बेल आउट पॅकेज अमेरिकेवर इम्पॅक्ट, भारतिय भाग-२..(थोडंसं जे पहिल्या वेळी लिहायचं राहुन गेलं)

ओबामा चे बेल आउट पॅकेज अन त्याचे भारतावर परिणाम मी काही दिवसांपुर्वीच पोस्ट केलं होतं. पुन्हा वाचायला इथे क्लिक करा.
तेंव्हा पोस्ट फार मोठं झालं म्हणून काही मुद्दे सोडून दिले होते ते आता कव्हर करतोय. अमेरिकेत त्या पॅकेज चा फायदा घ्यायचा असेल तर  आऊट सोअर्सिंग करु नये असा फतवा  ओबामा ने काढला आहे. आता हे जर सगळ्याच कंपन्यांनी मान्य केलं की आम्ही आउट सोअर्सिंग करणार नाही आणि सगळी कामं अमेरिकन नॅशनल्स कडून करुन घेउ.. केले तर काय होइल?
हा एक दुसऱ्या अंगाने केलेला विचार…
१) सध्या आउट सोअर्सिंग केल्यामुळे  जे काम अमेरिकन कंपन्या २ ते५ डॉलर प्रति घंटा ह्या हिशोबाने करुन घेत आहेत , त्याच कामासाठी अमेरिकन नॅशनल जर एम्प्लॉय केला तर दहा पट खर्च करावा लागेल.
२) बॅलन्स शिट ची बॉटम लाइन डेफिनेटली अफेक्ट होइल. म्हणजे नेट प्रॉफिट कमी होइल.. ( खर्च वाढल्यामुळॆ)
३) अमेरिकन स्टॉक मार्केट रिकव्हरी होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमीत कमी५ वर्ष तरी पुढे ढकलले जातील.
४) बऱ्याच कंपन्या बेल आउट हेल्प घेउन सुध्दा लॉसेस बुक करतिल. असे लॉसेस दोन -तिन क्वार्टर मधे बुक केले तर मात्र खरे प्रॉब्लेम्स अमेरिकेत सुरु होतील.अल्टीमेटली स्टॉक होल्डर्स ला पण उत्तर द्यावे  लागेलच.
५)शेअरहोल्डर्स ला जर व्यवस्थीत डिव्हिडंड दिला नाही तर स्टॉक मार्केट म्हणजेच एकॉनॉमी गाळात जाइल. पुन्हा १९३० सारखी रेसेशनची परिस्थीती निर्माण होऊ शकते.

५) ह्या अशा सवंग लोकप्रियतेच्या निर्णयामुळे जरी ओबामा ला ब्रिदिंग टाइम मिळाला तरिही हा निर्णय अमेरिकेच्या एल आर पी (लॉंग रेंज प्लान) च्या दृष्टीने खूपच वाईट असेल.
6)काही अमेरिकन्स लोकांनी खुल्या दिलाने ऍक्सेप्ट केलंय की अमेरिकेची जी ग्रोथ झालेली आहे ती फिलिपिनोज, चिंगु सॉरी चिनी , आणि भारतिय मायग्रंट्स मुळेच झालेली आहे. आणी अशा तऱ्हेने ह्या अमेरिकन प्रॉस्परिटी च्या कॅटॅलिस्ट्ला अमेरिकेतुन परत पाठवणे म्हणजे अमेरिकेच्या ग्रोथ च्या मुळावर घाव घालण्यासारखे आहे.
7)वरील सर्व पॉईंट्स पहाता, अमेरिकन सरकार आउट सोअर्सिंग वरचा बॅन लवकरच उठवेल असा माझा कयास आहे.

8)न्यु यॉर्क टाइम्स च्या म्हणण्या प्रमाणे डिसेंबर महिन्यात जॉब्स अनएम्प्लॉयमेंट रेट ७.१% होता . सध्या म्हणजे फेब्रु. एंड ११ टक्क्यांच्या वर आहे. आणि अजुन ही वाढणार आहे..

9) डिसेंबर महिन्यात जॉब्स अनएम्प्लॉयमेंट रेट ७.१% होता .

जानेवारी एंड ला जॉब्स लॉस्ट लोकांची संख्या:- ६१४,०००
फेब्रु. एंड ला जॉब्स लॉस्ट लोकांची संख्या:-६९७,०००

10)जो पर्यंत हाउसिंग इंडस्ट्री इम्प्रुव्ह होत नाही तो पर्यंत अशाच प्रकारे लोकांच्या नोकऱ्या जात रहातील.  जर हाउसिंग सेक्टर मागे पडला तर,  सिमेंट, काच, स्टील, अल्युमिनियम इंडस्ट्रीज पण मागे पडेल . कन्स्ट्रक्शन इक्विप्मेंट सेल कमी होईल.. इन फॅक्ट सगळी एकॉनॉमी अवलंबुन आहे   यावर.

केवळ हाऊसिंग इंडस्ट्रीज मधे हायस्कूल ड्रॉप (अशिक्षित अमेरिकन्स)आउट्स घेतले गेलेत मागच्या काही वर्षात. पुर्वी म्हणजे ८० च्या दशकात अशी अशिक्षित अमेरिकन मंडळी इंडस्ट्रीज मधे कामं करायची पण नंतर कन्स्ट्र्क्शन बुम मधे जेंव्हा अशा कामात जास्त पैसा मिळू लागला तेंव्हा ही कामे करण्याकडे कल वाढला. कारण अशा कामासाठी फार स्किल लागत नव्हते.

ह्यावेळचे जॉब लॉसेस जे आहेत ते व्हाइट कॉलर्स साठी अजुन सुरु झालेले नाही.फक्त वर्किंग क्लास सफरर आहे असं अमेरिकन गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे ( जे मला पुर्णतः खोटं वाटतं. कारण, बॅंका, फायनान्शिअल इन्स्टीट्युट्स वगैरे बऱ्याच ठिकाणी व्हाईट कॉलर जॉब्स लुझ झाले आहेत.

त्या पिरियड मधे (८० च्या द्शकात) नॅशनल अन एम्प्लॉयमेंट रेट हा फक्त ३% होता , आत्ताच्या ११ टक्क्यांच्या तुलनेत. एक्सपर्टस च्या नुसार, हा रेट येत्या काही दिवसात अजुन वाढण्याची शक्यता आहे . केवळ हा रेट कमी व्हावा म्हणुन ओबामाने आउट सोअर्सिंग थांबवण्याची अट घातली असावी असे मला वाटते.

11) ह्या स्टॉक मार्केट क्रॅश चा इम्पॅक्ट पण फार मजेशिर आहे. सध्याचे जे अप्पर मिडल क्लास किंवा उच्च वर्गीय आहेत त्यांचा हाय व्हॅल्यु परचेस्ड स्टॉक त्यांना होल्ड करावा लागतोय.  अन्यथा लॉसेस बुक करुन कॅश केली तर मिलियन्स चे थाउझंड्स मधे पैसे मिळतील.
परंतु, यंग फॅमिलिज , यंग ईंटर्प्रेनर्स जे आहेत , त्यांनी जर आत्ता स्टॉक विकत घेणे सुरु केले तर , काही वर्षात त्यांच्या स्टॉकचे खुप अप्रिसिएशन होईल. (पण त्यांच्याकडेही पैसा नाही ही वस्तुस्थिति आहे). म्हणजे एकिकडे रावाला रंक करते स्टॉक मार्केट.. आणि दुसरी कडे रंकाला पण राव बनवण्याची वाट दाखवते…….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , , , . Bookmark the permalink.

4 Responses to बेल आउट पॅकेज अमेरिकेवर इम्पॅक्ट, भारतिय भाग-२..(थोडंसं जे पहिल्या वेळी लिहायचं राहुन गेलं)

 1. Amol says:

  “ह्यावेळचे जॉब लॉसेस जे आहेत ते व्हाइट कॉलर्स साठी अजुन सुरु झालेले नाही.फक्त वर्किंग क्लास सफरर आहे असं अमेरिकन गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे ( जे मला पुर्णतः खोटं वाटतं. कारण, बॅंका, फायनान्शिअल इन्स्टीट्युट्स वगैरे बऱ्याच ठिकाणी व्हाईट कॉलर जॉब्स लुझ झाले आहेत.” This is not entirely True, number of my friends who are working in engineering, has not lost jobs BUT their hour are reduces considerably, salaries are cut down from 4k to 27 pm, and it seems like new grads HAVE not a single JOB, most of em are extending their legal stay any way they can just in hope, but nothing is moving as of now ( dated april 9 2009) and bad part is NO one is telling when will it be alright! :((

 2. Shraddha says:

  I agree with most of the points. Good way of putting things, that too in well versed manner.

  Just one suggestion. If you want to use English word in a marathi post, please type that word in English. It becomes more readable. इंग्रजीमधे मराठी वाचण जितक त्रासदायक असत, तितकच इंग्रजी शब्द मराठीमधे वाचणे वेळखाऊ असत. थोड़ेफार शब्द असतील तर ठीकाय, पण तुमच्या पोस्टची जास्तीत जास्त इंग्रजी शब्द वापरण ही गरज असेल, तर उगाच देवनागरीत लिहिण्याचा अट्टहास टाळता आला, तर उत्तम!

 3. Vijay says:

  तुमचा ब्लॉग छान आहे पण मला याच गोष्टीची एक अजुन बाजु मांडाविशी वाटते.. एकुण इथल्या indians च्या परिस्थितिसाठी अमेरिकेला/त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. पैश्यांचा प्राथमिक उद्देश असला तरी एक सरळसोट सुखसोयियुक्त जीवन म्हणुन इथे येणारे कमी नाहीत. येथील साधारण कामगार (Maid, people doing blue collered job) आपल्याकडील सुखवस्तू प्रकारात मोडणारे जीवन आरामात जगु शकतो.

  कुणीतरी blessing in disguise हे छान म्हंटलय. खरतर भारत सरकारने या मंदितून फायदा करून घ्यायला हवा. रोजगार तयार करण्यासाठी Golden Quadrilateral, नविन धरणे, रस्ते, यासारखे projects चालू केले पाहिजेत. आज अनेक कंपन्या प्रोजेक्ट च्या मोबदल्यात Community सर्विस (स्थानिक विकास) करतात/ तशी कन्डीशन ठेवता येते. अनेक भारतीय केवळ भारतात research opportunity नसल्याने इथे रहने पसंत करतात. Equal Opportunities जर इथे मिळाल्या तर स्वतःच्या देशात रहने कोणीही पसंत करेल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s