स्त्रिया! त्यांच्या सोबत रहाणं मुश्किल, त्यांच्या शिवाय तर त्याहुनही मुश्किल!

(सगळ्या स्त्रीवादी मैत्रिणींची आधीच माफी मागतोय…  उगीच चिडू नका . .. रागाऊ नका.. हा लेख केवळ पुरुषां साठीच आहे.. 🙂   आणि कुणालाच दुखण्याचा हेतू नाही अगदी सहज सुचलं म्हणून… काहीतरी विनोदी लिहायचा प्रयत्न केलाय. कितपत जमला, ते तुम्हीच सांगायचं..)

तुमचं लग्न झालय़? तुम्हाला गर्ल फ्रेंड आहे? तुम्ही काहीही केले तरी तुमची गर्ल फ्रेंड किंवा बायकॊ तुमच्या चुका काढते? किंवा एखादी गोष्ट केली तर ती गोष्ट दुसऱ्या तर्हेने केली असती तर कित्ती बरं झालं असतं अशी पुस्ती पण जोडते??

काय म्हणता , मी ज्योतिषी आहे का? आणि मला कसं कळलं?  सांगतो..  धीर धरा थोडा..

संध्याकाळची वेळ असते. तुम्हाला कुठल्यातरी लग्नाला जायचं असतं.. तुमची सौ. छान तयार होऊन बाहेर येते आणि तुमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहाते?  अहो हज्जारो प्रश्न असतात त्या नजरेत पण सगळ्यात महत्त्वाचा असतो.. ” काय ? कशी दिसते मी?” तुम्हाला पण रोजची तारीफ करुन कंटाळा आलेला असतो, (जर रोज पानात श्रीखंडाची वाटी असेल तर त्या वाटीतल्या श्रीखंडाची तारीफ करतो का आपण ? नाही ना, सरळ उचलतो वाटी अन चापतो श्रीखंड!    )मग तुम्ही तिच्या मेकप कडे पाहिलं न पाहिलस करता, तसाही -अर्धा पाउण तास मेकप होई पर्यंत वाट बघून- कंटाळा आलेला असतो बाहेरच्या सोफ्यावर बसून वाट बघून..,  मग  आता काय रोजचंच म्हणून तुम्ही हं…बाईसाहेब,  चला आता लवकर निघू या आधीच वेळ झालाय, म्हंटलं की मग “तुमचं मेलं आमच्याकडे लक्षच नसतं हल्ली’ अशी कॉमेंट ऐकायला मिळते… बरं समजा, तुम्ही अगदी लाडात येउन , कित्ती छान दिसतेस ग तु. … असं म्हंटलं तर हट.. खोटारडे कुठले – आणि जास्त लाडात येउ नका लिप्स्टिक खराब होइल.. असं ऐकायला लागतं.. तुम्हीच सांगा.. कसं जगायचं…? पाडगांवकरांना पण हा प्रश्न पडला होताच.

रविवारची संध्याकाळ, तुम्हाला बाहेर जायचंय, सौ. गोदरेजच कपाट उघडून उभी रहाणार, आणि अगदी ’करिते विश्वाची चिंता’ असा चेहेऱ्यावर भाव आणून आता कुठली साडी नेसू?  जिन्सच घालू ? की ड्रेस घालू? असा मिलियन डॉलर प्रश्न चेहेऱ्यावर घेउन तुमच्या कडे पहाते. तुम्ही  तिच्या मनातले कळूनही न कळल्या सारखं  दाखवलं. आणि आपला नेहेमीचा एक टी शर्ट कपाटातून बाहेर ओढता आणि चढवता. तर…. तेवढ्यात………. अहो……. काय  नेसू? असा प्रश्न आला की माझ्या अंगावर काटा येतो. कारण सरळ आहे, उत्तर त्यांना  ‘ जे  काही नेसायच आहे ‘तेच  हवं असतं .  . तुम्ही म्हंटलं, की ती काळी साडी नेस, तुझ्या गोऱ्या रंगावर छान दिसते, तर नेमकं उत्तर येतं.. मॅचिंग ब्लाउज इ्स्त्रीला दिलेलं आहे. बरं, तुम्ही सेकंड ऑप्शन दिला की चल, सरळ जिन्सचं घाल आणि चल लवकर.. तर अहो, आपण अम्क्या तम्क्या कडे जातोय ना, तर तिथे जिन्स वाईट दिसेल.. ( मग मला विचारलं कशाला? असा प्रश्न मनात येइल .. पण त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू नका..)  बरं तुम्ही जरा बोलण सुरु केलं की ती गुलाबी साडी  नेस, तर म्हणेल अहो कित्ती बोलता तुम्ही मला आधीच काही कळत नाहीये, काय घालावं ते, आणि तुम्ही मला कन्फ्युज करताय…  तेंव्हा जरा चाचपडत तिच्या मनाचा अंदाज घेत  उत्तर द्यायचं असतं.. तिची नजर कपाटाच्या कुठल्या कप्प्यावर आहे ते बघून सांगितलं तर मात्र टॊला लागतॊ कधी तरी. … आणि गप्प बसलं तर.. अहो………. अहो…….. बोला नं ? काय नेसू??  अता तुम्हीच सांगा…. कसं वागायचं माणसानं?

न्यु इयर ची पार्टी असते तुमच्या मित्र मंडळीची अर्थात विथ फॅमिली. आधिच ठरलं असतं की बरोब्बर १२ वाजता लाइट बंद करणार ३० सेकंदांसाठी.. तर त्या ३० सेकंदांचा ’व्यवस्थित’ उपयोग करुन घ्यायचा प्रयत्न केला  तर म्हणणार..अहो.. हे काय??? कोणी बघेल ना ( आता सगळेच तर त्या ३० सेकंदाचा उपयोग करण्यात गुंतले असतात वेळ कोणाला आहे तुमच्याकडे पहायला?) .. आणि तुम्ही काहीच केलं नाही तर लाइट आल्यावर तुमच्याकडे – काय नेभळट आहे हा अशा नजरेने पहाणार.. थोडापण रोमॅंटिझम शिल्लक नाही तुमच्यात…  तुम्हीच सांगा.. कसं वागायचं पुरुषाने?

बायकोच्या माहेरचं कोणीतरी दूरचा मावस भाऊ वगैरे आलेला असतो. तुम्ही ऑफिस मधुन घरी येता… तो समोर दिसतो.. म्हणतो, इंटर्व्ह्यु होता म्हणून आलोय.. तुम्ही म्हणता… अरे वा.. छान ,,, आता इथेच थांबा.. तर बायकोच्या कपाळावरच्या आठ्या दिसतात आणि जाणवतं.. अरेच्या.. चुकलं वाटतं पुन्हा आपलं…  हा तितकासा जवळचा नाही..  पण  तो पर्यंत बाण सुटला असतो. तुम्ही स्वयंपाक घरात पाणी प्यायला गेल्यावर अहो त्याचे काका रहातात ना इथेच.. तुम्ही इथे कशाला थांबवताय त्याला? असे डायलॉग्ज ऐकावे लागतील… जर तुम्ही थोडं कोरडं वागलं तर तुम्हाला  मेलं माझ्या माहेरच्याचं कौतुकंच नाही. बोला?? कसं वागायचं माणसाने?

स्तुती ही   स्त्रीला प्रिय असते. मग ती स्तुती तुम्ही केंव्हाही करावी अशी अपेक्षा असते. जर स्तुती केली वेळोवेळी तर मात्र थोडा फार (छॆ! मी वेडा की काय? हे काय लिहितोय? थोडा नाही भरपूर )  फायदा होतो. पण तुम्ही बोलू  लागलात तर गप्प बसा हो..कित्ती बोलता तुम्ही.आधी . आता ऐका की जरा माझं…… आणि तुम्ही न बोलता आपलं बसून राहिलात तर , अहो, तुम्हाला काय झालं? कसला राग आलाय का? आणि तुम्ही सांगितलं की काही नाही शांत बसलोय सहज तर… काय मुखदुर्बळ माणुस  आहे असं  म्हणणार.. आता तुम्हीच सांगा.. कसं वागायचं?

बरेचदा तुम्ही काही सांगायला गेलं ,तर तिला ते आधीच  माहिती असतं.   तुम्ही एखादी गोष्ट तिला सांगायला जाल, तरी ती तिला नेहेमी माहिती आहे असाच भाव चेहेऱ्यावर असतो.मग तुमचं वाक्य संपता संपता, तिची बॉडी लॅंगवेज पाहिली की मग तुमचा आवाज व्हिस्परिंग टोन ला कन्व्हर्ट होतं, आणि टेपर आउट होऊन थांबतो.

पण… जेंव्हा तिने एखादी गोष्ट सांगायला सुरुवात केली, तर मात्र अगदी भक्ती भावाने आणि पहिल्यांदाच ऐकतो आहे असा भाव चेहेऱ्यावर आणायचा .’तू कित्ती कित्ती हूषार आहेस गं’ असा भाव चेहेऱ्यावर आणायचा,त्या कौतुकाच्या भावाचे रुपांतर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला हव्या असलेल्या भावात ( मुलं समोर नसतील तर !!  🙂 )तुम्ही केल्यास संसार अजुन जास्त सुखाचा होतो ..

आता मी इतकं ओपनली कसं काय लिहू शकतो म्हणताय? अहो माझ्या सौ. ला वेळच नसतो माझं वाचायला. पुरुषांसाठी हा प्रश्न तर गेले  अनेक जनरेशन्स छळतोय..  .” तो म्हणजे ह्या बायकांचं कसं करायचं? त्यांच्या बरोबर जगणं कठीण.. अन त्यांच्या शिवाय जगणं त्याहुन कठीण… “

हे पोस्ट पुर्ण झालंय पण भुंगा च्या ब्लॉग वर हा एक मस्त ट्विट सापडला म्हणून पोस्ट मधे ऍड करतोय.. अगदी ह्या पोस्ट शी रिलेटेड आहे म्हणून.. “Between men and women there is no friendship possible. There is passion, enmity, worship, love, but no friendsh..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , . Bookmark the permalink.

28 Responses to स्त्रिया! त्यांच्या सोबत रहाणं मुश्किल, त्यांच्या शिवाय तर त्याहुनही मुश्किल!

 1. bhaanasa says:

  hmmm….Prashna kathin aahet khare. Thodefaar tathyahi aahe. Aata matra diwas badalalet, mhanje ajunhi stuti ji konalahi priya asatech ti baykanahi aawadate. ( Purushanahi aawadatech) Pan he ase kaay nesu/ghalu asale prashna farase padat nahit. Natayalahi faarsa vel lagat nahi karan aajkaal khoop natane muradane hyakade strivargacha kal jara kamich zalay. Comfort havach pan uthun disale pahije ha drushtikon vadhala ahe. Agdi garib bichchhaare asa aav matra chaan aanla aahe tumhi.

 2. धन्यवाद.. अहो थोडा अतिरेक केलाय , केवळ विनोद निर्मिती साठी.. पण थोड्या फार प्रमाणात सगळीकडे असंच असतं.. २१ वर्षाच्या वैवाहिक जिवनाचा परिपाक म्हणजे हा लेख.. 🙂

 3. कठिण आहे .

 4. अजुन एक सौलिड लेख… !
  तसा हा प्रश्न गहनच आहे… मात्र तुमच्या विनोदाच्या झालरने मस्त बनलाय.

  अरे हा – ते पुर्ण ट्वीट असं आहे – Between men and women there is no friendship possible. There is passion, enmity, worship, love, but no friendship. -Oscar Wilde

 5. धन्यवाद.. बहुतेक कॉपी करतांना अर्धं सुटलं असेल..

 6. Anand Ghare says:

  छान लेख आहे. तुम्ही कांहीही केले असले तरी त्याव्यतिरिक्त दुसरे कांही करता आले असते हे निरीक्षण झकास आहे.

 7. ravindra says:

  महिद्र म्हणजे लेखणीचा बादशाहाच.भन्नाट लेख लिहिला आहे बर का. माझा अनुभव वेगळा नाही. बायको आपल्याला विचारते आज स्वयंपाक काय करू? आपण जरा विचार करून मूड बनवितो व बेत सांगतो. मात्र जेवण करतांना समोर काही तरी वेगळच वाढलेलं असत. बऱ्याच वेळा दोन पर्याय देतात. तरी हि आपण सांगितलेला पर्याय जेवणात नसतो. जेवणच नाही इतर बाबतीत हि असच असत. मी लग्न झाल्यावर लाडाने आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून आवडती साडी आणली कि ती तिला अजिबात नको असायची. नंतर मी बंद केले. खरच त्याच्या बरोबर व शिवाय राहण कठीणच.गुपचूप सहन कराव लागत नाही तर काय?

  • रविंद्र
   हा लेख म्हणजे विनोदी लिखाणाचा पहिला प्रयत्न खरं सांगायचं तर मला थोडं सिरियस लिखाण करायला आवडतं, पण एखाद्या वेळेस असा विनोदी पण लिहिण्याचा मुड येतो. एक बाकी आहे, विनोदी लिहिलं, की कितिही सिरियस गोष्ट असो, ती अगदे साधेपणाने सांगता येते.

 8. Vinod P. Shinde says:

  Khup Khup Chan aarticle aahe, aani Mahendra he “Vinodi” nahi kharokhar khup serious article aahe, mala tar lagn karayachi bhiti vatayla lagali… lagn tharlay, jevha pan ticha phone yeto tevha angavar kata ubha rahatoch rahato… tondat ek aani practically don… बोला?? कसं वागायचं माणसाने?

 9. ayshu says:

  i like ur article mostly my mum asks me about sarre and if i suggest similar answer i got as u .

 10. aZIM says:

  kHUP CHAN LIHILE AHE ARTICLE……KITI WARSHA ZALI LAGNALA TUMCHYA?

 11. हाहाहा… चांगला आहे लेख. आवडला बुवा आपल्याला. 🙂

 12. “….बरं समजा, तुम्ही अगदी लाडात येउन , कित्ती छान दिसतेस ग तु. … असं म्हंटलं तर हट.. खोटारडे कुठले – आणि जास्त लाडात येउ नका लिप्स्टिक खराब होइल.. असं ऐकायला लागतं..”……. “एक नंबर!!”

 13. Shweta Nare says:

  काका ,

  तुम्ही सगळ्या स्त्रीवादी मैत्रिणींची आधीच माफी मागीतलीत खर्र..!!!

  पण खर सांगू का..?? ह्यात चीडण्यासारखे काहीच नाही आहे..!! अगदी सगळेच खरे आहे..

  संपूर्ण लेख वाचताना एक- एक गोष्ट पटत होती नि त्याची प्रचीती येणार हसू देत होती… 😀

  असो… अप्रतिम लिखाण !!!! फार आवडला लेख..!!

 14. aki says:

  baki kahi aso pan mala tumchya lekhach shirshak avadla
  mhanje chala khai purush he manya kartat ki te baykanshivay nahi jagu shakat,
  n kahi thodefar purush yachashi sahamat astat pan tyana te ughad ughad tasa darshavaycha nasta…………….
  tyat tyana kamipana vatato ki ankhi kahi, mahit nahi buva…….. 🙂 😀

 15. maze vichar says:

  KAKA
  FARACH CHAN
  MHANJE YATALA BARYACH GOSHTI ME MAZYA JIWANAT BARYAPAIKI ANUBHAWATO ,
  YATALA SADI NESLYAWAR ME KASHI DISATE HE TAR AGADI BAROBER YALA TAR KONICH NAKARU SHAKAT NAHI ASE MALA WATATE

 16. hema says:

  काका, खरे आहे हो म्हणणे तुमचे !

Leave a Reply to Shweta Nare Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s