माझे ऑर्कुट मित्र आणि त्यांचे प्रोफाइल्स.

हा लेख खूप मोठा होणार आहे ह्याची मला कल्पना आहे पण वाचतांना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही ह्याची खात्री मला आहे.

ह्या ऑर्कूट्चा शोध कोणी लावला असेल? गुगलींग केलं..आणि असं कळलं की हे एका ऑर्कूट नावाच्या माणसाने गुगल मधे काम करताना २०टक्के इंडीपेंडंट प्रोजेक्ट म्हणुन करताना डेव्हलप केलं. गुगल मधे काम करणाऱ्यांना रोज एक तास स्वतः च्या इच्छेप्रमाणे काहीही डेव्हलपमेंट वर्क करण्यासाठी परवानगी असते. त्या काळात हे ऍप्लिकेशन ऑर्कूट ने डेव्हलप केले असे म्हणतात. अशीही वदंता आहे, की ह्या ऑर्कूट ची एक गर्ल फ्रेंड होती , पण तिचा आणि ह्याचा संपर्क तुटला होता, म्हणून त्याने हे ऍप्लिकेशन तिला शोधण्यासाठी डेव्हलप केले. आता खरं खोटं माहिती नाही..

ही सोशल साईट अगदी भारतीय किंवा एशियन वाटते- फेस बुक- माय स्पेस च्या तुलनेमध्ये. मला वाटतं ह्याचं कारण ऑर्कुट वरचे   प्रोफाइल्स.. माझ्या जवळपास ३ वर्षाच्या ऑर्कुट वरच्या  एक्स्पिरियन्स मधे असे  बरेचसे प्रोफाल्स पहाण्यात आले की ते वाचतांना कधी कधी हसून गडाबडा लोळायची इच्छा झाली,तर कधी कपाळाला हात मारुन घ्यायची!

काही प्रोफाइल्स एकदम ट्रेंडी तर काही एकदम कॉंटेंपररी…     माझ्याच फ्रेंड लिस्ट मधल्या काही असे  प्रोफाइल्स आहेत… माझा एक मित्र आहे दिपक , ज्याच्या प्रोफाइलला एकदा भेट दिली असता मला त्याच्या “पुलंप्रेम” ह्या ब्लॉगची लिंक दिसली, आणि लक्षात आलं की हा पण अगदी आपल्यासारखाच तिरशिंगराव दिसतोय, एखाद्या लेखकावर मनापासून प्रेम करणारा..त्याच्याशी मैत्री झाली.. आणि त्याच्या ब्लॉगवरुन स्फुर्ती घेउन हा ब्लॉग सुरु केलाय.

आता हा माझ्या एका मित्राचा प्रोफाइल.. मी काहीच लिहित नाही. अगदी जस्ट जसा आहे तसा कट पेस्ट करतोय

प्रोफाइल असा आहे.. . लिंक दिलेली आहे पण खाली डिटॆल्स पण पोस्ट केले आहेत.

राम राम ‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗

विशेष सुचना :

1] ऊगाच येथे घुटमळू नये.
वारंवार चौकश्या करू नयेत.

2] उगाच इथे तिथे क्लिक करत बसू नये..
पेज ला चरे पडतात….

3] प्रोफ़ाईल पहाण्यास ना नाही..
पण चोरुन, लपुन प्रोफ़ाईल पहाण्यापेक्षा
एखादा स्क्र्याप टाकलात तर अधीक योग्य होइल.

4] अल्बम मधील फोटोंकडे एकटक पाहत बसु नये.
आत फ़ार काही पहाण्यासारखे नही.
एकदा पाहुन लगेच बाहेर कटावे.

5]प्रोफाइल वरचे फोटो मनोरंजना साठी लावले आहेत. त्याचा खासगी मालमत्ते सारखा वापर करू नये.

6]फोटो जास्त वेळ बघू नयेत. फोटोची झीज झाल्यास दंड पडेल.

7] ही खासगी जागा आहे, पाहण्यासारखे काही नाही.

8]स्क्रॅपबुक वर थिललर वा आचरट प्रश्न विचारल्यास तशीच उत्तरे दिली जातील.

9]स्क्रॅपबुक वर जाहिराती अथवा आचरट मजकूर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

10] ह्या प्रोफाइल ला वारंवार भेट देऊ नये. बॅंड विड्थ मर्यादित आहे. आम्ही बॅंड विड्थ चे पैसे भरतो.

11]या प्रोफाइल वरचा मजकूर इतरत्र कोपी पेस्ट केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल

12] फिरत्या ओनलाईन विक्रेत्यानि आत येऊ नये. त्यांच्या कंप्यूटर मध्ये व्हायरस गेल्यास आम्ही जबाबदार नाही.

13] वाट्टेल तिथे उगाच क्लिक करत बसू नये. काही मोड्तोड झाल्यास खर्च भरून द्यावा लागेल.

14]ही कामाची जागा आहे. गप्पा मारायचा अडडा नाही
‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗‗

मागे वळून पुन्हा.
आता नाही बघायचं…

विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं…

चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं…

अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच…

नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं…

निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं…

स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं…

नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!
मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं…

..

आता ह्या मित्राचे नांव पण मला माहिती नाही पण माझा मित्र आहे हा. अगदी जवळचा मित्र वाटतो. ऑर्कूटवर हे बरं असतं.. स्वतःबद्दलची काहीच माहिती न देता तुम्ही इथे प्रोफाइल बनवूशकता.

आता हा दुसरा प्रोफाइल बघा.. येंगावंडोट्टो झिंन्गिबांडो त्याचे कंटॆंट्स खाली पेस्ट करतोय.माझ्या माहिती प्रमाणे हा ग्रुहस्थ पिएचडी झालेला आहे मराठी मधे . ह्या प्रोफाइलमधे काही फोटॊ आहेत अवश्य पहा..   हसून पोट दुखेल असे फोटॊग्राफ्स आहेत..

about me:

माझी प्रोफ़ाईल फ़ेक आहे याची प्रत्येकाने नोंद घ्यावी.

[माझ्याकडुन तुम्हाला काहीही शिकण्यासारखे नाहीये]

माझा उद्देश कुणालाही दुखवण्याचा नाही अथवा कुणाचाही अपमान करण्याचा नाहीये.

मी ही प्रोफ़ाईल माझ्या करमणुकीसाठी फक्त एक विरंगुळा म्हणून बनवली आहे आणि तसेही तुमचे पण चांगलेच मनोरंजन करण्याचा माझा प्रयत्न असेल.

मी एवढं चांगले मराठी कसे बोलतो या प्रश्नाचे उत्तर या प्रोफ़ाईल ला अनुसरून देत आहे याचा माझ्या वास्तविक जिवनाशी काही एक सबंध नाहीये.

मी एका मानाच्या विद्यापीठातुन मराठी वा:ड्मय या विषयात Phd केलेली आहे.

आणि मी यालाच अनुसरून सर्वांच्या सकर्मक क्रियापदाचे अकर्मक क्रियापद करण्यासाठी इथे आलो आहे.

माझ्याबद्दल अधिक माहीती जाणुन घेण्यास इछुक असाल तर,

दिल कि बाते येंगावंडोट्टो कि जुबानी;)

फ़ुकट काही मिळत नसत,
पण इथे फ़ुकट प्रोफ़ाईल पहाण्यास ना नाही,
पण चोरुन, लपुन प्रोफ़ाईल पहाण्यापेक्षा
एखादा स्क्र्याप टाकलात तर अधीक योग्य होइल.

हे असे गमतीशीर प्रोफाइल्स पहातानाच एका कवी मनाच्या अविनाशची प्रोफाइल.. ह्याच्या प्रोफाइल वरुनच कळतं की हा माणुस कसा असेल ते. खरं तर यांचं वय हे ६० च्या आसपास असावं. पण मैत्रीला वय नसतं म्हणतात ना,, म्हणून एकेरी उल्लेख लिहितांना झालाय.. माझ्या पहाण्यात इतक्या रोमॅंटीक कविता करणारा तरी एवढ्यात  कोणी आला नाही. ह्याच्या प्रोफाइल वरची कविता इथे पेस्ट करतोय..

about me:

===================॥
कोवळी कळी, बघ प्रियकरा ही बहरली
टिपण्यास मकरंद ,भ्रमर होऊन तु येशील का..

मातली काया,थांबले श्वास,आवेग हि सोसवेना
करण्यास धुंद, बनुनि वारुणी,तनुत रे भिनशिल का

रेशमी काचोळित, जे तारुण्य माझे दाटले,
त्यास चुरणारा, राजसा मीत तु होशिल का..

सजविले रुप सारे ,नाहि काजळ कोरले
घनशाम बनुनि सख्या ,कुरंग नयनि तु येशिल का

संपले शब्द माझे, भावना बघ दाटलेल्या
करण्यास व्यक्त त्या , कविता तु माझी होशिल का?

बरं मॅरिशिअल स्टेटस मधे “लिव्ह इन रिलेशनशिप विथ वाइफ” :)

आता हा माझ्या एक मैत्रिणिचा प्रोफाइल बघा तिने थोडा कट शॉर्ट केलेला दिसतोय हल्ली..

Strangers … dun expect good treatmnt

मला माझ्यापेक्षा जास्त माज करणारी लोक आवडत नाहीत … Fed-ex is God :) … ani jyanna he patat nahi tyanchi mala keev yete …

माझी एक भाची आहे. तिने तर मला अगदी कन्फ्युज करुन टाकलं होतं. माझी सवय आहे कोणिही फ्रेंड्स रिक्वेस्ट टाकली तर ती मी ऍक्सेप्ट करतो. एकदा एका मुलिची रिक्वेस्ट आली , मी नेहेमी प्रमाणे ऍक्सेप्ट केली आणि विसरुन गेलो. त्या मुलिचे स्क्रॅप येणं सुरु झालं. मी तुला ओळखते वगैरे.. कार्टीने मला अगदी भिन करुन सोडलं. ( पण करणार काय लाडकी भाची ना, मामाची फिरकी घ्यायचा अधिकार असतोच भाच्यांना ) बरं पण हा मामा तिच्या परिक्षेत पास झाला बरं कां! तिने खुप प्रयत्न केला मला पटवायचा..पण….. जाउ दे.

बरं हे सगळं तर ठिक आहे. पण माझा गिर्यारोहक मित्र ॐकारने तर बरंच काही लिहिलंय प्रोफाइलवर.ॐकार हा गोनिदांचा भक्त, रामदास स्वामींवर भरपुर अभ्यास… पॊटापाण्यासाठी एच आर मधे काम्करतो. पण ह्याच्या प्रोफाइलमदे लक्षवेधी म्हणजे खायला काय काय आवडतं ते.  वाचा इथे…

cuisines:

पुरण पोळी, शेवग्याच्या शेंगांयुक्त कटाची आमटी, मसाले भात, आळुची भाजी, सुरळीच्या वड्या, काकडिची कोशिंबीर, घोसावळ्याची भजी, बिर्ड्याची डाळिंब्यांची उसळ, पाटवड्या, पापड, कैरीचे लोणचे, जिलबी, मठठा, पुदिन्याची चटणी, बटाटे वडे, भोपळ्याचे भरीत, आमसुलाची चटणी, पंचामृत, उकडिचे मोदक,मटाराच्या करंज्या, आळू वडी, मटार बटाटा फ़्लॉवरची भाजी, आमरस, डाळ मेथ्या, कैरीची डाळ, सोलकढी, मुटकूळी, कायरस इ.

passions:

इतिहासाचा अभ्यास, दुर्गभ्रमण, धार्मिक ग्रंथांचे वाचन, कथाकथन तसेच निवेदनाद्वारे गडांवर जाउन माहिती सांगण्याचा निदीध्यास.

बरं हे सगळे लिहितांनाच हा अजुन एक प्रोफाइल म्हणजे एखाद्या कॉज साठी स्वतःला वाहुन घेतलेल्या तरुणाचा प्रोफाइल. हा पण माझ्याप्रमाणेच राइट एक्स्ट्रिमिस्ट पोलिटीकल व्ह्युज असलेला आहे राघव खंडेलवाल.. वय वर्ष २०,पण पुर्णपणे वैचारिक डेव्हलपमेंट झालेला. ह्याचा उल्लेख न करता लेख संपवणं योग्य होणार नाही..

about me:

▲▼▲▼▲▲▼▲▼||जय श्री राम|| ▲▼▲▼▲▲▼▲▼▲
श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा…
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्रीमंत छञपती शिवरायांना मानाचा मुजरा…

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…

हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्रीं ची इच्छा…
||जय भवानी|| ||जय शिवाजी||

असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही “सहिष्णुतेला”.

दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची “संवेदनाही” भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला “शॄंगार” कधीचं गमावला नाहिये.

घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.

घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्याच हाताने सजते.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक “उज्ज्वल” भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे “मराठयांच्या मनगटात”..
सिंहाच्या जबड्यात घालून हात
मोजीन दात
अशी ही आमची मराठ्याची जात

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

होता तो कोहिनूर हिरा
नाव त्याचं ‘शिवाजी राजा’

महाराष्ट्र माझा होता अंधारात
औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत

तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
आणि पाठीवर दादोजींचा हात
डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल

———————–————
____________0____00___0____________
_____
_______00_______0000__________
__________
___000000000000__________
_______________
000000000___________
______000000______00
!______________
_____000000000___________
000000____
_____00______00_________000000
000__
______________00_______0000__00000_
______________00_______00______000_
_____
________000___00000________00_
__________
__000__00000000________0_
0________000000
0000000000________0_
0________00000_0000_
___00________0_
00________00____00_____00
________0_
00_______________00____00_____
__00_
_00______________000___00_______00_
_00_______________00___00______000_
__00_
_____________000__0000000000__
___00_____
_______0000___00000000___
____000________
__0000____00000_____
_____0000_____000000
_______________

I m HARDCORE HINDU FOR ANTI-HINDU. I DON’T BELIVE IN SECULAR……but different people think differently in there own way...

तर अशा अनेक गमती जमती आहेत पण हा लेख संपवायला हवा ना. म्हणुन इथे थांबतो. ऑर्कुट हा विषय माझ्या दृष्टीने ओपन ठेवतो म्हणजे पुन्हा कधी तरी लिहिता येइल..

मला ऑर्कुटवर इथे भेटा….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , . Bookmark the permalink.

23 Responses to माझे ऑर्कुट मित्र आणि त्यांचे प्रोफाइल्स.

 1. Ghatotkach says:

  Tumcha pahila mitra amchya Punyacha distoy! Changla post aahe. Vegla kahitari.

 2. sonalw says:

  navin post taaklay blogvar..wel milala tar wacha.

 3. Pramodini says:

  Avadle.

 4. somnath says:

  khupach chhan

 5. Ajit Khodke says:

  Chhan Blog aahe 🙂
  keep writing

 6. santosh says:

  orkut madhe maitr kse jodayche

 7. shriniket bhagat says:

  hiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

 8. bunty says:

  thanks

 9. amit bidkar says:

  i want to join orkut.

 10. bala says:

  kahitari navin shikayala bhetal

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s