सेक्स आणि संस्कृती

मी आधीच सांगितलंय की मी किती चांगला अन सत्प्रवृत्त आहे हे दाखवण्यासाठी हा ब्लॉग मी लिहित नाही. माझ्या मनातील विचार अगदी प्रामाणिक पणे लिहिण्याचा मी इथे प्रयत्न करतो. आपल्या  भारतीय संस्कृती मधे ह्या विषयावर काहीही बोलणे म्हणजे महा पाप आहे. . . भारतामधे सेक्स हा शब्द टॊटली टॅबु आहे. नुसता शब्द जरी उच्चारला तरीही भुवया वक्र होतात. या विषयावर पुर्वी काहीही बोलले जायचे नाही. हा प्रकार म्हणजे काही तरी घाण गोष्ट असा कन्सेप्ट होता.ज्या गोष्टींवर जगाचे रहाट गाडगे चालते ती गोष्ट म्हणजे सेक्स.. मग तिला वाईट का म्हणायचं? मला वाटतं आता वेळ आलेली आहे, की भारतीयांनी पण क्लोझेट मधून बाहेर येउन या गोष्टीवर पण ओपनली चर्चा केली पाहिजे.

पूर्वीच्या काळी, जी काही माहिती मिळायची, ती फक्त ऐकीव स्वरुपातच असायची आणि अर्धवट माहिती असलेल्या माणसा कडूनच- , हल्ली तसं नाही, इंटरनेट आल्या पासुन बरंच जग बदललंय..

ह्या विषयावर जरी काही बोलणे किंवा इतर काही ज्ञान दिले जात नसले तरी पण योनी शुचुता हा भारतियांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. काहीही झालं तरी हरकत नाही, पण स्त्री ची अब्रु ही काचे प्रमाणे असते वगैरे वगैरे गोष्टी अगदी  बालपणापासून स्त्री च्या मनावर बिंबवल्या गेल्या असतात.( ह्या गोष्टी बरोबर की चूक हे डिस्कस करणार नाही इथे)

हा विषय डोक्यामधे घोळत होता बरेच दिवसा पासून. हा  विषय साधारणतः तीन पिरियडस मधे विभागला जाउ शकतो. एक म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळ, दुसरा म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काळ, आणि आत्ताचा काळ.. की जेंव्हा आता ऑफिसेस मधे समवयीन लोकं जी स्पॉट वगैरे गोष्टी पण हल्ली डिस्कस करतात..

पहिला पिरियड:-

पुर्वी च्या काळी जेंव्हा बाल विवाह पद्धती भारतामधे होती( १९व्या शतकाच्या सुरवातीला) तेंव्हा वयाच्या १५-१६ व्या वर्षीच  विवाह होऊन मुलगी पती कडे रहायला जायची. तेंव्हा सेक्स विषयी चे ज्ञान अगदीच नगण्य असायचे. जे काही शिकायचं ते केवळ प्रॅक्टीकल अनुभवा वरुन, नैसर्गिकरीत्या हे शिकता येइल ते.. .सेक्स म्हणजे काय हे समजण्या पूर्वीच आणि सेक्स हा एंजोय करायचा असतो हे समजण्या पूर्वी  ,दोन तिन मुलं पदरी पडायची अन रोजच्या रहाटगाडग्यात स्त्री ने गुंतून जायचे. अगदी दोन पिढ्या आधी.. ही सिस्टीम प्रचलित होती. स्त्रियांचा एक भोग वस्तु म्हणून वापर अगदी सर्वमान्य होता. प्रत्येक स्त्रीला ( भरल्या घरातली) कमीत कमी ६ ते ९ मुलं असायची. अर्थात ह्या पैकी सगळी मुलं जगायची असं नाही. त्यापैकी बरीच मुलं बाळंतपणातच दगावायची. बऱ्याच स्त्रियांचा  बाळंतपणातजीव पण जायचा. सेक्स म्हणजे मुलं होण्याकरिता करण्याची क्रिया..असाच समज होता. हा प्रकार स्त्रियांनी एंजॉय करायचा असतो हा कन्सेप्टच नव्हता..

दुसरा पिरियड :-

भारत स्वतंत्र झाला होता, बाल विवाह हा कायद्याने गुन्हा झाला होता .स्वातंत्र्याकरता लढलेल्या लोकांच्या नंतरची पिढी होती ही. ह्या लोकांनी स्वतंत्र भारतामधे जन्म घेतला होता. साधारण ६० व्या दशकात जन्मलेली मुलं आणि मुली  यांनी शिक्षण घेणे सुरु केले होते. सेक्स म्हणजे संभोग , म्हणजे दोघांनीही एकत्र घेतलेला भोग( म्हणजे काय?) ,… वगैरे वगैरे.. गोष्टी थोड्याफार वर्गामधे मुलांमधे चर्चिल्या जाउ लागल्या होत्या. तरीही ह्या विषयावरचे ज्ञान मात्र अगदी( खरं तर शुन्य) यथा तथाच होते.तसंही नाही म्हणायला पिवळ्या कव्हरमधली पुस्तकं रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडे दिसु लागली होती. मुलांच्या हातामधे पैसा हा कधिच नसायचा. त्यामुळे एखादेच पुस्तक  ,लगन झालेल्या मोठ्या भावाच्या गादिखालचं कोणितरी आणायचा.वर्गामधे सगळी मुलं ते पुस्तक आळीपाळीने वाचायची. मला आठवतं मी आठवीत असतांना सुहागरात म्हणुन एक पुस्तक एका मुलाने आणले होते, त्या पुस्तकाचे कॉमन रिडींग एका ऑफ पिरियडला झाले होते .. भर वर्गात… आता वर्गामधे मुली नव्हत्या म्हणून बरं… आमची केवळ मुलांचीच शाळा होती ना…..!अर्थात त्या पुस्तकात अजिबात काहीच दिलेले नव्हते पण जेवढे काही दिलेले होते, तेच आमच्या दृष्टीने खुप होते.

वात्सायनाचे काम शास्त्र म्हणुन एका संस्कृत ग्रंथाच्या बद्दल पण भारतियांमधे आणि परदेशामधे एक वेगळंच सुप्त अट्रॅक्शन असते.आम्ही पण शाळेत असतांना हे पुस्तक म्हणजे काहितरी ग्रेट असेल म्हणुन वाचायला जीव टाकायचो.. एकदा एका मित्राने वर्गात आणले होते तेंव्हा वाचायला मिळालं पण होतं.. पण त्यात असं काही वावगं दिसलं नाही.. फक्त कॉम्प्रोमायझींग पोझिशन्स मधली रेखा चित्रे मात्र पाहिल्याचं आठवतं..तसेच एकदा  एका मुलाने वर्गामधे अने विर्यनाश म्हणजे मृत्यु हे पुस्तक आणले होते, आणि नंतर कित्येक दिवस आम्ही लोक घाबरुन गेलो होतो. सायकिक डिसऑर्डर व्हायची वेळ आली होती.. पण हळु हळू सांभाळल्या गेलो.

बरं ह्या गोष्टी कुणाला विचारायच्या तरी पण लाज वाटायची.. एक बाकी खरं,  मुलांना  ह्या विषयावरचं ज्ञान अगदी शून्य होतं, जे काही समजायचं ते असंच उडत उडत.केवळ म्हणूनच मला असं वाटतं की पौगंडावस्थेतील मुलांना ( ७ वी ८ वीत )ह्या विषयावर शास्त्र शुद्ध शिक्षण देणे आवश्यक आहे..

हे सगळं लिहिण्यामागचा उद्देश केवळ हाच की पौगंडावस्थेतील मुलांना ह्या गोष्टी बद्दल सुप्त अट्रॅक्शन असतं.. आणि त्यामुळे ह्या मधली काहिही माहिती काढण्यासाठी मुलं काहिही करण्यासाठी तयार असतात. ब्लॉटींग पेपर जसा शाई टिपून घेतो, तसाच ह्या वयात जे काही बरं वाइट वाचायला मिळेल  ते मुलं वाचतात.

ह्याच पिढी ने वपु काळेंचं पुस्तक पार्टनर वाचलं.. मला आठवतं १९८२ मधे ह्या पुस्तकाचं अगदी पारायण केलं होतं.. त्यामधले ते पार्टनरने लिहलेले पत्र.. … वाचून संभोग म्हणजे काय ? ह्या गोष्टी बद्दल अजूनच कन्फ्युजन वाढीला लागायचं…

हेच ते वपुंचं पार्टनर मधलं पत्र..
“समुद्राची ताकद टिटवी समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फुलाला उमलत नाही.
एवढासा तू, त्याहून एवढासा मी मला जीवनाचा अर्थ कसला विचारतोस?आणि त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो, हे तुला कोणी सांगितले?
पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मूर्ख म्हणून नव्हे तर जाणकार म्हणून थांबले.
पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणून.
कोणता आनंद क्षण जीवी नाही?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास.
सुगंधाचं नातं नाकाशी.घशातून आत गेल्यावर ती फ़क्त हवा.
खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेचे नसून तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसिकता संपली.
इतर अनेक गरजा प्रमाणे “तृप्ती” जी एक गरज आहे.
जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ.”

काय सुंदर लिहिलंय ना? वपुंचं ते पार्टनर प्रत्येकाने एकदा तरी जरुर वाचावे. आज जवळपास तिस वर्षानंतर पण त्या पुस्तकाची जादु काही कमी झालेली नाही.

तिसरा पिरियड:-

.आजच्या पिढी मधे आता इतकी डेव्हलपमेंट झालेली आहे की आपण सेक्स एज्युकेशन बद्दल बोलणं सुरु केलंय, शाळेमधे द्यायचं की नाही हे डिस्कस करणे सुरु केले आहे…मुलांना  नको त्या वयात इंटरनेट वर बऱ्याच गोष्टी माहिती झालेल्या असतात. अगदी डीप सेक्स्युअल इंटरकोर्स मधल्या इंट्रिकसीज पण फुकट ऍव्हेलेबल असलेल्या चित्रफिती मधून आणि चित्र पाहून माहिती झालेल्या असतात.

माझ्या सारखे पालक म्हणून घरच्या कॉंप्युटर वर नेट नॅनी इन्स्टॉल करण्यासाठी खर्च करायला तयार असतात आणि करतात पण…..,!मुला मु्लिंच्या मित्र मैत्रिणीकडे  घरी इंटर्नेट “पुर्ण पणे असेसेबल” असते. मग मित्रांकडे जाउन नेट सर्फिंग सुरु होतं. देअर आर आल्वेज फ्यु थिंग्स बियॉंड युवर कंट्रोल…ह्या अशा प्रश्नांना काहिच उत्तरं नाहित हे मात्र खरं..

बरोबरचे वर्गातली मुलं काही तरी वाचून आणि बघून मग  स्वतःचे कन्सेप्ट फॉर्म करतात. फार नाही , पण इंटरनेट वर पाहून फिजिकल क्रिया कशी असते, एवढं तर मुलांना नक्कीच कळतं.चित्र , लिखित स्वरुपातलं वांगमय, आणि इतर गोष्टी..बरं इतकं सगळं असून सुध्दा अजूनही मुलांना आणि मुलींना ह्या विषयातले ज्ञान अतिशय कमी आहे. जे काही आहे ते चिप पोर्न मटेरिअल बघुन  स्वतःचे कन्सेप्ट फॉर्म केलेले असतात.

मला एक मोठा प्रशन पडलाय, की हे असं कां? मुलं इतकी इंटरनेट सॅव्ही आहेत, इतका वेळ इंटरनेट वर घालवतात, तरीही ह्या विषयावरचे ज्ञान इतके कमी कां? मला वाटते चिप पॉर्न बघून ह्या विषयाबद्दल भीतीच निर्माण होत असेल. काही मुलं मात्र नकॊ ते जास्त शिकून मग नसते प्रयोग करतात.. (डीपीएस  केस , ती डीपिएस ची चित्रफित मला पण इ मेल मधे आलेली होती, जवळपास ५ मिनिटांच्या चित्र फिती मधले ती मुलगी अन तो मुलगा दोघांचेही वागणे एकदम पोर्न स्टार्स ला लाजवणारे होते.) अशा परिस्थिती मधे मुलांना सेक्स एज्युकेशन हे अतिशय गरजेचे आहे असे वाटते…चित्रांमधले चित्र विचित्र प्रकार पाहून हा विषय म्हणजे काहीतरी अगम्य आणि जिम्नॅस्टीक सारखा खेळ वाटायला लागतो, अन या खेळामधे आपण पुरु शकतो का? हा प्रश्न मनात उभा रहातो. मग केवळ स्वतःची कॅपॅसिटी टॆस्ट करायला म्हणून सुद्धा काही तरुण वेश्या गमन वगैरे गोष्टी  करतात… हल्ली हाय सोसायटी मधे पण ,ह्याच वयात  कॅज्युअल सेक्स हा कन्सेप्ट वा्ढीस लागलाय …एड्स आणि तर संसर्गजन्य रोग, नवीन पिढी मधे पसरु नयेत म्हणून तरी जागरूकता आणणे आवश्यक आहे.

मुंबई मिरर मधे सेक्स ऍडव्हाइस या सदरामधे, अतिशय प्रिलिमीनरी प्रश्न विचारले गेले असतात. तसेच मटा मधे पण असेच काही  प्रशन डिस्कस केल्या गेले असतात..ह्याच गोष्टींच्या मुळे मग खरंच काय असतं हे शोधण्याची प्रक्रिया सुरु होते.

सेक्स म्हणजे संभोग.. दोघांनीही समप्रमाणात घ्यायचा भोग.. पण आपल्यावरच्या संस्कारांमुळे, दोन्हीही  सेक्स पार्टनर्स दुसऱ्याला जास्त सुख द्यायचा प्रयत्न करतात, (पुरुष स्त्रिला आणि स्त्री पुरुषाला ),त्यामुळे होतं काय…….. की दोघंही देणारेच .. !!!  सुख घ्यायला कोणीच तयार नाही.. !!सगळा वेळ केवळ दुसऱ्याला बरं कसं वाटेल, ह्याच गोष्टीवर विचार आणि क्रिया करण्यात जातो. स्वतःला काय आवडतं आणि कसं आवडतं हे सरळ विसरल्या जातं..आणि अल्टिमेटली दोघंही एंजॉय करित नाहीत.. ह्या सगळ्या परिस्थिती मधे मग सेक्स ही क्रिया एक मेकॅनिकल गोष्ट होऊन जाते..

माझ्या मते सेक्स ही फक्त देण्याची नाही तर सुख घेण्याची क्रिया आहे. दोघांनीही शक्य होइल तेवढं सुख घ्यायचं असतं………

माझ्या वाचण्यात आलंय की बऱ्याच स्त्रियांना लग्नानंतर पण कित्येक वर्ष ऑर्गझम म्हणजे काय हे ठाऊक नसते.. स्पेशिअली हा प्रकार भारतामधे जास्त प्रमाणात दिसून येतो..

शक्यतो  कुठेही अश्लिल न होऊ देता लिहण्याचा प्रयत्न केलाय. .. ह्या विषयावर जितके लिहावं तितकं थॊडंच आहे. तरी पण माझ्या कडून एक लहानसा प्रयत्न.  मला जे काही कन्व्हे करायचे आहे ते झालेले आहे., म्हणून इथेच थांबतो आता.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

8 Responses to सेक्स आणि संस्कृती

 1. abhijit says:

  पिरियड पहिला: यावर ध्यासपर्व हा छान चित्रपट आहे.

 2. ध्यास पर्व ह्या चित्रपटाबद्दल ऐकल जरुर आहे पण पहाता आला नाही. बघतॊ सिडी मिळते का ते आज..
  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

 3. Nitin Sawant says:

  marathi chitra katha…

  first time on net..

 4. वा… पुन्हा एक मस्त आणि वास्तव पोस्ट!

  हा विषय तसा नाजुकच.. म्हणजे बोलावं तरी अगदीच ‘फौरवर्ड’ कॅटेगरी मधला किंवा पिसाटलेला वगैरे गणला जाण्यासारखा!

  पहिल्या पिरियडच्या बद्दल फक्त वाचुन माहिती मिळते.. मात्र दुस-या पिरियडचा उत्तरार्ध जवळ-जवळ जवळुन पाहिल्या सारखा…!

  लहाणपणी गावी असताना पाहिलंय की मोठ्यांचे ‘हे’ प्रोग्राम ब-याचदा शेतात व्हायचे.. घरी त्यासाठी जागाच नसायची! मात्र त्याही प्रकारात अगदीच पटकन् उरकुन घेणे [जल्दी कर – कोई देख लेगा!] हाच उद्देश असावा असे वाटायचे. माझ्याच वयाच्या मित्रांचे – नातेवाईकांचे ‘हनिमुन’ प्रोग्राम ब-याच अंशी असेच शेतात किंवा घरच्या किचनमध्ये झालेले! त्यात ‘ऑर्गझम’ / उच्च – बिंदु चा भाग कितीसा हा विषय वेगळा!

  … हा आता तिस-या पिढीबद्दल – म्हणजे बहुतांशी चालु – पिढीबद्दल.. नेट सॅव्ही पिढीबद्दल काय सांगावे… खरंच – पौर्न ल्किप्स – मुव्हीज बघुन तसे प्रकार तर करणे म्हणजे स्वतःच्या आणि पार्टनरच्याही सुखावर पाणी ! …अशा प्रकारात ब-याचदा ‘पोपट’ झाल्याच्या कथाही मित्रांकडुन ऐकल्यात. ज्या मुव्हीज – क्लिप्स फक्त फॅटसी म्हणुन बघता त्या आजमावण्यात काय अर्थ आहे? हा.. आता जर लोकांना त्यात ‘सुख’ मिळत असेल तर ना नाही…!

  या विषयावर काही महिन्यांपुर्वी एक चांगली पोस्ट वाचली होती… पुन्हा शोधुन काढली… ती इथे आहे.. जरुर वाचा!

  बाकी… बोलण्यासारखं बरंच मात्र … “माझ्या मते सेक्स ही फक्त देण्याची नाही तर सुख घेण्याची क्रिया आहे. दोघांनीही शक्य होइल तेवढं सुख घ्यायचं असतं………” हेच बरोबर!

  • पण तुमचा सर्वांग सुंदर अभिप्राय एकदम आवडला. तो प्रिंसेस चा ब्लॉग पाहिला.वाह.. अरे काय मस्त पोस्ट आहे. त्या वेळेस मी ब्लॉगिंग करित नव्हतो म्हणुन वाचणं सुटलं बहुतेक. खुपच मस्त लिहिलंय.. मी नेहेमी म्हणतो, एक पर्सनलाइझ्ड टच असेल तर पोस्ट वाचायला ’खरं’ आणि ’बरं’ वाटतं.. इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल अभिप्राय..

   मी स्वतः जवळपास प्रत्येक पोस्ट वाचतो.. अगदी नजरेखालुन तरी घालतो. मनात विचार असतो, कोणितरी ते लिहिण्यासाठी मेहनत केली आहे… नजरेखालुन तरी घालु, पुर्ण वाचलं नाही तरी..

 5. Sharda Morya says:

  Mahendra,
  Khup chaan, Kiti sopya bhashet tumhi ha article lihila aahe.

  • शारदा,
   खूप दिवसापूर्वी लिहिलेले आहे. आता निटस्ं आठवत पण नाही काय लिहिलं होतं ते.. 🙂 धन्यवाद.

 6. zmanoj says:

  “पहिला पिरियड” थोडासा चुकीचा वाटतो.
  सेक्स हा फक्त पिढी वाढविन्यासाठीच आहे, हे शास्त्रीय दृष्ट्या खरं आहे. संभोग करताना माणूस बऱ्याच मोठ्या प्रमाणात एनर्जी वाया (किंवा उपयोगी 😛 ) घालवतो. शारीरिक कष्ट घेतो. प्रण्यामधल्या सहज स्वभावानुसार आपण एनर्जी प्रीजर्व करण्याकडे काळ देतो. वंश वाढवणे हा उद्देश तसा सुप्तच असतो. मग संभोगासाठी प्रेरित करण्या / होण्यासाठी निसर्गतः एक आकर्षण निर्माण करणारी संप्रेरके तयार होतात, आणि नकळत आपण सेक्स, ओर्गाझम वगैरे एन्जोय करतो.
  मुळात सेक्स हि गरजेची गोष्ट आहे. एन्जोय दुय्यम आहे. असोत, सेक्स एन्जोय करणेही तितकेच नैसर्गिक आहे जीतके कि वंश वृद्धीची सुप्त इच्छा असणे.

Leave a Reply to abhijit Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s