वरुण गांधींचं काय चुकलं??

एकदम सॉलिड बाप्या आहे बरं हा वरुण गांधी वरुण गांधी… जे काम मोठ्या मोठ्या धुरंधरांनाही जमलं नाही ते वरुण ने एका झटक्यात करुन दाखवलं..भर सभे मधे  मनातले विचार बोलून दाखवणं म्हणजे काही खेळ नाही. यु मस्ट हॅव टु हॅव फुल फेथ ऑन द थिंग्स यु बिलिव्ह इन..देन ओन्ली यु कॅन हॅव गट्स टु स्पिक ओपनली अबाउट इट.

खरं तर गांधी घराण्याच्या वंशाचा दिवा, कॉंग्रेस मधे जर सोनिया गांधी नसत्या तर नक्कीच मनेका गांधी अन वरुण ने राज्य केलं असतं… पण विधी लिखित वेगळंच होतं !

स्वतःच्या वागणूकी वरून  संजय गांधींसारख्या वाद्ळी व्यक्तिमत्त्वाचे ऑफ स्प्रिंग असल्याचा १००टक्के पुरावा दिलाय वरुणने.संजय गांधी पण अशाच प्रकारे कुठल्या ना कुठल्या प्रकारे लाइम लाइट मधे रहात होते. मग ते नसबंदी असो किंवा मारुती कार असो.. प्रत्येक गोष्टीमधे एक वेगळीच लेव्हल ऑफ डिझायर आणि जे काही केलं त्यावर विश्वास होता त्यांच्या मधे. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी साठी कुठल्याही लेव्हलला जायची तयारी असायची तयारी असायची संजयची . स्वतःच्या प्रत्येक निर्णयावर ठामपणॆ उभे रहाण्यासाठी पण धैर्याची आवश्यकता असतेच..जी संजय कडे होती…

पिली भित इथुन वरुण ने भाजप च्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचं डिक्लिअर केलं ,तेंव्हा पासूनच त्यांच्या कडे सगळ्या भारताचे लक्ष  आहे. संजय -मनेकाचे सुपुत्र आणि इंदिराबाइंचे नातू म्हणुन त्यांच्याकडे एक वंशपरंपरागत चालत आलेली गुडविल तर आहेच पण सोबतच व्होकॅबलरी पण आहे. आणि त्याचा पुरेपुर फायदा त्यांनी परवाच्या भाषणात घेतलाय..

केवळ दोनच वाक्य होते ज्यावर आक्षेप घेतला जातोय.

—पहिले म्हणजे जर एखाद्याने एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करु नका, तो हात तोडून टाका म्हणजे तो हात पुन्हा उचलला जाणार नाही….

— दुसरी गोष्ट म्हणजे जर हिंदु कमजोर आहे असे समजून आणि जर   मतासाठी नेते आपले बुट चाटतिल असे वाटत असेल तर मी गीतेवर हात ठेउन प्रतिज्ञा करतो की मी तो हात तोडुन टाका ..

भाजपाचे अध्यक्ष मुख्तार नकवी ह्यांनी पण यावर आक्षेप नोंदवला आहे.त्यांचं म्हणणं की प्रत्येक दाढी आणि टोपी वाला लादेन नसतो..

वरच्या वाक्यामधे काय चुकलं अन काय बरोबर आहे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.(मला तरी काह आक्षेपहार्य वाटत नाही.) केवळ एकच सांगावसं वाटते की एक तडफदार नेत्याचे सगळे गुण दिसताहेत वरुण मधे. प्रमोद महाजनांची पोकळी भरुन तर येणार नाहीच , पण अशा  वरुण सारख्या नेत्यांची भाजप ला नितांत गरज आहे..

जर एखाद्याला असं वाटलं की महात्मा गांधींचं लॉजिक आता जुनं झालंय अन आजच्या परिस्थितीमध्ये लागु होत नाही तर त्याच्यावर केस करणार कां? हे कसले कायदे आहे? जेंव्हा कसाब गोळ्या घालित होता तेंव्हा हे अहिंसा तत्वज्ञान चालले असते कां? अर्थात नाही.. xx गिरी फक्त सिनेमातच सक्सेसफुल होऊ शकते असे मला वाटते..

भाजपा ने सरळ हे विचार आमच्या पक्षाचे नसुन केवळ वरुण गांधींचे आहेत असं म्हंटलं आहे. शेपुट घालुन केकाटंत बसण्याची भाजप प्रवृत्ती आता तरी या पक्षाने  सोडली तरच पक्ष टीकेल .. अन्यथा,  कॉंग्रेस च्या मार्गावर जाइल हा पक्ष..मानसिक रित्या खच्चीकरण झालेले आणि ’त्यांचे’ लांगुलचालन करणारे बरेच नेते आहेत पक्षात..

आता वरुण हा एक  नावाच चांगलानेता मिळालाय.. त्याला पण घालवायचा घाट घातलाय !नरेंद्र मोदी ह्यांच्याबद्दल सुद्धा सुरुवातीला असाच आक्षेप घेतला गेला होता. पण नंतर जेंव्हा क्लिन स्विप केलं गुजरातेत तेंव्हा मात्र भाजपाच्या हाय कमांड ( कसला जबरी शब्द आहे हा…!)ला मान्य करावंचा लागलं मोदींचे नेतृत्व गुण.मला वाटतं वरुण बद्दल पण असंच काहिसं घडणार..

हिंदुत्ववादी म्हणून  भाजप शिवसेना युती झाली. आता तर शंका येते आहे की भाजप खरंच हिंदुत्व वादी पक्ष आहे कां? की ते पण स्युडो सेक्युलर च्या मार्गाने जाताहेत? ह्या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपा च्या विश्वासार्ह ते बद्दल एक मोठं प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे..
भाज्पा मधल्या काही नेत्यांनी, म्हणूनच त्याच्या पाठीशी उभं रहाण्यापेक्षा, त्याचे भाषण हे कॉग्रेसी प्रवृत्तीचे आहे म्हणणे म्हणजे एक निव्वळ मुर्ख पणा.. अन दुर्दैवाची गोष्ट तो मुर्खपणा भाजपा करतंय..

भाजपाचा विजय जेंव्हा झाला होता, तेंव्हा भाजपाने हिंदु कार्ड खेळले होते. आज सेक्युलर कार्ड खेळताहेत.. काळाच्या ओघात कळेल हा निर्णय बरोबर की चुक ते!

वरुण गांधींवर सेक्शन १५३, १५३ ए, १५३ बी, १२३, १२३ बी च्या अंतर्गत कार्यवाही होऊ शकते. ह्याच कलमांवर बाळासाहेबांवर आजपर्यंत बरेच खटले दाखल केले गेले. त्यामुळे ह्याचा काही परिणाम होणार नाही. फक्त इलेक्शन कमिशन काय करते ते बघावे लागेल.

पिलिभित येथील दोन अधिकारी निलंबित करण्यात आल्याचे पण वाचले.. का म्हणून काय विचारता राजे..?? अहो त्यांनी वरुण वर कारवाई केली नाही म्हणून…!!

आता हा सिंहाचा छावा मात्र ’त्या’ मांजरांच्या  पिल्लावळित उठुन दिसतोय हे मात्र अगदी खरं.. आणि त्या पिल्लावळिला ह्याचं वागणं , बोलणं कितपत झेपतं ते ही बघायचं आता..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged . Bookmark the permalink.

8 Responses to वरुण गांधींचं काय चुकलं??

 1. atul gadhave says:

  varun gandhi is realy great man.he is second sanjay gandhi.
  you are god of hindu people.varun gandhi keep it up all hindu are with you.

 2. milindarolkar says:

  काहीच चुकलं नाही वरूण गांधि यांचं. पण आपल्या देशाला वास्तवापेक्षा स्वप्नात जगायला आणि प्रत्यक्षापेक्षा प्रतिमेची पूजा करायला आवडतं.

  त्यामुळे वरूण यांनी जे वक्तव्य केलं त्याचा विचार करण्याचा विचार्ही आपण करू शकत नाही…

 3. amit joshi says:

  पण हाच छावा नंतर म्हणाला की मी असे बोललोच नाही. त्याचे काय?

 4. deep says:

  अरे बाबा, हा कसला छावा. हा तर कातडं पांघरलेला कोल्हा. दुसर्‍याच दिवशी फिरला. ते तुमचं यु मस्ट हॅव फुल फेथ…, २४ तासही टिकलं नाही. How sad.

  इकॉनोमिक अजेंडावर बोला रे बाबानो. किती दिवस धर्माच्या नावावर मते मिळ्वणार.

  • इकॉनॉमिक अजेंडा आहे कुठे आपल्या कडे? दिवस उगवेल तसा जगायचं… आर्टीफिशिअली इन्फ़्लेटॆड शेअर्स प्राइसेस वर शेअर्स घेतल्याने मध्यम वर्गियाचे कंबरडे मोडले आहे. लोकांनी अगदी पोस्टातिल काढुन पैसे मार्केट्ला गुंतवले होते..!
   धर्म आणि जातिच्याच राजकारणावरच तर सगळं राजकारण खेळलं जातंय भारतामधे, म्हणुनच तर मायावतीचे ३ टक्क्यांचे राजकारण ह्या विषयावरचे प्रभुत्व त्यांना युपी वर कंट्रोल करु देते..
   आणि दिप, बाय द वे अजुन तरी तो फिरलेला नाही . केवळ इतर धर्मियांना कटवा म्हंटल्याचे नाकारले आहे. खरं तर मी मॅनस्क्रीप्ट मिळते का ते पहात होतो, पण नेटवर काहीच मिळाले नाही..

 5. Pingback: फक्त वरूण गांधिच कां? « काय वाट्टेल ते…

Leave a Reply to Mahendra Kulkarni Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s