टाटा पोर्ट

ग्रिनपिस डॉट ओआर्जी नावाची एक संस्था आहे. ती फक्त नेचर वाचवण्यासाठीच कामे करते. या एन जी ओ ने लाखो लोकांच्या मधे एंडेंजर्ड स्पेशिज वाचवण्यासाठी किंवा नेचर चे नुकसान वाचवण्यासाठी अवेअरनेस क्रियेट केलाय.

टाटाचे एक नवीन पोर्ट येउ घातलंय,ओरिसा मधल्या धामरा या गावी. हे पोर्ट ज्या ठिकाणी यायचं आहे त्याच ठिकाणी एका एंडेंजर्ड स्पेशी म्हणून डीक्लिअर करण्यात आलेले टर्टल अंडी घालण्यासाठी याच ठिकाणी दर वर्षी येतात. जर इथे टाटाचे पोर्ट झाले तर ’ओलिव्ह रिडले टर्टल’ च्या नेस्टींग ग्राउंड ची तसेच भारतातील सगळ्यात मोठ्या मरिन रिझर्व्स गहीरामठ वाट लागेल.

या ऍक्टीव्हीस्ट लोकांनी रतन टाटा यांच्या मधे अवेअरनेस क्रियेट करण्यासाठी म्हणून टाटाच्या हेड ऑफिस समोर पण धरणे धरले होते. असो..

या एज जी ओ ची वेब साइट इथे आहे. अगदी कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर नसतांना केवळ इच्छाशक्ती च्या जोरावर या एन जी ओ ने बऱ्याच ठिकाणी जिंकले आहे. त्यांनी आता एक ऍडव्हर्टाइझ तयार केलेली आहे आणि ती ऍड पेपरमधे देण्यासाठी पैसे गोळा करताहेत.

अर्थात, मी इथे हे जे पोस्ट करतोय ते त्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून नाही,एंडेंजर्ड स्पेशिजला वाचवण्याकरता   डेव्हलपमेंट चा बळी द्यायचा का? हा एक मोठा अनुत्तरीत प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर देणे पण तितकेच कठीण .

ओरिसा तसंही खूप मागासलेलं आहे पारादिप पोर्ट झाल्यानंतरची त्या भागाची झालेली डेव्हलपमेंट सगळ्यांनीच पाहिलेली आहे. इथे जर पोर्ट झाले तर लाखो लोकांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगार मिळेल, आणि त्या भागाचे नंदनवन होईल, असे मला वाटते.

इथे फक्त एक एन जी ओ किती सक्सेस्फुली काम करू शकते त्याचे उदाहरण म्हणून हे पोस्ट केलेले आहे.

यांच्या सक्सेस स्टोरीज जरूर वाचा.

हीच ती ऍड्व्हर्टाइझ जी त्यांना पेपर मधे द्यायची आहे,आणि ज्या करिता हे लोकं पैसे गोळा करित आहेत..ad-small1


About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड and tagged , , , . Bookmark the permalink.

7 Responses to टाटा पोर्ट

 1. sonalw says:

  mala as waatat ki ya saglyat aaplya sarkaar cha waata khup mahatwach aahe. ParyawaraN khat he nusat khat n raahta jar kharokhar ya drushtine educate jhal tar baryach goshti nisargach nuksaan n karata howoo shaktil. jas ki ya jeevansathi dusrya prakaare soy karan ki jene karun tyanna aawashyak as environment artificially available karun den aani tithe tyanna preserve karan. khar tar ya khatyane fakt kaahi basic goshti jari pramanik pane rabawaly tari far motha farak padel, jas, jungle tod thambawane, kinva aaplya jaminicha kiti % bhubhag ha jhadanni kinva wanaspatinni wyaplela asan aawashyak aahe he pahun tyasathi kadak kaayde karne, illegelly chemicals anni sandpanyacha nichara howoo n dene, khajan preserve karnyasathi atikraman thambawane etc. Plastic chy wastunvar aala ghalne, gawagawat pani jirwa mohim raabwane..anek goshti howoo shaktaat ki jyamule, development aani paryawaran donhi sadhal jaail. Pan raajkiy icchashakti ithe mahtwachi tharte.

 2. @सोनल
  … माफ करा.. पण हे “मिंग्लिश” [मराठी+ईंग्लिश] वाचने जरा कठीणच आहे… तुम्ही हा – गमभन – ओनलाइन मराठी टायपिंग एडिटर – वापरा… मराठी आणि इतर देवनागरी लिपिंसाठी उत्तम..

  • हा गमभन आपल्या ब्लॉगवर टाकता येइल कां? म्हणजे टॉगल ऑप्शन घेता येइल -इंग्लिश, मराठी साठी.

 3. @महेंद्रजी,
  मी तर त्या एन्.जी.ओ. च्या बाजुने मत देइन… पोर्ट साठी नविन लोकेशन मिळु शकेल मात्र त्या कासवांच्या जातीच्या संरक्षणाचं काय? जसं आपण “मानव” या प्रजातीसाठी – त्यांच संरक्षण आणि इतर मुद्दे लक्षात घेऊन एस.ई.झेड. वगैरे प्लान करतो, त्याच प्रमाणे मला वाटतं या विलुप्ताभिमुख जातीचाही विचार केला जावा.

  इंडस्ट्रीयल डेवलपमेंट चा बळी द्या असं मी म्हणत नाही.. मात्र पोर्टसाठी जरा दुसरीकडचं किंवा आसपासचं लोकेशन शोधुन त्याला पोर्टसाठी योग्य करता येइल. मात्र त्या कासवांच्या साठी तसं नॅचरल लोकेशन पुन्हा निर्माण करणं, तेवढं सोपं किंवा अकलेचं वाटत नाही… तसंही आम्ही या इंडस्ट्रीयल डेवलपमेंट.. सिटी प्लानिंग… रियल इस्टेट… ग्लोबलायझेशन अशा “गोंडस” नावाने नॅचरल रीसोर्सेची वाट लावायला मागे-पुढे पाहिले नाही… आता जे शिल्लक आहे, किमान ते न उजाडता, आपल्याला डेवलपमेंट कशी करता येइल याचा विचार केला पाहिजे अन् तसं इम्प्लिमेंटेशन सुध्दा केलं पाहिजे.

  शिवाय, अशा डेव्हलपमेंटच्या नावाखाली – पोर्टवाल्यांचा नफा विरुद्ध त्यामुळे मिळणारे रोजगार यांचा हिशोब हा मुद्दा जरा वेगळाच आहे. पोर्टवाल्यांच “रोजगार उपलब्ध्दि” एवढाच उद्देश नाहीये!

  सरकारी यंत्रणे बद्दल तर न बोलणेच चांगले… नाही तर… सोनलने, म्हटल्याप्रमाणे “पाणी अडवा – पाणी जिरवा” पेक्षा आपल्याकडे “पैसा आडवा- पैसा जिरवा” हेच फार आहे!

  हे झालं माझं मत.. कधाचित तुमचं व इतरांची मतं वेगळी असतील/ असावीतच 🙂

  • कदाचित थोडासा समुद्राच्या काठावरचा भाग मोकळा सोडल्यास थोडा फायदा होऊ शकतो.
   दुसरे असे की मी स्वतः ओरिसाच्या डीप इंटेरिअर भागात पण काम केलेले आहे.
   तिथल्या लोकांची सध्या तरी आवश्यकता दोन वेळचे जेवण आणि कपडे आहे.
   म्हणुन थोडं कन्फ्युजिंग आहे.. पण कधी वाटतं की ठिक आहे.. पोर्ट व्हावं……!
   अर्थात, काही सुवर्ण मध्य काढता आला तर ठिकच होइल.

 4. हा गमभन आपल्या ब्लॉगवर टाकता येइल कां?

  “वर्डेप्रेस” वरती जे ब्लौग फ्री होस्टेड आहेत त्यांसाठी कोड एडिट करता येत नाही, शिवाय तसं विजेटही नाही सापडलं 😦 …त्यामुळे “गमभन” येथे टाकणे शक्य वाटत नाही.

  मात्र तसं प्लगिन आहे मात्र त्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा होस्टेड ब्लौग असावा लागेल. जर आपण इटरेस्टेड असाल तर “याहु इंडिया” चांगली होस्टींग सर्विस देतेय… स्वतःचं डोमेन…वेबसाइट अन् ब्लौग .. १००० इमेल, चांगली सोय आहे 🙂

  याहु इंडिया स्मौल बिझनेस…

  माझी काही मदत लागली तर अवश्य सांगा!

 5. Pingback: टाटा व्हर्सेस टर्टल- नविन गेम.. | काय वाटेल ते……..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s