एल्टीटीई, क्रिकेटर्सवर अटॅक, आणी जैश ए मोहम्मद

काही सोशल साइट्सवर पहाण्यात आलंय, की पाकिस्तानवरच्या हल्ल्यामुळे बरेच लोकं खूश झालेले दिसताहेत. काही लोकांच्या  मते श्रीलंका टीम वरील हल्ला हा पाकला  आंतरराष्ट्रीय राजकारणात.बॅक सिट घ्यायला भाग पाडेल.अगदी पाकिस्तानचे अस्तित्व असावे की नसावे इथपर्यंत चर्चा सुरु आहेत.

माझ्या मते तसे नाही. पाकिस्तान वरील हल्ल्यावरून पाकची राजकिय प्रतिक्रिया, म्हणजे खुपच  हास्यास्पद वाटते. काहीही तपास करण्या पुर्वीच त्यांनी डीक्लिअर केलंय की ह्या हल्ल्यामध्ये भारताचा हात आहे.ह्या राजकीय नेत्यांचं आपलं बरं असतं, “उचलली जीभ लावली टाळ्याला”………मग तो नेता भारतीय असो की पाकिस्तानी !!!

त्यातल्या त्यात भारतीय नेते तर बस्स.. सारखे “इशारे”च करित असतात. रोज न्युज असते- आज काय तर म्हणे पंतप्रधानांनी पाकला इशारा केला, उद्या काय तर गृहमंत्र्यांनी इशारा केला- बरं हेच काय ते थोडं तर.. पुन्हा अंतर्गत इशारेबाजी सुरुच असते. हल्ली अशी काही हेडलाईन वाचली की माझ्या “कपाळावरच्या आठ्या” इशारे करु लागतात 🙂

आमच्या लहानपणी असं ऐकलं होतं की इशारे करुन गिऱ्हाइक बोलावण्याचे काम फक्त धंदेवाइक  बायकाच करतात पण आता तर प्रत्येक नेता कुणाला ना कुणाला इशारा करतोय. म्हणजे हे नेते ————-??

मी कालच लिहिल्या प्रमाणे हा  तालिबानचा आपली शक्ती जगापुढे ठेवण्याचा एक भाग आहे. कालच बातम्यांमध्ये पाहिले की जैश आणी एलटीटीई फारच चांगले संबंध आहेत. जैश ने एलटीटीई सगळ्या तऱ्हेने मदत पुरवली आहे, मुख्यत्वेकरून शस्त्रांची !

वरची न्युज पाहिल्यावर या हल्ल्याचे एक दुसरे पण परिमाण नजरेत भरते. श्रीलंके मधे सध्या एलटीटीई विरुद्ध चे युद्ध अगदी निर्णायक अवस्थेत पोहोचले आहे. आता बस्स.. शेवटचा धक्का द्या आणि युध्द संपवा… अशी स्टेज आलेली आहे.तेंव्हा एलटीटीईला मॉरल सपोर्ट म्हणून पण हा हल्ला असू शकतो. एलटीटीई ने जैश बरोबरचे जुने संबंध एनकॅश केलेत की काय  असा संशय येतोय.एलटीटीई वरील हल्ल्याला मिळणारे श्रीलंकेतिल समर्थन कदाचित वेगळा टर्न घेईल कारण श्रीलंकेत पण भारताप्रमाणेच क्रिकेट हा खेळ नसून धर्म आहे आणि धर्माला पोहोचलेला धोका सामान्य विचारांची जनता ( अ परिपक्व मनोवृत्तीची) कधीच सहन करू शकणार नाही.

पाकिस्तानचे अस्तित्व असावे की नाही , हा विषय तर खूपच आवडीनेच चर्चिला जातोय. माझ्या मते जर पाकिस्तानचे अस्तित्व मिटले आणि तो अफगाणिस्तान , किंवा तालिबानिस्तान झाला तर भारतामधील मुस्लिम मूलतत्त्व वाद्यांना एक नैतिक पाठबळ मिळेल आणि  त्यांची पण शक्ती वाढेल. ते लोक भारतामधे पण तालिबान्यांची ताकद वाढवण्यासाठी मदत करतील . सध्या पाकिस्ताना मधे माणशी ५ ह्या दराने मुले होताहेत. सध्या पाक मधे नवतरुण लोकं १५ ते १८ वर्ष वयोगटातील बरीच आहे की जी अशिक्षित आहे आणि धर्माच्या नावाखाली काहीही करायला तयार आहे.  ही फोर्स जर विधायक कामाकरता पाक मधे वापरल्या गेली नाही तर मात्र हे असे हजारो “कसाब” आपल्या दृष्टीने धोक्याचे आहेत.  तेंव्हा पाकिस्तान असावाच… असे मला वाटते. फक्त तिथला कट्टरवादी तालिबान संपावा आणि तिथे आता मिलिट्री राजवट लागु व्हावी म्हणजे भारताच्या दृष्टीने बरे होईल.

आणि ही जी अशी अशिक्षित फोर्स आहे ती तिथेच रहावी.  मला वाटतं अशीच विचारसरणी जेंव्हा इस्ट आणि वेस्ट जर्मनी एकत्र झाली तेंव्हा पण बऱ्याच लोकांनी बोलून दाखवली होती.. असो..
आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधला अग्रलेख वाचनीय आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in तालिबान and tagged , , , , . Bookmark the permalink.

4 Responses to एल्टीटीई, क्रिकेटर्सवर अटॅक, आणी जैश ए मोहम्मद

 1. rajesh gupta says:

  hi. nice blog. keep it up.

 2. sonalw says:

  kon sampawnar? Ya deshala eka hitlar chi garaj aahe. To krur hota pan sachha deshbhakt hota. Hukumshahi che kaahi faayde suddha astat. Satta ekhaati ekwatleli asate. he far mahatwach…Tya drushtine gen Musharraf ne saglya groups na barach controo madhe theval hot.
  Janata ashikshit rahan ha khup motha dhoka aahe. lok shikali pahijet. jag kuthe challay he tarun pidhila samajalach naahi tar te chukichya vichaaratun baaher kadhich yenar naahit. mulat changal kaay aani waait kai he kalnyasathi, tyanchya samor dusari baaju yen far mahatwach aahe. te shikshanaane aani mukt media chya purskaraane sadhya howoo shakel. ya force la tya drushtine educate karan garajech aahe.
  Ek garib pakistani kutumb aaplya mulanna madrase madhe pathavn prefer kartaat karan tithe shikshan-khan mofat asat. tithe ko halu halu kattat banato. man kowal asatana tyachyawar he sanskar hotat je nantar pusan ashakya asat. Hyach soyi jat government schools dewoo laglya tar kadachit hi mul madarase madhe janaar naahit.
  Tasach garibi war maat karnyasathi suddha barech tarun ya aslya goshtinkade waltaat. kasaab ha hi tyatalach ek.
  kuthun surwaat karnaar? aani kon? Amerikechi sadhyachi ‘throw money at a problem’ policy khupach ghatak tharel.

  • america is also in doldrum situation. They are not understanding what to do. The way they pulled out from Vietnam, they will pull out from Afganistan also.
   ITs the record of US < Inspite of all the necessary War Heads, they could not win a single war.. well, Iraq u can say they one !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s