न्युयॉर्क वरचा हल्ला

न्युयॉर्क वरचा हल्ला हा अपेक्षित होताच. एका आशियाई मुळाच्या माणसाने केलेला हल्ला होता हा. बरेच वर्षानंतर असा हल्ला झालेला आहे , तेंव्हा आता पुन्हा हेट क्राइम्स सुरु होऊ नये. असं काही झालं की मूळ निवासी कुठल्याही आशियाई लोकांना आपला शत्रू समजणे सुरू करतात, आणि मग भारतीय, श्रीलंकन, इराणी , पाकिस्तानी … म्हणजे ज्यांच्या तोंडवळा ( चेहेरा) आशियाई दिसतो, त्यांच्यावर हेट अटॅक्स केले जातात.

ज्या दिवशी पाकिस्तान मधे अटॅक झाला होता, ३०/३ ला तेंव्हाच मी पोस्ट वर लिहिलंय की आता अमेरिका आणि युरोप मधे पण असेच अटॅक होऊ शकतिल. कालच ओबामांनी पण ह्याची पुष्टी केली आहे.माझी अशी इच्छा नाही की ते अटॅक व्हावेत, पण ते होणारे हे मात्र नक्की. कालच इंग्लंडमधे माहितिच्या अधिकाराखाली ७/७ चे व्हिडीओज पब्लिकला पहाण्यासाठी ओपन करावेत असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे.

ह्या फंडामेंटलिस्ट लोकांची ताकत कमी समजून चालणार नाही.. दे निड टु बी ब्रॉट टु जस्टिस…आता त्या लोकांनी एक नवीन प्रकारचा अटॅक डेव्हलप केला आहे. सरळ बंदुक घेउन कुठेही घुसायचं आणि सरळ गोळीबार सुरू करायचा. जो समोर येइल त्याला मारुन टाकायचं.. स्वतःच्या जिवाची तशीही ह्यांना काळजी नसतेच!

ह्या हल्ल्या मागे कोण आहे ते अजुन प्रसिद्ध केलेले नाही. पण जर हा वैयक्तिक वैमनस्यातून हा हल्ला असेल तर ठीक आहे .. नाहितर ह्याला तालिबानची वाढलेली ताकत असेच समजावे लागेल आणि पुढच्या एका मोठ्या घटनेसाठी अमेरिकेला तयार रहावे लागेल.

जास्त काही लिहित नाही…थांबवतो इथेच.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s