रिअल लाइफ हिरो’ज- द अनसंग हिरो

माणिकचंद फिल्म फेअर अवॉर्ड्स, किंवा तत्सम ऍवॉर्ड्स तर नेहेमिचेच झाले आहेत. पण कधी तरी, एखादी ऑर्गनायझेशन रिअल लाइफ मधल्या हिरो’ज ला ऑनर करण्यासाठी एखादा कार्यक्रम करते , तो मात्र अगदी अन नोटिस्ड जातो.

हे पोस्ट थोडं मोठं होणार आहे हे मला माहिती आहे पण कृपया पुर्ण पोस्ट वाचा. आजच्या या युगामधे पण असे लोकं आहेत की जे स्वतःच्या पेक्षा जास्त इतरांचा.. पिडित दुःखी लोकांचा जास्त विचार करतात.
जसे सिनेमाच्या ऍवॉर्ड्सला इतके जास्त महत्व दिलं जातं त्यपेक्षा २५टक्के जरी  महत्व , ’रिअल लाइफ हिरोज ’ ला दिलं गेलं असतं तरिही बरं वाटलं असतं. रिलायन्स ने आयबिएन -सी एन एन ने रिअल लाइफ हिरोज ला ऑनर करण्याचा पायंडा गेल्या वर्षापासुन पाडला आहे. हे वर्षं दुसरे वर्ष आहे या पुरस्काराचे.

आजचे पोस्ट त्या अनसंग हिरो’ज ची जयगाथा लिहीण्याकरता आहे.. टोटल २४ हिरोज आहेत ज्यांचं काम ऍक्नॉलेज केलंय सिएनएन आणी रिलायंस ने. २४ लोकांच्या बद्दल सगळी माहिती एकाच पोस्ट मधे  कव्हर करणे शक्य नाही तरी पण काही लोकांची माहिती पोस्ट करित आहे.

माझी अगदी मनापासुन विनंती आहे की तुम्ही जस्ट एकदा तरी हे पोस्ट पुर्ण वाचावे.    सिएनएन आयबिएन वर एका कार्यक्रमात सगळं दाखवलंय काल, पण नेमकं जेंव्हा डेली सोप्स असतात तेंव्हाच, त्यामुळे कोणिच पाहिले नसावे.

डॉ. रॉफ मोहिद्दीन मलिक -व्यवसायाने डॆंटीस्ट असलेले हे डॉक्टर श्रीनगर मधे कोशिश नावाची एन जी ओ चालवतात . ह्या संस्थे मार्फत ते बऱ्याच ’हाफ विधवा’ स्त्रियांचे पुनर्विवाह करुन देण्याच्या कामात पुढाकार घेतात.अर्ध विधवा’ ही टर्म काश्मिर मधे प्रचलित आहे.  बरेचसे लोक ७-८ वर्षांपासुन परांगदा झालेले आहेत.त्यांच्या अपरोक्ष राहिलेल्या आणि त्यांची वाट पहात बसलेल्या स्त्रियांना अर्ध विधवा म्हणतात.कधी कधी हे परांगदा झालेल्या ( कींवा कुठेतरी बॉर्डर वर मारले गेलेल्या)लोकांची वाट पहात स्त्रिया ७-८ वर्ष पण काढतात.

एकदा डॉक्टर एका स्त्री कडे तिच्या मुलाला अभ्यासासाठी स्पॉन्सर  करण्यास तयार आहोत म्हणुन सांगायला गेले होते.तेंव्हा ती स्त्री म्हणाली, मुलाचं ठिक आहे, पण माझं काय? डॉकटरांना धक्काच बसला.. त्यांना काहिच कळलं नाही. जेंव्हा माहिती काढली तेंव्हा असं कळलं की त्या स्त्री चा पती गेली ८ वर्ष  परांगदा झाला आहे. ती बिचारी रोज त्याची वाट पहात रहाते, की तो कधी ना कधी परत घरी येइल . पण ७ वर्षानंतरहि तो आलेला नाही.

ही गोष्ट पाहिल्यावर त्यांच्या मनात आलं की अशा परित्यक्ता स्त्रियांसाठी काही तरी केलं पाहिजे, म्हणुन त्यांनी अशा स्त्रियांच्या रिमॅरेज चा विचार केला.गेल्या ६ वर्षात त्यांनी ४० अर्ध विधवांचा पुनर्विवाह करुन दिला आहे.

बऱ्याच स्त्रिया  पुर्ण विधवा   झाल्या आहेत टेररिस्ट अटॅक मधे. या सगळ्या विधवांचे जीवन अगदी नरकमय करुन टाकलं होतं जुन्या वळणाच्या लोकांनी. मुस्लिम समाजात स्त्रीचे दुसरे लग्न हिच संकल्पना लवकर ऍक्सेप्ट होत नाही. अशा परिस्थिती मधे  डॉ. रौफ मल्लिक हे विधवांच्या पुनर्विवाहाचे काम करतात.त्यांना नविन आयुष्य सुरु करण्यास मदत करतात.

मुस्लिम कम्युनिटी मधुन पण ह्या कामासाठी भरपुर विरोध झाला. पण त्यांनी माघार न घेता काम सुरु ठेवले. पण डॉ. मल्लिक आपल्या कामापासुन अजिबात ढळले नाहित.जर तुम्हाला त्यांना कॉंग्रॅचुलेट करण्यासाठी फोन किंवा इ मेल  करण्याची असेल तर पत्ता
drouf2000@gmail.com Phone No.9419015201

उत्तर भारतामधिल अगदी दुरच्या खेड्यामधे आजही गरिबी इतकी आहे की पर्सनल हायजिन अतिशय लो स्टेज ला आहे. गरिबी मुळे आजच्या युगातही स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्सच्या ऐवजी  तेच ते कपडे पुन्हा पुन्हा धुउन वापरतात. अगदी काही घरात तर सगळ्या स्त्रियांचे ‘ते’ कपडे पण कॉमनच(’एकच’) असतात.एका घरातल्या सगळ्या स्त्रिया तेच ते कपडे पुन्हा पुन्हा धुवुन वापरतात, कारण प्रत्येकी साठी वेगळे कपडे घेण्याची लक्झुरी त्यांना परवडत नाही.

अंगावर घालण्याच्या कपड्यांचीच जेंव्हा ऍव्हेलेबिलिटी नसते, त्यावरुनच त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येइल.. काही ठिकाणी जाड्या भरड्य़ा गोणपाटासारख्या कपड्याचे कींवा ज्युटच्या कपड्याचे तुकडे पण वापरले जातात.अंशु गुप्ताने एका इंटर्व्ह्यु मधे सांगितले आहे की इतकी गरिबी आहे की वेळ प्रसंगी स्त्रिया अगदी पोत्याचे तुकडे करुन ते पण वापरतात. अशा परिस्थिती मधे मेडिकल प्रॉब्लेम्स प्रचंड प्रमाणात वाढले असतात. पैसा नसल्यामुळे डॉक्टरला वगैरे तर कधिच काही दाखवता येत नाही.आणि स्त्रियांना मग वेगवेगळे रोग अंगावरच वागवत दिवस काढावे लागतात.

अशा परिस्थिती मधे दिल्ली मधे गुंज नावाची एन जी ओ स्थापन केली आहे अनुष गुप्ता यांनी. ते टाकुन दिलेले कपडे  रिसायकल करुन नॅपकिन्स मधे कन्व्हर्ट करुन खेड्य़ामधे  अंडरप्रिव्हिलेज्ड स्त्रियांना विनामुल्य वाटतात. हे सगळं लिहितांनाच मला कसंतरी होतंय. इतका अंतर्गत विषय , पण आता ओघा ओघात आला म्हणुन लिहिलंय.मला जाणिव आहे, की वाचतांना पण तुम्हाला कसंसंच वाटंत असणार, पण दुर्दैवाने आजही स्वतंत्र भारतामधली ही परिस्थिती आहे.

तेंव्हा अंशु गुप्ताने केलेले कार्य हे अतिशय नावाजण्याजोगे आहे ह्यात काहिच शंकाच नाही.सि एन एन आणि रिलायन्सने ह्यांच्या कार्याची नोंद घेतली आहे आणि ५ लाखाचे पारितोषक दिले आहे. तुम्हाला पण अन्शु गुप्ताला इ मेल पाठवायचा असेल किंवा फोन वर बोलायचं असेल तर इ मेल ऍड्रेस आणि फोन नंबर खाली दिलेला आहे
anshugoonj24@gmail.com Phone No 9868146978

भारतामधे पर्व्हर्ट लोकं पुष्कळ आहेत. असाही एक गैरसमज आहे की अंडरएज मुलींसोबत सेक्स्युअल संबंध ठेवले तर गुप्त रोग बरा होतो. केवळ ह्याच गैरसमजुतीमुळे , कित्येक लाख १६ वर्षाखालिल मुली फ्लेश ट्रेड मधे ढकलल्या जातात.ऍंसन थॉमस ने ६००च्या वर जबरदस्तिने देह व्यवसायात ढकलल्या गेलेल्या अवयस्क म्हणजेच अंडरएज मुलींचे /स्त्रियांची मुक्तता केली आहे.या मुलींमधे अगदी १३ ते १६ च्या एज ग्रुप मधल्या मुली पण आहेत.  आणि हे काम मुंबई मधे माफियाचा विरोध आणि इतर गव्हर्नमेंट बॉडिज चा नाकर्तेपणा ह्यावर टीच्चून केलेले काम आहे हे.

गेली १८ वर्ष थॉमस हे काम करित आहे.आजपर्यंत त्याने कित्येक ब्रॉथेल ओनर्सशी भांडणं केलेली आहेत आणी पोलिसांना पण बरेचदा रेड घालण्यासाठी भाग पाडले आहे. अतिशय सेन्सेटिव्ह कामामधे पण थॉमस ने कधीच कुठल्याही ऍकनॉलेजमेंट्ची अपेक्षा केली नाही.त्याला मिळालेले ५ लाखाचे बक्षिस पण त्याने १९९१ मधे रेस्क्यु केलेल्या स्त्रीला दिले आहे. त्याचा फोन आणि इ मेल पत्ता खाली दिलाय.
anson_tms@gmail.com Phone No 9820504486

चेन्नाइ च्या सावित्री वैती या वयाच्या ७० व्या वर्षी पण ओल्ड एज होम चालवतात आणि फॅमिलिज ने ऍबॉंडंड केलेल्या स्त्रियांच्या रहाण्याची व्यवस्था करतात.
Phone No. 9840059143

अहमदाबादचे हेमंत पटेल आणि मित्र मंडळी ह्यांचा एक ग्रूप आहे. गव्हर्नमेंट दवाखान्यामधे जे कोणि पेशंट्स आणि त्यांचे नातेवाइक जवळपासच्या खेड्यातुन येतात, त्यांच्या साठी पटेल आणी त्यांचे मित्र मिळुन विनामुल्य टिफिन वितरित करतात. कोणाही कडुन काहिही पैसा मिळत नाही पण हे मिशन केवळ डोनेशन वरच चालतं.हिंदु, मुस्लिम, सिख सगळ्यांना (म्हणजे जो जास्तित जात नीडी आहे त्याला) सकाळी एक कार्ड देण्यात येते , आणी संध्याकाळी ६ वाजता जेवणाच्या डब्यांचा टेंपो हॉस्पिटलला पोहोचतो. या कामासाठी बरेच लोक पैशाने मदत करतात, पण स्वयंसेवकांची कमतरता खुप भासते असं ते म्हणाले.
e mail amit.kachhai@yahoo.co.in Tel No.9376116519

भावनगर चे बिझिनेस मन श्री निशित मेहेता ह्यांच्या फॅक्टरिमधे ८० टक्क्यांच्या वर लोकं डीसेबल आहेत.सरकारी नियमाप्रमाणे केवळ ३ टक्के आरक्षण आहे डिसेबल्ड लोकांना, की जे पण कुठलीच कंपनी फॉलोकरित नाही. निशित म्हणतात, एखाद्याची डिसऍबिलिटी ही पण एक ऍसेट होऊ शकते. एखादा ऐकु न येणारा माणुस असेल तर त्याला, जिथे खुप जास्त आवाज आहे, त्या ठिकाणि काम दिल्यास तो चांगले काम करु शकतो.जर एखाद्या ठिकाणी टेबल रिलेटेड असेम्ब्ली काम असेल , जिथे चालण्याची गरज नाही, पण मेंटल कॉन्सन्ट्रेशनची जास्त गरज आहे,पण काम मोनोटोनस आहे,  तिथे ऑर्थोपेडीक लोकांना कामं दिलेली आहेत. त्यांच्या वर्कर्स साठी निशित मेहेता हे खरे हिरो आहेत ज्यांनी त्यांना रोजगार दिलाय अन मानाने जगण्याचा मार्ग !त्यांचा फोन नं आणि फोन नं खाली दिलाय.

E mail microsign@microsignproducts.com, Tel No 09426212121,
09227550777

उत्तर प्रदेशातिल फेजबाद येथिल मोहम्मद शरिफ, हे दवाखान्यात  जे कोणी लोक पैशाच्या अभावी डॆड बॉडी सोडुन गेले असतात, त्यांच्या बॉडीला सन्मानाने आणि स्वतःच्या पैशाने अंत्यविधी करतात.त्यांचा फोन नंबर खाली दिलेला आहे.

Phone No. 9235853230

ठाकुर पुकुर गावातिल (कलकत्या जवळ ) एक भाजी विकणारी महिला सुभाषिनी मिस्त्री हीने  मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल स्वतःच्या  पैशाने सुरु केले आहे, ज्या ठिकाणि गरिब लोकांचा मोफत इलाज केला जातो.२० वर्ष रस्त्यावर उभे राहुन भाजी विकणारी! तिच्या पतिचे पोटाच्या विकाराने निधन झाले. गावामधे वैद्यकिय सुविधा नव्हती म्हणुन त्याचा मृत्यु झाला. जवळ पैसे नाही, आणि चार मुलं गाठीशी, पोट भरायला, तिने अक्षरशः पॉलिश करणे, भाजी विकणे इत्यादी कामं केली.स्वतः करता एकही पैसा खर्च न करता कमावलेला प्रत्येक रुपया तिने या हॉस्पिटलच्या उभारणिसाठी लावला.
या सगळ्यामधे एक सिल्वर लायनिंग म्हणजे तिचा मोठा मुलगा अजय डॉक्टर झाला. आणि आता आईने सुरु केलेले काम पुढे पहातोय!

Phone No. 9883062354

के .सुजाताच्या मुलाचा मृत्यु जा मस्क्युलर डीस्ट्रोफी मुळे झाला होता.तिच्या मुलाच्या मत्युनंतर त्यांनी व्यंकटेश मस्क्युलर डिस्ट्रॉफी सेंटर सुरु केलं.२००५ मधे त्यांच्या मुलाच्या मृत्यु नंतर त्यांनी एक मोठं घर भाड्याने घेतले आणि या रोगाने पिडित असलेल्यांची सेवा करणे सुरु केले – अगदी सगळे..कुकींग, नर्सिंग इत्यादी सगळ्या गोष्टी त्याच करायच्या. या सगळ्याकरिता लागणाऱा पैसा नसल्यामुळे शेवटी त्यांना सगळ्या पेशंट्सला घरी सोडावे लागले.
या रोगाचे जवळपास ६०० पेशंट्स त्यांनी आंध्रामधे शोधुन काढले. आणि त्यांना विकलांगाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले.सुजाता अशा मस्क्युलर डीस्ट्रोफी च्या पेशंटस्ला भेटते , आणी सेल्फ रिलायंट होऊन कसं जगायचं ह्या साठी मदत करते. त्यांचा फोन नं खाली दिलाय.

Phone No 9391300429

हैद्राबादचे के श्री व सौ के रघुराम हे दोघेही ऍक्सिडॆंट मधे ब्रेन डेड झालेल्या लोकांच्या नातेवाइकांना भेटुन ऑर्गन डॊनेशन साठी उद्युक्त करतात. त्यांचा स्वतःचा मुलगा पण रोड ऍक्सिडॆंट मधे मृत्यु पावला, आणि त्याचे पण सगळे देता येण्यासारखे सगळे अंग त्यांनी डोनेट केले होते. या कामासाठी एक एन जी ओ स्थापन केली आहे, जिचं नांव आहे मोहन फाउंडॆशन.त्यांचा इ मेल आणी फोन नं दिलाय खाली.

E mail  hyd.mohanfoundation@yahoo.co.in Phone:-9392456355

पुंछ जिल्ह्यातिल एक प्रोफेसर  जसबिर सिंग सुदान हे एका शाळेचे प्रिंसिपॉल आहेत . ते सगळ्या बॉर्डर वरच्या खेड्य़ांना भेटी देउन कॅम्प्स करतात.या भागा मधे बरेच लोक लॅंड माइन्स च्या ब्लास्ट मुळे आपले अवयव गमावुन बसले आहेत. पैसा हा अजिबात नाही या भागा मधे.. सैन्यानी पेरलेल्या लॅंड माइन्स वर पाय पडून अधु होण्याचे प्रमाण सिमावर्ती भागात खुप जास्त आहे. घुसखोरी रोखण्यासाठी म्हणुन लावले जातात माइन्स.या माइन्स पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहुन शेतामधे येतात .याच बरोबर क्रॉस बॉर्डर फायरिंग मधे पण ज्यांचे  हात पाय  ऍम्पुकेट करावे लागतात, त्यांना पण यांच्या आर्टीफिशिअल लिंब सेंटरमधुन ३००० च्या वर लोकांना आर्टीफिशिअल लिंब्स देण्यात आले आहेत.. जसबिरसिंग यांनी आतापर्यंत फ्री लिंब रिप्लेसमेंट चे ३६ कॅंप्स केले आहेत.

Email :- ellahiinvestment@yahoo.com Phone:-9419633873;
01965 221038

हजाबा नावाच्या ह्या माणसाने आपल्या फळ विक्रिच्या धंद्याच्या जोरावर गावातिल मुलांसाठी एक शाळा सुरु केली आहे नेवपडुपू व्हिलेज मधे. हे गांव मंगलोर जवळ आहे.

Phone :-0824-2235964

नागालॅंड मधे बरेच दिवसा पासुन मिलिटंसी चा प्रकोप सुरु आहे. बरिच मुलं ऑर्फन होतात. झापुटोऊ अंगमाई ह्या नागालॅंडमधिल स्त्री ने अशा मुलांसाठी एक ऑर्फनेज सुरु केले आहे .हे ऑर्फनेज ती स्वतःच्या बळावर गेली २५ वर्षं चालवत आहेत.

Phone:-094360 00868

काही व्हॉलेंटियर्स आणि कमिट्मेंट टू द कॉज.. फक्त इतकंच लागतं एखादं काम करायला. पटन्याचे विकास चंद्र गुड्डू बाबा, हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत गंगा नदी स्वच्छ राखण्यासाठी अवेअरनेस कॅंपेन चालवतात. आणि सोबतच, ज्या बॉडिज गंगेमधे अर्धवट जाळुन टाकुन दिलेल्या असतात, त्यांची पण प्रॉपर विल्हेवाट लावतात.

Phone No.9234798012

धोराजी गुजरात मधले शामजी भाइ अंताला, हे लोकांना वॉटर टेबल चे मह त्व आणि ग्रिन मुव्हमेंट चालवतात.सौराष्ट्रामधे पाण्याचं दुर्भिक्ष सगळ्य़ांनाच माहिती आहे..७५ वर्षिया शामजी भाईंनी शेकडॊ विहिरी स्वच्छ करुन , पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक साधा सरळ उपाय केलेला आहे . पाउस पडल्यावर पाणी गटारात वाहुन जाउ न देता, ते पाणी विहिरित किंवा ओपन तलावात जिरवले तर उन्हाळ्यातही पाणी पुरते.
शेतामधे दर ५ एकरामागे एक विहिर आहे सौराष्ट्रात. विहिर रिचार्ज करुन वॉटर टेबल वाढवण्याचा कन्सेप्ट पॉपुलराइझ केलाय त्यांनी.  जे लोकं  पाण्याच्या स्केरसिटी मुळे  आत्महत्या करित होते , त्यांचे आयुष्य पण ह्या  माणसाने पाण्याचा सुयोग्य वापर कसा करायचा हे शिकवुन बदलुन टाकले.

Email:-nayanaantala@yahoo.in Phone:-9724574865

श्रीमंगला येथिल के एम चिन्नपा या फॉरेस्ट रेंजर ने पोचर्स बरोबर (अनधिकृत जंगलतोड करणारे , किंवा शिकार करुन प्राणी मारणारे, किंवा चंदनाची तस्करई करणारे,) संपुर्ण आयुष्यभर युध्द केलं.त्याच बरोबर ट्रायबल्सचे पण रिहॅबिल्टेशन चे काम केले आहे..

Phone:-98808995788

आय ए एस ऑफिसर झाले असते दिपक शहा.पण ते बिहारला आप्ल्या गावी परत गेले . तिथे जयप्रभा महिला विकास केंद्र नावाची एन जी ओ सुरु केली.शाळा, कम्युनिटी सेंटर्स सुरु केले या एन जी ओ च्या वतिने. सोबतंच संपुर्ण सुकलेल्या विहिरी ,डॅम्स चं पुनरुज्जीवन केलं.

Email:-deepaksaha946@rediffmail.com Phone:-9199002930

एकेकाळी साय़ंटिस्ट असलेले रंगास्वामी इलॅंगो, हे आपल्या मुळ गावी तिरुवेल्लुर इथे परतले. पंचायत राज सिस्टिम रिव्हाइव्ह केलि,  कुंभकोणम   या भागामधे त्यांनी दाखवुन दिलं की रुरल एकोनोमी आणी वुमन एंपॉवरमेंट खेड्यामधे कशी अचिव्ह केली जाऊ शकते.आय आय टी ग्रॅज्युएट , आय ओ सी एल मधे सिलेक्षन झालेलं ,गावात परत येउन केवळ इतरांना शिक्षणाची महती पटावी म्हणुन परत येतो अन … पुढे.. एव्हरिथिंग इस हिस्ट्री.

Email :_ panchayat@yahoo.com Tel No.9940682201

बाबर अली ह्याने केवळ ९ वर्षाचा असताना कलकत्त्याजवळ मुर्शीदाबाद येथे शाळा सुरु केली , की ज्या शाळेत आज ६०० च्या वर मुलांना फ्री शिक्षण दिलं जातं.ह्याचं वय आता १६ वर्ष असुन स्वतः पण तो शिकतो.

Phone No :-9007100960

मलकानगिरी या ओरिसा मधल्या  एका लहानशा नक्सल अफेक्टेड गावात ,जल्पना पाल हिने मुलीची डिस्ट्रिक्ट लेव्हल क्रिकेट , फुटबॉल टीम सुरु केली.

Phone No.9777599688

गुजरात मधे परतापपुर गावात गेली २८ वर्ष मुलांना पोहणं शिकवण्याचा उपक्रम राबवताहेत,करसन भाई पटेल..कर्सन भाइंनी शिकवलेल्या २०० विद्यार्थ्यांनी ४५ च्या वर नॅशनल लेव्हल वर मेडल्स पटकावले आहेत.इथे मुलांना शिकवायला काही प्रॉब्लेम्स नाहीत, पण मुलिंना जिथे पायात स्लिपर्स घालण्याची ऐपत नाही तिथे स्विमिंग कॉस्च्युम्स कुठुन आणणार? दुसरं म्हणजे चेंजिंग रुम्स वगैरे नसल्यामुळे मुलिंना   त्रास होतो.त्यांनी शिकवलेला कमित कमी एक तरी स्विमर इंटर्नॅशनल लेव्हलला गेलेला त्यांना पहायचाय..

Phone :- 9913103859

देविंदर सिंग हे फॉर्मर सैनीक आणि ऍथलेट यांनी डेरा बाबा नानक , येथे एक ऍकेडमी स्थापन केली आहे, मुलांना स्पोर्ट्स्चे शास्त्र शुध्द शिक्षण देण्यासाठी. त्यांच्या ऍकेडमी मधुन बरेच स्टेट लेव्हलचे आणि नॅशनल लेव्हल चे  प्लेअर्स तयार झाले आहेत.

Phone No.. 9855266102

हे पोस्ट फार मोठं होणार म्हणुन खात्री होती , तरिही एका गोष्टीचं वाइट वाटतं की काही हिरोज ची संपुर्ण माहिती मी इथे पोस्ट करु शकलो नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

9 Responses to रिअल लाइफ हिरो’ज- द अनसंग हिरो

 1. वा… प्रत्येकाचं काम म्हणजे अगदी इन्स्पिरेशनल आहे!..

  अ बिग सॅल्युट टु द रीयल लाईफ हिरोज !

  इकडे हा चॅनल “आयबिएन -सी एन एन ” दिसत – [ सबस्क्राइब नसल्यामुळं म्हणा- औफिसचे गेस्ट हाऊस आहे ] पाहता आला नाही..

  महेंद्रजी, आपण काहींची का होइना, माहिती दिल्याबद्दल आभार..!

  • खरंच खुप छान झाला कार्यक्रम.. एकदा तरी पहायलाच हवा.असे कार्यक्रम पाहिले की मग आपल्याच नाकर्ते पणाची लाज वाटते. कमित कमी सगळ्यांना इ मेल तरी पाठवले अभिनंदनाचे, तेवढंच काही तरी केल्याचं समाधान…

 2. manju says:

  kharach aashrya vatal samnya manashi asamanya banu shakatat

 3. abhijit says:

  धन्यवाद महेन्द्रजी,
  अशा लोकांबद्दल माहिती देउन तुम्ही किती जणांना प्रेरणा दिली ठाउक नाही. पण त्यातून काही तरी कृती नक्कीच घडेल.

 4. sonalw says:

  thank you very much…itki sunder mahiti dilyabaddal. Saglech great aahet. pan mi babar ali baddal waachun awak jhale. keal 9 warshachya wayat evhadhi paripakwata yete kuthun!
  aaplya bhartaat itak kaahi ghadat asataana aapan kuthe asato asa prashn padala.
  mata puraskaaranchya anushanghane ek post sonalwaikul.wordpress war taaklay. Vishay wegla aahe pan jaroor waacha. aani punha ekda manapaasun aabhaar.

 5. ashvini pendse says:

  me ha karyakram ibn var pahila . atishay inspirational hota.

 6. vishal says:

  atyant prerak…

 7. या लोकांनी केलेलं कार्य वाचताना डोळे भरून आले. दुसर्‍यासाठी जगणं हेच खरं जीवन. मला त्यांना कधी आणि कशी मदत करता ये‍ईल देव जाणे, पण सगळ्यांना मेल पाठवून निदान त्यांचं अभिनंदन तरी केलं. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s