बेल आउट पॅकेज आणि भारतिय

जग म्हणजे एक ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. कुठेही थोडं खुट्टं झालं की त्याचे दूरगामी परिणाम आपल्यावर होतात. जसे जेंव्हा ओबामाने बेल आउट पॅकेज डिक्लिअर केलं, तेंव्हाच  त्याचा मतितार्थ लक्षात आला की ते  आउट आऊटसोर्सिंग रिलेटेड आहे, त्याचा  सरळ परिणाम  हा भारतातल्या  जॉब मार्केट वर होणार हे निश्चित झाले.

जे एंप्लॉइज ऑन साइट होते, त्यांच्या नोकरीचे तसेही प्रॉब्लेम्स झालेले आहेतच.त्यांच्या पैकी बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आणि इतरांच्या जाण्याच्या मार्गावर आहेत.

फिकी चे सेक्रेटरी मित्रा आणि ’स्वामिनॉमिक्स’ वाले ( रविवारच्या टाइम्स मधे लिहितात ते) स्वामिनाथन यांनी कालच्या एका टीव्ही वरच्या कार्यक्रमात   सांगितले की अमेरिकेतून जवळपास २००००आय टी प्रोफेशनल्सना  नोकरी वरून काढून भारतामध्ये परत पाठवण्यात आले आहे , आणि अजुन कमीत कमी त्याच्या चौपट परत पाठवले जाण्याची शक्यता पण  आहे .भारतामधे पण बऱ्याच आय टी  कंपनि  एम्प्लॉईज ना कमी करताहेत.कालच विप्रो ची पण बातमी ऐकली, ७०० लोकं कमी केलेत म्हणून..

ज्यांच्या कडे ग्रिन कार्ड आहे ते लोकं कसंही करून वेळप्रसंगी (कुठलंही )काम करून आपले दिवस काढतील , पण एच १ बी वाल्यांना मात्र परत  येण्याच्या शिवाय दुसरा तरणोपाय नाही..

ओबामांचे स्टेटमेंट की  जर कुठल्याही कंपनीला बेल आउट पॅकेज चा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना तर त्या कंपनीला नोकऱ्या आउट सोअर्स करता येणार नाहीत. मित्रा यांच्या माहिती नुसार अमेरीकेतील जवळपास ९० ट्क्के कंपन्यांना ह्या बेल आउट पॅकेज ( ७००-  बिलियन डॉलर चा ) चा फायदा पोहोचणार आहे.केवळ ह्याच कारणा साठी    अजुन  बऱ्याच भारतीय आयटी प्रोफेशनल्स’ना नोकरी वरून कमी करण्यात येइल, फक्त “कधी?” हेच पहायचं.

ह्या बेल आउट पॅकेज ची कॉस्ट ही प्रत्येक टॅक्स भरणारया अमेरिकन ला ६५०० डॉलर्स पडणार आहे. ओबामाचे स्टेटमेंट अमेरिकेला आर्थिक डबघाई मधून बाहेर काढण्यास नक्कीच मदत करेल असं म्हणतात…..

भारताचे कॉमर्स सेक्रेटरी यांचे म्हणणे तर असे आहे की , जर ह्या बेल आउट  च्या परीणामामुळे फक्त एच  १ बी व्हिसा कमी होणार, आणि भारतीयांच्या नोकऱ्या जाणार  एवढाच  असेल .

सध्या बऱ्याच अमेरिकन्स नॅशनल्स ला जॉब्ज नाहित. त्यामुळे भारतिय लोकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा जसा आपल्या इथे मुंबई ला भैय्या लोकांच्या कडे पहाण्याचा आपला असतो तसा आहे.( थॅंक्स टु स्लम डॉग , न्युज चॅनल्स, बिबीसी.. इत्यादी ज्यांनी भारताची प्रतीमा अशी करण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत) लोकल लोकांना हे सगळे परदेशी एच १ बी वाले लोकं नको आहेत. जर यावर वेळीच अमेरिकन सरकार ने काही ऍक्शन घेतली गेली नाही, तर हेट क्राइम्स मधे नक्कीच वाढ होइल. लोकल लोकांना नोकरिवर घेतल्यावर सहाजीकच होम फ्रंटवर ओबामाला श्वास घ्यायला वेळ मिळेल.

सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे तो बिपिओ वर . भारतामधे तर बिपीओ कंपनिज चे पेव फुटले आहे. दर नाक्यावर बिपिओ कंपन्या दिसतात. लहान लहान शहरात सुद्धा आय़ टी पार्कला सुरु करण्यात आलेले आहेत. सध्या म्हणजे बेसिक  कुठल्याही स्ट्रिम मधे ग्रॅजुएशन केल्यावर एक लहानसं ट्रेनिंग पुर्ण केलं की  बिपिओ मधे नोकऱ्या लागायच्या मुलांना. कमीत कमी १५ ते २५ हजार च्या दरम्यान पगार होता या सेक्टरमधे.ह्या इतक्या वाढलेल्या व्यवसायाचे मार्केट एकदम संपले, तर मात्र भारता मधेपण बेकारी वाढेल.आउट सोअर्सिंग बंद झाले की लाखॊ तरुण जे बिपीओ मधे काम करतात, ते रस्त्यावर येणार. हा सगळा इम्पॅक्ट अगदी एक्स्पेक्टेड आहे.

नुकताच ग्रॅज्युएट झालेला मुलाला किंवा मुलीला जर इतका पैसा हातात आला तर त्याचे तो जशी वाट लावता येइल तशी लावताना दिसतो. माइंड  स्पेस  हा मालाड वेस्टचा भाग. इथे बऱ्याच आयटी कंपन्या आणि बिपिओ ची ऑफिसेस आहेत.  लंच टाइम मधे तुम्हाला अगदी मुली सुद्धा नाक्यावरच्या भैय्या कडे सिगारेटी ओढतांना दिसतील.संध्याकाळी आपल्या मित्रा सोबत किंवा मैत्रिणीसोबत बार मधे किंवा पब मधे.. अशी असंख्य जोडपी दिसतील.जिन्स च्या पॅंट्स कमरे खाली, आतली अंतरवस्त्रं दिसणारी….  तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्हीच दुसरी कडे पहा….

पुर्वी मॅन पॉवर शॉर्टॆज मुळे आयटी प्रोफेशनल्स चे पगार अव्वाच्या सव्वा वाढवुन कंपन्यांनी लोकांना कामावर ठेवले होते. ईव्हन बेंचर्स ला सुध्दा साधारणपणे ३ लाखा पर्यंत पॅकेजेस देण्यात येत होते. पण आता टेक्निकल स्टाफ चा सप्लाय वाढेल ( वाढला आहेच) तेंव्हा आता आय टी क्षेत्रातले पगार कमी होतिल असेही मत त्यांनी व्यक्त केले.पूर्वी जे जॉब्ज हॉपिंग सुरु होते, त्याला आता काही काळ खिळ बसेल. हॉपिंग बंद झाले की मग मात्र थोडीफार स्टॅग्नन्सी येइल पगारामधे. दोन वर्षापूर्वी आयटी कंपनिज मधे पगारतील वाढ ही काही “सो कॉल्ड डीझार्विंग कॅंडीडॆटस” साठी ५०% च्या वर देण्यात आलेली होती. आता, अशी लक्झुरी विसरावी लागेल.

नेमकी हिच परिस्थिती आम्ही पाहिली आहे दुबई ,शारजाह,कुवेत मधे. तिथे पुर्वी चांगला पगार दिला जायचा इंजिनिअर्स ला. नंतर तिथे मल्लू लोकांनी जाउन कमी पैशामधे कामं करण्याची तयारी दाखवली आणि त्याचा सरळ इंपॅक्ट हा जॉब मार्केट वर झाला.(दिवसभर काम केल्यावर काही एक्स्ट्रॉ पैशा साठी हे लोकं अरबी लोकांच्या टॉयलेट्स साफ करायचे काम पण करायचे.) एकंदर भारतियांचे नोकरीच्या बाबतीत गल्फ मधे जे डीग्रेडेशन झाले आहे ,त्या साठी हे मल्लू लोक जबाबदार आहेत असे मला तरी वाटते.

मला एक सामान्य माणुस म्हणून काही प्रश्न आहेत. मागल्या वर्षी आय आय एम मधल्या काही मुलांना एक कोटी रुपयांचे पॅकेजेस ऑफर करण्यात आले होते. हे ऑफर करणाऱ्या कंपन्या या मेनली अमेरिकन कंपनिज होत्या. फक्त आय आय एम मधुन एम बी ए केलं की इतकं ज्ञान वाढतं कां की एकदम १ कोटी रुपये पगार ऑफर करावा? इतका पगार देणं म्हणजे लायकी पेक्षा जास्त पैसा देणं नाही कां?

तुम्ही केवळ आय आय एम मधुन पास आउट झालात म्हणजे काय तुम्ही इतके हूषार झालात का , की तुम्हाला एखाद्या मीड्ल स्केल कंपनीच्या एम्डी इतका पगार द्यावा? खरंच माझी तर बुद्धिच काम करित नाही

हा प्रश्न मला कित्येक दिवस छळत होता. दुसरे म्हणजे इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज मधे नॉर्मल सॅलरी पॅकेज हे साधारणतः २ लाखापर्यंत देण्यात येते ट्रेनिंग पिरीयडमधे..तीच सॅलरी इन्फोसिस मधे २७००० रुपये ट्रेनिंग पिरियड ला होती.दुसरी गोष्ट म्हणजे, या आय टी कंपन्यांना बरे दिवस होते तेंव्हा या कंपन्यांनी आपले खर्च इतके वाढवून ठेवले आहेत( एम्प्लॉई वेल्फेअर साठी, इम्पोर्टेड कॉफि व्हेंडींग मशिन्स, फ्रि कुपन्स इत्यादी.. आता हा खर्च परवडण्या सारखा नाही.इंजिनिअरींग इंडस्ट्री मधे एक बिई मेक झालेला किंवा बिई ईलेक्ट झालेला मुलगा जेंव्हा जॉइन करतो , तेंव्हा त्याला मिळणारा पगार, फॅसिलिटीज  आणि बिई आय्टी, इत्यादी पास करून नोकरीवर लागणारा मुलगा ह्याला मिळणारा पगार ह्या मधे जमीन अस्मान चे अंतर आहे–की होते म्हणु?? कारण आता लवकरच हे अंतर कमी होण्याची चिन्हे दिसताहेत.


असो.. ह्या विषयावर जितकं लिहावं तितकं थोडंच आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , , , . Bookmark the permalink.

12 Responses to बेल आउट पॅकेज आणि भारतिय

 1. Nitin Sawant says:

  अमेरिकेत मंदी आली,
  आता भारतातील प्रोफेशनल्स भारताबाहेरील उद्योगधंद्यामध्ये रस न घेता भारतातील उद्योगावर लक्ष देतील.
  त्यामुळे एक प्रकारे भारताचा फायदाच आहे.

  • नितिन,
   मला असं वाटतं की हे लोक तिथे अवरली बेसिस वर पण कामं करतिल , किंवा, अगदी गॅस स्टेशन वर सुध्दा कामं करायची ह्यांची तयारी असेल.
   इतक्या सहजा सहजी कोणीच परत येणार नाही.. हे मात्र खरं..
   अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

   • sonalw says:

    This could be a blessing in a disguise. But again…shevti hi maanas naailajaane parat yenaar. kahi warshanni stithi sudharali ki punha parat janyacha kahi jan prayatn karnaar. mhanje shevti kaay tar naailaaj mhanun maaydeshi parat yenaar. mhanje swatahchya deshkade laksh detil te dusar koni daarat ubh karat naahi mhanun!! yaatach kaay te aal.

    • Amol says:

     This is the thing I am close to in fact, I m the one whos is thinking of going back right now! Miss/Mrs. ( I dont know ), aamchyatale je parat jat aahet, te nailaaj mhanun nahi.Mostly karan kal pudhe challay aani aayushya titech adkun padlay. Jenva Ethe yet hoto tenva vichar kela hot ki 2 te 3 varshat we will forward OUR life, pan jar te ithe rahun honar nasel tar thambnyat kay arth aahe?.

 2. Sonal says:

  I think it has completed the circle now. it is following the bell curve. Once at the peak and now started declining!
  I think its time now that our government and industrial world (be it IT or other industries) needs to reshape to create more employment / business oppertunities.
  Agriculture is our strength and that has been ignored to quite an extent in last few years especially after IT revolution. Agriculture, alternate energy generation are the two industries where government/industrialists can really research and create ample oppertunities for youth. gamourizing agriculture is very important if young people are to be diverted to this. In last few years people have forgotton about other branches of engineering. Any ENGINEER is a computer engineer now a days. this has to change. Engineers in other fields can be utilized in field of research in Alterate Energy sources. This field is going to be the prime and the most needed in coming future.
  Government has to prepare itself for the in-flow of NRIs, Create business friendly environment for them if some of them wish to be enterperuners, and first and foremost, divert them to other developing cities anyhow. Else all this so-called highly educated doller-rich population will start burdening the metro cities.
  pls pls develope cities other than bombay, banglore, hyderabad, and delhi…create employement oppertunities there in the field of basic infrastructure development to attract enginnering graduates so that the load on these cities will reduce.
  I think its time now to stop depending on US for anything. neither for employment nor for support against terror…Obama government has alreday declared the aid for arms to Pak, inspite of the decision about swat. What more can one expect from such a hypocritic country?

  • Sonal,
   As usual your post is very thorough and well worded. WOnder, i also could not have given better justice to the points covered. Thanks for the comments.
   The alternate Energy source , is normally known as un conventional energy source. Some people are even trying to produce electricity from Bio Gas, Bio Diesels, etc . But the prouction process of Bio gas causes inhurrent damages to the Nature. Leaves lot many carbon foot prints.. which can not be accepted. Further development is required to be carried out in this field.

   • sonalw says:

    Thanks.
    This is where government can create oppertunities for researching the ways these sources can be optimally used with minimum damage. there will be massive requirement of right instruments to produce such energy, right people to do the research etc.
    Ariculture chya sandharbhat raj thakrey ch ek statement far chaan hot: mala maharashtratalya shetila glamour prapt karun dyaych aahe. t-shirt aani jeans madhla educated tarun sheti kartaana disla pahije…

    • राज ठाकरेंचं स्टेटमेंट्स – मग ते कुठलंही असो, अगदी “पहिल्या धारेचं” असतं. ( म्हणजे अगदी कडक!) त्यांचे भाषण अर्थातच घणघणाती असते पण , ते किती व्यवहार्य आहे हे पण पहाणे गरजेचे आहे.
     माझ्या मते हे कदापिही शक्य नाही. मी स्वतः शेतकरी आहे. पण शेतावर कधी गेलॊ होतो ते मला आठवत नाही. मे बी ५ वर्षापुर्वी… की जास्तंच? काही कळत नाही.
     स्वातंत्र्यानंतर जवळपास २ पिढ्या होऊन गेल्या आहेत. प्रत्येक पिढी मधे तिन मुलं ( कमित कमी) म्हणजे तेवढ्याच वाटण्य़ा.. असे तिनदा झाले आहे. आजची परिस्थीती अशी आहे की प्रत्येकी इव्हन ५ एकरापेक्षा पण कमी कोरडवाहु जमिन असते गरिब शेतकऱ्यांकडे ( आत्महत्या करणाऱ्या)
     ही वस्तुस्थिती विसरुन जर सवंग लोकप्रियते करता अशी स्टेटमेंट्स करणं , हा राज ठाकरेंचा नेहेमीचा हात खंडा आहे. ते स्वतः ह्या साठी काय करायचं म्हणताहेत? काही नाही, नुस्तं भाषण करणं सोपं आहे.. पण ते अमलात आणणं महा कठीण कार्य आहे..

     • sonalw says:

      actually he statement ek vision mhanun khup changal aahe. Pan again…Bolan aani karan yaatala samnway ya raajkaarni mansanni kevhach gamawlela aahe. Sagle dole asun aandhle aahet.

 3. तुम्ही लिहिलंय ते एक कटू सत्य आहे ,बऱ्याच लोकांना आवडणार पण नाही ते.. पण इट्स अ फ़ॅक्ट ऑफ लाइफ!

 4. Amol says:

  just randomizing the articles and came acrioss this, now I will explain the situation,
  a B.E.Mech guy now earns more or equal than a guy working in I.T. its all just levelling. I am a Mech and I know I earn more than some of my friends in IT except the ones who were employed way before I graduated.

  • आजकाल बरीच गॅप कमी झालेली आहे. मेक वाल्यांना पण सुरुवातीला २८ हजार दिले जातात..
   पण जर मार्केटींग मधे असेल तरच.. प्रॉडक्शनला अजूनही फारसा स्कोप दिसत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s