तालिबानी न्याय टिनएजर मुलिला ३७ फटके..

taliban-hiring

कालची बातमी वाचली.तालिबान मधिल मिलीटरी कमांडर फजुल्लाह ने स्वात मधे मिलीटंट्स चा गढ असलेल्या मट्टा या ठिकाणापासून केवळ २५ कि.मी. अंतरावर, एका मुलीला चाबकाने फोडून काढले..

हे लोकं स्वतःला तालिबान म्हणवतात, म्हणजे स्टूडंट. ह्या स्टूडंट्सनी स्वतः कधी शाळॆचं किंवा कॉलेजचं तोंडही पाहिलेलं नसतं पण म्हणे तालिबान… !

ह्या लोकांनी जितके   माणसं मारली असतील तेवढी पुस्तकं पण कधी हाताळली किंवा वाचलेली असतील क ह्याची शंका आहे..हे तालिबान म्हणजे माथेफिरू आणि अशिक्षित लोकं.त्यामुळे इतर सुशिक्षित लोकांवर जरब बसवायला त्यांना असे इसविसन पुर्व काळातले नियम आणि कायदे आवश्यक वाटत असतील.

हे लोकं स्वतःला इस्लामिक म्हणवतात , मौलवी म्हणवतात, पण त्यांनी कुठलेही ट्रेनिंग घेतलेले नसते. .तालिबानच्या वर्किंग स्टाइल वर आपण बरेच काही वाचले आहे.पूर्वी मला एकदा एक व्हिडीओ इ मेल मधे आला होता, एका स्त्रिला दगडाने ठेचून मारण्याचा. काल एक दुसरा व्हिडीओ आला. एका १७ वर्षाच्या मुलीला ३७ फटके मारण्याचा. फटके मारणारे तालिबानी होते.

तिचा दोष?असं म्हणतात की ती ज्या पुरुषाबरोबर घराबाहेर पडली तो पुरुष तिचा पती नव्हता. बस! त्याकरिता इतकी शिक्षा. तिला फटके मारले जात होते, आणि ती किंचाळत, मदत मागत होती. एकाने तिचे हात धरुन ठेवले होते, तर दुसऱ्याने पाय ..हात धरण्याचे कारण तिने तिच्या हाताने मागचा भाग झाकू नये हा होता. हा व्हिडिओ एका मोबाइल फोनने शुट करण्यात आलेला आहे.

काही लोकल लोकांचे म्हणणे असेही आहे, की ह्या मुलीने एका तालिबानी कमांडर ( कसला बोडख्याचा कमांडर.. भ++ पाक सरकार पुरस्कृत टेररिस्ट )ने तिला लग्नाची मागणी घातली होती ज्याला तिने नकार दिला म्हणून तिच्यावर बाहेरख्याली पणाचा चा आरोप करुन शिक्षा करण्यात आली. तिचे पुश्तु मधले डायलॉग्स आहेत.. मी जे काही केलं त्या बद्दल पश्चाताप करते आहे, आणि माझे वडीलांना पण .

हा व्हिडीओ यु ट्य़ुब वरुन काढून टाकण्यात आलाय पण इथे ह्या ब्लॉग वर ऍव्हेलेबल आहे.

अजुन एक बातमी वाचण्यात आली, त्या मधे शांगला( पाकिस्तान) येथील गोजकारो कलय इमरलेंड माइन्स,तालिबानच्या ७० लोकांनी एक अमेरिकन कंपनीला लिझ वर दिलेली पाचु ची माइन्स ताब्यात घेतली आहे.ही माइन पाकिस्तानने ४० मिलियन रुपयांच्या करारावर त्या कंपनीला लिझ वर दिलेली आहे.एक दिवस २५ -३० तालिबानी तिथे आले, धाड धाड गोळ्या चालवून सुरक्षा गार्ड्स ला पळवून लावले आणि मग माइन्स ताब्यात घेतली. ते लोकल लोकांना म्हणाले की आम्ही टेररिस्ट नाही, आम्ही तुमच्यातले आहोत, या आणि इथे माइन मधे काम  करा. (तुम्ही काम करा आणि  प्रॉफिट शेअर करा)

शांगला  जवळच्याच कोट्काय बाजारातुन मायनिंग इक्विपमेंट्स (म्हणजे कुदळी अन फावडॆ) आणले . तालिबानने टेकओव्हर करण्यापुर्वी ह्या माइन मधे १०० लोकं काम करित होते, आता करताहेत १०००!!!!इतकी माणसं हवे तसे माइन्स खणून  त्या माइन्स ची वाट लावणार ह्यात काहीच शंका नाही. त्याच बरोबर चूकिच्या माइनींग मुळे माइन कधिही खचू शकते आणि लोकं तिथे ट्रॅप होऊ शकतात.

हे टेकिंग ओव्हर झालंय मागच्या बुधवारी. अशा  घटना आपल्या इथे पेपरमधे पण कव्हर केल्या जात नाहीत त्यामुळे तालिबान आपली ताकद कशी वाढवीत आहे ते आपल्या लक्षात येत नाही.सध्या पाकिस्तानचे भवितव्य अशाच अशिक्षित आणि रॅडिकल इस्लामी मिलिटंन्सी च्या हातामधे गेले आहे.जे भारताच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे.असे हजारो लाखो कसाब तयार होत आहेत. अहो हातामधे बंदूक दिल्यावर तो मुलगा काम करुन पैसे मिळवायचा प्रयत्न का म्हणून करेल? तो तर सरळ एखाद्याच्या डोक्यावर नेम धरुन पैसे मागेल..

१५ ते ३५ हा एज ग्रुप आणि कुठल्यातरी कारणासाठी स्वतःला झोकून द्यायची तयारी, हातात बंदुक आणि रॉकेट लॉंचर..जेहाद च्या नावाखाली कट्टरपंथियांकडून मिळणारा आदर आणि आता मिळालेला पैसा(अफुच्या शेतिमधुन मिळणारे पैसे आणि अशा तऱ्हेने ऍक्वायर केलेल्या माइन्स मधुन मिळालेल्या जड जवाहीर विकून मिळालेले पैसे त्यांची ताकत वाढवायला पुरेशी आहे.एकदा फॅन फॉलोअर्स वाढले की झाले. ), अजुन काय हवे?

टांक येथे एका सुसाइड बॉंबरने  स्वतःला उडवून दिले काल संध्याकाळी. अटॅक मधे २९ लोक मारले गेले, पण सरकार म्हणतंय ११ लोकंच मेले,या तालिबानी लोकांमधे पण दोन ग्रुप्स आहेत.बैतुल्लह मसुद हा एक पाकि लिडर आहे आणि एक कोणी तरी ट्रायबल लिडर आहे. हा अटॅक त्या बौतुल्लाह च्या विरोधामध्ये केला गेला असे लोकल बलुचिस्तानमधल्या लोकांनी सांगितले. ही सगळी माहिती समजावुन घेण्यासाठी आपल्याला पाकी पेपर वाचावे लागतात. ह्या बातम्या थोडक्यात का होईना पण भारतीय पेपरला आल्या तर बरे होईल..

ओबामांच्या अमेरिकन डिप्लोमॅट्स ला हे माहिती असेलच…..????

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in तालिबान and tagged , , . Bookmark the permalink.

1 Response to तालिबानी न्याय टिनएजर मुलिला ३७ फटके..

  1. विडीओ बघितला आणि कसंसंच झालं. एवढा निर्दयीपणा कुठून आणतात हे लोक? ती मुलगी एवढी कळवळत होती तरी त्या नराधमाला काही तिची दया आली नाही… 😦

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s