दुनियादारी.

पुर्वी पुस्तकं वाचायची मनापासून आवड होती. अर्जुनही आहे 🙂 पण थोडं कमी झालंय वाचन. मोस्ट ऑफ द टाइम पुस्तकं वाचायला बसलो, की एखादा फोन येतो  आणि फोन करणारा अर्धा तास तरी फोन ठेवत नाही.

सहज कपाटातली पुस्तकं निट करतांना एक बाबुराव अर्नाळकरांचं पुस्तक, ज्याचं कव्हर फाटलंय, आणि पुढची – मागची काही पानं गहाळ झालेली आहेत ते सापडलं. आणि सरळ उघडून वाचायला सुरुवात केली. अनेक वर्षापासून कपाटात पडून असलेलं ते पुस्तकं  हातामधे आलं, आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

अगदी खरं खरं सांगतो… १३-१४ वर्ष वय असावं.. गुरुनाथ नाईकांच्या आणि बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्यांवर पोसलेला वाचक पिंड आहे आमचा. लायब्ररीमधे अक्षरशः नंबर लावून पुस्तकं आणायचो. आणि ते पण कसं.. तर सकाळी आणलं तर संध्याकाळी परत करण्याच्या बोलीवर. त्या पुस्तकातली मजा एखाद्या प्रथितयश लेखकाच्या गुळगुळीत वाक्यांच्या पुस्तकात नाही. ज्या कोणी ह्या लेखकांची पुस्तकं वाचली असतील तेच समजू शकतात.

गुरुनाथ नाइकांचा कॅप्टन दीप आणि  राजस्थानच्या वाळवंटातला जागेवर थोडा हलून रिव्हॉल्व्हरच्या गोळ्या चुकवणारा उदयसिंग चौहान तसेच अर्नाळकरांचा काळा पहाड आणि झुंजार म्हणजे आमचे हिरॊ होते. “कॅप्टन दीप च्या हातातिल स्टेन गन थडाडली अन समोरचे चार पाकिस्तानी शांत झाले” अशी वाक्य वाचली की कसं अगदी आपल्या हातात ती स्टेनगन असल्याचा भास व्हायचा, आणि   आपणच त्या पाकिस्तान्यांना मारतोय असं वाटायचं…:)

काळा पहाड रात्रीच्या अंधारा मधे बिल्डींग च्या पाइपला धरुन एखाद्या घरामधे शिरला की आम्ही श्वास रोखुन सगळा प्रसंग वाचुन काढायचो. तो पकडला जाउ नये म्हणुन छाती मधे धडधड व्हायची. ती लहानशी पुस्तकं म्हणजे आमचं जग होतं.. मित्रांमधे पण . अरे ते झुंजारचं +++ पुस्तक वाचलं कां? असे प्रश्न विचारले जायचे. ह्या पुस्तकांव्यतिरिक्त हे जग म्हणजे कल्पनाच सहन होत नव्हती..दर महिन्याला कमित कमी ८-१० पुस्तकं प्रसिध्द व्हायची.

बरेच दिवस तरुणांवर आणि पौगंडावस्थेतिल मुलांच्या मनावर ह्याच लेखकांचे राज्य होते. घरी ही पुस्तकं वाचायला बंदी होती, तरीपण लपून छपून ही पुस्तकं वाचली जायची.एखाद्या मित्राशी भांडण झालं की अरे त्या पुस्तकातला खुनी ++++ आहे म्हणून ओरडून सांगायचं एकदा सस्पेन्स गेला की मग त्या पुस्तकाची मजा संपली…! ह्याला म्हणतात स्विट रिव्हेंज…  🙂

होता होता, एक नवीन वादळ आलं चिंतामणी लागु आणि सुहास शिरवळकर या नावाचं.. एक पुस्तक होतं , दुनिया दारी .. मला वाटतं मी ते पुस्तक १९८३ मधे वाचलंय.  खरं सांगतो. .. त्या पुस्तकाने अक्षरशः मनातून हादरलॊ होतो. सगळे कॅरेक्टर्स अगदी रोजच्या पहाण्यातल्या सारखे. मग तो श्रेयस असो किंवा दिग्या.. ह्या पुस्तकामुळे वाचनाची “चव” बदलली.आणि झपाटल्या सारखी सुहासची सगळी पुस्तकं वाचून काढली. या पुस्तका मधे अगदी  कट्टा ते मारामाऱ्या सगळं काही होतं . ते दारु पिणे जे आजकालचा लपून छपून करतो   ते अगदी कथानकाच्या ओघात आलेले आहे आणि कुठेही मुद्दाम जोडले आहेत असे वाटत नाही.

सोबत शिवराळ भाषा पण   येते . शिव्या  वाचतांना आपण काहितरी वेगळं ,अडखळल्यासारखं किंवा विचित्र वाचतोय असं वाटंत नाही. सगळे शब्द वाक्यामधे अगदी चपखल बसले असतात. . तरुणांच्या रोजच्या बोलण्यातली भाषा वापरल्यामुळे सगळे प्रसंग अगदी आपल्या समोरच घडताहेत असे वाटते. श्रेयस च्या जागी आपणच आहोत अन दिग्या पण आपलाच एक मित्र आहे अन सगळं कथानक आपल्या भोवतीच घडतंय असं फिलिंग येतं….

दुनियादारी वाचायचं पुस्तक नाही तर अनुभवायचं पुस्तक आहे.. जो पर्यंत तुम्ही ते उघडत नाही, तो पर्यंत ठिक आहे, पण एकदा उघडलं की मग मात्र संपवल्या शिवाय ठेवणार नाही ह्याची मला खात्री आहे. म्हणून जर वाचायला वेळ असेल तेंव्हाच हे पुस्तक उघडा…पुस्तक वाचून झाल्यानंतर मात्र एक सुन्न करणारा अनुभव येतो..

कॉलेजात जाणाऱ्या मुलाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे हे.. ’दुनियादारी’ला पर्याय नाही…हे पुस्तक वाचल्या शिवाय कॉलेज  लाइफ सुरु करुच नये असे मला वाटते. तसेच प्रत्येक पालकांनीही हे पुस्तक  वाचल्या शिवाय त्यांनाही तरुणांच्या दुनियेचा अंदाज येणार नाही.

जरी आज कॉलेजात जाणाऱ्या मुलांनी हे पुस्तक वाचलं तरी  त्यांना असं वाटेल की सगळ्या घटना अगदी  आपल्या सभोवताली घडत आहेत असे  वाटेल.. आणि हेच त्या पुस्तकाच्या यशाचे रहस्य आहे. अहो बघा ना, २५ वर्षांपुर्वी लिहिलेलं पुस्तक अजुन ही वाचतांना ताजं तवानं /फ्रेश वाटेल..

एक होते , त्या मधे एका मुलाची मर्चंट नेव्ही मधली कहाणी होती. अगदी खालच्या पोस्ट वरुन जॉइन करुन शेवटी त्याचा राइझ ऍंड फॉल कव्हर केलाय. नांव आठवत नाही. कोणाला आठवेल तर कृपया इथे पोस्ट करा.. पुन्हा एकदा वाचायचंय ते पुस्तक..!त्या पुस्तकाने पण झपाटुन टाकलं होतं मला.

मला वाटते की  मराठी मधे ,अगम्य साहित्य आणि रटाळ भाषा , ओढून ताणून आणलेले किंवा वापरलेले  कठीण शब्द ,आणि अलंकारिक भाषा वापरली तरच लेखकाला साहित्यिक मानले जाते अन्यथा नाही.  ही एक सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे..

काही लेखकांच्या लिखाणाला साहित्यिक मुल्य कधीच नशिबात नसते.  यांची पुस्तकं जरी प्रतिथयश लेखकांपेक्षा जास्त खपत असली, तरिही ह्यांना साहित्यिक म्हणून मान्यता कधीच मिळत नाही  आणि कायम हे लेखक दुर्लक्षाची धनी होतात.. .

जितके लेखक माझे आवडते होते ते सगळे अगदी साहित्यिक  आणि समीक्षक लोकांच्या दृष्टीने अगदी टाकाऊ अन बाजारु लिहिणारे लेखक आहेत.पण एक सांगतो, शेवटी हेच लेखक सगळ्यात जास्त बॉक्स ऑफिस वर हिट ठरले आहेत. मराठी मधे सगळ्यात जास्त कादंबऱ्या लिहिण्याचा विक्रम बाबुराव अर्नाळकरांच्या नावे आहे,  सुहास शिरवळकर, चिंतामणी लागु हे सगळे प्रतिथयश किंवा रिस्पेक्टेबल साहित्यिक समजले जात नाहीत.

असो, जरी असे असले तरी, हे लेखक आमचे आवडीचे लेखक आहे,  ह्या लेखकांवर आणि त्यांच्या लिखाणावर अगदी मनापासून प्रेम केलंय..  आम्हाला आमच्या लहानपणी एक   सुंदर रंगतदार स्वप्नमय  बालपण जगण्यासाठी दिलं म्हणून……!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged . Bookmark the permalink.

36 Responses to दुनियादारी.

 1. YD says:

  vaa, captain deep, udaysinghchee athvan !
  Koneech hya herosvar lihit nahee…deep kasla bhareee hota…kuthehee ghusayachya pakistaninchya balekillyaat, anee sahee salamat baher 🙂

  Chaanach ahe he post…a-z vareel sagale lekhak avadtat mala 🙂
  Thanks tyanchyabaddal lihilyabaddal

  • अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
   लहानपणी हे लेखक म्हणजे आमचे जीव की प्राण होते.. पुस्तकं वाचतांना पण अभ्यासाच्या पुस्तकात दडवुन वाचावे लागायचे. कारण डिटेक्टीव्ह पुस्तकं म्हणजे वाइट असा एक समज होता.
   तुमच्या अभिप्रायामुळे एक कळले की आपल्यासारखी आवड असणारे लोकं आहेत अजुन 🙂
   पुन्हा एकदा प्रतिक्रिये करता मनःपुर्वक आभार

 2. बाबुराव अर्नाळकरांची मी खूप पुस्तकं वाचलीत.आपला लेख वाचून जुन्या आठवणी उजाळल्या.
  लेख छान आहे.

 3. Mrunalini says:

  Thanks
  Mi pan par vedi zale hote Suhas Shirvalkar vahun. DUNIYDARI vachun pustakatlya sarva thikani javun ale hote. Mala vataych ki kharach to bangla mala sapdel. Suhas Shirvalkar was great

 4. महेंद्रजी,
  खरं सांगायचं तर, पुस्तकांच्या बाबतीत मात्र मी नेहमीच मागासलेला राहिलो…मासिकं – चांदोबा किंवा कौमिक्स अगदी चाचा चौधरी – साबु वगैरे… वाचलित भरपुर!

  काही पुस्तकं ‘मात्र’ वाचलीत.. जसं, दया पवार यांच “बलुतं”, पॉउलो कोएल्हो यांच “द अलकेमिस्ट “, वीणा गवाणकर यांच “एक होता कार्व्हर “, घाणेकरांची भटकंती आणि सह्याद्रीवरील पुस्तकं आणि अशीच काही…! सध्या “ययाती” वाचतोय…. पण खास असा मुड आणि वेळ सापडत नाहीये…

  काही पुस्तकं वाचायची राहुनच गेलीत… त्यांची एक नोंद आहे माझ्याकडं, आणि आता त्यात तुम्ही वरती सांगितलेली काहींची भर टाकली.. अजुन काही असतील तर सांगा…!

  अरे हो.. पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

  – भुंगा

  • नुतन वर्षाच्या शुभेच्छा…
   सुहास शिरवळ्कर जरुर वाचा.. आणि चिंतामणी लागु सुध्दा..
   अजुन बाकी स्टॅंडर्ड पुस्तकांची नावं तर बरिच सापडतिल.. प्रतिथयश लेखकांची बरिच पुस्तके आहेत. पण इतकं सगळं वाचलं तरी दुनियादारी वाचली नाही तर “मोक्ष” नाही! 🙂

 5. sahajach says:

  नुतन वर्षाच्या तुम्हालाही शुभेच्छा…..खरय ’दुनियादारी ’ मस्तच.एक काळ असा होता जेव्हा निव्वळ शिरवळ्कर वाचत होते मी…मग व.पु. पर्व आले.मध्यंतरी Z Marathi वर ’दुनियादारी’ नावाचे सिरियल आले होते पण ते काही पुर्ण पाहणे झाले नाही….बाकी लेख वाचुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या…

 6. अनिकेत says:

  अर्नाळकर माझेही आवडते. पण गुन्हेगारी कथाच वाचायच्या तर इंग्रजीमधील ‘James Hadley Chase’ अती उत्तम किंवा थोडेसे पाल्हाळ लावणारे ‘Sydney Sheldon’ पण बेस्ट

 7. दिपक says:

  मस्त लिहंलयस मित्रा.. कारण कालच मी “दुनियादारी” झपाटल्यागत वाचलं. श्रेयस, शिरिन पासुन दिग्या, एम के श्रोत्री मनात घरुन गेले राव. असं वाटतं ही माणसं आपल्याच बाजुला आहेत. प्रत्येकाने एकदातरी आयुष्यात हे पुस्तक वाचलेच पाहिजे..

  अंवातर= कसा आहेस?

  • Mahendra says:

   मस्त चाललंय.. तसा थोडा कामाचा व्याप जास्त वाढलाय, त्यामुळे फारसा वेळ देता येत नाही नेट वर.. बाकी ठिक…माझं फेवरेट आहे ते पुस्तंक..

 8. nilesh jadhav says:

  kadhi kadhi asha kahi ghatana ghadtat ki dunidaritalya patranchi athvan yete , aani hi sarv patr mi kunachya na kunachya rupat pahat aalo ahe …aani ho ek mahatvaach SHIRIN ch je varnan kel ahe te apratim pan asa..patr baghayala milal nahi ajun

 9. Abhijit says:

  Hi Mahendra,

  Kharach chan lihilayes Duniyadari baddal.. Mi hi asech mazya teenage madhe wachle hote te ani wed laglele.. Tyanantar Pune Marathi Granthalayat tya weles jewdhi mhanun SuShinchi pustake hoti, saglee wachun kadhlee.. ani tya nantar Va.Pu.. kharach aprateem likhan karun thewlay ya dogha diggajjanni….

  • अभिजीत
   ह्या पुस्तकाने तर जादु केलेली होती माझ्यावर.. अप्रतिम लिखाण आहे सुहासचं..

 10. Prajakta says:

  hi mahendra,
  khuup chhaan vatla tuza blog wachuun.
  duniyadaari was the first punch and well-hit.
  pan ajuun khuup pustake aahet tyanchi jyancha khaas ullekh vhawa asa vaTata.
  like jaai, daastaan, madhuchandra, kosaL, rupamati, ……baaaaap re kiti tari aThavtaat
  aThvayala lagla ki…
  fine..
  thanx again.

  • मनःपुर्वक आभार, आणि ब्लॉग वर स्वागत. अजून बऱ्याच पुस्तकांचा उल्लेख करता आला असता पण दुनियादारी म्हणजे लास्ट ’नेल इन द कॉफिन’. माझ्या मनावर अगदी कोरलं गेलंय हे पुस्तक, म्हणुन केवळ त्याच्यावरच लिहिलंय.

 11. Shweta mahajan says:

  Hi!
  “Duniyadari” Khup aavadali.Chotya Chotya ghosti mastach explain kelyat.Shivay SHREYAS la khup chan rangaval aahe.mala aajkal vachanachi aavad nirman zali aahe te he pustak vachunach.mala ajun Suhas Shirvarkar yanchya pustakachi nav kalavu shakal ka.

 12. Mrunal says:

  Hey,
  Mi sudha सुहास शिरवळकर chi sagali pusatak 2-2 vela vachi aheth. Duniyadari” Manje saglyachi hight ahe
  chan aheth. thashech Babasaheb Purandarech “Mruthunjay ” agdi ved lavate. kaka tumi vachle ka.

 13. Anand says:

  me atach “Duniyadari” wachale…agadi ek tasa purvi complete kele….zakkas pustak ahe…mala ajun sahas shirwalkaranchya dusarya pustakanchi nave sangchal ka???? mhanaje mala library madhun magun gheta yeil….

 14. Shaunak says:

  It is a Forever Young book , Gr8 book forever, everyone should read atleast once 😉

 15. Rupesh says:

  hi~!
  Me Duniyadari baddal majya bhava kadun aikale hote…last year vachun kadhale…..te ek pustak nasun ..ek kalpnik katha aahe..ji sagale..roj jagtat…hya varshi parat ekda vachun kadhale…toch utsah tikun rahto….kantala yet nahi…ani aplyala aplya tarun panat gheun jato….

 16. tejali says:

  आज तुमच आलेख वाचून बर्‍याच दिवसांनी दुनियदारी च्या आठवणी जाग्या झाल्या. मी त्या पुस्तकाची अक्षरश: आवर्तन केलीत. माझ्या १का वाढदिवसाला मला भेट मिळालेल ते .. गेले ४ -५ वर्ष सोबतीला आहे माझ्या “दुनियदारी’… शिरिन तर माझ सगळ्यात आवडत पात्र..i always relate with her…me, my thoughts….but these days तिच्यासारख तटस्थ वागण जमतच अस नाही..पण तरीही जेव्हा गरज असते तेवा शिरिन मला नेहेमीच मदत करते….may be time changes a person..
  पण शेवटी एकच वाटत…आयुष्य दुनियदारि सारख नाही जगता येत..

 17. sandip maruti tepugade says:

  dunyadri ek vadal manala lobhas ek takat jaala aavarnyachi .dunayadari kadhi na sampanri kadanbari kadambri vishvas dete kitihi vadala aali tari tyala vel hech aoushadh aahe dunyadari jinkayla shikavte aaushayachya pratek valnavar dunyadari shikavte aaush jagala

 18. ketaki says:

  तुमची बरीच जुनी पोस्ट आहे ही, पण मी आजच वाचतेय. तुमचा ब्लॉग सर्फ करताना दुनियादारी असं टायटल दिसलं आणि ती पोस्ट उघडल्याशिवाय मला राहवेना. अतिशय सुरेख पुस्तक आहे. मी माझ्या कॉलेजच्या दिवसात वाचलंय. एकदा हातात घेतलं की पूर्ण झाल्याशिवाय ठेववत नाही अगदी. सुहास शिरवळकर माझेही अतिशय आवडते.
  या पोस्ट च्या निमित्ताने त्यांची आठवण झाली, आता परत सगळी पूर्वी वाचलेली पुस्तकं आणते लायब्ररीतून. धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल. 🙂

 19. Jagrut says:

  Kaka, Sushinchach “Jata-Yeta” pan chan pustak aahe…jamla tar jarur vacha..aavdel ashi apeksha..
  Duniyadari baddal kiti hi bolo tari kamich..!!
  Sadhya tumchya blog ne jhapatun geloy aani roj (kamitkami) 8-10 post vachto (including comments 🙂 ) Have never seen such tremendous variation in writing..u r just outstanding..

  • जागृत
   सुहासची पुस्तंकं खरच वेड लावतात. तसेच चिंतामणी लागु पण मला खूप आवडायचा. जाता-येता वाचलेले नाही, मिळवतो लवकरच..

 20. Vikas Katkar. says:

  mala suhas saranchi sarv pustakae awadtat. pane khup chan watate ti manjhe dunyadari

  Mi tar Fan Aahe Tyancha

 21. १४ ते १५ वर्षांचा असतांना १९९५ मध्ये गुरुनाथ नाईक , शैलजा राजे माझ्या आयुष्यात आल्या , ह्याच सुमारास विजय देवधर ह्यांनी अनुवादित परदेशी साहित्याची कवाडे खुली केलीत .
  पुढे ९६ च्या ला दहावीच्या सुट्टीत पंढरीनाथ सावंत , नारायण धारप , मतकरी ह्यांनी मनावर गारुड केले.
  ह्याच वेळी फडक्यांची शामा हृदयाचा ठोका चुकवून गेली. त्यांच्या सोबतीला आशु विजू रानडे सुद्धा आमच्या भावविश्वात दाखल झाल्या , प्रणय प्रसंग हा पाहण्या पेक्षा वाचण्यात अधिक हशील आहे हे माझे त्यावेळचे मत आज वयपरत्वे अनुभवांच्या कसोटीवर खरे उतरले आहे ,
  परदेशी रहस्य ,प्रणय , भय कथांना नुसतीच लोकप्रियता नाही तर लोकमान्यता आहे. .हे पाहता आपल्याकडील साहित्यातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा मनापासून तिटकारा येतो.

 22. Madhura Manohar says:

  प्रिय महेंद्र सर,
  प्रिय म्हणण्याची ताकत तुमच्या लेखांनी दिली आहे.
  सहज गुगल काकांनी तुमचा एक लेख पुढे केला आणि वेड्यासारखी वाचत सुटले. सगळे लेख वाचून काढले पण आज हिम्मत करून काही तरी लिहिते आहे.
  तुम्ही एका पुस्तकाचा संदर्भ मागितला त्याबद्दल. कदाचित ते पुस्तक अनंत सामंतांच “विराज अविरत” असावं असं वाटलं.

  • ब्लॉग वर स्वागत, आणि मनःपूर्वक आभार. खरं तर हल्ली मी नवीन व्यवसाय सुरु केल्याने लिखाणाकडे दुर्लक्षच होतंय, पण लवकरच सुरुकरू शकेन अशी अपेक्षा आहे.माझी मोठी मुलगी इंजिनिअर झालेली आहे, आणि ती नोकरी करते, तेंव्हा काका म्हणालीस तरीही हरकत नाही . 🙂 येत रहा ब्लॉग वर.

 23. vikas g shende says:

  नमस्कार,
  मी सुद्धा सुहास चा फॅन आहे,चिंतामणी लागुंचे पुस्तक आठवते का लोणावळ्या जवळ एक कॉलनी तयार होते तिथे एक जाड मुलगी व एक मुलगा असतो to थोडा वांड असतो तिथलेच एक रिटायर्ड व्यक्ती त्यांना सुधारून एकत्र आणते त्या पुस्तकाचे नाव माहित आहे का?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s