पाकिस्तान ज्वालामुखीच्या तोंडावर..

न्यायाधीशांना बरखास्त केल्या बद्दल पाकिस्तानात सगळ्या वकील लोकांनी  कराची ते इस्लामाबाद  लॉंग मार्च काढला .या मार्च ला असफल करण्यासाठी आसिफ अली जरदारी आपल्या पार्श्व भागाला पाय लावून ईराण हुन  पळत पळत पाकिस्तानला परत आलेत.त्यांना त्यांच्या अपरोक्ष झालेल्या लष्कर प्रमुखांच्या आणि  पंतप्रधान   झालेल्या  गुप्त बैठकीची बहुतेक भीती वाटली असेल म्हणून ते परत आले असंही काही लोकं म्हणतात. ? की  …आपला पण झुल्फिखार अली भुत्तो प्रमाणे झुला होऊ नये   म्हणून असेल ?(झुला होणे:- पक्षी फासावर झुलणे)

आल्या बरोबर त्यांनी पंतप्रधान गिलानी यांच्या बरोबर मिटींग केली. (बरोबर आहे , सेनाध्यक्षांशी पंतप्रधानांच काय बोलणं झालं ते माहिती करुन घ्यायचं असेल बहुतेक) खरं तर, मला असं वाटलं होतं की इथे एअरपोर्ट वरच ह्यांची गेम करतील लष्कराचे लोक , आणि लष्करी राजवट लागू करतील. पण तसे झाले नाही.

gunपाकिस्तानात पण  बघा, भारता प्रमाणेच विरोधी पक्ष आपलं  सरकारला कोंडीत पकडण्याच काम इमाने इतबारे करतो. नवाज शरिफ पण विरोधी पक्षाच्या नेत्याच्या भुमिकेत  देश खड्ड्यात गेला तरीही बेहत्तर.. राजकीय मायलेज मिळालेच पाहिजे !या उद्देशाने या लॉंग मार्च ची पाठराखण करताहेत.

नवाझ शरिफ यांच म्हणणं असं आहे की आमची बरबटलेली आम्ही आपली स्वच्छ करण्यास  समर्थ आहोत, म्हणून अमेरिकेने मधे मधे करु नये-

आता तुम्ही म्हणाल की अमेरिकेला  सांगणारे  हे कोण टिकोजी राव लागून गेलेत?? अमेरिका ह्यांचं ऐकणार आहे कां?नुकताच पाकिस्तानला अमेरीके कडून  मिळालेला ५० कोटींचा मलिदा अजुन हजम पण झाला नसेल…हा नियमित मिळणारा मलिदा बंद झाला तर हे सगळे पाकिस्तानी उपाशी मरतील ,अराजक माजेल पाकिस्तान मधे.

अमेरिकन सैन्य  लषकरी राजवटीला पाठींबा देईल ( स्वात मधला  प्रॉब्लेम्स पहाता) असे वाटते.!

हे असले भंकस लॉंग मार्च काढण्यापेक्षा  नवाझ शरिफ यांनी त्या तालिबानच्या मुस्क्या बांधायला सरकारला भाग पाडले तर जास्त बरे झाले असते. स्वात मधे तालिबानला मान्यता दिली गेली तेंव्हा तर ह्या नवाज भाई ने मिठाची गुळणी धरली होती , तेंव्हाच जर थोडा जोर लावला असता  तालिबान शासनाच्या विरोधात तर समजण्यासारखे होते. पण पाकिस्तानातील कट्टरपंथी विरोध पण नवाज शरिफ यांना नकोय. केवळ त्याच कारणासाठी ‘स्वात’ इशु च्या वेळेस आपली चोच उघडली नव्हती मियांभाईने….तिकडे तालिबानचा कॅन्सर फोफावतो आहे आणि हे नवाज शरिफ , वकिलांचे मोर्चे काढताहेत..

एक बाकी  पहाण्यात आलंय , पाक मधे कुठलाही राजकीय नेता तालिबान च्या विरुध्द ’ब्र’ काढायला  धजावत नाही.धन्य आहे रे बाबा! माझ्या तर आकलन शक्ती च्या बाहेरची गोष्ट आहे ही….बरं, हा लॉंग मार्च काढून काय मिळणार आहे पाकिस्तानमधे? गांधी स्टाइलने मेसेज कन्व्हे होईल का नेत्यांना? हा  मार्च सफल होऊ नये म्हणून आधीच  शेकडॊ नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे. दोनच दिवसापुर्वी पोपटासारखा स्टेटमेंट देणारा इम्रान खान  कुठल्या तरी बिळात लपुन बसलाय….

पण एका गोष्टीचं आश्चर्य आणि नवल वाटतं की नवाज शरिफ अटक होण्याची खात्री असुन सुद्धा इतक्या जोरात रॅली – मार्च साठी आपला पाठींबा देत आहेत .. मे बी फॉर पोलिटीकल मायलेज??

नाही.. ते कारण नाही… नवाज शरिफ पण तुम्हाला काय इतका सरळ वाटला काय??    हे सगळं कां होतंय?? तर खरं कारण हे की २५ फेब्रुवारी ला नवाज शरिफ वर सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णया प्रमाणे  जुन्या क्रिमिनल रेकॉर्ड्स मुळे शरीफ वर निवडणुक लढविण्यासाठी बंदी घातली आहे.मला तर असं वाटतं की आता जे काही सुरु आहे ते केवळ सुप्रीम कोर्टाचे जज बदलणे हाच उद्देश ठेवुन केलेला एक राजकीय स्टंट तर नाही?

आता समिकरण असं आहे ..

{(पंतप्रधान  गिलानी+ परवेझ  कयानी) – (नवाझ शरिफ आणि जरदारी जेल मधे?) } + अमेरिकेचा वरवंटा = पाकिस्तान स्टॅबिलिटी(?)

किंवा…

{(परवेझ कयानी + नवाज शरिफ)- (झरदारी आणि  गिलानी जेल मधे?)}+ अमेरिकेचा वरवंटा=  पाकिस्तान स्टॅबिलिटी(?)

की हे सगळे एका बाजुला आणि

(जनरल मुशर्र्फ + अमेरिकी वरवंटा)-( इतर सगळे जण) = पाकिस्तानमधली स्टॅबिलिटी(?)

हो.. अमेरिकेचा वरवंटा ह्यांच्या टाळक्यात पडल्याशिवाय यांना समजणार नाही.. अन्यथा.. तालिबानी कट्टर लोकं टेक ओव्हर करतिल..

बरं हे गिलानी म्हणताहेत पंजाब मधला गव्हर्नर रुल काढायला मी जरदारींना सांगतो. “सांगतो”म्हणजे काय ते मला नाही कळले.. ‘राष्ट्रपतिंना ‘ पंतप्रधानांनी काय करायचं ते सांगायचं अन ‘राष्ट्रपतिनी’ ते ऐकायचं..लै भारॊ!( म्हणजे काय? पाकिस्तानमधे पण राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅंपच कां?  :))

बरं एक बघा, जर तिथली गव्हर्नर राजवट काढल्याने काय होणार आहे? ह्या पाकिस्तानी लोकांची लायकी तरी आहे का लोकशाही मिळवण्याची..? त्यांना अर्थ तरी कळतो का लोकशाहीचा?? इथे गव्हर्नर राजवट काढली तर तालिबानी लोकांना थांबवण्याची कुठली योजना आहे  का सरकार जवळ? नाहितर इथे पण दुसरा स्वात तयार होईल..

भारताच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे , युएस सिनेट मधे , दोन यु एस मिलिट्री ऑफिशिअल्स च्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तान गव्हर्नमेंट ने तालिबान आणि अल कायदा च्या लोकांना क्वेटाहुन ऑपरेट करण्यास ग्रिन सिग्नल दिलेला आहे. म्हणजे क्वेटा हे तालिबान्याचे हार्ट तर ट्रायबल एरिया म्हणजे नर्व्हस सिस्टीम आहे.

लष्करे तोयबा स्ट्रॅटॅजिकली अल कायदा ची जागा घेण्यास तयार करण्यात आले हेत. अमेरिकेतिल पाकिस्तानी आणि लष्करचे  खंदे समर्थक आता नॉर्थ अमेरिके मधे हल्ला करु शकतात. क्वेटा मधे ( तालिबान काउन्सिल ही “क्वेटा शुरा” ह्या नावाने तालिबानी अगदी ओपनली गव्हर्नमेंट च्या नाकाखाली टिच्चुन कारभार करताहेत असे पण सिनेट मधे सांगण्यात आले.

तेंव्हा  भारतीयांनी जस्ट वेट ऍंड वॉच पॉलिसी अडॉप्ट करणे आवश्यक आहे असे वाटते. तसंही कुठेतरी वाचण्यात आलंय की तालिबानी आता पेशावर वरती कब्जा करणार आहेत.. जर ही बातमी खरी असेल , तर मिलिट्री राजवट हेच एक उत्तर दिसतंय.

जर…. पाकिस्तानमधे अराजक माजलं तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा अमेरिकेला होइल. तसंही म्हंटलं तर पाकिस्तान हे अमेरिकेसाठी एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, तेंव्हा तिथुन पुल आउट करण्याचा गाढवपणा ते कदापिही करणार नाहीत..

पाकिस्तान सध्या ज्वालामुखी च्या तोंडावरच बसलेला आहे आणि  ज्वालामुखी धुमसतो आहे……….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in तालिबान and tagged , . Bookmark the permalink.

6 Responses to पाकिस्तान ज्वालामुखीच्या तोंडावर..

 1. Madhurima says:

  The most perfect analysis of the pakistan Politics i have ever seen. The views and possiblities expressed are correct. Now just watching the news, jaradari missing, and Chief of militry is taking over with gilani.. With Varvanta of America ( as you said so… 🙂 )

 2. Raghavendra says:

  मला तर वाटते की मुश्र्फ नक्की येतिल, मागल्या दाराने का होइना पण ते टेक ओव्हर करतिल. अमेरिका पण म्हणते की मुश्र्फ च्या काळात तालिबान वर बरा कंट्रोल होता.तेंव्हा अमेरिका पण त्यांनाच सपोर्ट करेल.

  • कॉमेंट्स करता आभार.. मी ऑफिस मधे आहे त्यामुळे न्युज पाहिलेल्या नाही. अहो, मी इथे काही विशेष लिहिलं नाही, फक्त सगळ्या पॉसिब्लिटीज इथे लिस्ट आउट केल्या आहेत. भारताच्या दृष्टिने बरं होइल मिलिट्री टेक ओवर करेल तर..

 3. साक्षी says:

  लै भारी ! सेल फोन मस्तच आहे..

 4. Indian_Lost_in_US says:

  Your analysis is very good an in line with the current situation. Exactly the same thing as you predicted are happening. US Supporting Military and Jardari is being grilled.
  I am a regular reader of your blog. keep up the good work!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s