तंबी दुराई

कुठलाही रविवार असो, सकाळी उठलो, की आधी समोरचं दार उघडून कडी मधे अडकवलेले पेपर काढतॊ. अर्थात त्या मधे फक्त टाइम्स , मीरर आणि डिएनए असतो. मराठी पेपर पैकी एकही नसतो.नेहेमी प्रमाणे कुरकुरत पेपर काढून आत येतो..सौ. ला आवाज देतो,  चहा कर ग….आवाजातला चिडखोर स्वर ऐकुन तिला कल्पना आलेली असते….म्हणते… काय झालं? लोकसत्ता आला नाही वाटतं…….! म्हणत ती हलकेच स्मित हास्य देते.. ( काय तिरशिंगराव टाइपचा/सर्किट   माणुस आहे अशा अर्थाने .. ) ..आणि चहा चा कप समोर आणून ठेवते.. तिला पण माझ्या मुडची पुर्ण कल्पना ,   जो पर्यंत तंबी दुराई वाचत नाही तो पर्यंत मी अस्वस्थ रहाणार, ते तंबी चे अडीच पेग वाचले की मग  माझा मुड नॉर्मल ला येणार..

आजपर्यंत हज्जारदा सांगून झालंय पेपरवाल्या पोराला , की मराठी पेपर लवकर देत जा, पण हा प्राणी ऐकेल तर शपथ! म्हणे मराठी पेपर लॆट येतो.. बरं माझ्या समोरच्या केरळी माणसाच्या कडी मधे मात्र मल्याळम पेपर मोठ्या दिमाखात अडकवलेला दिसतो..   महाराष्ट्रा मधे मराठी ची गळचेपी सुरु आहे हे मात्र नक्की.. राज ठाकरेंनाच सांगायला पाहिजे.

एक दिवस रागारागाने बिल्डिंगच्या खालच्या मजल्यावर , ( रिसेप्शन कॅरिडॉर जिथे पेपर्स चं सॉर्टींग चालतं तिथे गेलो आणि पाहिलं तर तिथे मराठी पेपरचे गठ्ठे पडून होते..पेपरवाला अर्थात मराठीच, त्याला म्हंटलं अरे तु मनसे चा ना? मग मराठी पेपरला वेळ का लावतो? तर म्हणे, साहेब , मराठी पेपर वाचणाऱ्या फक्त मॅडम लोकं आहे, इतर सगळे साहेब लोकं, ( मराठी सुद्धा) आधी टाइम्संच वाचतात, म्हणून तोच पेपर आधी डिस्ट्रिब्युट करतो…. मराठी पेपर मॅडम लोकं दुपारी वाचतात….. म्हणून   उशिरा देतो…. !!आणि  त्याने माझ्या कडे त्याने एक तुच्छ कटाक्ष टाकला… काय माणुस आहे , सकाळी आधी मराठी पेपर वाचायचं म्हणतोय  हा.. अशा अर्थाने!!

तेंव्हा किंचित नाराजीनेच कम्प्युटर सुरु करतो अन लोकसत्ता च्या पेज ला पोहोचतो. सर्व प्रथम लोक रंग उघडून तंबी दुराइची-दोन फुल आणि एक हाफ  मारतो..

हे सदर म्हणजे अगदी ग्रॆट आहे. ह्या माणसाच्या विनोद बुद्धीची कमाल वाटते. दर रविवारी कुठल्या तरी करंट टॉपिक वर विनोदी लिहिणं म्हणजे काही सोपं नाही. पण हा माणुस इमाने इतबारे दर रविवारी दोन फुल अन एक हाफ चा रतीब घालतोय.

त्यातल्या त्यात बाळासाहेब, उद्धव आणि राज हा विषय असेल तर ह्याचा पेन ला थोडी जास्तच धार चढते. कालचा तंबीचा लेख वाचला कां? राज ठाकरेंच्या वरचा हा लेख एकदम मस्त अन हलका फुलका आहे. विनोदी पद्धतिने काढलेले चिमटे,आणि खुमासदार लिखाण..  दिवस मस्त गेला कालचा. राज ठाकरे यांनी किशोरी ताईंच्या अल्बम चे विमोचन केले, तेंव्हा त्यांनी न केलेले भाषण लिहिलंय  तंबी ने.. ते इथे लिहित नाही पण तुम्ही जर वाचलं नसेल तर जरुर वाचा..  तो लेख इथे आहे...

ह्या पूर्वी पण अमेरिकेमधे “अमेरिका नवनिर्माण सेना” हा लेख तंबी ने लिहिला होता.. तंबी म्हणजे ग्रॆट माणुस.. पण च्यायला, ह्याला कितीही मेल पाठवा उत्तर काही पाठवत नाही हा…   एखादा कॉलम दहा वर्षापेक्षा जास्त काळ चालवायचा म्हणजे काही चेष्टा नाही राव…
त्याने कोणालाच सोडले नाही अगदी, बाळासाहेब ते राज , किंवा नरायण ते विलास, किंवा गल्ली ते दिल्ली..ह्याच्या काही निवडक लेखाचं एक पुस्तक पण निघालंय… कुमार केतकरांची प्रस्तावना आहे   त्या पुस्तकाची..

माझ्या एका मित्राची , प्रियाल वेदपाठकची तंबी वरची कॉमॆंट फारच बोलकी आहे..”कुणाला “तंबी दुरई” या व्यक्ती बद्दल काही आधीक माहिती आहे का..? नावा वरुन तर डोळ्यासमोर एक “पांढरा हाफ़ शर्ट” आणि “पांढरी लुंगी” येते पण मराठी लेखन कौशल्य पाहिलं की यांचा पत्ता “५१७, सदाशिव पेठ, पुणे-१३ (दुपारी २-४ दरम्यान डोअर बेल वाजवू नये, इथे माणसे राहतात आणि ती दुपारी विश्रांती सुद्धा घेतात्..!)” असाच काहीतरी असेल असं वाटतं…

कुणाला अधिक माहिती आहे…??”

दहा वर्षांपासून टोपण नावाने लिहितोय हा माणुस.. !!!!!!!!!!


About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged . Bookmark the permalink.

13 Responses to तंबी दुराई

 1. मध्ये मी कुठेतरी वाचले होते की तंबी दुराई हे श्री. श्रीकांत बोजेवार यांचे टोपण नाव आहे.

  • नाही, तसं नाही . अजुन तरी तंबी कोण हे गुलदस्त्यामधेच आहे . बोजेवारांचे नांव मी पण ऐकले होते ,पण ते तंबी नाहित. इव्हन जेंव्हा तंबी च्या पुस्तकाचे विमोचन झाले तेंव्हा पण तो समोर आला नाही… अहो, रविवारचा सकाळचा चहा एकवेळ चुकवेन, पण तंबी.. छे!!! कदापी नाही..

 2. बोजेवार तंबी दुराई नाही असे ठासून म्हणता…पण बोजेवारांना तुम्ही ओळखता का ?

  • नाही हो.. मी स्वतः ओळखत नाही . पण जेंव्हा त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं तेंव्हा पण श्रीकांत बोजेवार नव्हते त्या कार्यक्रमामधे. माझी तर मनापासुन इच्छा आहे तंबी ला भेटायची.. असो.. पुढे मागे कळेलंच.. तेंव्हा कधीतरी..

 3. Nitin says:

  मी ब-याच लोकांकडुन ऎकलयं की तंबी दुराई म्हणजे अशोक नायगावकर…
  कोणीही असो – माणूस जबरदस्त आहे

 4. आल्हाद alias Alhad says:

  It think tambidurai is Mr. Pravin Tokekar!

 5. Varun says:

  तंबी दुराई हा माणूस नाही…ती बाई आहे….पेडर रोडला राहते….

 6. Sanket Apte says:

  Ikde lok kaay vattel te andaj bandhat aahet. Pan khari goshta hi ache ki mi Tambi Durai aahe. Prasiddhichi avad naslyane mi aattaparyant kadhi lokansamor aalo nahi… 😉

  • संकेत
   आता सगळ्यांना समजेल ना…. जाऊ दे, समजलं तरी काय फरक पडतो म्हणा, आता ब्लॉग वर पण लिहिणं सुरु कर , तंबी आणि ब्रिटीश नंदी हे दोघंही मला खूप आवडतात.

 7. अभिजित says:

  महेंद्र तुम्हाला तुंबी दुराई कोण याचे उत्तर मिळाले असे गृहित धरतो नसेल तर हा लेख वाचा http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=13658:2009-10-06-13-18-40&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s