बिग ब्रदर ते बिग बॉस..”लॉंग जर्नी इन शॉर्ट टाईम.”

a1५ जुन १९८१  कॅरेना जेफ गुडी .. हे एक वादळी व्यक्तिमत्त्व एका गरिब घरात जन्माला आले.बरेच लोकं असे असतात की ते कायम कुठल्या ना कुठल्या कॉंट्रोव्हर्सी मधे अडकत  असतात. काही ना काही कारणाने  बातम्या मधे   रहाणे हेच ह्या लोकांच्या भाग्यात असते ( की तसं करण्यासाठी हे लोकं स्वतः प्रयत्न करतात?  ). जेफ गुडी हे पण एक असंच व्यक्तिमत्व. मला नेहेमीच हिच्या बद्दल एक वेगळंच सुप्त आकर्षण वाटत आलंय.. 🙂  तशी ती दिसायला सुमार,   अगदी ऑर्डीनरी.. पण अट्रॅक्टिव्ह..

व्यवसायाने नर्स असलेली जेफ गुडी पहिल्यांदा जेंव्हा २००२ मधे बिग ब्रदर मधे एक पार्टीसिपंट म्हणून गेली तेंव्हाच तिचा एक सिलेब्रिटी म्हणून स्टेटस मिळाले.त्या नंतर तिला स्वतःला कसे लाइम लाइट मधे ठेवायचे ह्याचे उपजतच असलेल्या ज्ञाना मुळे ती  बऱ्याच टॉक शो मधे , आणि प्रॉडक्ट्स मॉडेलींग मधे गुंतून पैसा कमवायचा मागे लागली.

तिच्या दोन ऑटॊबायोग्राफिज प्रकाशित झाल्या. पहिली २००६ मधे झालेली “जेफ माय ऑटोबायोग्राफी” ह्या पुस्तकाने तिला करोडॊ रुपये मिळवुन दिले. कायम कॉंट्रोवर्सीमधे  असल्यामुळे गुडी ची दोन्ही आत्म चरित्र अगदी हातो हात खपली अन बेस्ट सेलर च्या लिस्ट वर जाउन बसली.ओघा ओघाने ह्या बिग ब्रदर च्या मिळालेल्या प्रसिद्धी मुळे नविन पर्फ्युम्स  आणि इतर प्रॉडक्ट्स चं एंडॉर्स्मेंट तिला मिळालं. आता फायनान्शिअल स्टॅबिलिटी आलेली होती.

judi9हिचं वैवाहिक जीवन पण वादळी ठरलं..ब्रिटिश टिव्ही मधला एक कलाकार जेफ ब्रेझर बरोबर तिच्या दोन वर्षांपासून संबंधातुन, निसर्ग नियमा प्रमाणे तिला दोन मुलं पण झाली.नंतर तिचे लग्न पण झाले असावे.. नक्की माहिती नाही .

judi6२००७ मधे तिने आपल्या बॉय फ्रेंड  जॅक आणि आई जॅकी बरोबर बिग ब्रदर मधे भाग घेतला होता.ह्याच शो मधे शिल्पा शॆट्टी पण होती. शिल्पा बरोबरच्या वंशवादी कॉमेंट्स च्या   मुळे तिची ब्रिटन मधली प्रतिमा डागाळल्या गेली.शिल्पा शेट्टी बरोबरच्या बिग ब्रदर मधल्या  तिची प्रतिमा अजुन खराब झाली.   ब्रिटन मधे पण तिचे फॅन फॉलोअर्स कमी झालेत आणि ती बिग ब्रदर मधुन व्होट आउट झाली.

बोग ब्रदर मधलं भांडण. शिल्पा, आणि जेफ गुडी आणि डॅनिअल इथे आहे..

ह्या वंशवादी टीप्पणी मुळे ब्रिटन मधे चॅनेल ४ ने तर सार्वजनिक पणे एकतर्फी वक्तव्य जारी केले होते पण जवळपास ५०००० च्या वर कम्प्लेंट्स मिडीया कडे करण्यात आल्या.

जेफ गुडी चा एव्हिक्शन नंतरचा इंटरव्ह्यु इथे आहे..

शिल्पा शेट्टीचा रेसिझम वरचा इंटर्व्ह्यु इथे आहे.

असे केवळ भारतामधे होते की एनी पब्लिसिटी इज गुड .. पण ब्रिटन मधे तसे नाही.  ह्याच पिरियड नंतर ताबडतोब, तिच्या नावाचे पर्फ्युम्स आणि इतर पॉडक्ट्स विथड्रॉ करण्यात आले. तसेच तिचे पुस्तक पण शेल्फ वरुन काढुन घेण्यात आले. जितके पैसे कमावले तितकेच पैसे तिने खर्च पण करुन टाकले होते.

सगळी कडचा  हेट्रेड  आणि मिडिया बायकॉट मुळे तिचे  टीव्ही वरचे आयुष्य संपल्यातच जमा झाले होते. तेंव्हा स्वतःची इमेज क्लिअरींग एक्झरसाइझ मधे एक शेवटचा उपाय म्हणुन शिल्पा होस्ट करित असलेल्या बिग ब्रदरचा भारतिय अवतार बिग बॉस मधे तिने भाग घेण्याचे कबूल केले. इथे आल्याबरोबर दोन दिवस तिने बिग बॉस च्या घरातल्या वास्तव्यात भारतीयांची मने जिंकली.शी वॉज द मोस्ट लव्ह्ड सिलेब्रिटी इन द शो, अमंग द फेलो पार्टीसिपंट्स . तिच्या खळाळत्या उत्साही व्यक्तिमत्त्वावर भारतियांनो मनापासून प्रेम केले. …जर ती संपुर्ण शो राहिली असती तर विनिंग कॅंडीडॆट म्हणून  दावेदार राहिली असती…

बिग बॉस मधे भारतामधे  येण्यापूर्वीच तिचे सॅम्प्ल्स टेस्टींग साठी दिले होते आणि तिला कॅन्सर असल्याचे वर्तमान, १९ ऑगस्ट २००८ ला इंग्लंडहुन तिच्या डॉक्टरने कळवले, आणि तिला  शो अर्धवट सोडून इंग्लंड ला परत जावे लागले…तिचा कॅन्सर हा २००२ पासुन शोधला जातोय. २००४ मधे किंवा २००६ मधे पण तिचे कॅन्सर साठी चेकिंग करण्यात आले होते  . तेंव्हा केलेल्या टेस्ट मधे काहीही प्रॉब्लेम सापडला नाही.

judi5इंग्लंडला गेल्यावर जर दुसरी कोणी असती तर तिने हाय खाल्ली असती पण जेफ गुडी ने आपल्या नविन बॉय फ्रेंड जॅक  ट्विड  बरोबर लग्न केले.तिचे वैवाहिक जीवन फक्त एक महिन्या पुरतेच टिकले आणि तिचा स्वर्गवास झाला.पण कॅन्सर डीटेक्ट झाल्यावर मात्र दुसऱ्या नवऱ्याला पण माझ्या मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती तिने आपल्या पहिल्या नवऱ्याला केली होती.. जी त्याने मान्यही केली….!

जेफ गुडीचा त्रास इतका वाढला होता की तिने मर्सी किलिंग साठी पण सरकारकडे मागणी केली होती. अर्थात अशी मागणी कुठल्याही देशात मान्य होऊ शकत नाही. कॅन्सर मुळे होणाऱ्या मरणा पुर्वीच्या वेदना ह्या असह्य  असतात असे म्हणतात.केवळ म्हणूनच तिने मर्सी किलिंग करता अप्लाय केला असावा.

judi10ती आजारी असतांना सुद्धा आपल्या मुलांच्या भवितव्य साठी पैसे कमावून ठेवायचे म्हणून काम करित राहिली. इतकं डिटर्मिनेशन क्वचितच पहायला मिळते. तिला स्वतःच्या मृत्युचे व्हिडीओ चित्रिकरण करुन त्यातुन मिळणारे पैसे मुलांसाठी ठेवायचे होते. .. ते करण्यात आले की नाही हे काही माहिती नाही.

तिचं आयुष्य थोडक्यात यू ट्य़ुब इथे आहे.

तिचं आयुष्यातले शेवटचे दिवस  यू ट्य़ुब व्हिडीओ इथे आहे.

२२ मार्च रोजी जेफ गुडी चे कॅन्सर च्या प्रदिर्घ आजाराने निधन झाले..केवळ २९ वर्षांच्या कालावधिमधे .. भरपुर कॉंट्रोव्हर्सीज.. अन ३ रिअलिटी शो मधे घेतलेला भाग.. !

अगदी शेवटच्या क्षणी पण ती हसत होती, डोक्यावरचे केस गेलेले पण तरिही चेहेर्यावरचे हास्य मावळले नव्हते..विथ ऑल द ऑड्स , हॅट्स ऑफ टु हर फॉर हर   फाइट विथ द कॅन्सर..

मे हर सोल रेस्ट इन पीस…..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली, Uncategorized. Bookmark the permalink.

3 Responses to बिग ब्रदर ते बिग बॉस..”लॉंग जर्नी इन शॉर्ट टाईम.”

 1. तिचं व्यक्तिमत्व नक्कीच वादळी होतं… बीग-ब्रदरच्या शिल्पा शेट्टी बरोबरच्या किस्सा तर चांगलाच आठवणीत आहे… मी आणि काही अजुन लोक त्यावेळी इकडेच होतो.. औफिसमध्ये चांगलीच बैठक रंगायची त्यावेळी.. आम्ही भारतीय आणि हे लंडनवाले… 😉 पण तिच्या वर्णद्वेषाच्या वाक्यांवर इकडचे लोकही नाराज होते हे ही तितकच खरं!

  ..विथ ऑल द ऑड्स , हॅट्स ऑफ टु हर फॉर हर फाइट विथ द कॅन्सर.. मे हर सोल रेस्ट इन पीस…

  ….आमीन!!

 2. जितकं काही आयुष्य ती जगली ते स्वतःच्या टर्म्स वर जगली. मरतांनाचा शेवटचा इंटर्व्ह्यु जो सध्या यु ट्युब वरुन काढून टाकलाय, तो फारस सुरेख होता. टक्कल पडलेली जेफ सतत हास्य विनोद करित इंटर्व्ह्यु देत होती..
  रिअली. हॅट्स ऑफ टु हर…

 3. Devendra says:

  I like this story, information but i want all type cancer information. thanks

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s