धावते जग- बदलते विश्व…

धाकट्या मुलीची ९ वी ची परीक्षा आटोपली अन तिला १० दिवस सुट्या आहेत , पण नेमकं त्याच वेळॆस मोठ्या मुलीचे सिईटीचे क्लासेस सुरु असल्याने कुठे जाता आले नाही.आत्ता पर्यंत दर सुटी मधे कुठे ना कुठे जाउन यायचा प्रयत्न करायचो, पण हल्ली मुली मोठ्या झाल्या झाल्यापासून ते बंदच झालंय.

बरं १० दिवस झाले की १ महिना शाळा आहे, म्हणे १० वी चा काही पोर्शन पुर्ण करायचा आहे. ज्या दिवसापासून हा १ महिना संपेल , त्याच दिवसापासून नेमकी क्लासेसची सुरुवात आहे,मला वाटतं अती होतंय हे.. थोडी तरी विश्रांती हवी की नको मुलांना??

रविवारी सकाळी धाकट्या मुलीला नाशिकला माझ्या लहान बहिणीकडे सोडून आलो. म्हंटलं ऍट्लिस्ट १० दिवस तरी थोडा चेंज होइल. तिला दोन्ही ऑप्शन्स दिले होते, म्हट्लं तुझी इच्छा असेल तर नागपुरला पण आजी कडे सोडून द्यायला तयार आहे , पण माझ्या बहिणीची मुलगी अगदी तिच्याच वयाची असल्यामुळे ’नाशिकाचा विजय झाला आणि तिला नाशिकला सोडले.

रविवारी रात्री परतणार होतो, पण मोठी भाची , जी सध्या लॉ च्या फायनल इयर ला आहे, आणि जिने टाइम्स ऑफ ईंडिया मधे लिखाण करुन स्व कष्टाने जमा केलेले पैसे उधळायचे म्हणुन थांबवुन घेतले. मला म्हणे , तुला सबवे चं खास सबवे स्पेशल सॅंड्विच खाउ घालते.. आता कोणी खाण्याच्या गोष्टी बद्दल म्हंटलं तर मग नाही कसं म्हणायचं?? म्हणून थांबलो नाशिकला! म्हट्लं , सोमवारी सकाळी निघू म्हणजे १० पर्यंत डायरेक्ट ऑफिसलाच पोहोचता येइल.

स्व-कष्टाने कमावलेलं ते चिकन टिक्का सॅंडविच आणि हॅम सॅंडविच ( भारतामधे हॅम म्हणजे चिकनचा पातळसा हॅम सारखा केलेला पिस.. अन सॉसेजेस म्हणजे पण चिकनचेच स्मोक्ड पिसेस असतात बरं का.. नाहितर उगाच गैरसमज…) ओट्स हनी ब्रेड सहित खाणं झालं. माझ्या ख्रिश्चन मित्रांकडे खाल्लेलं ऑलिव्ह ( जे ब्राइन वॉटर मधे प्रिझर्व केलं असतं ते ) अन हे पिकल्ड ऑलिव्हज मधे खुपच फरक पडतो.चवित खुपच फरक होता. मला ते साधे ऑलिव्ह अन ऑरेंज ज्युस च कॉंबिनेशन जास्त आवडतं. ही पिकल्ड व्हेजिटेबल्स मला तरी फारशी आवडत नाहित. पण चिकन टिक्क्का सॅंडविच मस्त होतं..

मला तसंही पिझा फारसा आवडत नाही . पण बर्गर मात्र( मॅक डी चं ) आवडतं . अर्थात गिव्हन अ चॉइस मी   बरगर  पेक्षा वडापाव किंवा नाशीकचा पाव वडा प्रिफर करेन. हो, सिडकोमधे जयंत कडचा पाव वडा खूप फेमस आहे असं माझी भाची नेहेमी सांगत असते…आणि तो खरंच चांगला पण असतो..

सोमवारी सक्काळी सक्काळी ५ वाजता मोबाइल केकाटला.. तसा निघायचं म्हणून उठलो होतोच, पण डिलरचा इंजिनियर होता, म्हणाला सर तुम्ही गेला नसाल तर थांबून जा.. एक मेजर फेल्युअर आहे.. वगैरे वगैरे…. म्हणून मुंबईला सकाळी जाणे कॅन्सल केले,विचार केला कामं आटोपून दुपारी निघावे. शेवटी संध्याकाळच्या पंचवटी चे रिझर्वेशन करुन टाकले नेट वर..आणि रात्री ११ वाजता पोहोचलो मुंबैला. आज बालिका बधु नव्हतं त्यामुळे काहीच टाइप केलं नाही.. घरी हा कार्यक्रम टिव्ही वर सुरु असला की दुसऱ्या खोलित बसुन मी नेक्स्ट डे चे पोस्ट टाइप करित असतो…!

आजकालचे दिवसात मुलांचे जे काही हाल होताहेत ते पाहून वाईट वाटते. पण एक गोष्ट आहे, जर आत्ताच अभ्यास केला नाही तर कधी करणार? दोन गोष्टी असतात, मी नेहेमी मुलींना सांगत असतो.. आता २-३ वर्षं मेहनत कराल , तर पुढचं पुर्ण आयुष्य सुखा समाधानात जाइल, आणि हे २-३ वर्ष आराम कराल,आणि आत्ता, मित्र मैत्रिणींबरोबर मजा कराल, अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन कुठले तरी टुकार विषय घेउन ग्रॅज्युएशन कराल  तर पुढच्या आयुष्यात ’चांगल्या संधी’ कमी मिळतील…तेंव्हा हीच वेळ आहे अभ्यास करण्याची , एखाद्या चांगल्या कोर्स ला ऍडमिशन घेतली की पुढचं आयुष्य सोप्पं होतं..!

कधी कधी वाटतं की ह्या अभ्यासाच्या रगाड्यात मुलांचं बालपण कोमेजून जातं .नुसतं खेळणं , ऊंडारणं.. सगळं काही संपल्यातच जमा झालंय.. या वयात अर्थाअ मुंबई सारख्या   महानगरामध्ये मुलं करणार तरी काय म्हणा सुटी मधे? कोणी नातेवाइक आले तर वेळ बरा जातो मुलांचा, नाहितर  आई वडिल दोघंही ऑफिस मधे अन मुलं घरी…!

कोणे एके काळी, एस्सेल वर्ल्ड ही एक मोस्ट हॅपनिंग जागा होती मुंबई मधे. मुंबईकर मात्र एस्सेल वर्ल्ड सारख्या ठिकाणांना कोणी बाहेर गावचा पाहुणा आला, आणि त्याने जायचे आहे असे म्हंटले तरच फक्त भेट देतो. असे फार कमी वेळा होते की तुम्ही अगदी सहज ठरवून एस्सेल वर्ल्ड ला गेला आहात. माझ्या बाबतीत तरी मी स्वतः गेल्या १५ वर्षात फक्त एकदा ठरवुन एस्सेल वर्ल्ड ला गेलॊ होतो.

बरेच वर्ष झालीत, भायखळ्याची राणीची बाग पाहिलेली नाही. अर्थात त्या एस ब्रिज वरुन बरेचदा जाणं येणं होतं परंतु राणिच्या बागेत मात्र  जाणं झालं नाही. मी सुटीमध्ये पुर्वी लहान असताना माझ्या आत्याकडे मुंबई ला यायचॊ तेंव्हा राणिच्या बागेला व्हिजिट ही ठरलेली असायची. आत्याचे मिस्टर जे जे हॉस्पिटल ला सी एस होते, त्यामूळॆ त्यांचे घर पण जे जे च्या आवारात होते. राणिचा बाग घरापासून अगदी जवळ पडायचा.

सिध्दीविनायकाला तर बरेचदा जाणं होतं. पण महालक्ष्मी मंदिरात गेल्या ८ वर्षात गेलेलो नाही. तसेच भुलेश्वर, हॅंगिंग गार्डन , कित्येक जागा आहेत मुंबईच्या ज्यांना गेलेलॊ नाही. एकदा रविवारी सकाळी सगळ्या ठिकाणी एक धावती भेट द्यावी असा विचार गेले कित्येक दिवस करतोय.. पण बाबा, तुम्ही जाउन या, आम्हाला यायचं नाही.. असं ऐकलं की बस.. मग उत्साह संपून जातो.. अर्थात मुली आता मोठ्या झाल्या आहेत त्यामुळे त्यांचे चॉइसेस पण बदलले आहेत हे विसरुन चालणार नाही..

मोठी मुलगी १२वी ची परीक्षा झाल्यावर मैत्रिणींच्या बरोबर दोन तिन दिवस फिरायला गेली . मला वाटलं होतं की बहुतेक सिनेमा वगैरे पहातिल परंतु सलग दोन तिन दिवस ह्या मुली ओबेरॉय आणि इतर शॉपिंग मॉल मधे फिरल्या.. आता हे शॉपिंग मॉल्स पण एक परिपूर्ण करमणुकीचे ठिकाण झालेले आहेत. सिनेमा हॉल्स –चुकलो, मल्टीप्लेक्स म्हणायचं त्यांना, खाण्या पिण्यासाठी फुड कोर्ट जिथे अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या खाण्यापिण्याची सोय असते.आणि सेंट्रली एअर कंडिशन्ड!मुंबईच्या मार्च हिट मधे ह्या पेक्षा जास्त काय हवे?? चेंजींग ट्रेंड आहे हा.. करमणुकीच्या कल्पना किती बदलताहेत नाही कालानुरूप?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in परिक्षा.. and tagged , , . Bookmark the permalink.

8 Responses to धावते जग- बदलते विश्व…

 1. sonalw says:

  kharach khup jhapatyane badalaly sagal. Mala majhya lahanpanichya goshti aata pargrahawarchya watayla laglyat. Vikram vetal, dada dadi ki kahaniya, election chya kalat doordarshan war dakhawale jaanare picture, barfacha gola, rawalgaon chya tofee, te botat surnalyansarkhe adkawnyache snacks, suttit karaychi bhel puri chi party (pratyeki 2 rs kadhun) aani kiti kiti saangu…he sagal aata untangiable, unreachable waatayla laaglay. kadachit pratyekala aapale divas asech watat astaat. aaplya muli suddha ek divas mothya hotil, tyanchya mulanna saangtil..aamhi kaay tya mall madhe bhatkaaycho aani subway ch sandwich teva xxx rs na milayach…halli ti majjach rahili nahi..:)

  • exactly same thing… honar ahe… divas phar lavakar badaltat. Amachya Ambasador madhe petrol 1 Rs 30 paise liter bharalele mala athvate. 🙂
   Fanta Orange 70 paise lagayche. te pan contri karun ek fanta 4 mule share karayachi..

 2. आता २-३ वर्षं मेहेनत कराल , तर पुढचं पुर्ण आयुष्य सुखा समाधानात जाइल, आणि हे २-३ वर्ष आराम कराल,आणि आत्ता, मित्र मैत्रिणींबरोबर मजा कराल, अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन कुठले तरी टुकार विषय घेउन ग्रॅज्युएशन कराल तर पुढच्या आयुष्यात ’चांगल्या संधी’ कमी मिळ्तील…!

  अगदी खरं!
  आमच्या वेळी हे आम्हाला हजारदा सांगुन झालं असेल… मात्र आम्ही म्हणजे – पालथ्या घड्यावर पाणी! कधी कुणाचं ऐकलं असेल तर शप्पथ!
  पण.. नशिबानं साथ दिलीय.. गाडी पुन्हा एकदा – हळु हळु का होईना – रुळावर आहे! मात्र, सगळ्यांनाच नशिब साथ देतं आणि संधी मिळते असं नाही… तेंव्हा..अनुभवातुन हेच – वरची लाईन – शिकलो!

  भुंगा!

  • मी पण दुर्लक्ष करायचॊ.. वडिल म्हणायचे की एम्पीएस्सी किंवा युपिएस्सी दे.. मी नाही ऐकलं.. म्हंटलं प्रायव्हेट कंपनितच नोकरी करायची आहे मला.. आता वाटतं ऐकायला हवं होतं..

 3. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
  शेखर

 4. geetapawar says:

  sir kai karute nit samjlech nahi punha 1da sang PHOTO kasa aanycha blogvar.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s