असंगाशी संग!

पर्सनल महत्त्वाकांक्षा ……….???

की पक्षाची विचारधारा………….??

काय महत्वाच?

राजकारणामधे काहीही होऊ शकते…
असंगाशी संग! मुस्लिम राज्यकर्त्यांच्या कडे आपल्या आया बहिणी पाठवायची परंपरा ही थेट जोधा- अकबर पासून सुरु झाली, ती आज पर्यंत सुरु आहे हे नमूद करतांना लाज वाटते……हे मोगल सम्राट राजपूत राजांच्या आया  बहिणींच्या अब्रूवर नाचून आणि ह्या राजांच्या छाताडावर पाय ठेवून सिंहासनावर बसले आणि त्यांनी अबाधित राज्य केले.

राजनिती कोणाला कोणा खाली झोपवेल ते सांगता येत नाही..कल्याण सिंहांना आणी त्यांच्या मुलाला तिकिट हवंय , हमखास जींकुन येणाऱ्या कॉन्स्टैटियंसी चे….. आज दिसतंय की भाजप चा जोर  युपी मधे कमी झालाय, आणि ते तिकिट भाजपा कडे मिळणार नाही हे लक्षात आल्या बरोब्बर इतक्या वर्षाचा घरोबा संपवून आणि काडीमोड घेउन ते तयार झालेत मुल्लायमसिंह ह्यांच्या गोटात जायला…..तसा  हा प्रकार कल्याण सिंह यांनी अधी पण एकदा केलेला होता..

हिंदु धर्माचे  आधारस्तंभ.. म्हणवणारे , बाबरी ला धराशायी करणारे …..आज बाबरीच्या रक्षणकर्त्याबरोबर ???

कल्याणसिंग…. आ्णि मुल्लायम सिंग जॉइंट आघाडी??भाजप मधून मारलेली उडी थेट  समाजवादी पार्टी मधे???

पूर्वी च्या काळी म्हणजे १९९४ मधे जर हे भाकीत केले असते की मुल्लायम सिंग.. बाबरी ला वाचवण्याची पराकाष्ठा करणारे आणि कल्याण सिंह.. बाबरी ला धराशायी करणारे कधी एकत्र येतील,, तर त्याला निश्चितच मेंटल हॉस्पिटलला पाठवलं असतं..

कल्याणसिंह यांनी बाबरी मस्जिद धराशायी ( चुकलॊ ’शहिद’) केल्या बद्दल सगळ्या मुस्लिम समाजाची माफी मागितली आहे. (???????)

इथे आज अनेक वर्ष  पक्षाचे कार्य केलेले नेतेगण ह्या  पूर्वी पण पक्षाबाहेर गेले आहेत , तेंव्हा पण असेच प्रॉब्लेम  आले  होते..भाजपा मधून…. गुजरात मधे शंकरसिंह वाघेला ह्यांनी जेंव्हा बंड उभारले तेंव्हा त्यांच्या जाण्यामुळे पक्ष मजबुत  झाला आणि नरेंद्र मोदींच्या सारखा एक नेता उदयास आला.

उमा भारती मध्य प्रदेशामधे का बाहेर पडल्या?? इथे पण साध्वी असून सुद्धा पर्सनल स्वार्थ आणि राजनैतीक महत्वाकांक्षा इतक्या मोठया प्रमाणात होत्या की त्यांच्या पुढे .. धर्मकरता लढणारा पक्ष अशी प्रतिमा असलेला पक्ष पण दुर करावासा वाटला. मदनसिंह खुराणा हे दिल्ली मधे सोडून गेले होते.

तेंव्हा पण व्यक्ती मोठी ……..की पार्टी मोठी……..की विचारधारा मोठी…….. की स्वार्थ मोठा? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बराच उहापोह केल्या गेला.पण ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्या पुर्वीच प्रश्न बाजुला ठेवून पक्षाची पुनर्रचना करण्याकडे जास्त भर दिला गेला.माझ्या मते तेंव्हाच जर थोडे रिट्रोस्पेक्शन करुन हे असे का झाले ह्याचे उत्तर मिळेपर्यंत जर ह्या प्रश्नाचे बौद्धिक चर्वण झाले असते तर काही तरी उत्तर मिळाले असते..

एखाद्या मोठ्या नेत्याने पक्ष सोडला तर तुमच्या आमच्या सारखा सामान्य कार्यकर्ता धास्तावतात.. म्हणण्यापेक्षा, सगळ्यात मोठा धक्का हा सामान्य कार्यकर्त्याला बसतो.आज दिसतंय की भाजप चा जोर  युपी मधे कमी झालाय, त्या बरोब्बर हे सगळे नेते आपापल्या टोप्या फिरवायला तयार झाले आहेत.

पुर्वी फक्त कॉंग्रेस मधेच असा प्रकार चालायचा, जेंव्हा शरदराव पवारांनी पार्टी सोडली तेंव्हा पण असाच गदारोळ झाला होता.. पण त्यांचा कॉंस्टीट्युअन्सी मधला आणि शुगर लॉबी वरचा कंट्रोल हा फारच चांगला असल्या मुळे त्यांचं जहाज तरलं…

माझ्या सारख्याला एक प्रश्न पडला आहे. तो म्हणजे आता ,  कल्याण सिंहांचे स्थान काय असेल त्या पक्षामधे? मुस्लीम समाजाची मते कल्याण सिंहांना ( बाबरी धराशायी करणाऱ्या ) माणसाला ते मिळतिल? की अजुन तिसरी- चौथी आघाडी निर्माण होइल?

आपल्या हातामधे काहीही नाही… फक्त वाट पहाण्याशिवाय… इलेक्शन ची….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय... Bookmark the permalink.

6 Responses to असंगाशी संग!

 1. sonalw says:

  Today’s politics is all about numbers. Biju janata dal has suddenly become secular after keeping mum about the attacks on chritians in their own state. Though they call themselves secular everyone knows that they have split because they are not getting seats from BJP.
  Same debate between sena-bjp, congress-and rashtrawaadi. left front is ready to compromise with anybody in the world (other than bjp and congress) for seats.
  This time it is height of shameless ness. No one has the agenda. only calculation of seats…Yukkkk. I am ashamed of all of them.

  • तत्त्वाशी एकनिष्ठ नसलेले राजकीय पक्ष जनतेशी एकनिष्ठ कधीच राहू शकत नाहीत.तसेच नेते सुध्दा… तत्वाशी प्रामाणिक असतिल तरच नेते पण जनतेशी प्रामाणिक राहु शकतील . जनतेला हे कळले पाहिजे.

 2. मला वाटतं हा फ्लो असा असावा:

  आधी पर्सनल महत्त्वाकांक्षा बनते ..
  मग ती व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षेला सजवुन – नटवुन लोकांसमोर सादर करते. या सादरीकरणातुन अजुन काही लोक त्या महत्वाकांक्षेला सपोर्ट करतात आणि…
  असा एक महत्त्वाकांक्षी पक्ष बनतो.

  … आता मुख्य महत्त्वाकांक्षा ती शाबुत असतेच, तिलाच पक्षाची विचारधारा बनवली जाते…
  …. पुन्हा तेच सजवणे – नटवणे… आणि पक्ष आणि पार्टी!

  काही लोकांना – याही पुढे जाऊन दुस-याच्या पक्षाच्या विचारधारा पटु लागतात आणि मग पक्ष – पार्ट्या बदला – बदली..!
  आधी शेण खायचे अन् दिखाऊ माफी नामे…!

  ख-या गोष्टी नेहमीच कडवट – कडु – असतात….पण स्पष्टच बोलायचं तर – शेण मुठीने खाल्ले काय अन् चमचाने खाल्ले काय – खाल्लेच ना!

  • “ख-या गोष्टी नेहमीच कडवट – कडु – असतात….पण स्पष्टच बोलायचं तर – शेण मुठीने खाल्ले काय अन् चमचाने खाल्ले काय – खाल्लेच ना!”

   पर्फेक्ट वाक्य आहे . अगदी सुटेबल टू द सिच्युएशन..
   पण ह्याच पक्षामधे अटलबिहारींच्या सारखे नेते पाहिले आहेत ,त्यांच्या पुढे हे असे सत्तेचे लालची नेते खुप छोटे वाटतात…

 3. मला नाही वाटत विचारधारा फार महत्त्वाची आहे. कोणाचेही विचार काहीही असोत, जिथे आपला फायदा तिथे हे माजोरडे राजकारणी जातात. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जात ही, त्यांना काय फरक पडतोय विचारधारेने? पक्ष बदलण्यातला सर्वांत महत्त्वाचा (आणि बर्‍याचदा एकमेव) मुद्दा म्हणजे सत्ता. जिथे आपल्याला सत्ता मिळेल आणि पर्यायाने जास्तीत जास्त पैसे आपल्या नरड्यात ओतता येतील असं या नेत्यांना वाटतं, तिथे ते लांगूलचालन करायला जातात!

  • राज ठाकरेंनी शरद पवारांच्या बरोबर केलेली मांडवली पण याचंच एक उदाहरण. सत्तेच्या पुढे सगळेच खूजे पडतात..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s