटमेंट दिले आणि आजची कृती अगदी त्याच्या विरुद्ध! जर हिंदुत्व वादी मते फुटली तर इलेक्शन चा निकाल काहीच सांगता येणार नाही.

ही भेट नाकारल्या मूळे भाजपाच्या गोटात फार अस्वस्थता पसरली आहे. भाजपा च्या काही लोकांना तसेच शिवसेनेच्या काही लोकांना असे वाटते की, अशा परिस्थितींमध्ये भाजपा ने शिवसेनेशी काडीमोड घेऊनच टाकावा.अर्थात ह्या युतीचा फायदा हा फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई भागातच होतो.

माझं मत असं आहे की  सध्या ,विदर्भ आणि मराठवाड्यातही शिवसेनेचे बळ काही विशेष नाही .मनसेने ऑलरेडी शिवसेनेची आणि कॉँग्रेसची मतं खाल्ली आहेतच. भाजपाची अर्थात संघाची मतं मात्र कुठेही वळणे शक्य होणार नाही.अशा परिस्थिती मधे शिवसेनेला भाजपा चा पर्याय जास्त संयुक्तिक ठरतो. विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा जो, बाळासाहेब नेहेमी  उचलून धरायचे,   त्याच मुद्द्याला तिलांजली देऊन , कसा प्रचार करतील तेच कळत नाही?

आजपर्यंत , हाच अनुभव आहे की हिंदुत्ववादी मते फुटली की कॉँग्रेसची ची जीत होते. पण यंदा, मात्र कॉंग्रेसच्या मतांमधे मनसेने पाडलेले खिंडार, आणि राज ठाकरे ह्यांच्या कडे मराठा मतांचा झुकाव, हा मात्र सगळं समिकरण बदलू शकतो.

तसेच मायावतीचा इफेक्ट विसरता येणार नाही. म्हणजे बहुजन समाज पार्टीची पण एक गठ्ठा मते आहेतच. माझा एक मित्र सांगत होता की , मनसे मधे बरेच मुस्लीम युवकांनी  पण जॉइन केले आहे. तेंव्हा मायावती च्या बसपा ची काही मते नक्कीच मनसे कडे डायव्हर्ट होतील .अशा परिस्थिती मधे इलेक्शन चां निकाल काय आणि  कसा लागेल तेच कळत नाही.

कितीही झालं तरीही, परिवारातील जी मते आहेत , ती मात्र संपूर्णपणे भाजपाच्या पारड्यात पडणार  ह्यात काहीच शंका नाही. शिवसेना+काँग्रेस युती  जर झाली तरीही एक मात्र खरं की कुठलाही भाजपाचा मतदार काँग्रेसला मते देणार नाही, ह्याची मात्र खात्री आहे.परंतु शिवसेनेची काही मते भाजपाला आणि मनसे कडे जातील असे वाटते.

रिपब्लिक पार्टी मधे अजुन ही ५ वर्षा प्रमाणेच लाथाळ्या सुरू आहेतच! अजुन ही राजकीय समिकरण इतकं  सरळ नाही..आपल्या म्हणजे , मतदारांच्या हातामधे वाट पहाण्या व्यतिरिक्त  काहीही नाही…..अजुन एक समिकरण आहे.. भाजप+मनसे.किंवा काँग्रेस+ मनसे…. लेट्स सी.. व्हॉट एल्स वी विल हॅव टु सी इन फ्युचर!

बाळासाहेब आणि अडवाणींना एकच कळकळीची विनंती. कृपया ही अंतर्गत भांडणं थांबवा. आम्हाला धर्म संकटामधे टाकु नका. आम्हाला बाळासाहेब जितके प्रिय आहेत तितकेच अडवाणीजी पण प्रिय आहेत.आम्हाला तुम्ही दोघेही एकत्र हवे आहात.

दोन डॊळ्यांपैकी कुठला डॊळा प्रिय आहे असे विचारले तर? तशीच अवस्था आमची झाली आहे.

अजुन पण  वेळ गेलेली नाही, भाजपा आणि शिवसेना युती ही काळाची गरज आहे.तेंव्हा सगळे रुसवे फुगवे सोडून पुन्हा एकत्र या आणि निवडणुक लढवा हीच आम्हा सगळ्यांची कळकळीची विनंती आहे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged . Bookmark the permalink.

5 Responses to अडवाणीजी-बाळासाहेब कृपया भांडणं थांबवा..

 1. sonalw says:

  आजची राजकीय परिस्थिति आणि समिकरणे सगळीच सत्तेच्या खुर्ची भोवती फिरतात. तत्व आणि मुद्दे हे त्यानुसार बदलायला एकाही पार्टी ला लाज वाटत नाही. शेवटी सत्ता महत्वाची. मग तत्वांचे आणि जनतेचे देखिल काहीही होवो.
  खर सांगायच तर कांग्रेस पासून बदल हवा म्हणुन जनतेने भाजपा ला निवडून दिले. त्यावेळचे वातावरण देखिल धार्मिक मुद्द्यावरून तापलेले होते. मुंबई दंगलिंची background होती. त्यामुले शिवसेना बीजेपी य़ुतीला चांगलाच पाठिंबा मिळाला. पण आता ही युती खरच कालबाह्य ठरू लागली आहे असे वाटते. देशासमोर आणि राज्या समोर कितीतरी प्रश्न उभे आहेत. पण बीजेपी आपल राममंदिर राजकारण सोडायला तयार नाही. त्यांच्या कारकिर्दितहि त्यांनी फारसे काही वेगळे नाहीच केले. वखवखलेल्या भुकेल्या वाघाप्रमाणे भरपूर खावून घेतल.
  त्यांच्यापेक्षा कांग्रेस खरच चांगली. एक परदेशी बाई आपल आयुष्य या देशाला वाहून घेते. या मातीत मिसळून जाते. सम्पूर्ण कुटुंब दहशतवाद्यांची शिकार झालेल असुनही या आगीत उडी घेते या पेक्षा तीचं परदेशी मुळ असण्याची खिल्ली उडावणं हे यांना जास्त महत्वाच वाटत. काय उपयोग? ही माणस फ़क्त धर्माच्या नावाखाली भावनाना हात घालतात आणि मते मिळवतात. बीजेपी इतका स्वार्थी आणि मागासलेला पक्ष मला दूसरा दिसत नही.
  त्यापेक्षा कांग्रेस च्या या ५ वर्षाच्या कारकिर्दीत कितीतरी चांगल्या गोष्टी घडल्यात. अणु-करार ज्या सयमाने मार्गी लावला त्याला तोड़ नही. मंदीच्या खडतर परिस्थित भारत टिकून राहिला याचा खुप मोठा वाटा मनमोहन आणि चिदंबरम यांच्या सक्षम नेत्रुत्वाला जातो. राहिला दहशतवादाचा मुद्दा. तर मी अस म्हणेन की हे कोणाच्याही राजवटीत होण शक्य होत. कारण जिथे सम्पूर्ण system corrupt असते तिथे हे घडणं दिल्लीत कोणाच सरकार आहे यावर अवलंबून नसत.
  ज्या खुबीने प्रणव मुखर्जी यांनी आंतराष्ट्रीय दबावनिती अमलात आणली त्याला सलाम. नेत्रुत्व अस हव. शांत तरीही खंबीर आणि mature. जहाल भाषेत भाषण ठोकून संकट ओढवून घेणार नको.

 2. milindarolkar says:

  खरं म्हणजे भांडण असं नाहीय. दोघं एकमेकाला आजमावताहेत.
  तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना…..असं काहीसं आहे.

  युती होणारंच, कारण…….दोघांनाही (पक्षांना) पर्याय नाहीयेत….

 3. milindarolkar says:

  आपल्या लेखाला जो पहिला प्रतिसाद आलाय, त्यातील विचार फारच वरवरचे आहेत असे वाटते.
  गेल्या साठ दशकांचा विचार करता नेहरूंपासून ज्या चुका आणि मतलबी राजकारण कॉंग्रेस ने केलंय, विशेषत: भारताच्या सीमा सुरक्षा व परराष्ट्र नीती विषयातील चुका आज देशाला महागात पडताहेत.

  राजीव गांधींनी योजनांतील १०% पैसाच लाभार्थी पर्यंत पोहोचतो हे सांगित्ले होते. पण त्यांच्या आधी व नंतरही ही स्थिती बदललेली नाही. आज राहुल तेच सांगत फिरतोय.

  परदेशी बाईने देशाला वाहून घेतले म्हणजे नक्की काय…हा ही प्रश्नचं आहे….असो…हे मनोगत आहे….वादसाठी प्रतिक्रिया नाही….शेवटी आपली देश्भक्त नागरिक म्हणुन जी योग्यता असेल, तसेच सरकार आपल्याला लाभेल….

 4. sonalw says:

  रविवार च्या लोकरंग मधल्या डॉ. बल फोंडके यांच्या लेखाचा कही भाग येथे देत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या सोयीच राजकारण करत असताना, आणि आपल्या गोंधालालेल्या मनस्थिति च फायदा घेवून आपल्याला चक्क फसवत असताना, डॉक्टरां चा हा सल्ला प्रत्येक सदयं मतदाराने नक्की लक्षात ठेवावा.
  ___________________________________________________________
  म्हणूनच सर्व राजकीय पक्षांना उद्देशून आपण दुसरा निर्धार व्यक्त करू शकतो. ‘ज्या उमेदवारावर अनेक खटले चालू आहेत, ज्याला सजा झालेली आहे, ज्यानं निवडून आल्यानंतर संसदेत हजेरीही लावलेली नाही, किंवा लावली असल्यास तिथं मौनव्रतच धारण केलेलं आहे, राष्ट्रीय महत्त्वाचे पाच प्रश्न कोणते, हेही जो धडपणे सांगू शकणार नाही, आज आम जनतेला भेडसावणाऱ्या पाणी, वीज, रस्ते, अन्न, वस्त्र, घर आणि रोजगार यांसारख्या समस्यांची ज्याला माहितीही नाही किंवा ज्याचं वय सत्तरीच्या पलीकडे आहे, अशा कोणत्याही उमेदवाराला आम्ही कदापिही मत देणार नाही.’ किंबहुना अमेरिकेत ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्षपदापासून ते राज्याच्या गव्हर्नर किंवा सिनेटर यांच्यासाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये दोन्ही मुख्य पक्षांचे उमेदवार प्रीलिमिनरीज् म्हणजे निवडणूकपूर्व निवडणुकीच्या प्रक्रियेतून जातात, तशा प्रकारची प्रक्रिया इथं रुजवण्याचा आपण निर्धार करू शकतो. त्यासाठी सर्वच पक्षांना त्यांनी तिकीट देण्यापूर्वी आपला कौल घ्यावा, अशी व्यवस्था आपण करू शकतो. ज्या- ज्या वेळी संभाव्य उमेदवार म्हणून एखादं नाव पुढं येतं, त्या वेळी आपण आपली प्रतिक्रिया ‘होय’ किंवा ‘नाही’ अशा स्वरूपात व्यक्त करू शकतो.
  ती करण्यासाठी आपल्याला रस्त्यावरच उतरायला हवं किंवा एखाद्या परिपत्रकावर सह्य़ा करायला हव्यात, असं नाही. त्यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. वेबसाईटवरच्या ब्लॉगमधून किंवा साखळी ई-मेलच्या मदतीनं घरबसल्या आपण ते करू शकतो. आज युद्धकैदी म्हणून पाकिस्तानातल्या तुरुंगात अमानुष छळ होऊन वीरगती मिळालेल्या आणि तरीही उपेक्षित राहिलेल्या काही सैनिकांच्या वतीनं अशा प्रकारची साखळी ई-मेल धडाक्यानं प्रसारित केली जात आहे. तिला भरघोस प्रतिसादही मिळत आहे. ज्यांना संगणक वापरता येत नाही, अशांना इतर मदत करू शकतात आणि ते शक्य नसेल तर ‘एसएमएस’चा वापरही होऊ शकतो. यासाठी प्रसारमाध्यमेही कळीची भूमिका बजावू शकतात.
  राजकीय पक्ष याची दखल घेणार नाहीत, अशी भीती बाळगण्यात अर्थ नाही. कारण तेही निवडून येण्याच्या शक्यतेवरच उमेदवारी देत असतात. आजवर त्यांनी सरकारी- बिनसरकारी गुप्तहेरांची मदत यासाठी घेतली आहे. त्याऐवजी आपण उघड उघडच त्यांना आपला मनोदय का सांगू नये?
  _________________________________________________________________
  सम्पूर्ण लेख या लिंकवर वाचायला मिळेल.
  http://www.loksatta.com/daily/20090222/lr04.htm

 5. Pingback: राजकारण २०१२ | काय वाटेल ते……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s