मित्र

सत्याचा फोन आला. संध्याकाळी काय करतो आहेस? लक्षात आलं की ह्याच्या सुपीक डोक्यात  कसली तरी भन्नाट आयडिया आलेली दिसते. म्हणाला, राघव येतोय पुण्याहून ६ पर्यंत, रात्रीच्या फ्लाइटने कोच्ची ला जाणार आहे.

एवढं बोलला, आणि पुढचं सगळं अगदी न सांगता समजलं. ह्यालाच तर खरी मैत्री म्हणतात. अहो गेली ४० वर्षांची मैत्री आहे… म्हंटलं कुठे?? तर म्हणे राघव येतोय ६-३० पर्यंत प्रितम ला बसू या थोडावेळ..! माझा विक पॉइंट याला बरोब्बर माहिती आहे. दादरला प्रितम माझा फेवरेट जॉइंट आहे इस्ट साइडला. मी काही तसा बेवडा वगैरे नाही. पण कंपनी म्हणून एखादा ग्लास बिअर वगैरे घ्यायला माझी ना नसते.

प्रितम मधे हिवाळ्यात मिळणारी सरसो दा साग अन मक्के कीरोटी हा तर एक आवडीचा प्रकार. दुसराही एक मुद्दा होता, जर येत नाही म्हणालो तर हा गृहस्थ सगळ्या मित्रां मधे रम्य आणि सुरस तसेच चमत्कारिक कथांच्या भेंडोळ्यात, मी कसा बाइलवेडा आहे, आणि मी कसे मित्रांना टाळतो, हे रंगवून रंगवून सांगायला कमी करणार नाही. तर प्रितम ला पोहोचलो, तर तिथे हा आणि राघव बसलेले. जवळपास २ तास बसलो, बरं , सत्याचं घरपार्ल्याला, मला जायचं मालाडला,म्हणून त्याला म्हणालो, मी आता निघतॊ. तर म्हणे राघ्याचि फ्लाइट लेट रात्रीची १ वाजताची आहे, तर आपण ११ पर्यंत बसु, नंतर राघ्याला एअरपोर्ट ला सोडून देऊ. मला एक समजत नाही, ह्या प्राण्याला कुठे थांबावं हेच कळत नाही. म्हणूनच ह्याची बायको ह्याच्या नावाने कायम शंख करित असते.

मी सरळ, उठून उभा झालॊ, म्हंटलं , मला जायचंय.. उद्या सकाळी कोस्ट गार्डमधे मिटींग आहे, तर तयारी करायची आहे.. असं काहिसं कारण सांगून सरळ घरी आलो. थोडी कुरकुर केली, पण मी दुर्लक्ष केलं.हे दोघंही लहानपणचे मित्र, त्यामुळे गैरसमज वगैरे होत नाही. फार तर शिव्या घातल्या असतील मी गेल्यावर.. तरीही घरी पोहोचायला १०-३० वाजले.

तुमचेही असेच मित्र असतील, तुमचा कुठलातरी पर्सनल प्रोग्राम असतो, ऐनवेळी फोन येतो, एखाद्या मित्राचा आणि कुठेतरी अगदी लाइटनिंग स्पिडने ये असा निरोप असतो. ह्या माणसानी मला एकदा  फोन केला होतं की बॉंबे हॉस्पिटलला एक कॉमन फ्रेंड ऍड्मिट आहे म्हणून.म्हंटलं काय झालंय त्याला, तर म्हणे त्याच्या पोटामधे एक मेणाचा गोळा फॉर्म झालाय.( बरं इतकं सांगूनही माझी ट्युब पेटली नाही..त्या मित्राची बायकॊ खूप लिप्स्टिक लावते ना  🙂 म्हणून त्याला नेहेमी आम्ही छळायचॊ ). मी त्याला सिरियसली म्हणालो, पण  पोटामधे मेण गेलं कुठुन? म्हणे ये मग सांगतो..  तिथे गेलो तर म्हणे मरिना मधे जाउ या,बरेच दिवस झाले, तू आला नाहीस म्हणून थाप मारली. चल , पार्टी मी देतो …थोडावेळ बसु म्हणे…. अस्सा संताप आला होता म्हणून सांगु, मी माझ्या क्वार्टर एंड च्या मिटींगची तयारीची सगळी वाट लागलेली दिसत होती.  मित्र दवाखान्यात आहे म्हणून सगळं सो्डून आलो, आणि हा माणुस …….!

मित्र म्हंटल्यावर किती लिबर्टी घ्यायची ते प्रत्येकानेच आपापले ठरवायचे असते. मला रिकामा वेळ आहे म्हणजे मित्राला पण वेळ आहेच हे गृहीत धरुन चालणे चुकीचे आहे. वरच्या केस मधला मित्र माझा अगदी लहानपणापासूनचा मित्र * शाळू सोबती .त्याला काय म्हणणार??

आज हे लिहिणं सुरु केलंय , पण काय लिहितोय ते माझं मलाच कळत नाही. मला मित्रांची ऍलर्जी आहे कां? छे! तसं नाही, मला मित्रं आवडतात, त्यांच्या बरोबर वेळ घालवायला पण आवडतं पण माझ्या स्पेअर टाइम मधे. अगदी कामं बाजुला ठेवून मित्रांबरोबर वेळ घालवायचे दिवस संपले आहेत.

मला नेहेमी वाटतं की बरेचदा ’माझी पर्सनल  स्पेस’ मला हवी असते,अगदी एकट्या करता! कधी कधी त्यामधे अगदी जवळच्या मित्राचे  पण एन्क्रोजमेंट नकोसं वाटतं.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली and tagged . Bookmark the permalink.

8 Responses to मित्र

 1. abhijit says:

  हम्म…आम्ही या टप्य्यावर नाही आलो अजून. येउ का ते देखील माहित नाही. अजून बायको नाही म्हणून कुठे ही मोकाट जाउ शकतो. कोण बोलावतो यावर बरंच डिपेन्डंट आहे म्हणा. मी सुद्धा माझ्या नव्या मित्रांना टांग देतो. जुन्यांना भेटणं म्हणजे पर्वणी असते. जाबबदा-या आल्यावर चित्र बदलत असेल कदाचित.

  • मी जरी लिहिलंय की पर्सनल स्पेस हवी असते, उद्वेगातुन ते लिहिलं असावं. जुने मित्र आता फारच कमी शिल्लक आहेत.
   म्हणुन केंव्हाही , फोन आला की अजिबात विचार न करता भेटायला जातो मग हातामधे कितिही काम असलं तरिही..
   आपल्या पुर्वीच्या आयुष्यामधे बरोबर मटरगश्ती ज्यांच्या बरोबर केलेली असते, त्यांच्याबरोबर पुन्हा वेळ घालवायला मिळणं
   म्हणजे पुन्हा एकदा जुनं आयुष्य जगायला मिळणं.. जुन्या आठवणी निघतातच, मग कसा वेळ जातो तेच कळत नाही.
   अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

 2. हुम्म…. खरं आहे… वयानुसार, समयपरत्वे प्रायारिटीज बदलत जातात… त्यात अनेक नाती दुरावतात, त्यात मैत्रीतही अंतर पडत जाते. जुने मित्र वेगवेगळया शहरात जवळ – जवळ सेटल होतात… फॅमिली अन कामाच्या गराड्यातुन वेळ काढणे जरा कठीणच होते….

  मात्र आजही मी आठवड्याचा एक दिवस – शनि/ रवि माझ्यासाठी राखीव ठेवतो… त्यात मैत्री.. ट्रेकिंग – भटकंती.. खाने-पिने यासारख्या गोष्टी होतात… मित्रांच्या गप्पा-गोष्टी.. जुन्या आठवणी ताज्या होतात!

 3. marathi blog says:

  please write some love stories. you write it so well.specially where boys dont know that they love someone.but girl know that she loves him very much.

 4. marathi blog says:

  i like both your love stories.

 5. marathi blog says:

  young college love stories

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s