दिसामाजी काही लिहावे.. पण काय?? तसा प्रश्न कधीच पडत नाही. लॅप टॉप सुरु केला की आपोआप काहीतरी टाइप केल्या जाते. आपण लिहायला तर काही लिहू पण लोकांना वाचायला काय आवडते हे जास्त महत्वाचे! ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सलिम जावेद ला सुद्धा सापडलं नाही. म्हणूनच एकेकाळी अनभिषिक्त राज्य केल्यावर त्यांचे पण चित्रपट सुपर फ्लॉप गेले. ह्याचा अर्थ काय? आज ज्या तऱ्हेचं लिखाण लोकांना आवडतं तसंच कदाचित उद्या आवडणार नाही, म्हणजे लिखाण व्हर्सटाइल असेल तर जास्त वाचले जाईल.
माझ्या गुगल रीडरमधे मराठी ब्लॉग विश्व चा फिड घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त काही आवडीचे ब्लॉग्ज आहेत त्यांचा पण फिड घेतलेला अहे. मी रीडर उघडल्यावर काय वाचायचं हे ठरवतो. तर आजचा लेखाचा टॉपिक आहे लोकं ‘काय वाचायचं’ हे ‘कशावरून’ ठरवतात?? मी स्वतः बद्दल लिहितो, आणि मला वाटतं मोअर ऑर लेस तुम्हा सगळ्यांच्या बाबतीतही तेच खरं असावं……
अगदी आत्ता पर्यंत मला असं वाटायचं की पुस्तकी भाषा लोकांना वाचायला आवडत असेल. पण माझ्या बाबतीत तसं नाही. अगदी रोजची साधी सरळ सोपी फारशी अलंकृत नसलेले पोस्ट पण वाचायला छान वाटतात. त्या मधे फक्त एक ’पर्सनल ट” असलेला मात्र मला आवडतो..
मी आज जेंव्हा मराठी ब्लॉग्ज . नेट फिड ओपन केलं आणि लिस्ट “शो एक्स्पांडेड” केलं. प्रत्येक पोस्ट च्या पहिल्या चार ओळी आणि हेडींग.. बस्स! पहिले तर हेडींग जर कॅची असेल तर खालच्या चार ओळी वाचल्या, आणि शितावरून भाताची परीक्षा प्रमाणे , जर त्या चार ओळी आवडल्या तर त्या ब्लॉग ला व्हिजिट करुन पुर्ण आर्टीकल वाचून काढलं..
नंतर जवळ पास सगळ्या नोंदी नजरेखालून घातल्यावर पुन्हा एकदा सगळ्या चार ओळी, ज्या हेडिंग कॅची नाही म्हणून सोडल्या होत्या, त्या पण वाचल्या. लक्षात आलं.. की .. अरे? चांगलं लिहिलंय की… !!! थोडक्यात एक गोष्ट लक्षात आली, पहिली म्हणजे हेडींग अगदी कॅची पाहिजे , आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या चार ओळी चांगल्या पाहिजेत.
काही कवितांचे सुंदर ब्लॉग्ज आहेत. पहिल्या चार ओळी जर चांगल्या असल्या तर कविता पण बऱ्या वाटतात वाचायला.
माझ्या हे पण लक्षात आलं, की टाटा नॅनो ची माझी पोस्ट, जी माझ्या मते एक वन ऑफ द बेस्ट पोस्ट्स आहे ती लोकांना का आवडली नाही.. त्या पोस्ट मधे टाटा मोटर्स नॅनो कार मुंबई ला लॉंच करणार २३ मार्च ला.. ही न्युज आणि, जगप्रसिद्ध मोटर मॅन्युफॅक्चरर्सनी जेंव्हा टाटा मोटर्स च्या स्टॉल ला भेट दिली आणि नॅनो कार पाहिली, तेंव्हाच्या कॉमेंट्स आणि फोटो होते. पण ती पोस्ट अन दुर्लक्षित गेली. एक भारतीय म्हणून मला जे फोटो बघतांना अभिमान वाटला होता, ते फोटॊ इतरांच्या दृष्टीने नगण्य होते…..कारण?? त्या पोस्ट ची वाईट तर्हेने केलेली सुरुवात… मी सुरुवात जर टाटा आपली नॅनो मुंबई शो रुम मधे लॉंच करणार… अशी केली असती तर लोकांनी ते पोस्ट पाहिलं असतं..
असो… आजच्या ह्या पोस्टची पण सुरुवात तशी बरोबर नाही.. पण असो..माझी लिहिण्याची पद्धत अशी, की सरळ किबोर्ड बडवायचा, आणि सगळं लिहुन झालं की मग हेडींग काय असेल ते टाकायचं… जास्त वेळ घालवायचा नाही आज ह्या पोस्ट वर. बालिका बधु संपलंय . पोस्ट पण संपवतॊ..
my observation is people do comment when a specific blog is new.. their interest of reading that blog remains the same later , but commenting on that definitely reduces unless the blogpost is exceptionally well written.. 🙂
so maze mat.. comments dilyat tar thanks! nahi dilya tari no problem! 🙂
तुमच्या ह्या मताशी मी १०० टक्के सहमत. माझ्या लक्षात आलं नव्हतं पण नेमकं असंच होतं..आता बघा ना, मी पण बरेच ब्लॉग्ज वाचतो,काही पोस्ट नजरेखालुन घालतो.. ( म्हणजे वर वर वाचतो) तरी पण कॉमेंट्स फार कमी टाकल्या जातात. जसे , तुमच्या ब्लॉग वरचे परवाचे पोस्ट ’धमाल’ छान जमलंय, मी वाचलं सुध्दा पुर्ण आणि मला आवडलं, तरी पण कॉमेंट टाकायचा कंटाळ केला. असं होतं हे बाकी खरं…
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार…
मला एका गोष्टीची आठवण झाली (थोडंसं विषयाला सोडून). एका प्रख्यात गाईकेचा कार्यक्रम होता ठाण्यात. त्यांनी अतिशय सुंदर गाणी गायली. पण टाळ्या येईनात. मग त्यांनी म्हटलं, “ठाण्यातील लोक हे उत्तम कला अभिरूचीसाठी प्रसिद्ध आहेत. दाद घ्यावी तर ठाणेकरांकडून.” लगेच टाळ्यांचा कडकडाट आणि त्यानंतर प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा कडकडाट होत गेला. तोच कार्यक्रम दुसर्या शहरात झाला, तिथे पण तेच. मग त्यांनी परत तीच युक्ती केली. असो.
महेंद्र आणि भायश्री, मी आपल्या दोघांच्याही मताशी सहमत आहे. टायटल तर कॅची पाहिजेच पण वाचकांनी कमेंट्स दिल्या तर तर आणखी हुरूप येतो. छान आहे किंवा वाईट आहे, इतकं लिहायला किती वेळ लागत असेल हो?
सुंदर उदाहरण दिलंत …. लिहायला काही फार वेळ लागत नाही आणि कॉमेंट्स न देण्याचे काही कारण पण नाही. तुमचं म्हणणं पटण्यासारखं आहे. आणि मला पण वाटतं काही आपल्याला आवडलेल्या पोस्ट वर कॉमेंट टाकायला काहीच हरकत नाही . मे बी दोन शब्द कौतुकाचे..
मी तरी ब्लॉगस कधी वाचत न्वहतो,पण जेव्हा तुम्ही सांगितल की तुम्हाला एक नवीन कीडा चावला आहे आणी तुम्ही ही लिंक दिलीत तेव्हापासून मी तुमचे जवळ जवळ सर्वच पोस्ट्स
वाचले आहेत वेळ काढून पण सर्वच पोस्ट्स वर प्रतिक्रिया लिहली नाही कारन एकच कधी
कंटाळा तर कधी बरेच पोस्टस एकदाच वाचत असताना वेळेचा अभाव आणी एकदा प्रतिक्रिया द्यायच राहून गेल की राहुनच जाते… तुमच्या ब्लोगमधील लिंकवरून सलोनिचा ब्लॉग वाचला त्यातले बरेच पोस्ट्स वाचले मस्त आवडले पण एकदम पर्सनल टच आहे त्यात पण प्रतिक्रिया द्यायच राहुनच गेल आता परत तिथे एकदा भेट देऊन छानशी प्रतिक्रिया देतो कंटाळा गेल्यावर ….[:)]
देवेंद्र
ब्लॉग सुरु केला होता तो मंगेश पाडगांवकरांच्या कवितांसाठी. पण नंतर मग तो ब्लॉग डिलिट केला . पण रोज काहितरी लिहायला बरं वाटतं..
Hmmm khara aahe pan heading vchaa aani likhaanaacha tasa phaarsaa kaahi sambandh nasto i mean jar vel asel tar aapan neet vaachun kaadhtoch ki saar..
aso tumcha blog aataach vaachtoy aani to aavdtoy he saangaayala haa prtisaad! 🙂
दिपक
प्रतिसादा बद्दल आभार. अशा प्रतिसादांमुळेच अजुन काही तरी लिहीण्याला हुरुप येतो.
पण जेंव्हा आपण पेपर वाचतो, तेंव्हा, आधी हेडींग बघुनच आपण ठरवतो बातमी वाचायची कि नाही ते. पण एकदा चांगले हेडींग असलेल्या बातम्या वाचुन झाल्या की मग इतर बातम्या पण वाचतो..
काय काका, तुम्ही इंग्लिश माध्यमातून शिकलात वाटतं? असो. मीही आधी ब्लॉग वाचण्याआधीच मत बनवायचो माझं. पण आजकाल शीर्षक आवडलं नाही तरी बर्याचदा वाचतो लेख. कधी कधी अनाकर्षक शीर्षक असूनही लेख चांगले असतात.
खरं आहे, अरे सुरुवातीला मी जेंव्हा ब्लॉग लिहिणे सुरु केले तेंव्हा माझ्या लिखाणात बरेच इंग्रजी शब्द यायचे… हा लेख फार सुरुवातीच्या काळात ( म्हणजे माझ्या ब्लॉगिंगच्या) लिहिलेला आहे.