आय टी मधले जॉब रेसेशन

33ई सकाळ मधे एक लेख आलाय रेसेशन बद्दल. त्या लेखाची सुरुवातच अशी आहे की एक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट म्हणतोय की त्याचं कॅंपस इंटर्व्ह्यु मधे सिलेक्शन झालं होतं ,पण अजुन कॉल आलेला नाही. माझ्या एका मित्राच्या मुलीचं पण असंच झालंय. गेले ४ महिने वाट पहाते आहे अपॉइंटमेंट लेटरची….! कधी फोन केला एच आर डिपार्टमेंटला तर म्हणतात, वुइ विल कॉल यु व्हेन एव्हर निड अरायझेस…

ह्या विषयावरचे माझे विस्तृत मत मी सकाळवर टाकले होते पण, सकाळने फक्त पहिल्या दोन ओळीच नेटवर प्रसिध्द केल्या, आणि बाकी सगळं एडीट केलं..म्हणुन ह्या पोस्ट चे औचित्य.

रेसेशन म्हंटलं की डॊळ्यापुढे आधी सबप्राइम क्राइसेस येतात आणि यु एस मधल्या एकॉनॉमी वर तोंड सुख घेणं सुरु करतो आपण. पण ह्याच गोष्टीला एक दुसरा पण ऍंगल आहे आणि त्या दृष्टीने विचार करणे अतिशय आवश्यक आहे.

आज पासून साधारणतः ८-१० वर्षापुर्वी आयटी हे एक नवीन फिल्ड होते. सोबतच बी एस सी क्म्प्युटर सायंस सुरु झाले होते. मार्केट मधे  कम्प्युटर बद्दल नॉलेज असणाऱ्यांची डिमांड खूप होती, आणि संख्या कमी होती.. कंप्युटर सायंस मधले ग्रॅज्युएट्स मिळेनासे झाल्या बरोबर , इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग च्या   काही स्मार्ट इंजिनिअर्स नी ( ईतर ब्रॅंचेस च्या) कम्प्युटर ट्रेनिंग चे कुठले तरी क्रॅश कोर्सेस करुन आय टी मधे जॉब्ज मिळवणे सुरु केले.

आयटी कंपन्यांचं भांडवल म्हणजे मॅन पॉवर. रॉ मटेरियल म्हणजे पण मॅन पॉवर.. पण आय टी मधे काम जास्त कधी मिळणार? जेंव्हा बेसिक इंजिनिअरिंग उद्योग चांगले चालतील तेंव्हा.

अमेरिकन कंपन्यांनी आउट सोअर्सिंग सुरु केले होते, ह्याचा फायदा इन्फोसिस , सत्यम आदी कंफन्यांनी करुन घेतला.कामं खुप होती,  पण मॅन पॉवर  पुरेशी अव्हेलेबल नव्हती,कंपन्यांच्या लक्षात आले की थोड्याफार ट्रेनिंग ( म्हणजे जॉब स्पेसिफिक ट्रेनिंग) वर कुठलाही ग्रॅजुएट हे काम करु शकतो, म्हणून  आय टी कंपन्यांनी कॉमर्स आणि आर्ट्स ग्रॅज्युएट्स पण  नोकरीवर ठेवणे सुरु केले गेले.

अजुन एक मोठ्ठं स्थित्यंतर झालं. दर चौका मधे एक इंजिनिअरिंग कॉलेज सुरु झाले, पुर्वी जे पुर्ण महाराष्ट्रात फक्त ७ कॉलेजेस होती ती आता १००० च्या वर झालेली होती .कुठलाही विद्यार्थी आता इंजिनिअर बनू शकत होता. पैशापुढे शिक्षण ’संस्थाने’गुडघे  टेकुन बसले होते.. नवीनच स्व-घोषित शिक्षण महर्षी आपल्या तुंबड्या भरण्याचे नवीन नवीन उपाय शोधू लागले- जसे रिझर्व्ड सीट्स, मॅनेजमेंट कोटा इत्यादी .

या सगळ्या इंजिनिअरींग कॉलेजेस मधे , आणि आय टी ची डीमांड वाढल्याने जवळपास प्रत्येकच कॉलेजने आय टी शाखा उघडल्या.प्रत्येक कओलेज मधे कमित कमी एक वर्ग, आणि क्लास मधे साधारण ७० मुलं!  दर वर्षी कमीत कमी ७० हजाराच्या आसपास आय टी इंजिनियर्स तर महाराष्ट्रातच इंजिनियर्स तयार होऊ लागले. एम एस सी क्म्प्युटर झालेले वेगळे..ते पण कॉंपिटीशन ला होतेच इंजिनिअर्स च्या , त्यांची मोजदाद अजुन केलेली नाही.

इतकं सगळं लोकं होते तरी पण  आय टी कंपन्यांमधे अजुनही भरपूर  जॉब्ज  ओपनिंग्ज होते. जॉब हॉपर्स अगदी ग्रास हॉपर्स प्रमाणे इकडून तिकडे उड्या मारीत होते. थोड्या जास्त पगारावर जॉब्ज चेंज करणाऱ्यांची संख्या खूपच वाढली होती.लव्ह युवर जॉब, ऍंड नॉट युवर कंपनी हे नारायण मुर्तींचं वाक्य अगदी प्रमाण मानून प्रत्येक इंजिनिअर कुठल्यातरी कंपनीत स्थिरावण्या पेक्षा, इकडे तिकडे रिझुम पोस्ट करित होता. हेड हंटर्स पण सारखे इंडिव्हिज्युअली फोन करित होतेच लोकांना व्हेरियस जॉब्ज साठी. एखाद्या रॉ इंजिनिअरला दोन वर्ष ट्रेनिंग द्या, आणि तो लगेच दोन वर्ष झाले, आणि थोडंफार काम शिकला,  की दुसरी कडे जॉब घेणार. कंपन्या म्हणजे ट्रेनिंग सेंटर्स झाले होते.

डॉलर टु रुपी कन्व्हर्शन रेट चांगलाच झाला होता.डॉलर्स मधे पेमेंट मिळाल्यामुळे कंपन्यांची किटी खुप फुगली होती. अमेरिकेत लोकांना नोकरीवर ठेवल्यास महाग पडते म्हणून मग कंपन्यांनी भारतातुन लोकांना  ऑन साईट पाठवणे सुरु केले .अगदी सुमार दर्जाची मुलं अणि मिडिऑकर पण त्या मुळे पण परदेशी जाउन स्थिरावली.तिथे गेल्या बरोब्बर दुसरे जॉब् पहाणे सुरु केले.   मुलांनी   ऑन साइट काम मिळाले नाही म्हणून सुद्धा जॉब्ज चेंज करणे सुरु केले होते काही लोकांनी.

ह्या जॉब हॉपिंगवर उपाय म्हणून बेंचर्स चा कन्सेप्ट जन्माला आला. मोठ्या मोठ्या कंपन्या गरज नसतांना पण काही लोकं नोकरी वर घेउन बसवून ठेवू लागल्या होत्या. म्हणजे एखाद्याने नोकरी सोडली की लगेच ह्या मागच्या बेंचर्स पैकी एक समोर घेउन त्याला काम द्यायचे म्हणजे कामाचे नुकसान होणार नाही.ह्या बेंचर्सला बेसिक ट्रेनिंग देण्यासाठी मोठ नोठे ट्रेनिंग डिपार्ट्मेंट्स सुरु करण्यात आले होते. ह्या कन्सेप्ट ला मुर्त स्वरुप देण्यासाठी कॅंपस इंटर्व्ह्यु मधे मुलांना सिलेक्ट करुन ’बुक’ करुन ठेवू लागले. पुढे जेंव्हा ४-६ महिन्यात रिक्वायरमेंट निघाली की ह्या मुलांना बोलवायचे……. सगळी कडे आनंदी आनंद होता.

आता इंजिनिअरिंग ईंडस्ट्रिज जोरात चालत होत्या. इंडेक्स जवळपास २० हजारावर पोहोचण्याच्या तयारीत होता.इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीचा बुमींग पिरियड होता.  इन्फ्रास्ट्रक्चर चांगले चालले आणि बिल्डींग कन्स्ट्रक्शन्ला चांगले दिवस आल्यामुळे , स्टिल, सिमेंट, मशिनरी मॅन्युफॅक्चर्स आणि  इंजिनिअरिंग कंपन्यांना चांगले दिवस आले. प्रत्येकच कंपनी बोनस शेअर्स देत होती. आता काम वाढलं म्हणून  बऱ्याच कंपन्यांमध्ये इ आर पी सुरु करण्यात आले होते. त्यामुळे  इंजिनिअरिंग कंपनीमध्ये पण आय टी बेस्ड जॉब्ज ओपनिंग निघाले. इआरपी इम्प्लिमेंटेशन ची किंमत करोडॊ रुपयांमधे होऊ लागली.आणि आय टी ट्रेंड लोकं मिळणं आणि  टिकणे मुश्कील झालं होतं.

इंटर्नेट बॅंकिंग आणि तत्सम ऑन लाइन शेअर्स ट्रेडींग सारख्या बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या होत्या, इथे आय़ टी ट्रेंड लोकांची डीमांड वाढली होती. म्हणजे अर्थ शास्त्रामधला एक सोपा सिद्धांत.. डिमांड जास्त आणि माणसं कमी… म्हणजे नेट आउट कम की पगारामधे वाढ.त्या मुळे त्यांनी पण लोकांना भरमसाठ पगार देणे सुरु केले होते. कसंही करुन मॅन पॉवर टिकवायची हाच मुख्य हेतू होता….. कंपन्यांनाही काहीच प्रॉब्लेम्स नव्हते कारण त्यांचे इनकम डॉलर्स मधे होते…

आय टी मधे खुप जास्त काम करावं लागतं म्हणून खुप जास्त पगार आहे  असे नाही. केवळ डीमांड अन सप्लाय रेशो मधे खुप तफावत असल्यामुळे पगार जास्त दिला जायचा असे मला वाटते.. अर्थात मी चूक असू शकतो.पण हे माझे मत आहे. हा माझा ब्लॉग आहे म्हणून मी इथे   मला जे काही वाटते ते लिहायचे ठरवले आहे.आय टी मधे काम करणारे आणि इतर ठिकाणी काम करणारे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स सारखेच कामं करतात. त्यांच्या बुद्धिमत्ते मधे पण काही फारसा फरक नसतो, किंबहुना ती सारखीच असते. तरी पण आय टी मधे ग्रॅज्युएशन केले म्हणजे या मुलांना इतर स्ट्रिम मधल्या मुलांपेक्षा जास्त  ( दुप्पट ) पगार मिळत होता ज्या  मुळे इतर मुलांमधे इन्फेरिअरिटी कॉम्प्लेक्स आला होता.

24आता नेमकं उलटं झालंय.. रेसेशन चे परिणाम म्हणजे  पहिले जे इटालियन कॉफी व्हेंडिंग मशिन्स ( ज्यांची कॉफि ७० रुपये पडायची )होती ती निघून इंडीयन मशिन्स लागली.एच ओ डी सी कुपन्स वगैरे कमी करण्यात आले, काही कंपन्यांनी बंद पण केलेत. अमेरिकन ’आका’ आता बराच  सुस्तावलेला होता. दिलेल्या ऑर्डर्स कॅन्सल होऊ लागल्या होत्याच. असलेल्या लोकांनाच कामे नव्हती, तेंव्हा अजुन जास्त लोकं घेउन करायचे काय ?

एच १ बी जो ह्या आयटी कंपन्यांचं बॅक बोन आहे तोच कॅन्सल करणे सुरु झाले होते ओबामांच्या भाषणानंतर. जर तुम्हाला  बेल आउट पॅकेज घ्यायचं असेल तर तुम्हाला एच १ बी डिपेंडंट कंपनी राहुन चालणार नाही . आणि जर तुम्ही एच १ बी डीपेंडंट असाल तर मात्र तुम्हाला या पॅकेजेस चा फायदा घेता येणार नाही  ह्या सरकारच्या स्टॅंड मुळे अडचणीत अजुन वाढ झाली.म्हणजे नोकऱ्या कमी झाल्या, बरेच लोकं परत भारतामधे आले. आणि जे अजुन तिथे टिकुन आहेत त्यापैकी बऱ्याच लोकांना अजूनही परत यावं लागेल असं दिसतंय.

कॅंपस इंटर्व्यु बंद झाले. आय आय एम मधे पण जे करोडॊ रुपयांचे पॅकेजेस वाटले जात होते (मेरिलिन वगैरे अमेरिकन कंपन्यांकडून) ते आता रॅशनलाइझ झाले होते. पुर्वी आय आय एम त्यांच्या कॉलेज मधे कॅंपस इंटर्व्ह्यु घेण्यासाठी पैसे मागायचे, आता या वर्षी त्यांच्याकडे मोठ्या कंपन्या कॅंपस इंटर्व्ह्यु घ्यायला गेल्याच नाहीत. जे कोट्य़ावधी रुपयांचे  ( एखादा मुलगा एखाद्या इन्स्टिट्य़ूट मधे शिकला म्हणजे त्याची लायकी एकदम करोडॊ रुपये कशी  होते  हा मला पडलेला एक    प्रश्न आहे) पॅकेजेस होते ते आय आय एम मधे ७ ते १० लाखावर आले . बी ग्रेड चे मॅनेजमेंट्स कॉलेजेस ( अरे माफ करा मंडळी, ही कॉलेजेस स्वतःला बीझिनेस स्कुल्स म्हणवतात…म्हणजे काय मुलांना उगिच आपण हार्वर्ड मधे शिकतोय असं वाटावं म्हणुन. 🙂 ) त्यातल्या मुलांची तर अजूनच वाईट परिस्थिती झालेली आहे. अगदी २ लाखावर कामं करायला पण मुलं तयार आहेत. पुर्वी जी मुलं  ( एम बी ए फिनान्स वगैरे झालेली) इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज कडे तुच्छतेने पहायची ती आता ईंटर्व्ह्यु करता तिथेच अप्लाय करताहेत.

तर पुन्हा आपण आय टी कडे वळु या. सध्या जी मुलं आय टी मधे इंजिनिअरिंग करुन लाखो रुपयांच्या नोकऱ्यांचे स्वप्न पहात होती , त्यांना जॉब्ज मिळणे कठिण झाले आहे. त्यांनी  आता जमिनिवर उतरायची वेळ आलेली आहे.  इतर स्ट्रिम च्या इंजिनिअर्स प्रमाणे  मिळेल त्या नोकऱ्या करण्याची मानसिक तयारी करावी..तुम्ही पण इतर इंजिनिअरिंग ग्रञ्युएट्स पेक्षा काही फार जास्त हुषार आहात असे नाही, आणी आता रेसेशन मुळे नौकऱ्या पण कमी झालेल्या आहेत.

अजुन बरेच लोकं जे ऑन साइट आहेत ते पण परत येतिल. म्हणजे ट्रेंड मॅन पॉवर आहे पण काम नाही अशी परिस्थिती.. सोबतच ,फक्त महाराष्ट्रात इंजिनिअरिंग कॉलेजेस दर वर्षी ७० हजार मुलं फक्त आय टी स्ट्रिम मधली बाहेर काढेल.

येणाऱ्या काळात किंवा काही वर्षांनी  जरी कामं वाढली तरी पगार पुर्वी सारखे अव्वाच्या सव्वा  मिळणार नाहित ह्याची खुण गाठ मनाशी बांधणे आवश्यक आहे असे मला वाटते.या उलट आता आय टी मधे अती जास्त अव्हेलेबल असलेल्या मॅनपॉवर मुळे दिड ते दोन लाखांच्या पॅकेजेस वर ऑफर केले जाणार नाही असा माझा अंदाज आहे.आणि अशा पगारावर पण  नौकऱ्या करण्याची तयारी मानसिक तयारी ठेवायला हवी..

जेट एअर वेज, किंग फिशर, टाटा , किर्लोस्कर वगैरे कंपन्यांप्रमाणे सध्या ज्यांची नोकरी सुरु आहे त्यांचे पण पगार ३० टक्के ते ४० टक्के  किंवा त्या पेक्षा जास्त पण कमी होऊ शकतील असा माझा अंदाज आहे…

हा लेख वाचुन घाबरुन जायचे कारण नाही .डिझर्वींग कॅंडीडॆट्स ला अपॉर्च्युनिटिज तर नक्कीच रहाणार आहेत तेंव्हा, पुल अप युवर सॉक्स ऍंड स्ट्रार्ट हंटींग फॉर अ जॉब.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

12 Responses to आय टी मधले जॉब रेसेशन

 1. Indian_Lost_in_US says:

  Whatever you said is not 100 percent true.
  One thing is true, IT people do not have TOO MUCH Work, as compared to their counter parts who have done BE Mech or Elect.. is a correct reading.

  Also,your reading that some mediocre people have reached US is a correct reading.. I am also a mediocre and not very clever.. Ha ha ha!! Its fact, and i am not kiding…. Still i have managed to reach here.

 2. Amit D says:

  Correctly said!!!

 3. महेंद्रजी,
  बरेच मुद्दे मांडलेत आणि प्रत्येक मुद्दा जणु त्यांच्यातच एक लेख होऊ शकेल इतका नक्कीच विस्तारला जाऊ शकेल.

  आता मी सुद्धा आय.टी. वालाच तेंव्हा ही तर ‘घरचीच बाब’ झाली.. गेलं २००१- २००२ सालचं रीसेशन – मी स्वतः अनुभवलंय.. 😦

  मात्र तुम्ही मांडलेले मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत….

  आलीया भोगासी | असावे सादर!
  भार देवावर ठेऊनिया!

  • प्रतिक्रियेबद्दल आभार.
   जे काही कधिचं वाटत होतं ते लिहिलं. जर सकाळ ने माझे मत पुर्ण छापले असते तर कदाचित हा लेख झाला नसता.
   २००१-२००२ चं रेसेशन तसं ग्लोबलाइझ्ड नव्हतं त्यामुळे लवकर रिकव्हर झालं पण ह्या रेसेशन ची तुलना १९३०सालच्या रेसेशनशी केली जाते.
   पण हे सगळं लवकर सावरलं जावं हीच इच्छा…

 4. The Big K says:

  Wwa! Masta!

  Agdi mazya manatla lihilat 🙂

 5. raviraj says:

  Its true…
  but we have to understand that apart from depend upon Us or other countries we will develop our domestic market….

  • I agree with your views, but in IT the domestic market completely depend upon US out sourcing. Besides, we can always give it a thought to develop the market in NZ and Australia.
   Domastic market will improve on its own as soon as the Engineering Market improves. comments.php#comments-form investment in IT or ERP is always there , when the Engineering and Const & consumables industries are doing well..
   Thanks for your comments.

 6. fanfare says:

  @bhunga:
  2001-2001 recession was just a particular technology bubble going bust! The current one is far more profound and serious- don’t we know that? The very backbone of USA economy -wall street companies going bust and consequently affecting the entire world economy has set the IT in a downward spiral..
  One up-side is junior engineers who threatened to leave every now then because “they did not like what they did” are now putting their heads down and working. I mean- give me a break- are we sure our parents liked everything they had to do everyday? Did they not keep their jobs to support us? it is what you are working towards that matters not always what exactly you are working on every time!
  layakipeksha jasta goshtee kamee shramat milalyane sagale faracha majale hote ata jara talyawar yetil.A senior lady I know once commented ” kadhee yanchya gharatun pariksheche/resultche pedhe khalle nahit, taree he loka itake easily america -america- karat tithe pohochale suddha? What you said is right- many mediocres made it!”
  to be fair to those who have their feet on the ground. you will always do well becaue you have the right mix of IQ and EQ and yes- AQ- adversity quotient.

 7. फारच सुरेख विचार मांडले आहेत. धन्यवाद.

 8. चांगला आहे लेख. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदीचं एवढं विस्तृत आणि मुद्देसूद विवेचन मी याआधी नव्हतं वाचलं. आवडला लेख एकदम… 🙂

Leave a Reply to raviraj Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s