पाकिस्तान ३०/३

इथे आजच्या अटॅक बद्दल काहीच लिहिणार नाही.म्हणजे हा अटॅक कसा झाला, का झाला वगैरे… कारण ते सगळं तुम्ही कुठे ना कुठे वाचले असेलच..जे काही हल्ल्या मधे ८०० लोकं  मारले गेले त्याला पण मी काही फारसं महत्त्व देत नाही. कारण खाली दिलेलं आहे..

पाकिस्तानातला आजचा अटॅक हा पाकिस्तानावर केलेला अटॅक नाही. तो म्हणजे ओबामांच्या डीक्लिअर केलेल्या बक्षिसावर दिलेले उत्तर आहे. आजचा जो टेरर अटॅक झाला तो म्हणजे मुंबई च्या अटॅक ची सुधारित आवृत्ती होती. (पहिला अटॅक ३/३ दुसरा ३०/३.. किती को इन्सिडन्स ? नाही कां?)हा अटॅक आता मुंबईला झाला, पाकिस्तानात फॉलो अप अटॅक झालाय , आता माझ्या मते अमेरिका किंवा युरोप मधे या धर्तीवर अटॅक केला जाउ शकतो.. फक्त कधी तेच पहायचं…

गेल्या दोन वर्षा मधे पाकिस्तानात २ हजारापेक्षा जास्त लोकं टेररिस्ट अटॅक मधे मारले गेले आहेत. अतिरेक्यांना आय एस आय ने दिलेले कॉंबॅट ट्रेनिंग , की जे भारत आणि काश्मिर मधे अराजक माजवण्यासाठी देण्यात आले आहे, ते आज पाकिस्तानच्याच विरोधात वापरल्या गेले आहे. म्हणजे काय तर ’कुऱ्हाडीचा दांडा अन गोतास काळ’.

ह्या अटॅक मुळे पाकिस्तानातिल हिंदुत्ववाद्यांनी ( म्हणजे नेमकंकाय हो??  :)) आपली ताकत दाखवण्यासाठी केलेला आहे. काही दिवसांपूर्वी जेंव्हा स्वात मधे शरीया कायदा लागु करण्यास तालिबान्यांशी आशिफ अली जरदारी ने  संधी केली होती,तेंव्हा पासुनच अशा मोठ्या अटॅक्सची अपेक्षा होती. पण तो इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते. आता, तालिबान्यांच्या दृष्टीने  सोप्पं झालंय, पाकिस्तानमधे कुठेही अटॅक करा, आणि आपल्या सेफ प्लेस मधे म्हणजे स्वात मधे ( जिथे शस्त्र संधी आहे तिथे) जा .. बस्स! सोप्पा उपाय..

ओबामाने ऑलरेडी सांगितले आहेच की, पाकिस्तानमधे कॅन्सर प्रमाणे वाढणारा तालिबानी विचारधारा पाकिस्तानला डॅमेज करु शकते, म्हणून पाकिस्तानने आपली टेररिस्ट च्या अगेन्स्ट कमिटमेंट प्रुव्ह करावी. केवळ ओबामाला आणि वेस्टर्न वर्ल्ड्ला दिलेला मेसेज आहे , की त्यांना कंट्रोल करणे सोपे नाही. अगदी करोडॊ डॉलर्सचे  बक्षिस जरी डीक्लिअर केले, आणि कितीही पाक सरकारला प्रेशराइझ करायचा प्रयत्न केला, तरीही त्यांना काही फरक पडत नाही. त्यांनी आपली स्ट्रेंथ शेवटच्या दोन अटॅक्स करुन   दाखवून   दिलेली आहे..

ह्या अटॅक वरुनच हे पण टेररिस्ट लोकांनी प्रुव्ह केलं की केवळ ३-४ वेल ट्रेन्ड माणसं कुठलेही शासकीय किंवा इतर इमारत ताब्यात घेऊ शकतात. जी खरंच खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. अमेरिकेला आणि वेस्टर्न वर्ल्ड ला मेसेज दिलाय, की आम्ही तालिबानी काही पण करु शकतो….

सगळेच काही तालिबानी नसतात. हा जो हल्ला आहे जरी त्याची जबाबदारी कोणीही घेतली नसली तरी, माझ्या माहिती प्रमाणे .. जैश ए  मुहम्मद, लष्कर ए जांगवी, किंवा लष्कर ए तोयबा ह्या पैकी कोणि तरी असावे. कारण सध्या ह्याच ऑर्गनायझेशन कार्यरत आहेत. सुसाइड बॉम्बर्स पण  आमच्याकडे आहेत आणि ते किती डॅमेज करु शकतात,   ते दाखवायला म्हणून हा हल्ला केला असावा.

टेररिस्ट लोकांनी हजार पाचशे लोकांना वेठीस धरले आणि मारले वगैरे गोष्टींना मी काही फारशी किंमत देत नाही …… हे चालायचंच! पण मला सगळ्यात जास्त काळजी वाटते ती म्हणजे पाकिस्तानातिल ऍटोमिक इन्स्टॉलेशन्सची.जर असाच   हल्ला जर एखाद्या ऍटॊमिक इन्स्टॉलेशन वर झाला आणि टेररिस्ट लोकांच्या हाती जर अणु बॉंब लागला, तर काय होऊ शकेल ह्याचीच कल्पना केली जाऊ शकत नाही. फ्रेडरिक फोर्सिथ चं एक पुस्तंक वाचलं होतं.. नांव  आज ते आठवतंय.. हं… फोर्थ प्रोटोकॉल.. होतं नांव त्याचं ..

आज जे पाकिस्तानी सायंटिस्ट्स आहेत त्या पैकी एक जरी अल कायदा शी संबंधित असेल तर खुद्द पाकिस्तान,  भारत आणि तिथे पोस्ट असलेल्या  अमेरिकन सैन्याला किती मोठा धोका आहे हे लक्षात घ्यायलाच हवे.

माझ्या मते आजचा हल्ला हा तालिबानी ताकतिचा एक सुदृढ नमुना म्हणता येइल. माझ्या मते पाकिस्तानला परफेक्ट हॅंडल करु शकणारा म्हणजे परवेझ मुशर्र्फ.. बस्स. त्याला बसवावे परत गादीवर अमेरिकेने.. सध्याचे पपेट्स काही उपयोगाचे नाहीत..फक्त मुशर्र्फ कंट्रोल करु शकेल विथ द आयर्न फिस्ट!.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in तालिबान and tagged , , , . Bookmark the permalink.

11 Responses to पाकिस्तान ३०/३

 1. bhagyashree says:

  हा अटॅक आता मुंबईला झाला, पाकिस्तानात फॉलो अप अटॅक झालाय , आता माझ्या मते अमेरिका किंवा युरोप मधे या धर्तीवर अटॅक केला जाउ शकतो.. फक्त कधी तेच पहायचं…>>>>>>>>>>>>>>>>>>

  he vaaky nahi awdla.. are waiting for an attack in US or Europe ? 😦

  neways, baki vishay mazya kuvati bahercha ahe so maz kahi matpradarshan nahi.. pan he kinva हल्ल्यामधे ८०० लोकं मारले गेले त्याला पण मी काही फारसं महत्व देत नाही. ashasarkhi vakya changlich khatakli..

  • पुर्वी पण एकदा असं वाचण्यात आलं होतं की भारत ही टेस्ट फिल्ड आहे कुठल्याही अटॅक टेस्ट करण्याची. आणि मी जे लिहिलंय ते एक्स्पर्ट ओपिनियन आहे एफ बी आय चं.. माझं मत नाही ते.. अशी माझी पण अशी इच्छा नाही की अजुनही कुठे अटॅक्स व्हावेत म्हणुन.. पण बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यातलीच ही एक, पण एफ बी आय सगळ्यात जास्त ऍक्टीव्ह असल्यामुळे ट्रेअरिस्ट लोकांवर कदाचित हल्ला करण्यापुर्वीच ताबा मिळवु शकेल. काहीच सांगता येत नाही… काय होइल ते!

   दुसरी गोष्ट , ८०० लोकं मारली गेली त्याला मी महत्व देत नाही , हे वाक्य टेररिस्ट जर ऍटोमिक इन्स्टॉलेशन्स वर हल्ला करुन जर काही घात पात घडवुन आणला तर लाखो लोकं मारले जातिल , ह्या कॉंटेक्स्ट मधे लिहिलंय.. जेंव्हा लाखो लोकांच्या जिवाचा प्रश्न मला ८०० लोकांच्या पेक्षा महत्वाचा वाटला म्हणुन ते वाक्य..
   या अटॅक मुळे त्यांनी हे दाखवुन दिलेले आहे की, ते कुठलेही इन्स्टालेशन (इन्क्लुडींग ऍटोमिक इन्स्टॉलेशन्स) वर हल्ला करुन त्यावर ताबा मिळवु शकतात ही खरी काळजी करण्याची गोष्ट आहे असे वाटते.

 2. Indian_Lost_in_US says:

  @Bhagyashree
  Whatever the author says is right. He says he is more concerned about the Atomic war heads being acquired by Terror organization.
  I have also heard that the India is the trial ground for terror activities.FBI have said this some time back.

  About the attack on US and UK, Author is indicating that IT CAN take place and Not IT SHOULD… . Thinking that the terror attacks are limited to Only Asia and Gaza is not correct. Definitely, US and UK is on the TOP of the HIT LIST of Terrorists. There fore he has written that the attacks can take place in western countries as well.

 3. abhijit says:

  महेन्द्रजी ८०० लोक मारले गेले नाहीत केवळ २५ मारले गेले आहेत.८०० लोक त्यावेळी ट्रेनिंग घेत असावेत.

 4. @Abhijeet
  शक्य आहे, माझ्या फिगर्स इंडिया टीव्ही च्या फिगर्स वर अवलंबुन आहेत.
  पण शेखर, मला असं वाटतं की २५ पेक्षा जास्त लोकं मारले गेले असावेत.. ८ तासाच्या वर त्या लोकांचा कंट्रोल होता. फायरिंग मधे नक्कीच जास्त लोकं मारले गेले असावेत. २५ तर अगदी मैदानावरच मारले गेलेले दिसत होते. आणि सरकार पण खऱ्या फिगर्स डिक्लिअर करणार नाही नक्की कॅज्युअल्टीज किती झाल्या ते..

 5. जे मारले गेले ते जिवाला मुकले ते दुखदायी आहेच । पण परमाणु शस्त्र अतिरेक्यांच्या हाती लागणं खरोखरच अति भयंकर आहे . सध्या तरी पाकिस्तानांत दहशत पसरवण्याचे काम आतंकवादी करीत आहेत . मुशर्रफ यांच्या विषयी मात्र मला तेव्हढी खात्री वाटत नाही.

 6. sonalw says:

  Uttam lekh. Analysis aawadal.

 7. सोनल, भाग्यश्री,आशाताई, अभिजित इंडियन
  तुम्हा सगळ्यांचे मनःपुर्वक आभार…

 8. अ‍ॅनलेसिस आणि महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, महेंद्रजी!

  फक्त मुशर्र्फ कंट्रोल करु शकेल विथ द आयर्न फिस्ट!
  …..

  ” लातों के भुत बातों से नहीं मानते!”

  या बाबतीत अगदी सहमत.. एक तेच आहेत
  जे अशा प्रसंगी “दणक्याचा” निर्णय घेऊ शकतील – निदान मला तरी असे वाटते..

 9. अहो काकाऽऽऽऽ,
  हा लेख चांगला आहे, पण स्पष्टच सांगायचं तर मला अजिबात आवडला नाही. आणि न आवडण्याचं कारण त्यातला मजकूर किंवा त्याची सत्यासत्यता नसून त्यात केलेला इंग्रजी शब्दांचा अतिरेक हे आहे. स्पष्ट बोलल्याबद्दल आय अ‍ॅम सॉरी, पण तुमचे पहिल्यापासून सगळे लेख मी वाचतो आहे. आणि ही गोष्ट पदोपदी जाणवते. शेवटी राहावलं नाही म्हणून ही प्रतिक्रिया. यातल्या मतांवरून मी फटकळ, लहान तोंडी मोठा घास घेणारा किंवा उद्धट वाटू शकतो, पण माझा नाईलाज आहे. त्यामुळे जर तुम्हाला राग आला तर मला माफ करा आणि माझी ही प्रतिक्रिया एका गद्धेपंचविशीतल्या मुलाचे अल्लड बोल म्हणून सोडून द्या.

  अहो, किती इंग्रजी शब्दांचा वापर करता तुम्ही? तुमचे लेख कितीही चांगले असले तरीही त्यात होणारा इंग्रजी शब्दांचा अतिवापर माझ्या डोळ्यांत सुईसारखा खुपतो. प्रत्येक शब्द मराठीत असावा असा माझा आग्रह नाही. अगदी ‘सेरेब्रो-स्पायनल फ्लुईड’ साठी ‘प्रमस्तिष्क-मध्यमेरु तरल द्रव’ किंवा ‘ऑईल इमर्शन लेन्स’ साठी ‘तेलनिमज्जन वस्तुभिंग’ असे क्लिष्ट आणि बाष्कळ शब्द वापरावेत अशा मताचा मी नक्कीच नाही. पण, नेहमीच्या वापरातले मराठी शब्द तरी निदान वापरले जावेत अशी माफक अपेक्षा आहे. पण तुमच्या लेखांत तेही दिसत नाही. एका वाक्यात अनेक इंग्रजी शब्द येतात. उदाहरणार्थ: ‘पाकिस्तानने आपली टेररिस्ट च्या अगेन्स्ट कमिटमेंट प्रुव्ह करावी. केवळ ओबामाला आणि वेस्टर्न वर्ल्ड्ला दिलेला मेसेज आहे , की त्यांना कंट्रोल करणे सोपे नाही.’ या वाक्यात ‘प्रुव्ह’ ऐवजी ‘सिद्ध’, ‘कंट्रोल करणे’ ऐवजी ‘नियंत्रणात ठेवणे’ किंवा ‘मेसेज’ ऐवजी ’संदेश’ असे शब्द वापरता आले असते. ब्लॉग लिहिताना मनातील विचार स्क्रीनवर उतरवले जातात. त्यामुळे त्यांत बोलीभाषेतले शब्द किंवा सर्रास वापरले जाणारे इंग्रजी शब्द येणं अगदी साहजिक आहे. पण थोडा प्रयत्न केला तर असा अतिवापर टाळता येऊ शकतो. आपल्या मराठीचा आपण वापर नाही केला तर आणखी कोण करणार? आणि इंग्रजीचा अतिवापर केल्याने लेखांमधले मुद्देही वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोचत नाहीत. इंग्रजी शब्दांकडे सारखं लक्ष जात राहतं आणि मूळ लेखाकडे थोडं दुर्लक्ष होतं. (निदान मलातरी इंग्रजीच्या अतिरेकाची अ‍ॅलर्जी आहे, त्यामुळे माझं लक्ष राहत नाही लेखाकडे. किंबहुना लक्ष द्यावसंच वाटत नाही…)

  असो. ही प्रतिक्रिया खूप मोठी झाली आहे. परत एकदा… राग आला असेल तर क्षमा असावी.

  • संकेत
   अरे मला मराठीत लिहायची सवय अजिबात नव्हती( जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा) आणि हे पोस्ट पण फार पूर्वीचे आहे. आजकाल इंग्रजी शब्दांचा वापर बराच कमी झालेला आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s