चैतन्य कुंटे व्हर्सेस बरखा दत्त!

प्रत्येक ब्लॉगरने अतिशय केअरफुली वाचली पाहिजे असे पोस्ट आहे हे. तुम्ही आम्ही सगळे जण कुठेतरी नोकरी करतो आणी उरलेल्या वेळेमध्ये , किंवा दिवसभरातून एखादा तास ब्लॉगिंग करता देता. त्या मधे कुठल्या एखाद्या पोलिटिकल पक्षाचा प्रचार करणे हा उद्देश नसतो.. पण तरीही…. काही वेळेस जस्ट ड्यु टु हीट, वी एंड अप इन रायटींग समथिंग विच शुडनॉट हॅव बिन….ऍंड एंड अप इन लिगल मेस..

चैतन्य कुंटे…..! ह्या माणसाचं नांव मला माहिती पण नव्हतं पण एकदा एक पोस्ट टाकलं होतं अभिव्यक्ती ची गळचेपी म्हणुन तेंव्हा कॉमेंट्स मधे त्याच्या अपोलोजीची लिंक टाकलेली होती. बरखा दत्ता यांच्या एनडीटीव्ही ने त्याच्यावर डिफेमेशन ची केस केली होती. हा प्रकार जो घडला तेंव्हा  एनडीटिव्ही च्या वेबसाइट वर  वर मोठ्या दिमाखात ह्या “विजयाची गाथा” नमूद केली होती. चैतन्य ने बरखा ने केलेले कव्हरेज कसे टेररिस्टांच्या सोयीचे होते की असेच काहीतरी लिहिले होते ब्लॉग वर.

चैतन्य कुंटे…………..! हा गृहस्थ कोण? मला वाटतं ब्लॉगर्स हे तुमच्या माझ्या सारखे कुठे तरी नोकरी करणारे आणि दिवसातला एखादा तास ब्लॉगिंग ला डिव्होट करणारा असावा.ब्लॉगर्स हे कुठल्याही पक्षाचे मुखपत्र म्हणुन ब्लॉग लिहित नाही. थोडक्यात ब्लॉग वर लिहितांना एक प्रकारे मनातली भडास काढली जाते. आपण टिव्ही ,वरच्या न्युज, किंवा पेपर च्या न्युज वाचतो. त्या बातम्या पाहिल्या की प्रत्येकाचा एक वेगळा व्ह्यु फॉर्म होतो त्या विषयाबद्दल चा. ब्लॉगर मग त्याचे व्ह्युज लिहिणारच..

चैतन्य कुंटे यांच्या ब्लॉग वर त्याने लिहिलेले होते की कसे बरखा दत्त यांच्या कव्हरेज मुळे ट्रेररिस्ट लोकांचा फायदा झाला. नंतर बरखाच्या वकिलांच्या टीम ने त्याला नॊटिस पाठवल्या नंतर चैतन्य ने माफी मागितली.. ( बरोबर आहे, एक इंडिव्हिज्युअल ब्लॉगर  एका मोठ्या कंपनी शी कोर्टामधे लढण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करु शकत नाही.. ) हे सगळं लिहिण्याचं एकच कारण.. कसे पोस्ट लिहिले तर कारवाई किंवा केस होऊ शकते हे समजावे म्हणुन इथे ह्या लिंक्स दिलेल्या आहेत. ह्याच विषयावर इंग्रजी ब्लॉग विश्वामधे बरेच लिहिले गेले आहे त्या सगळ्या लिंक्स एकत्रित पणे इथे पोस्ट करतोय…

ते चैतन्यचे संपुर्ण आर्टिकल इथे पोस्ट केले आहे.

http://retributions.nationalinterest.in/so-who-else-should-ndtv-sue/

http://bit.ly/13rca

http://gauravsabnis.blogspot.com/2009/01/ndtv-self-righteous-ill-advised-or-both.html
http://www.sandeepweb.com/2009/01/30/fragile-basis-to-support-barkha-dutt/
http://www.sandeepweb.com/2009/01/29/barkha-dutt-and-ndtv-the-joke-is-on-you/
http://www.labnol.org/india/indian-bloggers-vs-ndtv-barkha-dutt/6853/
http://lifeandsomething.blogspot.com/2009/01/bullying-by-ndtv.html

http://boycottndtv.wordpress.com/

http://www.rakeshjhunjhunwala.in/2009/02/pigeon-heads.htm

www.sumanspeaks.blogspot.com

असे अजुन बरेच ब्लॉग्ज असतिल पण त्यातले काही इथे पोस्ट केले आहेत. जेंव्हा हा प्रकार घडला तेंव्हा व्हॉलेंटरिली बऱ्याच ब्लॉगर्सनी तेच पोस्ट आपल्या ब्लॉग वर पण पोस्ट केलं होतं..

एनडीटिव्ही ने नंतर त्यांच्या वेब साईट वरुन ह्या केसशी संबंधित न्युज आयटम काढुन टाकला होता. ९ कदाचित लक्षात आलं असेल की आपलं किती हसु होतंय या मुळे.) जर बरखा दत्त ने काहिच ऍक्शन घेतली नसती तर कदाचित काहिच झाले नसते. लोकांनी तो पोस्ट वाचला पण नसता.. पण केवळ त्यांनी दिलेल्या नोटिशीमुळे हे पोस्ट कित्येक लाख लोकांनी वाचले.. असो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged . Bookmark the permalink.

5 Responses to चैतन्य कुंटे व्हर्सेस बरखा दत्त!

 1. … मला वाटतं की मिडीयाची चुक होतीच.. भलेही ती कोणत्या चॅनलची असो…तसं बघायला गेलं तर कुणी काय लिहायचं आणि काय वाचायचं हे ज्यानं त्यानंच ठरवायचं असतं… कारण दोन्हीही गोष्टीमध्ये आपले स्वातंत्र्य आणि कर्त्यव्य यांचा भाग आहे!

  अरे हां.. ‘मॅडम’ आणि काही नेतीझन्सच्या डिस्कशनचा काही भाग इथे आहे.

  एनडीटिव्ही ने नंतर त्यांच्या वेब साईट वरुन ह्या केसशी संबंधित न्युज आयटम काढुन टाकला होता. ( कदाचित लक्षात आलं असेल की आपलं किती हसु होतंय या मुळे.)
  …… हा हा हा … पण काही लोकं खरच हुशार असतात.. आता हेच पहा ना.. ते आर्टिकल पी.डी.एफ. मध्ये इथे आहे!!

 2. लोकं हुशार झाले आहेत. 🙂 ही पीडीएफ लिंक बघुनच लिहावंसं वाटलं हे पोस्ट..

 3. पण चैतन्य म्हणाला ते चूक मुळीच नाही. मिडीयावाल्यांचा थोड्या अंशी हात नक्कीच होता परिस्थिती बिघडण्यात. मी तर ऐकलं आहे की, करकरे, साळसकर आणि कामटे कारवाईसाठी जात असताना वृत्तवाहिन्यांवर त्या गोष्टीचं थेट प्रसारण होत होतं. आणि अतिरेक्यांना त्यांच्या हालचाली पाहून आपल्या चाली आखणं सोपं गेलं. आता खरंखोटं देवाला ठाऊक…

  • चैतन्यने आपला ब्लॉग बंद केला. शेवटी एकाचा आवाज बंद करण्याचे महत्कार्य ’पद्मश्री’ बरखाने करून दाखवले. एका ब्लॉगरचा आवाज बंद करून काय मिळवले तिने??

 4. Pingback: भाजपा मधे आणीबाणी? | काय वाटेल ते……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s