तालिबान – शरियत आणि भारत.

तालिबानच्‍या मागण्‍यांच्या पुढे नतमस्‍तक होत पाकिस्‍तान सरकारने स्वात खोऱ्यासह नैऋत्‍य फ्रंटीयर प्रांतात शरीयत कायदा लागू करण्‍याची तालिबानींची मागणी मान्‍य    केलेली आहे.
अर्थात ह्या मान्यतेला अमेरिकेने कशी मान्यता दिली  हेच मला कळत नाही. एकीकडे अमेरिका तालिबानी लोकांशी लढते आहे अफगाणिस्थान मधे आणि त्या पार्श्वभूमीवर ही मान्यता का?? हे लक्षात येत नाही. अमेरिकेला कुठल्याही परिस्थितीमध्ये तालिबान्यांची ताकत वाढलेली नको आहे. तरी पण हा एक पुर्ण प्रांत तालिबान्यांच्या नियंत्रणाखाली देण्याचे प्रयोजन कळत नाही.
या उलट या भागावर अजुन जोरात हल्ला करुन तालिबान्यांना नेस्तनाबूद केले पाहिजे.माझी अपेक्षा अशी होती की अमेरिका आणि पाकिस्तान मिळून त्यांना पळता भुई थोडी करुन टाकतील. पण तसे झाले नाही.
दहशतवाद्यांबरोबर केलेल्या शांती करारास अमेरिकेकडून विरोध केला जात असतानाही या भागातील प्रशासनाने  एका करारावर स्वाक्षरी केली आहे  असे वृत्त वाचण्यात आले आहे. यावरुन एक सिध्द होते, वेळ प्रसंगी आपल्या आकावर पण दात विचकण्याची  हिंम्मत पण   ह्या पाकी कुत्र्यांमधे आहे .
या करारानुसार शरीयत किंवा इस्लामी कायद्यांच्‍या विरोधातील सर्व नियम व कायदे नष्‍ट करण्‍यात आले आहेत. तर याबाबतही संमती करण्‍यात आली आहे, की या भागात सैनिक असतील मात्र दहशतवाद्यांकडून हल्‍ला झाल्‍यासच प्रत्‍युत्तर दिले जाईल.दहशत वाद्यानी हल्ला केल्याशिवाय पाकिस्तानी सैनिक त्यांच्यावर हल्ला करणार नाहीत. म्हणजे असे… बघा एखादा तालिबानी खांद्यावर रॉकेट लॉंचर घेउन जात असेल , तरी पण त्यावर पाकी सैनिक त्याने हल्ला केल्याशिवाय हल्ला करणार नाही..
पाकिस्तान मधल्या स्वात नदी! ह्या नदीचे खोरे म्हणजे अगदी खजियार प्रमाणे पाकिस्तानचे स्वित्झर्लंड समजले जाते. केवळ १५० किलोमीटर वर आहे हा भाग इस्लामाबाद पासून.काय गंमत आहे नाही ? राजधानी पासून केवळ १५० किमी वर पाकिस्तानचे कायदे चालणार नाहीत.
निसर्ग सौंदर्याने नटलेला हा भु भाग म्हणजे पृथ्वी वरील स्वर्गच आहे.इथे काय नाही? पर्वत, हिरवळ, तलाव आणि निसर्ग सौंदर्य सगळं काही आहे इथे. नाही ती फक्त शांतता..कारण इतकं सगळं निसर्गाने दिलं पण सोबत एक शापही दिला.. तो म्हणजे हा  भाग जॉग्रोफिकली जरी पाकिस्तानला जोडला असला, तरीही इतका दुर्गम आहे, की त्या भागामधे तालिबान्यांनी आपले बस्तान चांगलेच जमवले आहे. जो पर्यंत मुश होते, तो पर्यंत ह्या भागामधे २५ हजारच्या वर पाकिस्तानी टृप्स तैनात केल्या गेले होते. पण नंतरच्या काळात ते बरेच कमी करण्यात आले.अजुन ही ट्रुप्स आहेत पण कमी प्रमाणात.
मिंगोरा हे ह्या प्रदेशातील महत्वाचे शहर. संपुर्ण तालिबानी कायदा इथूनच चालवण्यात येइल. कुठलीही केस असेल तरी तिचा निकाल इथेच लावण्यात येइल. हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट, काही नाही. पूर्वी हाय कोर्टांसाठी किंवा सुप्रीम कोर्टासाठी केसेस इस्लामाबादला नेल्या जायच्या. आता ते होणार नाही. ४ महिन्यात निकाल आणी शिक्षा सुध्दा..
 • आणि शिक्षा पण कसल्या डेन्जरस.. दगडाने ठेचून मारणे, बलात्कार प्रुव्ह होण्यासाठी कमीत कमी ५ साक्षीदार उभे करावे लागतील स्त्रीला तरच तो बलात्कार सिद्ध होईल अन्यथा , ऍडल्ट्री खाली तिलाच शिक्षा- दगडाने ठेचून मारण्याची दिली जाईल..
 • कुठलाही खेळ खेळणे हे तालिबान च्या दृष्टीने गुन्हा आहे.
 • इथे आज इस्लामी तालिबानी कानुन लागु करण्यात आला आहे. त्या नुसार, प्रत्येक खटल्याचा निकाल हा ४ महिन्यात लागलाच पाहिजे.
 • चोरी करता हात कापणे वगैरे ह्या शिक्षा तर आहेतच. फक्त एकच प्रश्न आहे, जर एखाद्याचा हात कापला, आणि नंतर कळले की हा माणुस चोर नाही आणि खरा चोर सापडला , तर हे तालिबानी लोक काय करित अस्तील बरं?
 • स्त्रियांनी मार्केटला जाणे हे शरीयत  कायद्या नुसार परमीटेड नाही.स्त्रिया मार्केटला जाउ शकतील पण केवळ मेडिकल ट्रिटमेंट साठी आणि सोबत कोणी पुरुष असेल तरच.
 • ट्रायबल नियमाप्रमाणॆ स्त्रियांनी  केवळ डोक्यावर रुमाल बांधला तरी पण चालायचं , पण आता तालिबानच्या फतव्या प्रमाणे सगळ्याच स्त्रियांना चेहेरा झाकून घेणे / चेहेऱ्यावर   पडदा घेणे कम्पलसरी केले आहे.स्त्रियांनी चेहेरा न झाकल्यास, त्यांचे नाक कापण्यात येइल असे तालिबानी लोकांनी  जाहीर केले आहे .
 • पाकिस्तानी मीडियाने असेही म्हंटले आहे की ह्या मलाकंद भागात  १९९४ पासूनच शरीयत कायदा लागू होता. पण एखादा  निकाल जर विरुद्ध गेला तर पेशा वरच्या हायकोर्टापुढे अपिलही करता यायचं. पण आत्ताच्या नवीन नियमाप्रमाणे पाकिस्तानी कायदे ’शरीयतच्या नियमानुसार दिलेले निकाल’         ( कायदे म्हणायचे कां?)   ओव्हर रुल करु शकणार नाहीत.हायकोर्टाचा रस्ता बंद झाला!!
 • पुरुषांना दाढी ठेवणे हे कम्पलसरी आहे..
 • एकंदर २१ पैकी १६ ट्राइब्ज वर त्यांनी हा तालिबानी शरीयतचा कायदा लागू केला आहे. इतर सुटलेल्या ५ ट्राइब्स वर पण हा कायदा  लादण्यात  येइल.
 • एका शरीयत एक्स्पर्ट च्या म्हणण्यानुसार तस्लीमा नसरीन ला जर शिक्षा द्यायची झाली तर तिला कंबरे खालचा भाग जमिनीत पुरुन, तिला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा द्यावी लागेल.
प्रत्येक वकिलाने शरीयत कायदा हा अभ्यासणे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे , इथे पाकिस्तानचा कुठलाही कायदा लागु होणार नाही. सध्या जे वकील आहेत त्यांनी पण मौलाना कडून शरीयत लॉ चे प्रशिक्षण घेणे कम्पलसरी करण्यात आले आहे.
या भागातील कोर्ट बरखास्त करण्यात आले आहे. जे पूर्वी जुडी शिअरी मधे कामं करायचे , त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे आणि त्या भागातील जज, वकील, सरकारी वकील, ह्या सगळ्यांनी मान तुकवून तालिबानी लोकांचे म्हणणे मान्य केले आहे .
एक कोणी फाजूल्ला नावाचा नेता आहे तालिबानी ! ह्या माणसाने हजारो लोकं मारली आहेत काहीही कारण नसतांना.ह्या भागात  जवळपास ५०० च्या वर शाळा होत्या.   मुलींना शिकणे हराम आहे असे डी क्लीअर करुन त्याने ३०-४० शाळांमधे आणि कित्येक कॉलेजेस मधे ( साधारणतः २०० च्या आसपास) बॉंबस्फोट घडवून आणले . ..केवळ मुली तिथे शिकायला जायच्या म्हणून..
या भागावर पूर्वी बुध्द लोकांनी आणि हिंदु राजांनी राज्य केले पण एकदा गझनी ने सत्ता हाती घेतल्यावर मात्र हा भाग मुस्लिम शासकांच्याच नियंत्रणाखाली राहिला. ह्याच भागात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बौध्द स्तूप, मुर्ती, आणि विहार दिसून येतात ( अर्थात तोडफोड केलेल्या अवस्थेत  )हा भाग १९६९ साली पाकिस्तान मधे सामील झाला.
पाकिस्तानच्या एका भा्गामध्ये आपले बस्तान बसवल्यावर, हळू हळू तालिबानी लोक आपले पाय पसरायला सुरुवात करणारच , आणि हे लोण लवकरच सिंध प्रांतापर्यंत पोहोचणार आहे . खरं तर तालिबान म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तानने निर्माण केलेला एक राक्षस आपल्या पुराणात एक भस्मासुर नावाचा राक्षस होता, त्याची गोष्ट आहे. तसेच हा पाकिस्ताननेच निर्माण केलेला भस्मासुर आता त्याच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला आहे.
तालिबान्यांना आता अफगाणिस्थान मधे काहीच शिल्लक राहिलेले नाही. त्यांना आता दुसरी सरजमीं पाहिजे उजाडण्या साठी.म्हणून हा स्वात चा भाग म्हणजे एक वरदान आहे त्यांच्यासाठी. अफगाणिस्थान मधे अमेरिकन्स सरळ हल्ला करु शकतात. पण इथे सिव्हिल एरियामधे आल्यावर त्यांच्या हल्ल्यावरून नियंत्रण येइल आणि तालिबान्यांना पण सेफ पॅसेज मिळेल. गोरीला युद्धासाठी तालिबान्यांना एक पोषक वातावरण निर्माण केलं जातंय.
असं ऐकण्यात आलं आहे, की इस्लामाबाद पासून केवळ २८ किमी वर तालिबानी पोहोचले आहेत. आणि लवकरच ते कराची, इस्लामाबाद नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करतील. अर्थात, अमेरिकेची आर्मी पाकिस्तानात असल्यामुळे थोडा फार कंट्रोल राहिल(?) अशी अपेक्षा …..अन्यथा आपल्याला पाकिस्तान बरा  म्हणायची वेळ येइल तालिबान्यां पेक्षा…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in तालिबान and tagged , , , . Bookmark the permalink.

8 Responses to तालिबान – शरियत आणि भारत.

 1. Nachiket says:

  या घडामोडी भीतीदायक तर आहेतच पण जगाला हजार वर्षं मागे नेणाय़्रा आहेत..

 2. sonalw says:

  इंडिया टीवी वर २-३ दिवसांपूर्वी याच विषयावर चर्चा चालू होती की अमेरिकेने या गोष्टीला विरोध का केला नाही. त्यांच्या मते बराक ओबामा च याला पाठिंबा आहे कारण तालिबानी लोकांमधे २ गट आहेत. एक फज्ज़ुलाल्लाह च आणि अजुन एक. (नाव आठवत नाही). स्वात मधे शरिया लागू झाल्यास या दोन गटामधले मतभेद अजुन वाढतील आणि ते आपापसातच भांडून मरतील अशी अमेरीकेची नीती आहे. खरे किती आणि खोटे किती हे देवालाच माहित.
  एक मात्र नक्की की ही राजवट उलट्या काळजाच्या मनासंनी चालवलेली आहे. वाचून इतका राग येतो तर तिथे जुलुम सहन करनार्यांचे काय होत असेल? मला तर अस वाटत की तालिबान विरोधी देशांनी(including pakistaan, इंडिया,आणि जे कोणी सामिल होण्यास तैयार आहेत ते ) एक आघाडी उघडून सरळ सरळ युद्ध करावे आणि त्यांना समूळ नष्ट करावे. यात कदाचित काही civilians ना मरावे लागेल पण येणार्या संकटापेक्षा ते परवडेल. गीतेत कृष्णाने हेच सन्गितलय. यदा यदा ही धर्मस्य…

 3. ngadre says:

  फ़क्त काही civilians नव्हे.. लाखो मरतील.. युद्धाने कोणीच जिंकत नाही..

 4. जर बराक ओबामा केवळ ह्या कारणासाठी पाठींबा देत असतिल तर ते कारण फारच तकलादु वाटते. मला वाटतं अमेरिकेला पण दुसरा काही चॉइस नसावा . पाकिस्तानमधला बेस टीकवायचा असेल तर असे काही निर्णय घ्यावे लागतिलच..

 5. ashok says:

  TALIBAN LA NAST KARNYASATHI AMERIKANE BHARTA BAROBAR SAHAKARY DYAVE GHYAVE

 6. rajesh thombare, Chalisgaon says:

  taliban madhun amerikeche sainya maghari bolavinachi prakriya purna hot asali tari tyane dahsadwad kharach modun nighel kay? Itihasachi pane chalta to adhik ugra rup dharan karel ase diste…..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s