क्लासेस, ट्युशन्स, परिक्षा

ह्या १२वी च्या अभ्यासात आजकाल आमच्या सारख्या  पालकांचं कॉंट्रिब्युशन अगदी शून्य असतं , कारण मुलं आपण होऊन अभ्यास करतात. त्यांना अभ्यास करा असे म्हणण्यापेक्षा,   आता बास  झाला अभ्यास… असं  म्हणायची वेळ येत असते.

एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की मुलांना , पूर्वी सारखे टेन्शन नसते परीक्षेचे. कदाचित ह्याचे कारण म्हणजे क्लासेस असावे. वर्षभर अगदी घोटून अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या वेळेपर्यंत अभ्यास पुर्ण झालेला असतो .प्रॅक्टीस पण इतकी केलेली असते की मग त्याचाही कंटाळा येतो.

साहजिकच आहे ना.. ९ वी पासून क्लासेस चं रहाटगाडगं सुरू होतं. ९ वी ची परीक्षा संपली की पुन्हा एक महिना १० वी ची शाळा असते.. चुकलो.. शाळा नाही स्कूल म्हणायचं… ( नाही तर , तुम्ही ना म्हणजे बाबा अगदी च हे आहात……शाळा काय म्हणता? इती धाकटी कन्या , म्हंटलं, का ग? शाळा म्हंटलं तर काय होतं? मराठीत शाळाच म्हणतात ना??) तर काय सांगत होतो,एक महिना शाळा चालते आणि मग उन्हाळ्याच्या सुट्या लागतात, आणि  ताबडतोब क्लासेस सुरू होतात. म्हणजे ९ वी पासून जे क्लासेस चे शुक्ल काष्ठ मागे लागते ते अगदी १२वी पास झाल्या नंतरही अगदी सिईटी ची परीक्षा होई पर्यंत सुटत नाही.

बरं क्लासेस पण जवळपास पुर्ण शाळां सारखेच झाले आहेत. त्यांचं गॅदरिंग, गेटटूगेदर वगैरे सगळं असतं. ज्या क्लासेस मधे मोठी मुलगी ९ वी पासून गेली होती, त्याच क्लासेस मधे धाकटी पण जाते. त्या क्लासेसच्या ऍडव्हर्टायझींग ब्राउशरवर टॉपर म्हणून मोठ्या मुलीचा फोटो आहे, काही दिवस लोकल केबल टिव्ही वर पण फोटॊ यायचा , त्या मुळे ’सीबलिंग रायव्हलरी’ मुळे असेल कदाचित, धाकटी मुलगी म्हणते तिला तो फोटो रिप्लेस करायचा आहे स्वतःच्या फोटोंचे..आणि खूप मेहनत करते आहे हल्ली.

८ वी पर्यंत बरं असतं.. आई ने शिकवलं तरी चालायचं. आमच्या घरी तेवढं बाकी बरं आहे, बायको सकट सगळे जण अभ्यास करित असतात. ( मी सोडून) त्या मुळे मुलींना अभ्यास करा म्हणून कधीच सांगावे लागले नाही. सौ. चा पिएचडी ची “घसाई” सुरु असतेच, सोबत तिचे चरित्रकोशाचे काम.मी एकटा आपला रीकामचोट इंटरनेट वर काही तरी खरडत असतो. कधी ऑर्कुट, कधी फेस बुक आणि हल्ली नवीन खेळ.. ब्लॉग..!.. असो..

आमच्या लहानपणी ट्य़ूशन लावणे म्हणजे कमी पणाचे समजले जायचे.त्या मुलाला ट्यूशन असेल तो पण सगळ्यांच्या पासून लपवून ठेवायचा. तरी पण, आमच्या लगेच लक्षात यायचं, की कोणाला कोणाची ट्युशन आहे ते.कारण अगदी सोप्पं होतं, एखाद्या मुलाचा   गणिताच्या पिरियड ला  हमखास बसणारा  मार थांबला, आणि त्याला जरा जास्त उत्तरं यायला लागली की मग समजायचं की त्याला सरांची ट्युशन लागली आहे म्हणून.जो मुलगा नेहेमी नापास व्हायचा,  त्या मुलाला एकदम गणितात १०० पैकी ९० मार्क्स मिळायचे, की मग समजायचं…. हा ट्य़ुशन वाला…. आणि ट्युशन पण नेहेमी क्लास टीचरची.. बाहेरच्या सरांची नाही.

तसे सर लोकं पण  एखादा बरोबर बकरा पाहून त्याला रोज डॊज द्यायचे , की मग तोच मुलगा घरी जाउन सांगायचा ट्य़ुशन लावून द्यायला आपल्या आई -वडीलांना  .रोजचा मार चुकवायला. किंवा एखादा कोडगा मुलगा सरळ दुर्लक्ष करायचा सरांच्या मारा कडे.

सरांनी मारले तरीही आई वडील काही म्हणत नस्ते. उलट अजुन का नाही मारलं तुला गधड्या? तुला असंच पाहिजे , ’रोज उठता लाथ आणि बसता बुक्की’ आमच्या माय बाईचा आवडता डायलॉग होता हा. आणि आमच्या शाळेमधे आमचे हेडमास्तर ( प्रिन्सिपॉल नाही) माझ्या आईचा सख्खा मावस भाऊ. मग काय सुहास चा मुलगा ना, दे दोन फटके अजुन , असा प्रकार होता.   थांब मी सांगतेच वसंताला ( तिचा भाऊ म्हणजे आमचे हे.मा.).. मग मी तर शाळेतला मार वगैरे घरी सांगणे सोडूनच दिलं होतं. हेच काय कमी होते का तर, अगदी शाळेच्या समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला माझ्या वडीलांचे कॉलेज होते.. म्हणजे काय दुष्काळात तेरावा महिना. असो. विषय माझा नाही, माझ्या मुलींचा आहे…

आम्हाला कधीच ट्युशन किंवा क्लासेस नसायचे जे काही वर्गात शिकवले जायचे तेच सगळं ! स्पेशल काहीच नव्हते. अभ्यासाच्या बाबतीतही एकंदरीत बोंबच होती, ( पण घरी मुलींना सांगतो , की मी खूप अभ्यास करायचो म्हणून , पण आजी आहे ना खरं काय ते सांगायला.. म्हणते तुमचा बाबा अगदी अभ्यास करित नसे तुमच्या एवढा असतांना… पण हुशार होता हो.. म्हणून चांगला पास व्हायचा…    :) )आईला पण पन्नास वेळा सांगितलं , की मुलींना माझ्या लहानपणीच्या खोड्य़ा सांगू नको म्हणून, पण खरं खरं सांगितल्या शिवाय तिला रहावत  नाही.

अगदी मी लहानपणी वर्धा नदी मधे वाहून गेलो होतो, किंवा चिंचेच्या झाडा वरून पडल्यामुळे हात फ्रॅक्चर करून घेतला होता ते अगदी सगळ्या लहान मोठ्या खोड्या सांगत असते मुलींना. अगदी नको नकॊ म्हंटलं तरीही.मी केलेले सगळे उपद्व्याप ती मुलींना सांगत असते. तसेच माझे वडील पण , मुलींच्या बरोबर स्वतः लहान होऊन उग्गीच नसत्या गोष्टी ( म्हणजे माझ्या लहानपणच्या) सांगत असतात.बरं दोघी मुली आता चांगल्या १४ आणि १७ वर्षाच्या घोड्या झाल्या पण अजुन ही आजी (माझी आई) आली की गोष्टी सांग म्हणून मागे लागतात. आणि गोष्टी कुठल्या तर.. म्हणे बाबांच्या.. आणि आजी जवळ तर भरपूर स्टॉक आहे अशा गोष्टींचा..  🙂  मला तर असं वाटतं की माझं लहानपण हे माझ्या पेक्षा माझ्या मुलींना जास्त माहिती असावं..    :) .. पण याच बाबतीत सौ. ची आई मात्र चांगलंच बोलते सौ. बद्दल.. सिन्सिऑरिटी बद्दल , अभ्यास वृत्ती बद्दल वगैरे .. चला कुठे तरी बॅलन्स होतंय ना .. ठिक आहे.

आजकाल क्लासेस लावणे म्हणजे स्टाइल सिंबॉल झाला आहे. माझी लहान मुलगी ८ वी पासूनच क्लास लाऊन द्या म्हणून मागे लागली होती. आम्हीच टाळलं , ९वी पर्यंत. पण एकदा क्लासेस सुरू झाले आणि मग एकदम खुष झाली ती. काय व्हायचं, मोठ्या मुलीचे क्लासेस वगैरे होते, म्हणून तिला जरा जास्त कपडे वगैरे घेतले जायचे, आणि आम्ही मग धाकटी ला  सांगावयाचे, की तुझे पण क्लासेस सुरू  झाले की तुला पण भरपूर कपडे घेउन देउ.  एकदा ९ वी चा क्लास सुरू झाला की मग स्वातंत्र्य संपलं. तुमचं आयुष्यच घड्याळाच्या काट्याशी बांधलं जातं. रोज सकाळी मॉर्निंग शिफ्ट ला शाळा, नंतर दुपार ते सायंकाळ ट्य़ुशन..मग घरी आलं की शाळेचं.. सॉरी.. लक्षातच रहात नाही..शाळेचं  होमवर्क , नंतर क्लासेसचं होम वर्क…. हुश्श!!!!! लिहुन थकवा आला मला…क्लासेस मधे पण प्रत्येक मुलाला किंवा मुलीला एक टार्गेट घ्यायला लावतात आणि तिथपर्यंत    साठी जेवढा  काही  अभ्यास करावा लागेल तेवढा  करायला उद्युक्त करतात.

पण मुलं हल्ली हे सगळं हेक्टीक आयुष्य एंजॉय करतात… क्लासेस.. मैत्रिणी.. पहिल्यांदाच दुसऱ्या शाळेतल्या मुली मैत्रिणी होतात, मग त्यांना पण मजा वाटते. मैत्रिणींचे फोन येतात.. आणि मग……. बाबा, तुम्ही मराठीत का बोलता हो फोन वर माझ्या मैत्रिणींशी?? आता तुम्हीच सांगा,.आपल्याच घरात आपण मराठी नाही तर काय बोलणार? तरीही घरी नियमच करून ठेवला आहे की फक्त मराठी मधेच सगळ्यांनी बोलायचं.. एकमेकांशी.. स्पेशिअली तुम्ही दोघींनी..केवळ मातृभाषा आवडावी म्हणून.(हो ना, नाहितर माझ्यासारखं  धेडगुजरी मराठी व्हायचं त्यांचं पण..) बरं मोठ्या मुलीने तर सरळ, सेकंड लँग्वेज हिंदी घेतली… काय करणार?? म्हणे हिंदी मधे कम्फर्ट लेव्हल जास्त आहे…… काय करणार बोला?

अहो मागच्या शनिवारी तर गंम्मत  झाली. धाकट्या मुलीचं ओपन हाऊस होतं. तेंव्हा ती म्हणाली.. बाबा , आमच्या क्लास मधे सगळ्या मुली म्हणजे माझ्या फ्रेंड्स आहेत ना त्या आपापल्या पॅरेंट्स चं फर्स्ट चाइल्ड आहेत.बरं मग? मी म्हंटलं..


तर म्हणते ,आणि मी सेकंड चाइल्ड आहे ना… म्हणून त्यांचे बाबा आहेत ना एकदम यंग आहेत……. मला हसु आवरत नव्हतं.. अगं, म्हंटलं तुला मी फर्स्ट चाइल्ड कसं करू? तु तर आयुष्यभर सेकंड चाइल्डच रहाणार?? आणि  मला तर यंग होता येणार नाही.. आता काय करायचं?  .. मी येऊ नको का? तर म्हणे नाही हो, तसं नाही…. तुम्ही फक्त केस काळे करा आणि मग या…. जेंव्हा तिची आई रागावली तेंव्हा गप्प बसली.. मुलांची सायकॉलिजी समजणं कठीणच आहे……..
असो.. आमची एवढी हिंम्मत नव्हती बाबांशी बोलायची  ! काळाचा महिमा!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in परिक्षा.. and tagged , , . Bookmark the permalink.

7 Responses to क्लासेस, ट्युशन्स, परिक्षा

 1. sonalw says:

  🙂
  तरी तुमच्या मुली एक generation मागच्या आहेत अस म्हणेन मी ..माझ्या घरात , मित्र मैत्रिणिंमधे मी जी आताची ICSE / CBSE बोर्डाच्या शाळेत जाणारी लहान लहान मूल बघते तेवा धस होत. Competion, मुलांची, पालकांची, मात्रुभाषेशी तुटत चाललेली नाळ आणि एकंदरीत बालपणाची बदललेली व्याख्या अस्वस्थ करते पण तुम्ही म्हणालात तस्..’कालाचा महिमा’ म्हणुन काही गोष्टी अगदी अपरिहार्य ठरतात.
  मी हाच मुद्दा माझ्या blog मधे वेगळ्या प्रकारे मांडलाय. ‘बालपन म्हणजे काय ग’ या नावाखाली. वाचून प्रतिक्रिया नक्की कळवा. जाणून घ्यायला आवडेल.

 2. sonalw says:

  Thanks for your comment on my post. Actually the post I was referring to is on my another blog…mi-sonal.blogspot.com
  Ek query aahe: aadhi mi jeva comments post karayche teva majhya nava barobar majhya blog chi link attached vhaychi. aata hot nahi. as ka? mi nakki kai change kelay profile setting madhe te mahit nahi.
  Pls help.

 3. vishal says:

  “घरी नियमच करुन ठेवला आहे की फक्त मराठी मधेच सगळ्यांनी बोलायचं.. एकमेकांशी.. स्पेशिअली तुम्ही दोघींनी..केवळ मातृभाषा आवडावी म्हणुन.(हो ना, नाहितर माझ्यासारखं धेडगुजरी मराठी व्हायचं त्यांचं पण..) बरं मोठ्या मुलिने तर सरळ, सेकंड लॅंगवेज हिंदी घेतली… काय करणार?? म्हणे हिंदी मधे कम्फर्ट लेव्हल जास्त आहे…… काय करणार बोला?
  “””

  mirvaychya goshti nakkich nahit ya!! chhan lihita aapan.. baki mulinna aaple baba mhatare hotahet yacha sankoch watto..durdaiv aajchya pidhich!! dikhavu pana kade jaast zuku lagliye aamchi hee pidhi!!

  • मिरवायच्या गोष्टी नाहित ही गोष्ट खरी. पण मी जेंव्हा लिहितो तेंव्हा जे मनात येइल ते लिहितो, नंतर काहिही एडीट करित नाही. जे काही लिहिलंय ते लिहितांना माझ्या मनात आलं होतं म्हणुन. जर एडीटींग केलं तर मात्र सगळं स्वतःबद्दल चांगलं चांगलंच लिहिलं जाईल. आणि मला तेच नकोय. मी जसा आहे तसाच इथे पण आहे. प्रतिक्रियेबद्दल आभार..

 4. prajakta sarnaik says:

  article changle ahe

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s