रामाचे चित्र असलेल्या नोटा नेदरलॅंड मधे चलनात

अजुन तरी भारतामधे फक्त महात्मा गांधी असलेल्या नोटाच चलनात आहेत. पण  नेदरलॅंडने मात्र प्रभु श्री राम ह्यांचे चित्र असलेल्या नोटांना चलनात ऍक्सेप्ट केले आहे.
ram
महर्षी महेश योगी..  या गुरुंचे संपुर्ण जगभर लाखॊ शिष्य आहेत. मला वाटतं की स्वामी रजनीशांच्या नंतर इतकं ग्लोबल ऍक्सेप्टन्स मिळालेले गुरु हे एकच असावेत.

आज माझे  मित्र अविनाश कुलकर्णी ह्यांनी एक टॉपिक क्रिएट केला ऑर्कुट वर. त्यामधे ह्या “राम” नोटेबद्दल माहिती दिलेली होती. एक राम, पाच राम आणि दहा राम अशा डिनोमिनेशन मधे ह्या नोटा ऍव्हेलेबल आहेत.आधी मला तर खोटंच वाटलं. पण जेंव्हा बघितलं की बिबीसी च्या साइटवर पण ही बातमी दिलेली आहे तेंव्हा खात्री पटली.

१००हुन अधिक ड्च दुकानदार, डिपार्टमेंटल स्टोर्स, आणि जवळपास ३० खेड्यांमधे ह्या नोटा ऍक्सेप्ट केल्या जातात.बरं ,एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही नोट लागु करण्यासाठी  कुठलाही नियम तोडण्यात आलेला नाही असे डच बॅंकेचे अधिकारी स्पोक्समन सांगतात.

“राम” जो पर्यंत सुस्थितीत आहेत तो पर्यंत चलन म्हणून वापरले जाऊ शकेल ( इन द क्लोझ सर्किट ऑफ युझर्स ऑफ कोर्स)

आयोवा स्टेट मधे ( स्वाती दांडेकरांच्या) महर्षी वेदीक सिटी मधे ह्या नोटा युएस डॉलर्स बरोबर वापरल्या जातात. आणि राम बेस्ड बॉंड्स पण ३५ अमेरिकन स्टेट मधे जारी करण्यात आलेले आहेत.

नेदरलॅंड मधे राम नोट्स ह्या एक राम = १० युरो ह्या रेटने एक्स्चेंज केले जाते. नेदरलॅंड मधे ह्या राम नोटा फोर्टीस बॅंक ब्रॅंच , रोर्मॉंड मधे एक्स्चेंज केल्या जाउ शकतील..असे डीक्लिअर करण्यात आले आहे.
हे सगळं तर ठीक आहे. पण मला न कळलेले मुद्दे..

१) नोटा प्रिंट करतांना तेवढ्याच व्हॅल्युचे गोल्ड सेंट्रल बॅंकेत ठेवावे लागते, हा सर्व जगातील नियम आहे. ह्या केस मधे ह्या नियमाचे पालन कसे केले जाते?
२) पॅरलल एकॉनॉमी ला सरकार कसे काय परवानगी देउ शकते?
३)१ राम= १० युरॊ हा रेट कसा काय फिक्स करण्यात आलाय?
४)द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पिस ह्या नावाच्या संस्थेने ह्या नोटा जारी केल्या आहेत.
५) डच बॅंकेने म्हंटले आहे की जो पर्यंत लिगल टॆंडर म्हणुन ह्या नोटा वापरल्या जात नाहीत तो पर्यंत त्यात इल्लिगल काहीच नाही.. याचा अर्थ काय?
६) बंजामिन फिल्डमॅन , मिनिस्टर ऑफ फायनान्स , महर्षी मुव्हमेंट म्हणाले की ह्या नोटा मुद्दाम नेदरलॅंड सारख्या श्रीमंत देशात लागू करण्यात आल्या आहेत , आणि इतर लहान देश या पासून स्फूर्ती घेतील अशी अपेक्षा आहे.

बाय द वे… भारतामधे अशा नोटा कधी पासून चलनात येणार?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , . Bookmark the permalink.

9 Responses to रामाचे चित्र असलेल्या नोटा नेदरलॅंड मधे चलनात

 1. abhijit says:

  श्रीराम सेनेला पेटवलं पाहिजे !! 🙂

 2. Sunita says:

  अहो, श्रीराम सेनेला वेळ कुठे आहे? सध्या तर सगळॆ आलेले गिफ्ट्स ..” ? ” ची वाटलावण्यात व्यस्त असतिल ना..

 3. Madhurima says:

  ha ha ha! yes, they must be busy in playing with those Pink Underwears..

 4. sonalw says:

  ek gosht notice kelit ka? ya notewar green font madhe kai lihilay? It reads ‘One raam’. aaplya deshat saglyancha raam ekach asel to divas suddha bhagyacha samjen mi.
  ajunahi ekeka hindu wyaspithacha wegla wegla raam aahe. eka eka jaaticha ek ek raam aahe….

 5. फडणीस says:

  नोटांइतकं सोनं सेंट्रल बॅंकेत ठेवावे लागते हे तुम्हाला कोणी सांगितले? जगात हे गोल्ड स्तॅंडर्ड आता कोठेच नाही!

  • फार पुर्वी वाचलं होतं.. करेक्शन बद्दल धन्यवाद.
   आपण ह्या वर अजुन काही प्रकाश टाकु शकाल कां?
   जर हे सोनं ठेवण्याची सक्ती नसेल तर मग बॅंका कितिही प्रमाणात नोटा छापुन मार्केट फ्लड करु शकणार नाही कां?
   छापलेल्या नॊटांचं आणि विनिमय दराचं प्रमाण कसं ठरतं?
   असे बरेच प्रश्न मनात आहेत पण उत्तरं माहिती नाहीत..

 6. काका,
  या पोस्टमुळे आजचा विकएन्ड कामी आला. आज आयोवामधल्या ‘वेदिक सिटी’ला जाऊन आलो. मस्तच.. काहितरी चकाट्या बघायला मिळालं. थोडेफार फोटो काढलेत, जमलं तर पोस्ट टाकेल, आणि हो मी तिथून काही ‘राम’ घेतले .. एक ‘राम’चं मूल्य- १० डॉलर !

  व्यवाहारात रामाला इथेतरी किंमत आहे, हे पाहून आनंद वाटला. 🙂

  • अरे वा!! उत्तम. लवकर लिही पोस्ट. नुसतं नोटांबद्दलच नाही तर श्री महेश योगींच्या बद्दल आणि तिथल्या कार्याबद्दल पण वाचायला आवडेल.
   मला खूप उत्कंठा आहे तिथे योगींनी आपलं बस्तान कसं बसवलं असेल याची!

 7. वेदांत तत्ववादी says:

  कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा

Leave a Reply to abhijit Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s