नॅनॊ आली हो……..

कधीची वाट पहातोय नॅनो कधी लॉंच होते त्याची.. नाही..नाही गैरसमज नकॊ, मला नॅनॊ घ्यायची नाहीये.. पण खूप उच्च दरात घेतलेले बरेच शेअर्स आहेत माझ्या बोकांडी बसलेले . एकदा नॅनो लॉंच झाली की मग मात्र जरा टाटा मोटर्स चे  भाव चढतील असं वाटतं आणि नंतर मग मला थोडं हलकं होता येइल.. माझी साईक मलाच कळत नाही. टाटा चा शेअर जर डाउन झाला तरी काही विशेष राग येत नाही, पण रिलायन्स मधला थोडा पण  उतार अस्वस्थ करतो. रिलायन्स च्या  खरेपणा बद्दल शंका येते.. तशी टाटा बद्दल कधीच येत नाही…याला कारण म्हणजे टाटा हे नांव देशप्रेमाशी निगडित आहे , रिलायन्स चे तसे नाही..

आजच एक मेल आलाय टाटा मोटर्स मधल्या एका मित्राकडून. कार्पोरेट कम्युनिकेशन हेड  देबाशिश कडुन इनिशिएट झालेला इ मेल फॉरवर्ड होत माझ्या पर्यंत पोहोचला.ती मेल म्हणजे मला प्रेस रिलिझ वाटते आहे.

तर… बा अदब  …. बा मुलाहिदा…. होशियार … २३ मार्च २००९… एक मोस्ट अवेटेड दिवस.. टाटाची ड्रिम कार … नॅनो  एका मोठ्या फंक्शन मधे मुंबईला लॉम्च करण्यात येणार आहे हो………

प्रत्येक भारतीय  आतुरतेने ज्या क्षणाची वाट पहातोय तो क्षण आता जवळ आलाय..मुंबईचा डीलर तो मोस्ट लकी डीलर ठरलाय जिथे टाटा नॅनो लॉंच करतील.बुकींग करायचंय म्हणता?? थोडं थांबा.. २३ मार्च ला टाटा च्या डीलरशिपला भेट द्या म्हणजे समजेल कसे बुकिंग करायचं ते..!

टाटा मोटर्स मधे सध्या प्रत्येक भारतीयाचं  लक्ष लागलंय. अगदी फार पूर्वी जेंव्हा टाटा टी ने टेटली ऑफ युके ( एक मोठा चहाचा ब्रॅंड ) एका मस्त मूव्ह करुन  (त्याला एल बी ओ म्हणतात.. म्हणजे लिव्हरेज बाय आउट.. एमबीए करणारे सगळे जण समजतील मी काय म्हणतोय ते. जर एल बी ओ हा काय प्रकार आहे हे माहिती करुन घ्यायचं असेल आणि ६ पानं वाचायची तयारी असेल तर इथे क्लिक करा.) जेंव्हा अक्वायर केला, तेंव्हाच प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंच झालेली होती.. कारण ही पहिल्या भारतीय कंपनीने टेक ओव्हर केलेली ब्रिट कंपनी होती.  टाटा हे देशप्रेमाचे सिनोनेम झाले आहे असे मला वाटते..

गेल्या एक वर्षात टाटा मोटर्सच्या साइट्ला ३० मिलियन हिट्स मिळाल्या आहेत,इंटर्नेट वर जवळपास ६००० इंटरेस्ट ग्रुप्स आणि कम्युनिटी तयार झालेल्या आहेत!

कनिष्ठ मध्यम वर्गियांचे कारचे स्वप्न साकार होणार आता.ही कार जेंव्हा पहिल्यांदा प्रगती मैदानावर ऑटॊ एक्स्पो भारत आणि  ऑटॊ एस्क्पो जिनेव्हा ला लॉंच झाली , तेंव्हा  केवळ भारतामधील नाही तर संपुर्ण जगातील सगळं ऑटॊमोबाइल वि्श्व ढवळुन निघालं होतं.

ज्या वेळेस कार लोकांना दाखवण्यात आली,  तेंव्हा टाटा चा एक इंटर्व्ह्यू आला होता, त्यात रतन टाटा म्हणतात, जेंव्हा ही कार ची आयडीया जर्मिनेट झाली , तेंव्हा मी कधीच असं म्हंटलं नव्हतं की १ लाखाची कार बनवणार म्हणून, परंतु मिडियाने हे १ लाखाची कार बनवणार म्हणून पब्लिसाइझ केलं. तेंव्हा मी पण माझ्या थिंक टॅंक ला.. आर ऍंड डी इंजिनिअर्स ना म्हणालो.. “व्हाय नॉट?” आणि सगळॆ जण एक लाखाची कार बनवायच्या मागे लागले.आणि आम्ही ती बनवून दाखवली..

जिनेव्हा एक्स्पॊ मधे इतर मॅन्युफॅक्चरर्स नी पण स्फुर्ती घेउन  कमी किमतीची, कमी पेट्रोल वापरणारी, कार तयार करण्याचा मनोदय बोलून दाखवला.रेनॉल्ट ने पण येनी या नावाने भारता मधे महिंद्रा च्या कोलॅबरेशन मधे ही कार  फियाट ५०० अन टाटा नॅनॊ च्या कॉंपिटिशनला उतरवणार आहे असे ऐकतो.

renault-yen

जिनेव्हा एक्स्पो बरोबर एक वर्षा पुर्वी जेंव्हा नॅनो पब्लिक डीस्प्ले केली गेली,  तेंव्हाच हे छायाचित्र..ह्या पोस्ट मधे बरीच छायाचित्रे आहेत. प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल अशी ही गोष्ट! सगळी चित्रे जरुर बघा, आणि फील  अ प्राईड  इन बिईंग ऍन इंडियन!

1123

324567282910रतनजी… यु मेड ऑल इंडीयन्स प्राउड टु !! शतशः प्रणाम….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड and tagged , , . Bookmark the permalink.

2 Responses to नॅनॊ आली हो……..

  1. देवेन्द्र says:

    टाटा दि ग्रेट …

    टाटा हे भारतात विश्वासच दुसर नाव आहे ते नुसत नाही…

  2. प्रतिक्रिये बद्द्ल धन्यवाद देवेन
    जगातील सगळ्या मोठ्या कार मॅन्युफॅक्चरर्स्ला हलवुन सोडलं होतं.. वरचे फोटो अन दाखवताहेत की प्रत्येक कार मॅन्युफॅक्चरर हा इंटरेस्टेड होता नॅनो मधे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s