इट कॅन हॅपन इव्हन इन इंडिया…

काल दुपारी गोदावरी एक्स्प्रेस ने नाशिक ला गेलो होतो. गाडी अगदी लेकुरवाळी. जास्तीत जास्त कोच हे अन रिझर्व. चेअर कार मधे रिझर्वेशन होतं . गाडीमधे प्रवेश केला. आपल्या जागेवर स्थानापन्न झालो. तेवढ्यात खाली पायाशी काही तरी वळ वळ करतांना जाणवलं, म्हणून खाली पाहिलं तर एक पिटुकला उंदिरमामा माझ्या कडे टूकु टूकु पहात होता. जोरात पाय आपटला, तर तो पळून गेला. अगदी सेल फोन च्या ब्लू टूथ हेडफोनच्या साइझ चे कॉक्रोच इकडून तिकडे आरामात फिरत होते. फॉर अ मोमेंट किळस वाटली ,पण हे असंच चालायचं म्हणून दुर्लक्ष केलं..

आपल्या इथे आपल्याच ट्रेन आपण स्वच्छ का ठेवू शकत नाही? ट्रेन जस्ट कुर्ला आगारातून आलेली होती. म्हणजे वॉशिंग होऊन आलेली असावी , तरी पण इतकी वाईट परिस्थिती ? दोष कोणाला द्यावा?

प्रत्येक गोष्ट प्रशासनानेच केली पाहिजे, माझे काही कर्तव्य नाही. मी तिकिटाचे पैसे भरले आहेत आणि त्या मुळे इथे कचरा करण्याचा मला अधिकार आहे असा कन्सेप्ट का असतो आपण सगळ्या भारतीयांचा? काही खाणं झालं की आपण रिकामे पॅकेट्स समोरच्या सीटच्या मागे टाकतो. तसाही  प्रवास फक्त ३ तासांचा होता, म्हणून फारसे लक्ष दिले नाही  आणि आपले पुस्तक उघडून वाचणं सुरु केलं.मुंबई चे शांघाय करायचं म्हणताहेत…. तोंड बघा आरशात  .. असं काहिसं मनात आलं..

280320091195विमानात पण कोल्डड्रिंक चा ग्लास आपण समोरच्यासीटच्या मागच्या पाकिटात घालतो.. तसेच आफ्टर मिंट खाणं झालं की कागद  चुरगळून खाली फेकतो,किंवा समोरच्या सीटच्या मागच्या पाकिटात घालतो..भारतामधे परत आलो की चॉकलेटचे रॅपर सरळ एअरपोर्टच्या जमिनीवर टाकुन देतो – जरी डस्ट बिन समोर दिसत असली तरीही.. ( मी पण तुमच्यात लाच एक आहे, असं समजू  नका की मी दुसरं काही करतो.. 🙂 )

हे असं कां होतं? इथे काही कायदे नाहीत स्वच्छतेच्या बाबतीत म्हणून का? की इथे सफाई कामगार आहे ना , तो स्वच्छ करेल , त्याचं कामच आहे ते.. असे विचार डोक्यात का येतात? आपली सायकॉलॉजी का अशी तयार होते??

नाशिकला तसं फारसं काही काम नव्हतं, फक्त माझ्या धाकट्या मुलीला सुटी संपली म्हणून तिच्या 280320091191आत्याकडून परत मुंबईला आणायचं होतं. ९ वी चा रिझल्ट आहे ना सोमवारी.. म्हणून..! आज सकाळी मी पंचवटीचे रिझर्वेशन केले होते..सकाळी ७-०५ चं नाशिक हून गाडी निघणार होती. गाडी अंदाजे २० मिनिटे लेट होती. ट्रेन आली आणि आम्ही म्हणजे मी आणि मुलगी दोघंही ट्रेन मधे शिरलो.

कोच नंबर सी२.. चेअर कार…आणि आत गेल्या बरोब्बर एक प्लिझंट सरप्राइझ!!! सुंदर स्वच्छ ट्रेन.. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पाट्या लावणे हा पुणेकरांचा अधिकार.. पण त्या पाट्या स्वतःला त्रास होऊ नये म्हणून लावलेल्या.. किंवा कुठल्या तरी स्वार्थासाठी लावलेल्या.. पण इथे या ट्रेन मधे एक लक्षात आलं की पुणेकरांची पाट्यांची आयडिया नाशिककरांनी पण आत्मसात केली आहे, आणि तिचा सुयोग्य वापर पण केलाय…

अगदी आत शिरलो आणि प्रत्येक सिट वर कव्हर लागलेलं आणि ते पण स्वच्छ! सीटवर बसलो, माझा नंबर ५६ आणि मुलिला ५४ मिळाला होता. दोन्ही सीट्स आय्ल सिट्स होत्या.सीटच्या मागची जाळी, पेपर ठेवण्याची आणि  फोल्डींग टेबल  ( स्नॅक्स वगैरे खाण्यासाठी वापरतो तो ) व्यवस्थित फोल्ड करुन ठेवलेला. पेपर ठेवण्याची जाळीचे पकिट  न फाटलेले.. आणी समोर एक स्टिकर  लक्ष वेधुन घेत होते.. ट्रेन मधे एकही कॉक्रोच दिसत नव्हते..किंवा उंदीर पण नव्हते..

सचिन तेंडुलकर ची सेंचुरी नुकतीच झालेली . तेंव्हा त्या रेकॉर्ड वर एक पोस्टर बनवून समोर लावलेले होते. त्या पोस्टर मधे सचिन असल्यामुळे अर्थातच लक्ष वेधले जात होते.

280320091202

मधे कम्पार्टमेंटचे दार होते.. दुसऱ्या बाजुला  एक दुसरे पोस्टर लागले होते, त्यात लिहिले होते की दोन वर्षं झालेत ’रेल परिषद’ नावाची एक एन जी ओ आहे त्यांनी हा अवेअरनेस प्रोग्राम सुरु केलाय. ही रेल परिषद कोण चालवत? आणि कुठली आहे ही एन जी ओ?? शेजारी बसलेल्या माणसाने माझा इंटरेस्ट बघितला  आणि सांगितलं की या गाडी ने रोज नाशिक ते मुंबई अप – डाउन ( हा  ट्रेन ने ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या टर्मिनॉलॉजी मधला शब्द आहे) करणारे पास होल्डर्स या गाडीने प्रवास करतात. सी ३ कोच हा फक्त पास होल्डर साठी असतो. त्यांना पण हा कॉक्रोच आणि उंदरांचा त्रास होतो, म्हणून त्यांच्या एन जी ओ ने स्वच्छ्ते बद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हे कॅंपेन सुरु केले आहे…

280320091203

हा अवेअरनेस प्रोग्राम साधारण पणे दोन वर्षापूर्वी पासून सुरु झाला आणि आजची जी परिस्थिती आहे ती ह्या दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे.म्हणून आता दोन वर्षांच्या पूर्ती प्रीत्यर्थ एक मेळा पण आयोजित करण्यात आलेला आहे. त्याची पाटी पण लागली होती…ती वर पोस्ट केलेली आहे.

ह्या कोच मधे एक कोड ऑफ कंडक्ट पण आहे , आणि ते पण खूप इम्प्रेसिव्ह.सगळे जण त्या प्रमाणे रोज वागतात. ती पाटी खाली पोस्ट केलेली आहे..
280320091198

सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत. पेपर वाचन..
सकाळी ८ ते ८-३५ ब्रेकफास्ट
सकाळी ८-३५ ते ९-४५ मौन व्रत आणि मेडीटॆशन
सकाळी ९-४५ ते १०-३० कॉल्स, डीस्कशन्स वगैरे..
आहे की नाही मस्त प्रोग्राम??

शेवटची पाटी.. टॉयलेटच्या दारावरची होती… प्लिझ फ्लश…. म्हणुन..

2803200911961

बरं नुसत्या पाट्या लावूनच हे लोकं थांबलेले नाहीत. तर गाडी सुरु झाली की या डेली पॅसेंजर्स  मधलाच एक पॅसेंजर येउन अनाउन्स करुन जातो.. मित्रॊ.. इस गाडी मे आपका स्वागत है. नाशत्ता एंजॉय करे लेकिन, नाश्ता खत्म करनेके बाद , पेपर प्लेटस और चाय के कप्स इस कोच के बाहर एक डस्ट बिन रखा है उसमे डालें. कंपार्टमेंट मे कचरा, खाने की चिजे फैलानेसे कॉक्रोच , और चुंहे होते है.. असं सांगून गेला तो माणुस..

280320091197सगळ्यांनी ब्रेकफास्ट सुरु केला. आणि जवळपास सगळ्यांनीच कागद बाहेर नेउन फेकले डस्ट बिन मधे..   तोच माणुस पुन्हा एकदा आला, आणि सगळ्या कोच मधे एक चक्कर मारली . सगळी कडे चेक केलं.. आणि शेवटी सगळ्यांचे आभार मानले. आणि अनाउन्स केलं.. की सब लोगोने कचरा बाहर फेककर अपने सिव्हिलाइझ्ड होने का सबुत दिया है. केवल एक जगह पर कचरा पडा हुवा मिला, असं म्हणून त्याने दोन चहाचे रिकामे कप उचलून दाखवले. ते कप ज्याचे होते तो माणुस अगदी शरमिंदा झाला आणि उठून आला, म्हणाला सॉरी, मै फेकत हुं.. पण त्या माणसाने त्याला म्हंटलं , की मै फेक दुंगा आपके लिये , लेकीन अगली बार आओगे तो याद रखना…

खरंच .. ह्या ट्रेनने प्रवास केल्यावर मात्र एका गोष्टीची खात्री पटली की आपण भारतामधे पण  पब्लिक ट्रान्स्पोर्ट व्हेइकल्स मेंटेंन करु शकतो.. कुठेही पान किंवा माणिकचंद खाऊन थुंकणे, पब्लिक प्लेस मधे सिगारेट्स ओढणे अशा गोष्टी अव्हॉइड केल्या तर मुंबई चं शांघाय होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही.

पंचवटी एक्स्प्रेस चे उदाहरण… म्हणजे “वुई कॅन– ऍंड वुई विल” चे उत्कृष्ट उदाहरण आहे..
आपण भारतिय जर मनात आणलं तर काहिही करु शकतो .. नाही कां? फक्त वुइ निड अ ड्रायव्हिंग फोर्स…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged . Bookmark the permalink.

18 Responses to इट कॅन हॅपन इव्हन इन इंडिया…

 1. शेखर जोशी says:

  स्वीस बॅंकेतील काळा पैसा या लेखावर आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद. पंचवटी एक्सप्रेसवरील माहिती खरोखऱच छान आहे. यापासून स्फूर्ती घेऊन लोकांनी आपापल्या परिसरात अशा प्रकारची चळवळ सुरू केली पाहिजे.
  शेखऱ

 2. shilpa says:

  मस्तच जमलय.

  • शिल्पा
   प्रतिक्रियेबद्दल आभार. खरंच .. आय वॉज ट्च्ड.. विद द कमिटमेंट ऑफ एन जी ओ पिपल इन्व्हॉल्व्ह्ड इन धिस.

 3. Aparna says:

  महेन्द्रकाका मस्त वाटलं आणि विचार करण्यासारखंही आपण आपल्या मुलांनातरी आतापासून सार्वजनिक स्वच्छता शिकवावी नाही का?? Lets try to do it like a project if we can…get our kids to do this as a summer job to educate people and I hope we get the results….Thanks…

  • अपर्णा
   खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गेली दोन वर्ष ही स्वच्छता मोहिम सुरु आहे पण एकाही प्रसिध्दि माध्यमाला ह्याची नोंद घ्याविशी वाटली नाही…
   प्रतिक्रिये बद्दल आभार..

 4. वा! पंचवटी सी३ गटाचे कौतुक वाटले. त्यांना प्रसिद्धी मिळायला हवी.

 5. शेखर जोशी says:

  नमस्कार,
  आपण माझा ब्लॉग वाचून आवर्जून प्रतिक्रिया लिहित असता, त्याबद्दल आभार. ठाल्यांची ठोकशाही हा माझा लेख आजच्या लोकसत्तामध्ये विशेष पानात प्रसिद्ध झाला आहे. तोच आज मी सर्वांच्या माहितीसाठी ब्लॉगवर टाकला. बाकी आपण म्हणालात त्याप्रमाणे आजचे तंबी दुराईही ठाले-पाटील यांच्यावरच असून तेही छान झाले आहे. असो. आपले अन्य लेखही वाचनीय आहेत
  शेखर

 6. मृदुला,
  अगदी सहमत आहे. पण दोन वर्ष झाले तरिही ह्या गोष्टीबद्दल कुठेच वाचण्यात आले नाही..

  शेखर,
  तुमचा ब्लॉग मी फॉलो करतो .

 7. मस्त लेखाबरोबर, “अनसिव्हिलाइज्ड” लोकांना चांगलाच “शालीतुन जोडा” मारलाय.. मी आपल्या मताशी अगदी सहमत आहे!

  तसं मी मात्र अशा लोकांनी कचरा टाकला किंवा घाण केली तर त्यांना “प्रेमाने” सुनावायला मागे-पुढे पहात नाही… जास्तीत जास्त असे लोक – तुम्हांला काय करायचयं म्हणतात किंवा शरमेने- सौरी – म्हणतात… मात्र त्यांना अशी आठवण करुन देणं – तुमच्या भाषेत “ड्रायव्हिंग फोर्स” ची गरज आहे!

  • पण या ट्रेन मधे त्या माणसाने ग्लासेस उचलुन दाखवले.. आणि ज्याने ते फेकले नव्हते तो एकदम शर्मिंदा झाला. ही पण चांगली आयडीया आहे..

 8. sahajach says:

  नेहेमीप्रमाणे खुपच अभ्यासपुर्ण आणि माहितीपुर्ण असुनही अतिशय साध्या शब्दात माडंलेला लेख…आता पंचवटी एक्स्प्रेस विषयी ही गाडी सुटते मनमाडहुन जिथे मी आयुष्यातली १५ वर्षे घालवली त्यामुळे जिव्हाळ्याचा विषय…आणि खरय तुमचे स्वच्छ्ता आपण बाहेरच्या देशात नियमांच्या बडग्यामुळे व्यवस्थित पाळतो पण आपल्या देशात मात्र कंटाळा करतो…आता भारतात आले की पंचवटीनी प्रवास नक्कि. माझा मामा रोज अप-डाउन याच गाडीनी करतो. मस्त मजा करतात ते सगळे मित्र….

  • मला एकाच गोष्टीचं वाइट वाटतं की एकाही मिडिया कर्मीने ह्या गोष्टीची दखल घेतलेली नाही. ही आयडियल गाडी घोषीत करुन सगळीकडे ह्या गाडीची माह्ती दिली तर इतर लोकंही इन्स्पायर होतिल.अभिप्रायाबद्दल सगळ्य़ांचे आभार.

 9. खरं आहे. आपण जर स्वयंशिस्त पाळली तर आपल्या सार्वजनिक स्वच्छतेत बरीच सुधारणा होईल. स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी. आणि असंही नाही की, भारतीयांना शिस्त पाळताच येत नाही. दुसर्‍यांच्या देशात गेले की अगदी शिस्तशीर राहतात आणि स्वतःच्या देशात मात्र वाटेल तसे वागतात. हेच वास्तविक टाळलं जाणं आवश्यक आहे.

 10. raj jain says:

  जबरदस्त.. आनंदाचा सुखद धक्का बसला वाचून सर्व.

  • राज
   हा लेख मी अगदी नवीन नवीन ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा लिहीला होता. तेंव्हा फारसा वाचला पण गेला नसावा असे वाटते.. पण स्वतःचाच एक चांगला लेख म्हणून मला आवडतो..

   • raj jain says:

    पण ही माहिती नव्यानेच कळली. असे उपक्रम चालू असतात याची कधी कधी आपल्याल माहिती देखील नसते.

Leave a Reply to Mahendra Kulkarni Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s