नेव्ही आणि आर्मी

कमांडंट +++ बोल रहा हुं…. फोन वर आवाज आला…
म्हंटलं येस मिस्टर +++.
पुन्हा आवाज आला  ” आय ऍम कमांडंट +++ बोल रहा हुं”
पुन्हा तेच , मला वाटलं की त्याला माझा आवाज व्यवस्थित ऐकू गेला नसेल , म्हणून मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगत असेल.. म्हंटलं.. “बोलीये +++साब…”.

त्यावर पुन्हा तो म्हणाला, “देखिये मिस्टर कुलकर्णी मै सिविलियन नहीं हूं…”.
“सर्टनली आय नो इट मिस्टर +++..”
“तो फिर बार बार ‘मिस्टर +++’ क्यों बोल रहे है आप? मै ‘कमांडंट +++’ …  नेव्ही.. ++++ शिप से बोल रहा हूं.. मेन इंजन मे कुछ खराबी आ गई है..जरा आपका टेक्निशियन भेज दिजिये..”

एकदम ट्युब पेटली.. ह्या नेव्ही, कोस्ट गार्ड अन मिलिट्री चे लोकं डेसिग्नेशन बद्दल फार सेंटीमेंटल असतात. त्यांना मिस्टर न म्हणता त्यांचं डेसिग्नेशन नावाच्या मागे लावलेले आवडते. तसेच त्यांना त्यांना आपापल्या ऑर्गनायझेशन्स चा अभिमान असतो.

मला वाटतं आपल्या इथे कार्पोरेट वर्ल्ड मधे हीच गोष्ट मिसिंग आहे, पिपल डोन्ट केअर फॉर द ऑर्गनायझेशन दे वर्क..लोकं कायम आपला रिझ्युम कुठे ना कुठे फॉरवर्ड करित असतात. सीटीसी जर १२ लाख असेल तर १५ लाख लिहुन पाठवत असतात.. तसं ह्या लोकांचं नसतं. ते आपल्या कामावर मना पासून प्रेम करतात…   लक्षात आलं म्हणून लिहिलं.

आपल्या इथे काय, अगदी काहीही डेसिग्नेशन असलं तरी कामाचं स्वरुप फारसं बदलत नाही. गेली कित्येक वर्ष कस्टमर सर्विस हा पोर्ट फोलियो संभाळतो आहे. त्याला सॉरी  म्हंटलं.. कमांडंट +++.. ईट्स ओके .. लेकिन कहां भेजना है उसे वो+++++ शिप तो कोची मे है ना? या वाडीनार शिफ्ट हो गई?? काहीतरी बोलायचं म्हणून बोललो .. मला पुर्ण माहिती होतं ती शिप कुठे आहे ते..

आमच्या इथे पुर्वी नेव्ही अन कोस्ट गार्ड चा बिझिनेस हॅंडल करण्यासाठी एक वेगळा डीव्हिजन होतं. आता एक वर्षा पासुन जास्तीची जबाबदारी  म्हणून हा डिव्हिजन पण मलाच बघावा लागतो. तसा डीआरडीओ वगैरेचा बिझिनेस पुर्वी सांभाळला  होता पण नेव्ही म्हणजे नवीनच जबाबदारी होती. इथे या बिझिनेस मधे प्रोटोकॉल्स ला फारच महत्त्व असतं . ते मला नुकतंच जाणवलं. एखादी गोष्ट तुम्ही फोन वर कन्फर्म केली की लगेच फॅक्स येतो.. रेफर योर टेलिकॉन ऑफ डेट रिगार्डींग………………………..! आणि त्या फॅक्स ला आपण उत्तर देणं हे अपेक्षित असतं..नाही दिलं तर दुसऱ्या दिवशी रिमाइंडर नंबर १ टेबल वर असेल..!

तसा मी मरीन शिप्स पुर्वी अटॆंड केल्या होत्याच, पण मर्चंट नेव्ही आणि ईंडियन नेव्ही मधे खूपच फरक असतो.इथे म्हणजे एखाद्या वरच्या हुद्यावर च्या माणसाला भेटायचं असेल तर त्याच्याच लेव्हलचा  माणुस भेटायला जावा लागतो. तुम्ही अपॉइंटमेंट साठी फोन केला की आधी तुमचं डेसिग्नेशन विचारतात आणि नंतरच अपॉइंटमेंट मिळते.

बार्जेस वगैरे पण हॅंडल केले होते, पण ह्या बार्जेस प्रायव्हेट लोकाच्या मालकीची  असल्याने वेगळंच पडतं.. ह्या बार्जेस एखादा ’ओअर’ शोअर पासून मेन शिप पर्यंत नेण्यासाठी उपयोगात आणला जातो. किनाऱ्या जवळ पाणीफार खोल नसतं, ्म्हणून मदर शिप खोल समुद्रा मधे असते, आणि ही बार्जेस किनाऱ्याच्या वरून  ओअर  नेउन शिप मधे टाकतात.

मला ह्या लोकांच्या युनिफॉर्म बद्दल नेहेमीच कौतुक आणि कुतुहल वाटत आलंय. यांच्या ऑफिस मधे गेलो की सगळी कडॆ पांढरी हाफ पॅंट अन पांढरा टीशर्ट घालुन फिरणारे लोकं दिसतात. डोक्यावरची डेसिग्नेशन सूचक कॅप खुपच सुंदर  दिसते.मला नेव्ही चा युनिफॉर्म खूप आवडतो. विशेषतः त्यांच्या कॅप्स फारच सुंदर असतात. जितका मोठा हुद्दा तितकी जास्त सुंदर कॅप.  कमीत कमी त्या युनिफॉर्म साठी तरी आपण नेव्ही मधे जायला हवं होतं असं वाटतं.मिल्ट्री मधले आणि नेव्ही मधले डेसिग्नेशन्स पण जरा वेगळेच आहेत. मिल्ट्री मधल्या कॅप्टन पेक्षा नेव्ही मधला कॅप्टन ही पोस्ट खूपच उच्च असते.. तेंव्हा गैरसमज होणं कधीही शक्य असते.

पहिल्यांदा जेंव्हा नेव्ही च्या शिप वर गेलो होतो, तेंव्हा इतकं काही अट्रॅक्शन नव्हतं. आय एन एस ++++ वर कामासाठी जावं लागलं. तेंव्हा माझा एक मित्र आहे नितीन देशपांडे , तो जस्ट इंजिनिअरिंग करून नेव्ही मधे  सेकंड लेफ्टनंट म्हणून जॉइन झाला होता. त्याच्या कडून बरंच काही ऐकलं होतं.एकदा तो सुटी मधे आला असतांना त्याने स्वस्त  मिळणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितलं होतं. आधी तर संपुर्ण फिजेट पाहिली..  आणि नंतरच कॅंटीन कुठे आहे म्हणून चौकशी केली. तेंव्हा मी स्मोकर होतो, डनहिल ची आणि रॉथमन्स ची ५ पाकिटं घेतली आणि नंतरच  कामाला सुरुवात केली.. ( ही गोष्ट साधारणतः २० वर्षापुर्वीची )

साधारण पणे त्याच पिरियड मधे आम्ही रशियन टॅंक  चं रिपॉवरिंग पण केलं होतं. रशियन मशिनरी तशी एकदम दणकट. पण तो टॅंक जुना झाला म्हणून पुर्ण पॉवर पॅक (इंजिन) बदलला होता. एक संपुर्ण टॅंक आमच्या आर ऍंड डी मधे आणून ठेवला होता कित्येक महिने आणि तिथेच काम करण्यात आलं पहिल्या टॅंकचं.

ह्याच बरोबर एक एपिसी म्हणजे ’आर्म्ड पर्सन कॅरियर’ पण रिपॉवरिंग केली होती.  ह्या एपीसी सैन्याच्या जवानांची ने आण करण्यासाठी वापरली जातात. त्यांच्या ट्रायल मग निरनिराळ्या वातावरणात ( थंड, गरम वगैरे) मधे घेण्यात येतात. अगदी अती जास्त उन्हाळ्यात  घेण्याच्या ट्रायल  राजस्थानी वाळवंटात  किंवा  अती थंड वातावरणात घेण्याच्या ट्रायल्स या जम्मु काश्मिरच्या खोऱ्यात घेतल्या जायच्या. त्या मीन मशिनच्या टेस्टींगचा चान्स मिळणं हीच एक मोठी उपलब्धी होती. आमचे ( जे कोणी टेस्टींगला जाणार होते,  त्यांचे  पोलीस व्हेरिफिकेशन करुनच मग पासेस देण्यात आले होते. )मी राजस्थानी वाळवंटातल्या ट्रायल ला गेलो होतो.

ह्या ट्रायल नंतर पाण्यातल्या ट्रायल् घेतल्या गेल्या. हा टॅंक जो असतो तो पाण्यामधून पण जाउ शकतो . ट्रायल्स च्या वेळी रबर गास्केट मधुन पाणि आत लिक व्हायला लागलं म्हणुन आम्ही लगेच बाहेर निघालो. पण नंतर मात्र मला या ट्रायलस मधे  इन्व्हॉल होता आलं नाही. मला रिलिव्ह करुन दुसरा इंजिनिअर इथे डेप्युट केला गेला. ( ट्रायल्स राउंड द इयर चालल्या होत्या..  जवळपास ६ महिने)

मिल्ट्री मधली गोपनीयता तर समजू शकतो, परंतु डि आर डि ओ ( डिफेन्स रिसर्च ऍंड डेव्हलपमॆंट ऑर्गनायझेशन) मधे मात्र खूपच गोपनीयता अजूनही पाळली जाते.     यांची ऑफिसेस शहरा मधेच असतात. अर्थात सगळी नाही. एकदा एका भागात   गेलो असतांना सांगण्यात आलं होतं, तुम्ही इथे आला आहात , तेंव्हा इथे काय चाललंय याची चौकशी करायची नाही. आपलं काम करा आणि परत जा.. बस्स! जास्त चौकशा कराल तर विनाकारण गोत्यात याल. अर्थात, मला वाटत होतं की विचारावं पण मोह आवरला. कशाला उगाचच विषाची परिक्षा घ्यायची?

मिलिट्री च्या अखत्यारीतील +++++ च्या पलीकडे इंडॊ भुतान मायक्रोवेव्ह प्रोजेक्ट मधला अनुभव आयुष्यभर विसरू शकत नाही.हा प्रोजेक्ट म्हणजे त्या काळची इंडिया आणि   चायना मधली एक लिंक होता. ह्या पॉइंटला काही  जर मशिनरी  जनसेट फेल  झालं तर चायना आणि भारता मधली मायक्रो्वेव्ह लिंक तुटणार. इतका महत्त्वाचा प्रोजेक्ट होता हा.  १७००० फुट उंचावरच्या एका शिखरावर एक रेडिओ मायक्रोवेव्ह टॉवर बसवण्यात आलं होतं. टेम्प्रेचर मायनस मधे. टॉवर अन मशिनरी सगळी ’अन मॅन्ड’ होती. सगळ्यांचे कंट्रोल्स त्या क्लिफ च्या खालुन रेडिओ कंट्रोल वर आधारित होते. वर जायचा एकच मार्ग तो म्हणजे चॉपर.  .

तेंव्हा मी सर्व्हिस इंजिनिअर होतो . स्वतः हाताने काम करावं लागायचं. त्या मायनस टेम्परेचर मधे हातामधले ग्लोव्ह्ज पण काढता येत नव्हते. थोडक्यात काय तर लघवी करायला गेलं तर बर्फाची कांडी तयार होइल अशी परिस्थिती. एक रिले जो मालफंक्शन करत होता तो बदलायचा होता. स्क्रु ड्रायव्हर हातामधे धरला तरी फिरवतांना खूपच कष्ट व्हायचे. जे काम १० -१५ मिनिटांमध्ये व्हायचे त्याला २-३ तास लागले.

त्या दिवसात    मजा यायची आणि आपण का आर्मी जॉइन केली नाही याचं वाईट वाटायचं. अजुन ही तो एक सल आयुष्यात आहेच.. आर्मी मधे किंवा नेव्ही मधे कां गेलो नाही?? जर प्रयत्न केला असता, तर कदाचित जमलं पण असतं.. सुशिक्षित मराठी मुलांनी ह्या  नोकऱ्यांसाठी पण प्रयत्न करायला हरकत नाही . प्रत्येकानेच एम बी ए करुन पोर्टर डायमंड चा अभ्यास केला पाहिजे असे नाही. असो.. विचार करा…. आणि ताबडतोब  ग्रॅज्युएशन नंतर इथे नोकरी साठी ट्राय करू शकता.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

3 Responses to नेव्ही आणि आर्मी

  1. अगदी खरं आहे तुमचं!
    सैन्यातील नोकरीत एक वेगळीच शान आहे. आमच्या आबा-आज्या पासनं प्रत्येक पिढीतील एकजण सैन्यात आहेच आणि सध्याला आमचे धाकटे बंधुराज ही परंपरा चालवताहेत!

    ……………. अरे हां, परवाच सैन्यातील मुलगा – शहिद आणि त्याच्या शहिद झाल्यानंतरच्या प्रकरणावरील “धुडगूस” नावाचा मराठी चित्रपट पाहिला [सौजन्यः अर्थातच यु ट्युब]. मस्त वाटला चित्रपट.

  2. Shivaji ramkrushna deshmukh says:

    मला नेव्ही जायच मी काय करु

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s