आय पी एल आफ्रिकेमधे..

काल रात्रीच्या बातम्यांमध्ये पाहिले की आय पी एल च्या मोदींच्या म्हणण्याप्रमाणे  ह्या मॅचेस आफ्रिकेमध्ये घेतल्या जातील. मॅचेस च्या वेळा ह्या भारतियांना सुटेबल रहातील..एखाद्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं?  मला एक कळत नाही आय पी एल ह्याच खेळाच्या भरवशावर करोडॊ रुपये कमावते पण जेंव्हा सेफ्टी साठी काही खर्च करायचा म्हंटलं तर डोळ्यातून पाणी काढताहेत  आणि सगळ्या प्रोग्रामचा व्हेन्यु आफ्रिकेला ट्रान्सफर करण्याचा घाट घातलाय मोदींनी.

इतक्या करोड रु   इनकम पैकी जर काही रुपये संरक्षणावर खर्च केले तर काय हरकत आहे? म्हणजे (टॅक्स फ्री – सरकारने टॅक्स न घेण्याचे मान्य केले आहे- कर्टसी शरद राव) पैसे कमवायचे आय पी एल ने, अन खर्च करायचा सरकारने .. म्हणजेच टॅक्स पेअर्स ने ?? असं कां?? मला तर असंही म्हणावंस वाटतं की ह्या सगळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आय पी एल तर काय हरकत आहे?

आणि ह्य सर्कस साठी सगळं सरकार वेठीस धरुन कायदा व सुरक्षेचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर हे सामने न झालेलेच बरे. ह्या सर्कस चा फायदा फक्त आय पी एल ला आणि त्या  टिम् च्या मालकांना होणार आहे .

आफ्रिकेत गेल्यावर तिथे भारता प्रमाणे काम धंदे सोडून क्रिकेट पहायला येणारे लोकं आहेत कां? सध्या सगळी कडे असलेल्या मंदी मुळे अर्थातच सामन्याची महागडी तिकिटे काढून सामना पहाण्यास येणाऱ्या लोकांची संख्या अर्थातच रोडावेल. तिकिटांच्या सेल मधुन मिळणारा पैसा हा निश्चितच  भारतामधे मिळणाऱ्या पैशा पेक्षा कमीच असेल. म्हणून ऍड्व्हर्टाइझ आणि मॅचेस चे डायरेक्ट प्रक्षेपण ह्यातून मिळणाऱ्या पैशावरच  समाधान मानावे लागेल..

आपल्या इथे भारतामधे आपण एखाद्या अगदी फालतू गोष्टीला आपण फार जास्त महत्व देतो असं वाटत नाही कां??तरीही.. मोदी आणि कंपनीचे ( शरदराव इन्क्लुडेड) आभार मानावे से वाटतात, आफ्रिकेत मॅचेस भरवून भारतवासियांच्या वेळेची आणि पैशाची बचत केल्या बद्दल..

बाय द वे… जाता जाता एक गोष्ट विचाराविशी वाटते   ,

टेररिस्ट लोकांनी किंवा तालिबानी अतिरेक्यांनी अंडरटॆकिंग  दिलंय कां की आफ्रिके मधे ते  ह्या खेळाडूंवर अटॅक करणार नाहित म्हणुन??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ. Bookmark the permalink.

2 Responses to आय पी एल आफ्रिकेमधे..

  1. Amit says:

    महेंद्र, IPL साठी खाजगी सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत मोदींचं एक विधान आलंही होतं. पण आपल्या सरकारला हा पर्याय पटला नाही. एकतर अशा खाजगी सुरक्षारक्षकांना आधुनिक बंदुका बाळगण्यावर अन त्या चालवण्यावरही फ़ार निर्बंध आहेत. आणि त्यांच्या विश्वासार्हतेवरसुद्धा शंका घेण्यास जागा असते [आजकाल सैन्यातसुद्धा फ़ितुर सापडतायत, मग ह्यांची काय कथा.] त्यामुळे सरकारनेच हा प्रस्ताव नाकारला होता. [खुद्द BCCI सुद्धा एका मर्यादेपलीकडे खाजगी सुरक्षाव्यवस्था सरकारी परवानगी शिवाय वापरु शकत नाही (अंतर्गत युद्ध / बंडाळीच्या भीतीने)].

    आणि प्रश्न शेवटी प्रत्येकाच्या मानसिकतेचा आहे. क्रिकेटला पोटभरुन शिव्या देउनही परत तोच खेळ बघणारे लोकही आहेतच की… कुणाला IPL न झालेली आवडली असती तर कुणाला ती फ़क्त भारतात झाली तरच आवडली असती. आणि आता झालेला निर्णय सुद्धा ब‍र्याच लोकांना आवडलाच शेवटी (म्हणे किमान होतेय तरी, नाहीतर पाकिस्तानच्या भीतीपुढे मान झुकवल्यासारखं झालं असतं). त्यामुळे झालेल्या निर्णयात काही चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही (म्हणजे निर्णय १००% बरोबर आहे असं नाही, निर्णय घेण्याची धडाडी मात्र नक्कीच योग्य आहे. नाहीतर मुलगा, बाप आणि गाढवाच्या गोष्टीसारखं होतं, काहीही करा लोकं शिव्या घालणारच.)

    आणि हो, आपल्याला तालिबानी undertaking पेक्षा South African Govt. नी दिलेल्या संपुर्ण सुरक्षेच्या भरवश्यावर विश्वास ठेवणं जास्त सोपं आहे. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s