टिव्ही बातम्या

टिव्ही वर गेले ३-४ दिवसापासून एकच बातमी उगाळली जाते आहे. एका बापाने मुलीवर केलेला अत्याचार.. तांत्रिकाच्या सांगण्यावरून केलेला बलात्कार.. तांत्रिकाने पण संधीचा फायदा घेउन केलेला बलात्कार, मुली बरोबर आणि त्यांच्या आई  बरोबर……

अशा बातम्या एकदा दाखवुन टिव्ही चॅनल्सचे समाधान होतंच नाही. त्याच त्या बातम्या देवासाठी चंदनाचे गंध उगाळावे तशा उगाळत बसतात. सॅडीस्ट झाले आहेत भ++ सगळे. एखाद्याच्या दुःखांमध्ये लोकांना पहातांना काय सुख मिळते कोण जाणे.

टिव्ही चे जर्नॅलिस्ट अगदी काहीतरी ग्रेट बातमी सापडल्या प्रमाणे ऑन साइट रिपोर्टींग च्या नावाखाली काय वाट्टेल ते अकलेचे तारे तोडतात.. खरंच आपलं मन इतकं दगड झालंय कां, की अशा गोष्टी पहाण्यात    आपल्याला सुख वाटावं??

अशा बातम्या सारख्या पहाणे म्हणजे घरामधे ब्लु फिल्म पहाण्या प्रमाणे वाटते. हा घाणेरडा प्रकार आता लवकर बंद झाला पाहिजे. ..

अशा बातम्यांना कितपत प्रसिद्धी द्यायची यावर काही सेन्सॉर ची बंधनं नाहीत कां? अशा बातम्या जेंव्हा सुरु होतात, तेंव्हा घरामधे बायको आणि मुलांसोबत पहायची लाज वाटते. बरं, चॅनल बदलला तरीही तीच बातमी ब्रेकिंग न्युज म्हणून तेच ते पुन्हा दळत असतात..

बरं एवढ्यावरच थांबत नाही, पेपर वाले पण अशा बातम्यांचे डिटेल्ड वर्णन देतात. त्यांनाही किती लिहावं ते कळत नाही. लहान लहान मुलं पेपर वाचतात.. अशा बातम्या वाचल्या नंतर एखाद्या मुलीचा तरी आपल्या नाते संबंधांवर विश्वास राहिलं कां? मुलगी बापाच्या खांद्यावर विश्वासाने डोके ठेवूशकेल कां? नुसता विचार करुनच डॊकं खराब होतं माझं…

काय लिहावं आणि किती लिहावं तेवढं कमीच आहे.. म्हणून संपवतो आता..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन. Bookmark the permalink.

6 Responses to टिव्ही बातम्या

 1. Nagesh says:

  मांडलेला विषय आणि मुद्दा यांचाशी मी सहमत आहे मात्र येथे हे उदाहरण चुकीचे आहे.
  “त्याच त्या बातम्या देवासाठी चंदनाचे गंध उगाळावे तशा उगाळत बसतात.”

  कारण चंदन कुठे ना कुठे कामाला येते
  त्याएवजी ह्या बातम्या कोळ्स्या सारख्या आहेत. कितीही उगाळा काळेच निघणार…

 2. ह्या चॅनेलवाल्यांना -ह्खो** – ना अशा चाटाळ न्युज ब्रेकिंग न्युजच्या माथळ्याखाली दाखवुन फक्त टी.आर.पी. च वाढवता येत असेल. बाकी कुणावर कय बेतलयं याचं जणु काही देणं-घेणं नाही… चॅनेलच्या गर्दीत आम्ही कसे नं. १ आहोत हे दाखविण्यासाठी हे लोक कुठल्याही स्तराला जाऊ शकतात … आणि हेच त्यांना दाखऊन द्यायचे आहे. आम्ही म्हणजे सर्वकाही… आम्ही दाखऊ तेच खरं.. आमच्याच चॅनेलवर सर्वात आधी.. अशी त्यांची धारणा..

  सेन्सारला गुंडाळुन अगदी उघडपणे हे लोक निर्लज्यपणाचा कळस करताहेत..अशावेळी यांची कार्यालये आणि यांनाही का कोणी फोडत नाही..?

  • फोडायला काही हरकत नाही.. पण अशाच गोष्टी मोठ्या कौतुकाने पहाणारा एक मेंटली सिक क्लास आहे आपल्या देशात,, त्यांना असंच काहीतरी आवडतं पहायला..पण खरंच सांगतो.. मला तर अगदी लाजिरवाणं होतं अशा बातम्या सुरु झाल्या की..

 3. Nitin Sawant says:

  जर तुम्हाला हे सगळे टाळायचे असेल तर “ETV MARATHI” वरच्या बातम्या (महाराष्ट्र माझा) रोज पाहत जा.

 4. आजकाल वृत्तवाहिन्यांमधली स्पर्धा एवढी वाढीला लागली आहे की, आपला कार्यक्रम नंबर वनवर राहावा यासाठी हे लोक कुठल्याही थराला जायला तयार असतात. त्यामुळे एखाद्या मुलीवर बलात्कार झाला असेल तर तिच्या मनावर किती आघात झाला आहे याचा थोडाही विचार न करता तिने बाईट द्यावा यासाठी जबरदस्ती करत राहतात. आणि या गोष्टीला सामान्य लोकही तितकेच जबाबदार आहेत. जर आपण हे असे कार्यक्रम बघितलेच नसते तर या हरामखोर न्यूज चॅनल्सचा टीआरपी वाढलाच नसता.

Leave a Reply to भुंगा Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s