उनके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा

उनके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा

शायर निदा फाजली ची ही गझल विसरल्यातच जमा झाली होती.एके काळी ही गझल अगदी मनापासून आवडायची. पण  आठवण्याचे मुख्य कारण म्हणजे हरेकिशनजींच्या ब्लॉगचं नांव आहे हे.. अगदी कोणीही ही गझल ऐकली तरी प्रत्येक माणुस ही गझल स्वतःशी कोरिलेट करायला पहातो. वाटतं , आपण खूपच चांगले वागतॊ म्हणून आपले बरेच शत्रू आहेत. ’मी’ कधीच चुकू शकत नाही.. !

निदा  फाजली एक अवलिया कलाकार. केवळ भाजपाने दिलेला सत्कार आणि पुरस्कार स्वीकारला म्हणून त्यांनी जावेद अख्तर शी पण भांडण केलं होतं आणि संबंध तोडून टाकले होते. बाळासाहेबांनी पण त्यांच्यावर घातलेल्या बंदी मुळे त्यांना जेंव्हा काम मिळणे कठिण झाले तेंव्हा पण त्यांनी हार मानली नाही. हा माणुस तर अगदी मूंह फट म्हणावा तसा. कमाल अमररोहींच्या मुलीने पण ह्यांच्यावर एकदा  केस केली होती डिफेमेशनची,कारण ह्यांनी एका लेखा मधे कमाल अमरोही हे स्वार्थी अन ’औरतबाज’ होते असं म्हंटलं होतं.ह्या अवलिया कलंदर कलाकाराने बरेच पुरस्कार धुडकावून लावले असं ऐकण्यात आहे. उमराव जान ची गाणी ऐकल्या नंतर त्याच्या उच्च दर्जाच्या लिखाणाची खात्री पटते.आजपर्यंत जवळपास २४ पुस्तके आणि कित्येक लेख ह्यांच्या नावे आहेत.

यहां मजबुत से मजबुत लोहा टुट जाता है
कईं झूठे इकठठे हो तो सच्चा टूंट जाता है..

ते  वय गझल्स ऐकण्याचे दिवस होते .. गझल्स शिवाय इतर काही ऐकणं म्हणजे वेळेचा अपव्यय वाटायचा ( अर्थात ऍबा आणि बोनी एम एक्स्क्ल्युडेड).  तेंव्हा मी पुण्याला होतो, आम्ही मित्र मंडळी ज्युक बॉक्स वर ५० पैसे टाकुन हिंदी गाणी किंवा अगदी बोनी एम ची किंवा ऍबा ची गाणी न चुकता ऐकायचो. काही रेकॉर्ड शॉप्स होते, तिथे पण एका रुम मधे बसुन गाणी ऐकण्याची सोय असायची. गझल्स ऐकायला म्हणुन अशा काही जॉइंट्स चे आम्ही अगदी परमनंट मेंबर्स होतो. गझल्सचे नांव   अगदी निदा फाजली सारख्यांच्या  न कळणाऱ्या उर्दू गझल्स , गुलाम अली च्या पण सगळ्या उर्दू आणि पंजाबी गझल्स, ऐकत होतो. बरेचदा इतकं उच्च दर्जाचं हिंदी कळत नव्हतं… तरीही एखाद्या मित्राला आवडते म्हणून ऐकलं जायचं.

मदन मोहन च्या गझल्स आणि तलत मेहमुद च्या गझल्स तर पर्वणीच वाटायची.बेहोश हो के जल्द मुझे होश आ गया,मै बदनसिब होशमे आया नहीं अभी , असं आळवणारा तलत काय किंवा मौतही दे दे अब, शिकवा आ गया म्हणणारा तलत म्हणजे अगदी मोजून मापून जगणाऱ्यांसाठी तलत नाही.. शामे गम की कसम म्हणत कधी तुमच्या काळजाचा ठाव घेतो हा माणुस ते तुम्हाला कळत नाही. लग्न झालेलं, अन बायको माहेरी गेलेली किंवा गर्ल फ्रेंड जवळ नसेल.. तर तलत ऐकायचे दिवस आले असं समजायचं…. बघा .. ऐकुन पहा एकदा..

त्या काळी टेप रेकॉर्डर्स नव्हते, पण रेकॉर्ड्स मात्र होत्या. मला आठवते ती गुलाम अली आशा भोसले ची एक गझल्स ची रेकॉर्ड .. मला खुप आवडायची.. गुलाम अली एकट्याच्या सुध्दा “चुपके चुपके.. किंवा तत्सम इतर गझल्स  नेहेमीच ऐकल्या जायच्या. नंतर जेंव्हा कॅसेट प्लेअर्स आले तेंव्हा पहिले ह्या रेकॉर्डस ची कॉपी करुन घेतली होति कॅसेटवर. गुलाम अलीचं एकछत्री राज्य होतं गझल्स वर. गझल्स म्हंटलं की गुलाम अली आणि तलत मेहमुद ची सर कोणालाच येणार नाही. दोघांचेही मधाळ आवाज ऐकले की मेंदु पर्यंत मुंग्या चढल्यासारखं व्हायचं. दोघांचीही गायकीची तऱ्हा निराळी , ढंग निराळा, पण स्वरा मधली सच्चाई एक सारखीच.. गुलाम अली  जेंव्हा दिल मे इक लहरसी उठी है अभी… मधे ’लहर’ शी ज्या तर्हेने जागा घेतो ते ऐकलं की बस्स!! वाटतं  बस्स.. ही गझल गुलाम अलिनेच म्हणावी. तो मधाळ आवाज, आणि आवाजातील आर्जव केवळ गुलाम अलिच आणु शकतो, दुसरा कोणी त्याच्या पासंगालाही पुरत नाही, तसेच एखादे प्रेम भंगाची गझल असेल तर ती तलत नेच म्हणावी..शिरिष कणेकर म्हणतो ना.. की तलतची गझल ऐकण्यासाठी आणि मनांपासून एंजॉय करण्यासाठी एकदा तरी माणसाचा प्रेम भंग व्हायलाच हवा. मग नंतरच त्या गझल मधली गोडी कळते. मला एक रेकॉर्ड आठवते तलतची.. ’तलत इन ब्लु मुड’ ! ती रेकॉर्ड इतक्या वेळेस ऐकली की शेवटी आवाज खराब झाला त्या रेकॉर्ड चा.. रेकॉर्ड पांढरी झाली म्हणतो ना तो प्रकार…

माझं गाण्यांचं प्रेम अगदी  बाळपणापासून आहे. बदल झालाय तो फक्त कुठली गाणी ऐकतो त्या बाबतीत . कोणे एके काळी फक्त गझल्स, नंतर फक्त जुनी सिनेमाची गाणी, कधी फक्त नाट्य संगीत, कधी क्लासिकल.. फक्त पंडित भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडॆ… अगदी काहीही असु शकतो, पण गाणे हा मात्र एक अविभाज्य अंग आहे. हल्ली सगळी गाणी ऐकतो.. अगदी क्लासिकल ते जुनी सिनेमा सुध्दा पण गझल्स ऐकणं कमी झालंय..पण कधी तरी मुड येतो आणि गुलाम अली किंवा तलत लाउन बसतो ऐकत…गुलाम अली अन तलत ला इतकं मानणारा मी इतर गायकांच्या गझल्स मात्र फारच कमी ऐकायचो. अर्थात आम्ही गुलाम अली/तलत च्या फॅन्स नी इतर गायकांची स्तुती करणे शक्यच नव्हते.. 🙂

मदन मोहन आणि तलत हे एक अजब रसायन आहे. मदन मोहनचं सगीत- तलत चा ह्र्दयातुन एक एक थेंब रक्त गळत आहे ,अन तरीही गाणं म्हणतोय गाणं म्हणतोय हा माणुस ….असं वाटणारा हदय पिळवटून टाकणारा आवाज एकत्र ऐकणं म्हणजे एक पर्वणीच.

तुम्ही ही गाणी एकदा शांतपणे एका जागी बसुन ऐकलीत तर तुमच्या लक्षात येइल मला काय म्हणायचंय ते. माझ्या काकांकडे हे गाणं ऐकलं पहिल्यांदाच  आणि मनात घर करुन बसलं.ह्या दोघांचही एकत्र काम म्हणजे ए्कमेकांना कॉम्प्लिमेंट करणारं असायचं….

आज जरा कमी वेळ आहे म्हणुन जास्त लिहित नाही.. निदा फाजली    ह्या एका उत्कृष्ट नज्म सोबत हे पोस्ट संपवतो.. बघा आवडते कां ते..

वो औरत किसी एक मर्द के साथ

ज्यादा दिन तक नहीं रह सकती

ये उसकी कमजोरी नहीं सच्चाई है

मगर वो जिस मर्द के साथ

जितने दिन तक भी रहती है

धोखा नहीं करती

लोग उसे कुछ भी कहें

मगर किसी एक घर में

जिंदगी भर झूठ बोलने से

अलग अलग मकानों में

सच्चाइयां बिखेरना कहीं बेहतर है।

.. इफ आय ऍम पोलाइट विथ यु, डझ नॉट मिन दॅट आय ऍम अफ्रेड ऑफ यु….. पण बऱ्याच गोष्टी मनातच राहुन जातात, बोलल्या जात नाहीत.  जशी वरची गझल आपण स्वतःशी कोरिलेट करु पहातो, तशिच हे  वाक्य  पण… !!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , . Bookmark the permalink.

9 Responses to उनके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा

 1. sahajach says:

  नेहेमीप्रमाणेच मस्त!!!खरय हे की आपण corelate करायचा प्रयत्न करतो…आणि तसे ज्या गोष्टिंना करु शकतो त्याच आपल्याला आवडतात…rather रुचतात.

 2. धन्यवाद तन्वी.. अभिप्रायाबद्दल. या शायरचं एक तरी पुस्तकं वाचायचं आहे एकदा… २००९ मधे.. 🙂

 3. meetabhig says:

  छान लेख आहे … एकच सांगायचं म्हणजे उमराव जान ची गाणी शहरयार ची होती .. निदा फ़ाजलींची नव्हे …

  • ओह… खरं की काय? मला नेहेमीच वाटायचं की ती गाणी निदा फाजलिंची आहेत म्हणुन.. करेक्शन बद्दल आभार…

 4. sonalw says:

  sunder post. ‘Insight’ ha jagjit-nida fazlin cha album aikalayas ka? true to its name.

  • ऐकलाय.. तो अल्बम.. पण आम्ही तलत आणि गुलाम अली चे चाहते दुसऱ्या गायकाला चांगलं म्हणत नसतो. 😉

   जोक अपार्ट.. छान आहे तो अल्बम….
   शिरिष कणेकरांची पुस्तकं जास्त वाचल्याचा परिणाम.म्हणुन अशा कॉमेंट्स..दिलिप कुमारचा चाहता शिरिष कधिच राज कपुरला चांगलं म्हणत नव्हता.. आठवतं कां??

 5. महेश says:

  व्वा …..वरिल लेख वाचून आनंद झाला….

Leave a Reply to Mahendra Kulkarni Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s