१२वी ची परिक्षा..

उद्यापासून १२वी ची परीक्षा सुरु होणार . माझी मोठी मुलगी यंदा १२ वीत आहे. तसा वर्षभर अभ्यास आणि क्लासेस सुरू असल्यामुळे तिला अजिबात टेन्शन नाही परीक्षेचे.  नुकत्याच भवन्स मधे झालेल्या प्रीलिम्स मधे ९७ ट्क्के मार्क्स आल्यामुळे कॉन्फिडन्स चा अगदी ओव्हर कॉन्फिडन्स झाला आहे. आज दिवस भर कुठल्या ना कुठल्या मैत्रिणीशी बोलणं सुरु आहे. अभ्यासाच्या नावाने बोंब आहे नुसती.दुसरी गोष्ट म्हणजे , तिचं म्हणणं ह्या १२वी च्या परीक्षेला काहीच अर्थ नाही. सिईटी चा अभ्यास जास्त केला पाहिजे. तरीही , १२वी मधे पण बरे मार्क्स मिळतील म्हणते..

हल्ली इंजिनिअरींग कॉलेजेस अगदी मश्रुम प्रमाणे झालेले आहेत. महाराष्ट्रामधे कमीत कमी १००० तरी असावेत कॉलेजेस. पुर्वी आमच्या वेळेस इंजिनिअरींग ला गेला म्हणजे हुशार मुलगा समजला जायचा. संपुर्ण महाराष्ट्रामधे फक्त ७ इंजिनिअरिंग कॉलेजेस होते. बी एस सी भाग १ नंतर ऍडमिशन दिली जायची . बरं ऍडमिशन पण साधारणतः ४८ ते ५२ टक्क्यावर बंद व्हायची .

ह्या नवीन उघडलेल्या कॉलेजेस मुळे बाकी एक बरे झाले आहे. कसेही केले तरी इंजिनिअरींग ची ऍडमिशन पक्की. तिला मी इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन घे म्हणतो आहे. पण आय टी चं खुळ जे डोक्यात आहे ते अजुन तरी कमी झालेले नाही. रिझल्ट नंतर बघू काय करायचे ते.

बरं इतरांना ग्यान बिड्या पाजता पाजता ( म्हणजे १२ वी नंतर काय करायचं?) स्वतःच्या मुलीवर वेळ आली तर जरा गोंधळल्या झाल्यासारखं वाटतंय. होतं काय, की आपण कितीही सांगितलं तरीही हल्ली मुलींचा कन्सेप्ट एकदम पक्का फॉर्म झालेला असतो. मी तिला सांगतोय की बेसिक इंजिनिअरींग चा विषय म्हणजे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स  किंवा इन्स्ट्रुमेंटेशन घे.. पण आय टी एके आय टी – हाच पाढा म्हणते आहे ती..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in परिक्षा.. and tagged , , . Bookmark the permalink.

10 Responses to १२वी ची परिक्षा..

 1. sonalw says:

  Best of luck!!! to her and to you too :)!

 2. YD says:

  Mazya babancha pan same 2 same funda hota – basic engg ghe mhanun…pan me BE comp varach adalo hoto 🙂

  Thodya varshanee comp pan basic engg vatel ho 🙂

 3. ब्लॊग खुपच सुन्दर आहे. मलाही अगदी मनातले लिहील्यासारखे वाटते. असे्च लिहीत जा.
  विषय निवडणी सुन्दर , त्या्मुळे वाचायला मजा येते.

 4. ngadre says:

  All the best wishes for her..

  Nachiket

 5. Dhanyavad Nachiket, sonal 🙂

 6. Milind says:

  “हल्ली इंजिनिअरींग कॉलेजेस अगदी मश्रुम प्रमाणे झालेले आहेत.”- ekdam maarmik!
  “बेसिक इंजिनिअरींग” he mi paN nakkich suggest karen- mazya anubhavanvarun alet tyanusar 🙂

 7. bhaanasa says:

  I hope you both are doing good.:) Very Best of Luck to her.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s