बलात्कार लिगलाइझ्ड?

काल एक बातमी वाचण्यात आली, ’बलात्कार  लिगलाइझ’ करण्यात आलाय. तसं बिल पण असेंब्ली मधे सबमिट करुन पास करण्यात आलंय. खरंतर ह्या बातमीवर ची प्रतिक्रिया कालच देणार होतो, पण केवळ एप्रिल फुल च्या नावाखाली डिस्कार्ड होऊ नये म्हणून आज पोस्ट करतोय..

हमिद कर्झाई यांनी यांनी एक लिगल बिल साइन केलंय.

आता हे हमिद कर्झाई कोण म्हणून काय विचारता? ते म्हणजे अफगाणिस्थानचे प्रेसिडेंट. त्यांच्या या नव्या कायद्या  नुसार अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांक ’शिया’ समुदायासाठी काही कायदे घाई घाईने पास  केले आहेत.

एका कायद्यानुसार स्त्री ने पुरुषाची प्रत्येक आज्ञा पालन केलीच पाहिजे. स्त्री ने पुरुषाची प्रत्येक वेळी केल्या गेलेली सेक्स्युअल डिमांडस पुर्ण केलीच पाहीजे.   स्त्री च्या (पत्नी)  इच्छेविरुद्ध केलेला समागम हा रेप समजला जाऊ शकत नाही असाही एक कायदा पारित केल्या गेला आहे. स्त्रीने पुरुषासोबत कमीत कमी चार दिवसा मधे एकदा तरी समागम केलाच पाहिजे.पती ने स्त्रिच्या इच्छेविरुद्ध केलेला समागम हा इतर सगळ्याच प्रगत  देशात बलात्कार म्हणूनच गणला जातो.पण अफगाणिस्थान प्रगत नाही म्हणून असे कायदे करायचे?? ( हे अफगाणी सरकार येडं झालंय.. कसले कायदे काढतंय…?)

तसाही तालिबानी कायद्याप्रमाणे रेप  साठी शिक्षा  होण्यासाठी कमीत कमी ५ ऍडल्ट साक्षीदार आवश्यक आहेत.जे कधीच शक्य नाही. जर केलेला आरोप सिद्ध झाला नाही तर त्या स्त्री लाच ठेचून मारल्या जाते.

सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे ,चाइल्ड मॅरेजेस पण लिगलाइझ करण्यात आले आहेत. चाइल्ड मॅरेजच्या मागच्या निर्णयाचे कारण काही कळले नाही.  अफगाणिस्थानचे प्रेसिडॆंट हमिद कर्झाई यांनी घाईने पारित केलेला हा कायदा म्हणजे वुमन लिबरेशन च्या कार्यकर्त्यांच्या साठी एक मोठा मुद्दा आले.हा कायदा, लग्न, डिव्होर्स, प्रॉपर्टी इन्हेरिटंस वगैरे गोष्टींवर डिल करतो.

प्रत्येक बाबी मधे स्त्रिचे स्थान अगदी खालच्या पातळीवर नेउन ठेवले आहे..माझ्या मते हे एक या शतकातील कुठल्याही देशाच्या पार्लमेंट मधे पास झालेले सगळ्यात वाईट असेल.अशा दकियानुसी कायद्यामुळे स्त्रिया जास्त व्हलनरेबल होतील असे वाटते.

अफगाणिस्थान मधल्या या बिलातिल कायदे हे अगदी इंग्लंड मधल्या ’थंब रुल’ कायद्यापेक्षाही भयानक आहेत. .इंग्लंड मधे १८ व्या कि १९ व्या शतकात एक थंब रुल म्हणून कायदा पास करण्यात आला होता. त्या कायद्याप्रमाणे पुरुषाने आपल्या बायकोला अंगठ्या एवढ्या जाडीच्या केनने मारणे हे लिगली मान्य होते.तेंव्हा पासूनच हा थंब रुल हा शब्द अस्तित्वात आला .अफगाण प्रेसिडेंट्च्या  या कायद्यामुळे एक बाकी क्लिअर झालंय, की तो तालिबानचा पिट्टू आहे हे निर्विवाद सत्य अधोरेखित झालंय.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in तालिबान and tagged , . Bookmark the permalink.

12 Responses to बलात्कार लिगलाइझ्ड?

 1. सुधीर says:

  आपण लीहल्याप्रमाणे खरच आसा कायदा होत आहे का? हे जर खरे असेल तर फारच भयानक राज्वट आहे.

 2. जर असे असेल तर “बलात्कार” हा शब्दच किंवा त्याची व्याख्याच बदलावी लागेल. कारण रेप [बलात्कार] ची व्याख्या “any act of sexual intercourse that is forced upon a person.” अशी आहे [संदर्भ]

  जर हा “फोर्स”च लिगल असेल तर रेप किंवा बला… हे शब्दच त्यांच्या डिक्शनरीमध्ये नसतील किंवा ते काढुन टाकण्याचा नवा कायदा पास होईल!!

  • स्त्री ही कुठलिही असो, कुठल्याही जाती धर्माची असो, ऍज अ ह्युमन बिईंग तिच्या स्त्रित्वाचा आदर हा झालाच पाहिजे. जर एखाद्या धर्मामधे तो होत नसेल तर त्याचा निषेध व्ह्यायलाच हवा.

 3. Mangesh Nabar says:

  This is nothing but horrible. These people will treat woman to the lowest level for their own benefit in the name of religion.

 4. ashvini pendse says:

  adhich afganistan madhe striyanvar kay kami atyachar hotat. tyat ha kayda manje atyacharchi parisima gthane ahe. eka rashtrapati ashya prakche nrnay ghene atishay dukhkark gosht ahe. strila atishay khachya drjyachi vagnuk denyache atishay bhayanak udaharn manun afganistantche nav gheu shakto.
  pashu dekhil kahi niyama pramane vagtat. manje yanchi patli pashu peksha dekhil khalcya drjachi ahe.

 5. मंगेश , अश्विनी
  प्रतिक्रियेबद्दल आभार. तुम्ही ते ’नॉट विदाउट माय डॉटर आणि ब्रेड विनर वाचलंय कां? सुंदर पुस्तक आहे.

 6. sadanand says:

  नॉट विदाउट माय डॉटर , Horrible. ‘betty mehmudi’
  Tyaa baichi kamaal aahe. Jidya wakhananyajogi.

 7. Mrunal says:

  Mi hi varil donni pusthke vachli aheth. farch bhyanak ahe sagale. Yavar apan barathat ahoth manun nasibvan samjayache. ki apn tychasadhi kahihi karu sakth nahi manun durdaivi samjayache hech kalan nahi.

 8. व्हॉट द ***! आईचा घो या करझाईच्या. त्याच्या स्वतःच्या आईवर किंवा बहिणीवर बलात्कार झाला असता तर समजलं असतं साल्याला… अतिशय जाचक अटी आहेत या कायद्याच्या:
  उदाहरणार्थ: स्त्रीने पुरुषाच्या परवानगीशिवाय घराबाहेर पडू नये, स्त्रीला लैंगिक संबंधांतून बळावेल असा एखादा आजार नसेल, तर तिने प्रत्येक वेळी पुरुषाच्या लैंगिक हाकेला प्रतिसाद दिलाच पाहिजे इत्यादी इत्यादी!!! या हरमखोर करझाईला चाबकाने फोडायला हवं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s