आजचा मटा वाचला आणी आश्चर्याचा धक्का बसला. अहो २ टक्क्यांच राजकारण ह्या विषयावरिल एक्स्पर्ट , कांशिराम यांच्या मतांना बहेनजीने तिलांजली दिलेली दिसते. कांशिरामचा राजकिय वारसा चालवता चालवता,कांशिराम यांची मुळ धारणा सोडुन हा बसप पुन्हा नव्या उमेदिने वेगळंच राजकारण खेळताना दिसतोय.
युपी मधे ब्राह्मणांनी पण बसप ला मते दिलित असं ऐकण्यात आहे. तेंव्हा तिच खेळी महाराष्ट्रात खेळण्याचा विचार दिसतोय बहेनजिंचा!
४ ब्राह्मण उमेदवारांची नावं मला एकदम आश्चर्य वाटलं.. राज करेगा तिलक, तराजु और तलवार हा नारा महाराष्ट्रात ट्राय करणार असं दिसतंय..
बघु या काळाच्या ओघात काय दडलंय ते!
या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 2,917,382
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.