आज सकाळचा लोकसत्ता वाचत होतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया चे स्वतःला सर्वे सर्वा समजणारे नेते! यांनी आज जाहीर केले की सगळे धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येउन निवडणुका लढवल्या नाहीत तर आर पी आय ला आपली वेगळी चूल मांडावी लागेल..
मला वाटतं की प्रकाश आंबेडकर , जोगेंद्र कवाडे आदी मान्यवर नेते आता हळूहळू बॅक सिट घेताहेत जे आरपीआय च्या दृष्टीने फार वाईट. .आरपीआय म्हणेज केवळ रामदास साहेबांचाच आवाज ऐकु येतो.आता रामदास आठवले हेच आरपिआय चे पोस्टर बॉय कम सर्वे सर्वा आहे असे वाटते!पुर्वीच्या काळी रासु गवई असतांना या पार्टीला एक वेगळेच परिमाण होते.एक वेगळाच बाज होता या पक्षाला. कुठलेही स्टेटमेंट आले की ते जरा सिरियसली घेतले जायचे इतर पक्षाकडुन. पण आता तसे नाही.
प्राध्यापक जोगेंद्र कवाडेंना एकदा भेटलो होतो. आणि खरंच सांगतो, एखाच्या कॉज साठी स्वतःला वा्हून घेतलेल्या माणसाला भेटल्याचा आनंद झाला. खादीचा शर्ट , शबनम बॅग, आणि वाढलेली दाढी असा विद्रोही साहित्यिकासारखा वेश.. पण विचार संपुर्ण प्रगल्भ..मी आर पि आय शी संबंधित नाही, पण प्राध्यापक कवाडे इज अ ग्रेट पर्सन.. हे माझं वैयक्तिक मत आहे.नामदेव ढसाळ साहेबांनी पण एके काळी गाजवले होते. आता वयोमानानुसार त्यांचेही ईन्व्हॉल्व्हमेंट कमी झाले आहे.
पुर्वी जागोजागी दलित पॅंथर चे बोर्ड जवळपास प्रत्येक झोपडपट्टी मधे दिसायचे.तो पक्ष पण आता इतिहास जमा झालाय. परंतु अजूनही दलित चळवळ पॅंथर शिवाय म्हणजे कुंकवाविणा सवाष्ण असंच वाटते. हा पक्ष म्हणजे मॅनेजमेंटच्या भाषेत एक एस यु व्ही (स्पेशिअल परपस युटीलिटी व्हेसल). एस यु व्ही चे काम पुर्ण होण्यापूर्वीच काळाच्या ओघात नामशेष झालेला पक्ष आहे हा… असो.. काय मीत्रांनॊ पुन्हा एम बी ए चा अभ्यास करतोय असं वाटतं कां? माफ करा, माझी ती इच्छा नव्हती , पण या शिवाय दुसरी उपमाच सुचली नाही.मी कॉलेज मधे असतांना ही पॅंथर चळवळ एकदम जोरात होती. माझे खूप मित्र ह्यात इनव्हॉल्व्ह होते. पण नंतर पुरेसे मार्गदर्शन न लाभल्यामुळे ही तरुणाईची शक्ती बरोबर प्रोपेल झाली नाही असे वाटते.
मायावती बेहेनजींनी पण आता बहुजन वाद सोडलाय असंही मत यांनी व्यक्त केलं.. आता हा बहुजन वाद म्हणजे ( पक्षी :-दलितेतर तिरस्कार वाद = बहुजन वाद ?) नक्की काय? काही गोष्टी वेल डीफाइंड नसतात, त्यातलीच एक ही.
कॉंग्रेस +राष्ट्रवादी ही युती तर मान्य आहे आरपिआय ला, पण राष्ट्रवादी+शिवसेना हि युती जी सध्या अगदी ऑन द टॉप ऑफ ऑल डीस्कशन्स आहे (हिंदुत्ववादी) ती युती कदापी सहन केली जाणार नाही असंही म्हणाले काही नेते, रामलीला मैदानावर.
ह्या सगळ्यामधे आंबेडकरी जनतेला काय वाटते ह्याचा विचार कोणी केलाय की तिचे अस्तित्व नेहेमी प्रमाणे “टु बी कन्सिडर्ड” असंच समजलं जाणार?
“तर आम्ही स्वबळावर १०० जागा लढवु” हे स्टेटमेंट एखाद्या ढाण्या वाघापुढे एखाद्या मांजराने त्या वाघाला घाबरवण्यासाठी म्यांउ करावे असे वाटले.
ढाण्या वाघ जरा घाबरल्यासारखं करेल कां? की मांजरी कडे दुर्लक्ष करेल?