फक्त वरूण गांधिच कां?

ज्या देशामधे ७० ट्क्क्यांच्या वर हिंदू लोकसंख्या आहे, त्या देशामधे हिंदू हिताबद्दल लिहिणे किंवा बोलणे म्हणजे महत्पाप समजले जाते. असे कोणी बोललं की मग आपली निधर्मी इमेज अजुन चमकवण्या साठी  स्व घोषित नेते हिंदूंच्या विरोधात मुक्ताफळं उधळायला तयार असतात.

वरुणच्याच केस मधे पहा , सगळी गिधाडं कशी तुटून पडली आहेत त्याच्यावर. या निधर्मी लोकांना फक्त वरूणच का दिसला? त्या शिवाय जे हुरियतचे नेते वाट्टेल तसे स्टेटमेंट्स देतात त्यांच्यावर कधीच कारवाई का केली जात नाही? वरूण काय बोलला हे अजूनही गुलदस्त्यामधेच आहे. पहिली सिडी पुरावा म्हणून कोर्टात जमा  करण्यात आली, नंतर दुसरी सिडी पण जमा करण्यात आल्याचं ऐकतो. सरकार म्हणतंय की कुठली सिडी खरी आहे आणि कुठली सिडी खोटी ते सिद्ध  करणं वरुणचं काम आहे. आता त्याला तर रासुका खाली अटक केली आहे  मायावती बहेनजींनी.आता जेल मधे राहुन वरुण कसा सिद्ध  करु शकेल की सिडी डॉक्टर्ड आहे ते?

एक इंट्रेस्टींग मुव्ह! जेंव्हा बहेनजींनी वरुणला अटक करुन रासुका लावण्याचे प्रसिद्ध  केले आहे, म्हणजे काय तर एक मुंगी  पायदळी द्यायला   हत्ती आणला   तेंव्हा मुल्लायम सींगाची प्रतिक्रिया काय आहे हे पहायला मला नक्कीच आवडलं असतं. मी सगळी न्युज चॅनल्स खंगाळली ( कित्ती जुना शब्द आहे हा, माझी आज्जी वापरायची, एकदम आठवला, हा आहे लिहिण्याचा फायदा.  🙂 )पण कुठल्याही न्युज चॅनलने मुल्लायम सिंग ह्यांना दाखविले नाही. कारण मुस्लिम लोकांचा मसीहा, ’बाबरी शहिद’ होण्यापासुन वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा एकमेव मसीहा, या इमेज मुळे मुस्लिम समाजाची गठ्ठा मतं त्यांना गेल्या दोन निवडणुकीत मिळत आहेत. मुल्लायम नेहेमीच कुठल्या ना कुठल्या मौलवी सोबत दर्शन देत असतात. असो.. मुद्दा तो नाही.

केवळ वरुण उच्च शिक्षित आहे म्हणून त्याने असे काही स्टेटमेंट्स करु नये असेही मत काही पत्रकारांनी व्यक्त केले. म्हणजे हुरियतचे नेते अशिक्षित आहेत कां? जर नाही उत्तर असेल तर का म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही?फक्त वरुण किंवा नरेंद्र मोदीच का दिसतात या सोशलिस्ट लोकांना?

बाळासाहेब जे काही म्हणाले ते काही खोटे नाही. इंदिरा गांधींचा नातु, जवाहरलाल नेहरुंचा पणतु देशासाठी धोका कसा काय ठरू शकतो?

आता मायावतींच्या ह्या स्टेप मुळे मुस्लिम समाजाला आता मायावतिबद्दल जवळिक नक्किच वाटेल. बाबरी धराशायी होऊन पण आता कित्तेक वर्ष झाली आहेत. मुल्लायम सींगांनी( बाबरी रक्षक) कल्याण सिंग यांना ( बाबरी पाडणारे ) पण आपल्या पक्षामधे घेतले आहे. याची गोळाबेरिज म्हणजे काही मुस्लिम मतांना आता ते जवळचे वाटणार नाहित.

या लोकांच्या मधिल काही लोक आणि  नवतरुण वर्ग (जो आत्ता पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मतदान करतोय तो) ज्याला ही जुनी हिस्ट्री माहिती नाही, तो वर्ग मायावती कडे नक्कीच मुस्लिम मसिहा म्हणुन आकर्षित होईल . मला वाटतं की गेल्या कित्येक वर्षांच्या नंतर मुस्लिम मतांच्या मधे फुट पडलेली आहे.  पॉलिटीक्स खरंच इंटरेस्टींग होत चाललंय.

लिहिण्याच्या ओघात,जरा विषयांतर झालं . क्षमस्व. ,मी काही लेखक नाही त्या मुळे माझे मुद्दे जरा तुटक तुटक  वाटत असतील  तर क्षमस्व. तर काय सांगत होतो, काही महीन्या पूर्वी हूरियतचे नेता, सय्यद अली शाह गिलानी ह्यांनी एका स्टेज वर म्हंटलं होतं ,की आम्हाला डेमोक्रसी नको आहे. जशी काही देशामधे कम्युनिझम सुरु आहे काही ठिकाणी डेमोक्रसी तशिच आम्हाला कुराण आणि सुन्नत चे नियम लागू व्हावेत. मुस्लिम पर्सनल लॉ मधे जर शरीया सुरु केली तर काय हरकत आहे?? आता हे स्टेटमेंट कां सिरियसली घेउन त्याला अटक केली नाही हे सरकारच जाणे. पण माझ्या मते जर कोणी भारतीय नागरिक डेमोक्रसी वर विश्वास नाही म्हणतो,  आणि सरकार दुर्लक्ष करते , तेंव्हा खरंच आश्चर्य वाटते.

शरद पवारांनी पण म्हटलंय की मालेगाव स्फोटातल्या  आरोपींना अटक केल्यापासून एकही बॉंब स्फोट झालेला नाही. ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो? अब्दुल रेहमान अंतुले जे बोलला होता त्यावर काय ऍक्शन घेतली गेली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी ना कधी द्यावीच लागतील सरकारला, आणि न दिल्यास त्यांनी हे विसरुन जाऊ नये की  भारतामधे लोकतंत्र आहे …

बाय द वे,  . मुस्लिम लोकांना जर शरीया कायदे हवे असतील तर काही हरकत नाही. जसे हिंदूंसाठी हिंदू लॉ आहे तसा, मुस्लिम लोकांसाठी शरीया लागू करावा. म्हणजे चोरी केली की हात तोडणे, किंवा तत्सम बार्बरिक शिक्षा सुरू  कराव्यात.जर भारतातील मुस्लिम लोकांना तेच हवे असेल आणि त्यांचे नेते पण जर तेच मागत असतील तर ठीक आहे..!

एक जुना लेख.. वरुणचं काय चुकलं? इथे आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , . Bookmark the permalink.

2 Responses to फक्त वरूण गांधिच कां?

  1. vishal says:

    varun gandhivarcha lekh uttam aahe… tasech majorda shahrukh aani gavaskar pan sahi…

Leave a Reply to vishal Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s