जेट एअर वेज फुल सर्व्हिस एअर लाइन्स??

एखादा दिवस इतका वाईट निघतो की त्या दिवशी जेवणाचे नुसते हाल होतात. खिशामधे कितिही पैसे असले तरिही जेवायला वेळ मिळत नाही किंवा जे काही मिळतं ते ’~नॉट टु युवर टेस्ट’ असतं.
गुरुवारी सकाळी सकाळी औरंगाबादला जेट एअरवेज ने गेलो होतो. जेट म्हणजे हल्ली नुसती नावालाच फुल सर्व्हीस एअर लाइन्स राहिली आहे. सकाळि ७-१५ ची फ्लाइट होती.धावत पळ एअर पोर्ट ला पोहोचलो तर ४ पैकी३ किऑस बंद होत्या . जो एक सुरु होता, त्यासमोर मोठा क्यु! चरफडत क्यु मधे उभा राहिलो. किऑस चेक इन ला २५० माइल्स मिळतात.. माझा नंबर येता येता१० मिनिटे गेली. शेवटी एकदाचा बोर्डींग पास+ लाउंज कार्ड घेतला….. सकाळी घरुन उशिरा निघाल्या मुळे  आणी किऑस क्यु मधे वेळ गेल्याने  एअर पोर्ट वर लाउंज मधे पण जाता आलं नाही, विचार केला सरळ फ्लाईट मधेच ब्रेकफास्ट करु..

bf1युजवली फुल कोर्स ब्रेकफास्ट सर्व्ह केला जातो ह्या वेळेमधे पण जेंव्हा एअर होस्टेस ने ट्रे आणुन ठेवला, मी तर चक्रावुनच गेलो.. एक पिस डॅनिश ब्रेड+ एक पिस लहान बन पाव+ बटर + स्ट्रॉबेरी जाम+ चार तुकडे पपई चे + एक तुकडा खरबुज+ एक द्राक्षं+ दोन तुकडे पायनॅपलचे+पाण्याची बाटली(चहा, किंवा कॉफी पण नव्हती). हा मेनु होता.

मी विचारलं की माझा ऑप्शन तर एल सि एम एल म्हणजे लो कॅलरी मिल्स आहे तर तिने सरळ सांगितले की स्पेशल ऑप्शन्स ऍव्हेलेबल नाहित. मी जेट चा प्लॅटीनम कस्टमर, त्यामुळे जरा जोरातच तिला ‘आज्ञा ‘ केली की मला दुसरं काहितरी आण, तर त्यांची मुख्य होस्टेस आली आणि म्हणाली की  औरंगाबादची  फ्लाईट कमी वेळाची असल्यामुळे हॉट ब्रेकफास्ट सर्व केला जात नाही.

म्हंटलं, तुम्ही जरी हॉट किंवा कोल्ड  ब्रेकफास्ट दिला, तरिही खाण्यासाठी सारखाच  वेळ लागणार.. तिच्या पण लक्षात आलं पण तिने ओशाळवाणा चेहेरा करुन सॉरी म्हंटलं.. ( जशी काही सगळी चुक हीचीच आहे अशा आविर्भावात)कोणी कस्टमर रागावला की त्याच्या शेजारी जाउन मधल्या पॅसेज मधे गुडघ्यावर बसुन बोलतात त्या पॅसेंजरशी. त्या वेळचा त्यांचा आविर्भाव मात्र  एकदम असा असतो की ज्याच्याशी बोलताहेत तो म्हणजे प्रेसिडेंट ऑफ यु एस आहे..  कसलं मस्त ट्रेनिंग दिलं असतं ना ह्या मुलिंना…मग मलाच वाईट वाटलं तिच्याकडे पाहुन, आणि उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म समजुन कोरडी ब्रेड पोटात ढकलली.

औरंगाबादला पोहोचलो, आणि नेहेमी प्रमाणे हॉटेल अतिथी वर पोहोचलो. थोड्या वेळाने आमचा सर्व्हिस इंजिनिअर आला,  दुपारचा एक वाजत आला होता, सगळी कामं झाली होती,  आम्ही वाळूंज भागात होतो, तेंव्हा ’लुधियाना ढाबा’ ला जाण्याशिवाय पर्याय नव्हता .लुढियाना धाबा आदी सो सो आहे. पण वाळूंज भागातिल बेस्ट जॉइंट म्हणुन फेमस आहे. तर, असा दिवस गेला.रात्री कंटाळल्या मूळॆ हॉटेलवरच जेवलो.. अगेन टिपिकल ’कुत्तेकी(तंदुरी) रोटी’अन मिक्स व्हेज वगैरे..अख्खा दिवस व्यवस्थित जेवण मिळालं नाही.

जो पर्यंत फुलका आणि शेवटचा दहिभात  खात नाही तो पर्यंत माझे समाधान होत नाही जेवल्याचे. शेवटचा ताकाचा पेला तर मस्ट असतो घरी..टुर ला असलो की मी मिस करतो ते गोड दह्याचं तांक! घरी रात्री लावलेल्या दह्याचं तांक सकाळी, आणी सकाळी लावलेल्या दह्याचं तांक सायंकाळी.. . मला ओरिजिनल टेस्ट ताकाची  अगदी मनापासुन आवडते, त्यामधे मिठ कींवा साखर न घालता..   .

औरंगाबादची चांगली माहिती आहे .. रात्रीच ठरवुन टाकलं की उद्या जे होइल ते होइल पण शेव भाजी अन भरित भाकरी खायचिच… राजेशला ( आमचा लोकल सर्व्हिस इंजिनिअर ) ला म्हणालो, आणी रात्री त्याने परभणीकरांच्या हॉटेलमधे (जालना रोड चे- औरंगाबादेपासुन साधारण ६-७ किमी दुर असेल ) नेलं.. ऍम्बियन्स तसा अगदीच सो सो होता.. आणि गर्दी पण फारशी दिसत नव्हती.. म्हंटलं.. आजपण जागा चुकली वाटतं. पण जेंव्हा स्टार्टर म्हणून मसाला पापड आणि शेवग्याच्या शेंगा मसाल्या सहित समोर आल्या,…. आणि मी विरघळलो.. म्हंटलं… बस्स! हमियस्तु!!

पहिली गोष्ट म्हणजे हॉटेल मधे शेवग्याच्या शेंगा बघुनच मी अर्धा खल्लास झालो होतो.. आणि पहिली शेंग हातात घेतली आणी मग प्लेट रिकामी होइ पर्यंत थांबलोच नाहीशेवग्याच्या शेंगांचा मसाला एकदम वेगळाच होता. मला वाटतं बहुतेक भरपुर प्रमाणात आलं वापरलं होतं..शेवग्याच्या भाजिच्या वासानेच भुक चाळवली..

जेवणा साठी वेटरला ऑर्डर दिली.. पातळ भाकरी एकदम क्रिस्पी, वांग्याचं भरित , शेव भाजी,   दही, आणि ताक..अहो जेवण तयार होऊन यायला जवळ पास ४० मिनिटे लागली पण तो पर्यंत शेवग्याच्या शेंगाच्या सालिंचा ढीग समोर तयार झाला होता.शेवग्याच्या शेंगा इतक्या चवदार होऊ शकतात हे मला आज समजले.

वेटरने जेवण आणलं. मस्त पैकी चुलिवरच्या फुगलेल्या पातळ ( कर्नाटकी स्टाइल च्या) भाकरी , आणि ऑर्डर प्रमाणे भाजी. दही पण अगदी मस्त खवल्या खवल्यांचं होतं…. पाहुनच मेंदु ला करंट पोहोचला आणी ….राजे.. खरं सांगतो.. दोन दिवसाचा उपवास सुटल्यासारखा अगदी तुटून पडलो त्यावर.. सोबत कच्चा कांदा, हिरवी मिरची अन तिखट लोणचं होतंच.. वेटर म्हणाला लोणि नाही.. म्हंटलं हरकत नाही.. पण जेवण एकदम झकास…. जेवतांना तिखट लागलं तर ताकाचा ग्लास होता. मस्त पैकी पुदिना, मसाला ताक एकदम टेस्टी होतं.. नेमका मोबाइल बरोबर नेला नव्हता, नाहितर इथे फोटो लोड केला असता.. तर मंडळी, कधी औरंगाबादला गेलात तर नक्कीच हॉटेल अमित, जालना  रोड विसरु नका..आणी हो तिथे गेल्यावर स्टार्टर म्हणून शेवग्याच्या शेंगा जरुर ट्राय करा.. टीपिकल मर्हाट्मोळं जेवण ..इतकं सगळं जेवल्यावर बिल फक्त..२१५ रु….जेवण झाल्यावर परभणीकरांचे मनोमन आभार मानत उठाल….

{माफ करा…. अमित नाही ..हॉटेल न्यु अभिजित.. फोन न. ६९९२८७२ ( आत्ताच बिल सापडलं म्हणुन दुरुस्त करतोय.)}

काल  सकाळच्या जेट च्याच फ्लाइट ने परत आलो.येतांना पण अगदी सेम ब्रेकफास्ट होता फ्लाइट मधे. सेम डेनिश ब्रेड, वगैरे स्टफ.  पण आधिचा अनुभव गाठी असल्यामुळे हॉटेलमधुन निघतांनाच ,ब्रेड ऑम्लेट + कॉर्न फ्लेक्स चा ब्रेकफास्ट घेउन निघालो. दुपारी मात्र  घरी जेवण करुन मस्त ताणुन दिली संध्याकाळ पर्यंत..

जेट एअर्वेज हल्ली सगळी कडेच कटींग द कॉर्नर करित असते. प्रत्येक गोष्टी मधे हा चेंज लक्षात येतो.पुर्वी पण लाउंज नसेल तरिही लाउंज कार्ड द्यायचे अन लहानशा असलेल्या काउंटर वर स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक कर्टसी म्हणुन द्यायचे. आता मला वाट्तं त्यांना कळलं आहे की कर्टसी कॉस्ट समथिंग.. सो कट द कर्टसी!रेसेशन चा प्रभाव सगळी कडेच जाणवतो. लहान एअर पोर्ट वर ( रायपुर, राजकोट, इत्यादी) हल्ली लाउंज कार्ड देत नाहीत प्लॅटिनम कस्टमर्सला सुध्दा..  जेट च्या इतर फ्लाइट्स मधे पण फुड क्वॉलिटी एकदम पॅथेटीक असते. क्वांटिटी पण कमी असते.. फुल सर्व्हिस एअर लाइन्स म्हणुन जेट ने प्रवास करणार ( स्वतःच्या पैशाने) तर टाळा. जर कंपनी अकाउंट असेल तर ठिक आहे.. हे फोटो नरेश गोयल ला पण मेल करतोय..  नेहेमी प्रमाणे त्यांचे ऍपोलॉजी लेटर येइल.. पण काहीच बदलणार नाही हे  मला पक्के माहिती आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged . Bookmark the permalink.

9 Responses to जेट एअर वेज फुल सर्व्हिस एअर लाइन्स??

 1. आधी का नाहीत लिहिले हे. मी जानेवारीमधे औरंगाबादला गेले होतो तेव्हा नक्कीच येथे गेलो असतो. अतिथी हॉटॆल तसे फारसे चांगले नाही. जेवणही फारसे पचनी पडले नाही. जालना रोडनर नैवेद्य मधे थाळी चांगली मिळाते ती मिस झाली.

 2. अहो, मी कालच आलो परत. आणि नेवेद्यचा बोर्ड दिसला होता , नेक्स्ट टाइम तिथे ट्राय करीन. पण एकदा पुन्हा परभणीकरांच्या अमित ला भेट द्यायला जरूर आवडेल.आणि ते अतिथी हॉटेल आमचा कस्टमर पण असल्यामुळे डिस्काउंट चांगला मिळतो. रहायला रुम्स वगैरे ठिक आहे. १७०० मधे एसी रुम म्हणजे औरंगाबादला चांगलीच म्हणायची ना ( डीस्काउंट जाउन अजुनही बरेच कमी होतात).. .. पण तिथले जेवण एकदम होपलेस आहे.. नॉट वर्थ! मित्राने एक पेग आर सी अन चिकन टिक्का घेतला होता , माझी मिक्स व्हेज अन दोन रोटी, बिल झालं होतं ६००+

 3. Siddharth says:

  अगदी खरे आहे. पण U. S. ला domestic flights मधे तर पाण्या शिवाय काहीही मिळत नाही. त्या मानानी आपल्या कडे एवढे तरी मिळत आहे हे आपले नशिबच म्हणायचे… 🙂

  • अहो पण पुर्वी जेट ला सगळी सर्व्हीस व्यवस्थीत मिळायची. जेट ला बेस्ट एअर लाइन्स चं अवॉर्ड पण मिळालं होतं लागोपाठ ३-४ वर्षं.फुल सर्व्हीस च्या नावाखाली तिकिट पण जास्त आहे इंडीगो किंवा किंग फिशर रेड पेक्षा. जेट ने नो फ्रिल एअर लाइन्स म्हणुन इकडे जेट लाइट ( पुर्वीचे साहारा) सुरु केली आहे आणि त्या फ्लाइट मधे इट इज नोन दॅट सर्व्हीस विल नॉट बी देअर, म्हणुन आपण काही एक्स्पेक्ट पण करित नाही ना… इथे तसं नाही.. अगदी प्रत्येक रुपया खणकाउन घेतं ना जेट आपल्या कडुन म्हणून आपला हा अधिकारच आहे.

 4. sahajach says:

  औरंगाबाद ची सफ़र घडवल्याबद्दल आभार…माझ्या नवर्‍याचा सल्ला “औरंगाबाद्ला गेल्यावर अमितला विसरु नका…तो स्वत: ही परभणीकरांचा अमित आहे” बाकि खवय्येगिरीसाठी नासिकपेक्षा औरंगाबाद अनेक पटीने चांगले.

  • अर्थात.. अमित ला तर विसरणे शक्यच नाही. खरंच खुप छान आहे ते हॉटेल. आता परत औरंगाबादला गेलो की अमित पक्कं..

   माफ करा…. अमित नाही ..हॉटेल न्यु अभिजित.. फोन न. ६९९२८७२ ( आत्ताच बिल सापडलं म्हणुन दुरुस्त करतोय.)

   जसं कोल्हापुरला गेलॊ की वुड हाउस ची व्हिजिट एकदातरी नक्की असतेच.. तसंच हे..

 5. Nitin Sawant says:

  घोर कलयुग…

 6. हो का इतकी वाईट अवस्ता आहे का जेट च्या सर्विस ची । औरंगाबाद ला जाणं होत नाही पण गेले तर अमित (न्यू अभिजीत ) नक्की .

 7. RAIS says:

  खुपच छान

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s