नॅनो का शिफ्ट झाली गुजरात मधे?

a2ममता बॅनर्जी ची पार गोची झालीय.. नॅनो प्लॅंट सिंगुरहुन गेल्या पासुन. अगदी तोंड दाखवायला पण जागा उरलेली नाही ममताला. खरं तर अगदी पहिल्यांदाच जेंव्हा न्युज पाहिली होती, की  टाटा नॅनो प्लॅंट  सिंगुरला सुरु करणार, तेंव्हाच कुठेतरी मनात खटकलं होतं..

.ममताला अपेक्षित होतं की त्यांनी काही केलं तरी टाटा इथून कुठेच जाणार नाही , कारण ५०० कोटीच्या पेक्षा जास्त  इन्व्हेस्टमेंट झालेली आहे.जवळपास ८० टक्क्यांच्या वर काम पण पुर्ण झालं आहे. सगळ्या फॅक्टरी आणि ऍन्सिलरीझ चे काम पुर्ण झालेले आहे. प्लॅंट जस्ट सुरु होण्याच्या बेतात आहे. तेंव्हा आता काही जरी केलं तरी टाटा चे हात दगडाखाली आहेत, त्या मुळे ते काहीच करु शकणार नाहीत..आपण जसं वाकवु तसे टाटा वाकतील आपल्या पुढे.

…. पण ममता वॉज रॉंग!! तिने टाटांना ओळखले नाही.पण जो पर्यंत टाटाच्या इंजिनिअर्स ला मारहाण झाली नव्हती तो पर्यंत टाटा पण शांत होते, पण ज्या दिवशी इंजिनिअर्स ला मारहाण झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्लॅंट बंद करण्याची घॊषणा केली टाटांनी.

म्हणतात ना, मॅन सपोझेस, ऍंड गॉड डिस्पोझेस.. इथे गॉड चं काम ममता   ने केले..ममताचा फासा इथे उलटा पडला आणि, या सगळ्याचा परिपाक म्हणजे  नॅनो सिंगुरहुन शिफ्ट झाली……

मी पूर्वी बंगाल मधे एक वर्षभर काम केलंय..आणि बऱ्याच कंपन्यांना पण जाउन आलोय, ( मार्केटिंग च्या कामासाठी.. साधारण २०-२५ वर्षापुर्वी) .त्या मुळे बंगल्यांची वर्किंग स्टाइल चांगली परिचयाची आहे. एकदा HM chya कारखान्यात गेलो होतो . ज्या प्लॅंट मधे ऍंबेसेडर कार तयार  होते त्याच प्लॅंट मधे एका जर्मन कंपनीच्या कोलॅबरेशन मधे डिमॅग एक्सकॅव्हेटर्स तयार व्हायचे. माझं पोस्टींग बिहार , बंगाल साठी होतं त्यामुळे मीटिंग्ज साठी जावं लागायचं.

तिथलं वातावरण पाहिलं की वाटायचं.इथे सगळं काही थंड काम आहे. हे सगळं बघितलं की मग मात्र वर आभाळात बघून नकळत हात जोडले जायचे.. ” तूच आहेस रे बाबा.. भगवंता” ……….!

एकदा मी पाहिलं होतं , फॅक्टरीच्या एका शॉप च्या दरवाजा बाहेर एक ओव्हर हेड वायर तुटून पडली होती आणि सगळे लोक गेट च्या बाहेर उभे होते. त्या वायरवरुन ओलांडून जाता आले असते, पण युनियन च्या लोकांनी जोपर्यंत वायर उचलली जात नाही तो पर्यंत कोणीच  आत जाणार नाही असा पवित्रा घेतला .. ह्या सगळ्या गोंधळात जवळपास वर्किंग टाइम मधला अर्धा तास वेस्ट झाला.

म्हणूनच म्हणतात..
टु बेंगॉलिज कॅन फॉर्म ३ युनियन …
काय म्हणता? नाही पटतं??

अहो  प्रत्येकी एक युनियन   अशा   दोन   युनियन्स, आणि एक दोघांची मिळून                                                                                                                      झाल्या की नाही तीन??

अर्थात टाटांना पण बंगालमधील परिस्थिती माहिती नसेल असे नाही. अगदी रस्त्यावरचा चहावाला पण एखाद्या युनियन चा मेंबर असतो. रतन टाटा यांना तसंही टाटानगर हे मुळ गांव असल्या मुळे बिहार आणि बंगाल बद्दल पूर्वजांचा एरिया म्हणून कदाचित  थोडी जास्त अटॅचमेंट असेल..  सिंगुर ला  नॅनॊ चा प्रोजेक्ट नेण्याचे कदाचित हे पण कारण असू शकते. ..

बंगालमधे माझे काही मित्र आहेत, पण कोणीही ममताच्या बाजुने बोलत नाही. बुध्ददेव भट्टाचार्य पण आपल्याच ( कम्युनिझमच्या लाल बावट्याच्या , निषेध, संप, रास्ता रोको, मारहाण वगैरे ..) दाखवलेल्या रस्त्यावर अडकले.संप, रस्ता रोको, तोड फोड , मार हाण हा सगळा कम्युनिस्टांच्या वर्किंग स्टाइलचा परिपाक.  त्यांना असं झालं की धरलं तर चावत  अन सोडलं तर पळत..तुम्हाला आठवत असेल , ममता वॉज इन फुल फॉर्म व्हेअर ऍज  बुध्ददेव वॉज टेकिंग लो प्रोफाइल..

सिंगुरच्या लोकांनी टाटाच्या वरच्या ऑफिसर्सना ला कॉंटॅक्ट केलंय.. असं बुध्द देवांचं म्हणणं आहे.   त्रूणमुल काँग्रेस ४०० एकर जमीन परत मागत होती, टाटामोटर्सला दिलेल्या ९९८ एकर जमिनी पैकी! मला एका गोष्टीचे नवल वाटते की ममता सारख्या नेत्याला पण ऍन्सिलरी युनिट म्हणजे काय हे न समजल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय का? की तिने जाणून बुजून आपली न्युसेन्स व्हॅल्यु चेक करण्यासाठी केले हे?.

ही ४०० एकर परत करणं म्हणजे प्रोजेक्ट स्टॉल करणे आहे कारण, ऍन्सलरिज युनिट्स  क्लोझ क्लस्टर मधे असणे हाच तर या प्रोजेक्टचा की पॉइंट होता. कारण  जर १ लाखात कार काढायची तर शुन्य इन्व्हेंटरी ची संकल्पना अंगीकारणं, आणि सुटे भाग आणण्यासाठी लागणारी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमीत कमी असणे.. हाच तर ह्या प्लॅंटचा प्रोजेक्टचा  की रिझल्ट  क्रस्ट आहे.  .

बरं, शेतकरी लोकं   ह्या जमिनीचे ते काय करणार होते बरं?? अहो, साधी गोष्ट आहे, जो पर्यंत टाटाचा प्लॅंट नव्हता, तो पर्यंत जमिनीला कवडीचीही किंमत नव्हती, पण इथे टाटा चे बांधकाम सुरु झाले आणि जमिनीची किंमत अगदी आकाशाला पोहोचली.

लालच…. लालच हा एकच फॅक्टर आहे .. शेतकऱ्यांना लालूच  दाखवण्यात आली, की टाटांचे काम ५८९ एकरात होऊ शकते तेंव्हा जास्तिची जमिन परत मिळाली तर शेतकर्यांना  खुप पैसा मिळेल.त्या जमिनिवर ते हॉटेल्स , दुकाने, सुरु करु शकतील. टाटाच्या प्लॅंट मुळे त्या भागातील लोकसंख्या बरिच वाढेल त्या मूळे कुठलाही धंदा जरी सुरु केला तरीही तो चांगला चालेल…  ..

बुध्ददेवांनी पण सरकार जास्तीचे पैसे देण्यास तयार आहे म्हणून सांगितले पण, ममता वॉज नॉट रेडी टू सेटल फॉर लेस दॅन हर डिमांड..तिचं म्हणणं होतं की ४०० एकर परत करा मगच पुढे बोलु.

तर ही खरी ग्यानबाची मेख आहे ह्या सगळ्या ट्रॅन्झॅक्शन मधली..जर ममता ने थोडे कॉम्प्रोमाइझ केले असते आणि सुवर्ण मध्य साधला असता तर वेगळेच दृष्य दिसले असते.

आता, टाटा गेलेत गुजरातेत, बंगाल सरकारला तोंड दाखवायला जागा उरली नाही, ममता अंडरग्राउंड झाली.. कित्तेक दिवस तर ममताचे नांव पण कुठे ऐकू येत नव्हते. बुध्ददेव ह्या गोष्टीचे पोलिटीकल मायलेज घेण्यासाठी काय करता येइल याचा विचार करु लागले.. शेतकऱ्यांना सगळ्या जमिनी परत देण्यात काहीच अडचण नव्हती. पण आता, दगड, माती, मुरुम इत्यादीची भर घालुन जमिनीचा कस पार खराब झाला होता .जमिनी शेतीलायक राहिलेली नव्हती. बऱ्याच जमिनिवर टाटा आणी त्यांचे ऍन्सिलरी युनिटस च्या शेडचे बांधकाम पण झालेले होते.. म्हणजे काय… तर टाटा ला घालवुन  ममताने शेतकऱ्यांचे  कधिही भरुन न येणारे नुकसानच केले..( जसे मुंबई ला दत्ता सामंतांनी केले होते)

आजच्या परिस्थिती मधे त्या ठिकाणी परत दुसरी  फॅक्टरी ओपन करण्याशिवाय काहिच उपाय राहिलेला नाही. आता तिथे जर आय डी सी ची सुरुवात केली तर कदाचित थोडाफार फायदा होईल, पण स्मॉल स्केल इंडस्ट्रिज, किंवा इतरही मिडीयम स्केल इंडस्ट्रिज जरी सुरु झाल्या, तरी त्या नक्की किती दिवस चालतील   याची खात्री नाही. पण जर  टाटाची फॅक्ट्री जर सुरु झाली असती तर नक्की चालली असती आणि रोजगाराची पण गॅरंटी मिळाली असती, म्हणूनच म्हणतात टाटाच्या बंगाल मधून जाण्यामुळे झालेले नुकसान अगदीच न भरुन येण्यासारखे आहे.

बुध्ददेव म्हणताहेत की बंगाल सरकार इथे असा प्लॅंट लावण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्यामुळे नॅनो इतकेच रोजगार निर्माण होतील.टाटाला घालवल्या नंतर बुध्ददेव आता इतके हात घाइला आलेले आहेत की त्यांनी आपला इंडस्ट्रियल सेक्रेटरी चायनाला पाठवला आहे कोण इंट्रेस्टेड पार्टी आहे का ते बघायला… (!!!)

शेती करता जे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे होते  त्या पैकी कॉम्पेन्सेशन अमाउंट जवळपास ९० टक्के  देऊन झालेली   आहे ,सबब आता पुढे काही फारसा त्रास होणार नाही अशीही पुस्ती बंगाल सरकारने जोडली आहे.

“दैव देतं अन कर्म नेतं” याचं उदाहरण म्हणजे सिंगुरचा टाटा नॅनो प्लॅंट..!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड and tagged , , , . Bookmark the permalink.

6 Responses to नॅनो का शिफ्ट झाली गुजरात मधे?

 1. ममता बॅनर्जी ची पार गोची झालीय.. नॅनो प्लॅंट सिंगुरहुन गेल्यापासुन. अगदी तोंड दाखवायला पण जागा उरलेली नाही ममताला.

  “विनाश काले – विपरीत बुद्धी म्हणतात” – याचे हे उत्तम उदाहरण आहे!

 2. krishnakath says:

  आम्ही Engg Trainee असताना एका बंगाली सहकार्याने एक लेक्चर दिलेले होते. तो म्हणला की कोलकाता-दुर्गापूर-असनसोल चा भाग मुंबई-पुणे भागा पेक्षाही जास्त प्रगत झाला असता. पण गेल्या तीस वर्षात डाव्यांनी बंगालच्या economy ची वाट लावलीय.

  • सहमत आहे. अगदी खरी गोष्ट आहे.
   काहीही काम सांगा.. दादा एटा होबे ना म्हणुन पहिले उत्तर असते. ही मेंटॅलिटीच बंगालला डेव्हलपमेंटच्या आड आली.

 3. Deepak says:

  यशस्वी घोड्दौड चालू आहे ब्लॉगची.. या लेखामुळे चांगली माहिती मिळाली.. 🙂

 4. Pingback: ममता- मनसे फॅक्टर « काय वाट्टेल ते…

 5. nitinbhusari says:

  माहीतीत भर पडली, धन्यवाद

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s