टीम श्रीलंका वर तालिबान चा हल्ला- की जगाला दिलेला संदेश?

2आजचा दिवस इतिहासातला  एक काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल. आज पर्यंत कितीही प्रॉब्लेम्स असले तरीही कुठल्याही खेळाडूवर पाकिस्तानमधे हल्ला झालेला नव्हता.अगदी भारताचे पाकिस्तानशी वाईट संबंध असतांना पण, आणि मागील संपुर्ण मालिका तसेच वन डे मॅचेस भारताशी हरल्यानंतर सुद्धा अशी प्रतिक्रिया नव्हती .   पण आजचा श्रीलंका टीम वरचा हल्ला म्हणजे तालिबानच्या वाढलेल्या ताकदीचा संकेत आहे.

हा हल्ला अगदी सरळ सरळ तालिबानी पद्धतिने केल्या गेला. म्हणजे हल्लेखोरांना आपल्या स्वतःच्या जिवाची काळजी न करता केलेला हल्ला होता हा.खेळाडूंना घेउन कर्नल गद्दाफी स्टेडियम कडे जाणाऱ्या बस जातांना हा हल्ला करण्यात आला. बसवर चारही बाजुने हल्ला केल्या गेला. लिबर्टी मार्केट या भागात बस वर , कारमधून आलेल्या अतिरेक्यांनी ग्रेनेड फेकून अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये श्रीलंकेचे ८ खेळाडू जखमी झाल्याचे वाचण्यात आले.

तालिबान मधे “खेळ” हे  शरीयत विरद्ध असल्याने   हा हल्ला!!!आमचे अस्तित्व तुम्ही केवळ स्वात मधे जरी मान्य केले असले तरिही , आम्ही सर्वत्र पसरलेले आहोत हा मेसेज अगदी “लाउड आणी क्लिअर” देण्यात तालिबान यशस्वी ठरले आहे.

स्वात मधे शस्त्र संधी केल्यानंतर इतरत्र पाकिस्तानमधे हल्ले वाढणार हा कयास होताच. पण इतक्या लवकर आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ला होईल असे वाटले नव्हते.

एक दोन दिवसांपूर्वी बातमी वाचण्यात आली की तालिबानी आता कराची जवळ पोहोचले आहेत . आणि ते कराची वर कधीही हल्ला करु शकतात. तसेच कराची पोलिसांनी पण हे  सांगितले की ते तालिबानशी युद्ध करण्यास तयार नाहीत म्हणण्यापेक्षा कॅपेबल नाही. तालिबानची युद्ध सामग्री आणि ए के ५३ सारख्या मॉडर्न गन्स सोबत लढण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या दुनाली बंदुका पुरेशा नाहीत.

माझ्या मते , तालिबानने आता स्वात एरियामधे आपले चांगले बस्तान बसवले आहे, आणि त्यामुळे ते हळू हळू आपले साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न करतीलच. इस्लामाबादवर पण हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.स्वात मधे सिझ फायर तर आहेच , त्यामुळे तालिबान्यांच्यावर स्वात मधे कोणीच अटॅक करु शकणार नाही.त्या भागातील सगळी यंत्रणा तालिबान्यांच्याच (इन्क्लुडींग पोलिस) हुकुमत खाली आहेत. तेंव्हा पाकिस्तानच्या इतर भागात दहशतवादी कारवाया करुन या भागात पळून येउन शरण घेतली तर तालिबान्यांना  कोणीच हात लावू शकणार नाही.

ह्या सगळ्या तालिबान्यांना जर दाबायचं असेल तर, केवळ पाकिस्तानमधे मिलिट्री रुल हा एकच पर्याय मला दिसतो.

हे पाकीस्तानी डेमोक्रसी च्या लायक नाहित…

……..पण जे काही होतंय ते भारताच्या दृष्टीने वाईटंच!!!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in तालिबान and tagged , , , , . Bookmark the permalink.

3 Responses to टीम श्रीलंका वर तालिबान चा हल्ला- की जगाला दिलेला संदेश?

  1. sonalw says:

    its dangerous..very very dangerous. aani jo paryant sagle ani-taalibani aaple international interests and power games bajula thevun ek hot naahit to paryant tyancha bimod hon ashakya aahe.

  2. Rohan says:

    with such issues in pakistan in out west, bangladesh in east & shrilanka in south … India should now take a major stand on border protection … !

Leave a Reply to sonalw Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s