श्रीलंके मधली लढाई

14

लंकन मिनिस्ट्री ने डिक्लिअर केले आहे की ..आता डोअर टु डोअर सर्च सुरु करण्यात येणार आहे. तामिळ टायगर्स चा जोर जरी कमी झालेला असला तरीही अगदी संपलेला नाही. अजुन ही ते लपून छपून मुल्लातिवॊ  मधे( बरोबरच असावा उच्चार) ग्रेनेड्स आणि  शेल्स अटॅक करताहेत. श्रीलंका मिलिट्री या भागावर चे आक्रमण  वाढवून हा भाग ताब्यात घेण्यासाठी जिवाचे रान करित आहे.तामिळ विद्रोही सध्या फक्त २० कि.मी. च्या एरिया मधे कन्फाइन्ड केले आहेत. इथला भाग ताब्यात आला की सगळे श्रीलंका टायगर मुक्त म्हणून घोषित करण्यात येइल. अजुन ही प्रभाकरनचा काहिच पत्ता नाही.

श्री लंके मधे आज ५० च्या वर तामिळ बंडखोर मारले गेले अशी बातमी वाचण्यात आली.मला श्री लंके ची काळजी वाटत नाही. मला खरी काळजी वाटते, ती परत आलेल्या रिफ्युजीज ची.  जर भारतीय तामिळ लोकांनी या विस्थापित तामिळींना सपोर्ट देण्यासाठी इथे म्हणजे भारतामधे गोंधळ सुरु केला तर भारताच्या दृष्टीने ती एक नवीन डोकेदुखी होऊन बसेल.. काही दिवसापूर्वी कुठे तरी कोणी तरी स्वतःला जाळून काय घेतले होते तेंव्हाच झालेला गोंधळ   मिडियाने जास्त हाईप न केल्यामुळे दबला..तामिळनाडू  मधे एखादा पोलिटिकल लिडर याचा फायदा घ्यायचा म्हणून काही तरी लुझ कॉमेंट्स करु शकतो  मतं मिळण्यासाठी..

काही तामिळ लोकं अर्थात भारतीय असंही कुजबुजतो की जसे बांगला देशावर हल्ला करुन त्याला स्वतंत्र होण्यास भारताने मदत केली होती, तशीच मदत श्रीलंके मधे पण करण्यात यावी. तामिळ लोकं जेंव्हा श्रीलंके मधल्या तामिळ लोकांची बाजू घेउन भांडतात किंवा त्या लंकन तामिळ लोकांना सपोर्ट करतात तेंव्हा तेंव्हा ते ही गोष्ट विसरतात की भारतामधे पण काश्मीर मधे जेंव्हा पाकिस्तान सपोर्ट करतो तो असाच प्रकार  आहे. तिथल्या उग्रवाद्यांना सपोर्ट करणे म्हणजे आपणही पाकिस्तान सारखे वागणे आहे.. काही असो.. टेररिस्ट लोकांना मग ते कुठलेही असो… अगदी भारतीय मुळाचे असले तरीही त्यांना सपोर्ट देता कामा नये..टेररिस्ट कुठलाही असला तरी त्याला ठेचायलाच पाहिजे..

मला वाटतं प्रभाकरन बरोबर केलेली शस्त्र संधी किंवा इतर वाटाघाटी  या मुळे त्याची स्ट्रेंथ वाढली आहे.श्रीलंके मधे पूर्वी सिंहली लोकांसोबत गुण्यागोविंदाने रहाणारा हा समाज एकदम इतका व्होलाटाइल का झाला या कारणाचा उहापोह पण होणे जरुरीचे आहे!

दोन्हीही बाजू ने म्हणजे श्रीलंका आर्मी आणि तामिल टायगर्स च्या कडून हल्ला करतांना निर्दोष लोकं मारली जात आहेत हीच खरी चिंतेची बाब आहे.दररोज च्या बातम्यांमध्ये असते की किती सिव्हिलियन्स मारले गेले ते… लवकर थांबायला हवं हे.. ऍम्नेस्टी इंटर्नॅशनलच्या म्हणण्याप्रमाणे जवळ पास १०००० लोकं सेफ झोन मधे ट्रॅप झाले आहेत.मला वाटतं टायगर्स कडून,  इंटर्नॅशनल अटॆंन्शन मिळवण्याचा प्रयत्न म्हणून निर्दोष लोकांना मारले जात  असावे .

असंही वाचण्यात आलेलं आहे की टायगर्स ने सिंहली लोकांना तामिळ कंट्रोल मधल्या एरिया मधे जबरदस्तीने विस्थापित केले आहे ,  श्रीलंका आर्मीचा अटॅक वाढला तर ऍज अ होस्टेज म्हणून.. ह्या सिंहली लोकांचा ढाले सारखा करण्यासही ते कमी करणार नाहीत अशी भिती पण ऍम्नेस्टि ने व्यक्त केली आहे..

लेख लिहुन पुर्ण झाला होता, पण आजच्या टाइम्स ऑफ ईंडिया मधला अरुंधती रॉयचे आर्टीकल वाचले. तिच्या सारख्या सुविद्य स्त्री ने तामिळ सेपरेटिस्ट ची भलावण केलेली आहे. जसे इतर सर्व देशात   भारतीय सैन्य कसे काश्मिरमधे अतिरेक्यांवर इन ह्युमन अत्याचार करते हे मोठ्या चविने चघळले जाते तसेच, भारता मधे श्रीलंकन आर्मीच्या अत्याचाराच्या कहाण्या ( ज्या अजुन कुठेच प्रसिद्ध झालेल्या ्नाहीत ) त्या पण चघळल्या जातात.श्रीलंकन आर्मी जे काही करते आहे ते त्यांच्या देशाच्या स्वायत्ततेसाठी. अरुंधती असंही म्हणते की श्रीलंकेमध्ये काय सुरु आहे ते नक्की कळत नाही, कारण फ्री मिडीया तिथे अस्तित्वात नाही. जर असे असेल तर मग अरुंधतिला कसं काय कळलं की तिथे काय सुरु आहे ते? अरे आवरा कुणीतरी या अरुंधतीला….

आयर्न फिस्ट चा आता जो वापर श्रीलंका आर्मी करते आहे, तोच जर काही वर्ष आधी केला असता, तर हे प्रकरण इतके चिघळले नसते.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged . Bookmark the permalink.

2 Responses to श्रीलंके मधली लढाई

 1. krishnakath says:

  I follow with great interest all the political topics that you discuss on your blog. Moreover, sometimes I feel that your article portrays a better organised and more thought provoking picture of what is going on in my mind.

  Elections are coming…so there will be no dearth of topics for you to write and for me to read and comment…

  Great job!

  • Thanks for your comments and the interest shown in my writing. In fact i am Mech Engg who wanted some platform to express views, and thats the reason .. this Blog was started… !
   Once again, thank you for the comments ..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s