सारेगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज.

coming-soon

सारेगमप चा नवीन कार्यक्रम सुरु झालेला आहे फारसा गाजावाजा न करता. त्यांना माहिती आहे, की आपले हक्काचे मराठी प्रेक्षक आहेतच, तेंव्हा जाहिरातीची काहीच गरज नाही. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या कार्यक्रमात ले  सगळे गायक हे अतिशय उत्कृष्ट आणि ’गाणं शास्त्रोक्त पध्दतीने शिकलेले’  गायक आहेत  .आजच्या कार्यक्रमाचा थोडक्यात अहवाल आहे हा..

म्हणजे आम्हा ’कानसेनांना’ हे सगळे गायक एक सुंदर स्वप्नमय वातावरणातून सहल घडवून आणणार यात काहीच शंकाच नाही.लिल चॅम्प्स ला लोकं अजुन तरी विसरलेले नाहीत. माझ्या ब्लॉग वर रोज कमीत कमी ३-४ सर्च असतात, मुग्धा, किंवा आर्या साठी.

आज पहिल्यांदा रिपीट पहातोय. मागच्या सोमवारी मिस केला होता हा कार्यक्रम. थोडं उशीराच टिव्ही सुरु केला.मधुरा दातार  ही माणिकजींची शिष्य़ा. तेंव्हा गाणं सुंदरच झालं. बाळासाहेबांनी खूप कौतुक केलं.

नंतर आला  पुष्कर लेले चं वाटेवर काटे  सुरु होतं. गाणं मस्तंच जमलं, बाळासाहेबांनी पण अगदी मनापासून कौतुक केलं त्याचं. म्हणाले , की पुष्करला आवाजाची एक दैवी देणगी आहे.

योगिता गोडबोले पाठक … हिने पूर्वी अगबाई अरेच्च्या मधे हिने पार्श्व गायन केलेले आहे. आवाज फारच गोड आहे हिचा आणि स्वरांवरची कमांड  अगदी गाण्याच्या पहिल्याच ओळीतुन लक्षात येते.सुरेश वाडकरांच्या कडे हिने गाण्य़ाचे  प्रशिक्षण घेतले आहे.हिचं गाणं पुर्वी सूर ताल मधे पण ऐकलंय. बाळासाहेब म्हणाले छान गाणं म्हटल, शब्द उच्चार छान आहेत.सुरेशजींनी पण तारीफ केली.. म्हणाले स्टार्टींग पॉईंट ते अंतर्याचा शेवट याचा ग्राफ  जमला नाही..

१९९५ मधे हिंदी सारेगमपाची विजेती मधे अमृता  … ही नेक्स्ट आली.सुर ताल मधे पण हिचे गाणं ऐकलंय. सांजवेळी मला आठ्वूनी.. सुरू केलं ( नेहेमी प्रमाणे मान वाकडी करुन सुरुवात केली) पण सुरूवातिलाच  मला तरी हिचा आवाज आज बरोबर लागलाय असे वाटले नाही. पण सुरेशजींनी पण म्हंटलं आवाज बसलाय का म्हणून विचारलं. गाणं आवडलं म्हणालेत. बाळासाहेब म्हणाले की तुम्ही दडपण घेऊच नका.. आवाज बसलेला असला तरी ते आज्च्या गाण्याचं सौंदर्य ठरलं. तुमच्या शब्दातुन, स्वरातुन भावना व्यक्त झाल्या आहेत, पुढच्या अजुन  प्रयत्न करा, काही स्वर चुकले ते दुरुस्त करा.

संजिवनी बेलांडे, हिंदी सारेगमपची पूर्व विजेती आहे ही पण. हिने निवडलेले गाणे .. तिन्ही सांजा सखे मिळाल्या.. सुरुवात केली अन लगेच हिच्या आवाजाची डॆप्थ लक्षात आली.. अतिशय सुंदर म्हंटलं गाणं हिने.पुन्हा विद्यार्थिनी व्हायला बरं वाटतंय असं म्हणाली.. एखाद्या कवितेला चाल लावणं  हा पहिला प्रयोग होता मराठीमधला. ह्या गाण्याचं रसग्रहण पण सुंदर केलं पंडितजींनी.. जेंव्हा पहिल्यांदा हिने हे गाणं गायलं होतं तेंव्हाची सफाइ दिसली नाही असंही पंडितजींनी म्हंटलं. सुरेशजी म्हणाले तू गाण्याची मजा उचलली नाही तर इतरांना पण येणार नाही.संजिवनीने सांगितलं की तिन्ही सांजा हे गाणं सलिल चौधरिंनी बंगाली मधे पण म्हंटलं आहे हे आवर्जून सांगितलं. विद्यार्थी म्हणून इथे आलेली आहे आणि .

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय ह्याचं संगीत दिग्दर्शन केलेला अजित परब स्टेजवर आला. हा एक स्वतः कंपोझर आहे. संगीतकार म्हणून एक नवीन एक्स्पोझर आणि अनुभव घ्यायला मी इथे आलोय.. असंही तो म्हणाला. बगळ्यांची माळ फुले हे गाणं त्याने निवडले . पंडितजी म्हणाले छान म्हणालात गाणं.. तुमच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटतं. गाण्यांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात बरं कां.. असं म्हणाले बाळासाहेब.

हृषिकेश रानडे हा स्टेज वर आला. वर्ल्ड सारेगमप चा विजेता. मन उधाण वाऱ्याचे हे माझे अतिशय आवडीचे गाणे म्हणणे सुरु केले आणि  तयारीचा ’गडी’ आहे म्हणून खात्री पटली.यार्डलिंग मस्त केलं. लिल चॅम्प्स्च्या वेळेस जे अगदी शेवटी जाणवलं की सगळेच छान म्हणतात. इथे अगदी पहिल्या एपिसोडपासुनच जाणवते. ह्याचे वडील व्हॉयलिन वादक होते. पंडितजी म्हणाले त्यांचे मित्र आहेत ते. म्हणाले, आवाज थोडा बेसला आला तर अजुन छान वाटे.  जे काही गायलात ते उत्कृष्ट गायलात..

हा कार्यक्रम एक नवीन उंची गाठणार ह्यात अजिबात शंका नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

14 Responses to सारेगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज.

 1. fanfare says:

  somehow, one cant help compaing this episode with the lil champs one- and I found the energy missing. The whole atmosphere used to be so charged up when that episode was on. I guess -shalakaree mulani anapekshit pane ekdam near-professional performances dilyamule tyat surprise element anee kautukacha bhaag paan hotach. it set a whole new benchmark and you cannot reconcile to anything less.
  as each of the celeb singer started presenting i found myself idly wondering- how would prathamesh sing this one … and so on… not fair to the current singers I guess but inevitable nonetheless!

 2. Your views are very correct. We have seen all these performers earlier on the various occassions. Specially most of them have appeared in ‘Sur Tal’. As you have rightly said, as all the performers are professionals, obviously we can consider it as Sur Tal extended episode.
  ALso one more thing i was rather avoiding to comment upon is the Judges.. the liveliness is missing in the comments of the judges. Its only because, they are very great people, we can not dare to comment upon them.

 3. Mangesh Nabar says:

  These are cocerts not the competitions. I hate to see such goody goody type conversations in between the song. Pallavi has come out of her Hindi accent very mcuh. Suresh Wadkar should not try to compete Avdhut Gupte for his humorous comments. Another strange thing is Suresh should not be the judge here. He was the mentor and Guru of some of the participants. That’s why I say this is not a competition, but a concert, a total entertainment. What do you say?

 4. सुरेशचं जज होणं इथे मला पण जरा खटकलंच.. लाइव्हलीनेस नाही त्या प्रोग्राम मधे आता. उत्कंठा पण वाटत नाही, पुढे काय होइल ते म्हणुन. पण फक्त एकच आहे चांगली गाणी ऐकायला मिळतिल हाच एक फायदा.
  पुर्वी जसा ’सुर ताल’ होता, तसाच हा पण एक कार्यक्रम म्हणुन पाहिला तर बरा वाटेल. सुर ताल मला खुप आवडायचा. तुम्ही म्हणता तशी एक कॉन्सर्ट म्हणुन बरा वाटतो कार्यक्रम.

 5. नमस्कार
  सारेगमपच्या पहिल्या भागाचा समर्पक आढावा आपण घेतला आहे.
  शेखर

 6. fanfare says:

  Two things: Liveliness was a natural forte of the previous judges -espeially Avadhoot Gupte which is not the case with Suresh Wadkar- he takes life seriously and that shows.. secondly, the judges of lil champs could ” kid around with the participants because the participants were in fact kids and it seemed apt to keep it all lighthearted and amusing and so on.. now with the participants being adult and renowned singers at that, the judges cannot take the liberties that could be taken with the kids..imagine use of “rapchik, dhasu” and so on with the celeb singers :-))it might just not fit in..
  so this is soor-taal with some rankings ..
  hey it is not quite the same as the previous episode and we all know it! even the organizers would be aware. The very fact that these celebs are well known deprives the program of its surprise element -which is the heart of any reality show.

 7. fanfare says:

  one more aspect about the judges: Pt. Hridayanath has so many anecdotes about practically all the songs and it is very entertaining to listen to him. At times, I find myself waiting to hear him tell us about a given song while the singer is still at the song !!SO this in itself might be a unique treat look forward to.

  I guess i went overboard with my comments on a single topic. see you ( ‘read you”) next week!

  • फॅन फेअर, भानस
   आपण गाण्यावर प्रेम करणारी माणसं आहोत, तेंव्हा हा तर फारच जिव्हाळ्याचा विष्य. तेंव्हा तुमच्या कॉमेंट्स चे स्वागतच आहे.
   आभार.

 8. bhaanasa says:

  सारेगामाचा नविन कार्यक्रम सुरू झाल्याचे कळलेच नाही इथे. ह्म्म…खरय गाजावाजा करण्याची गरज उरलेली नाही. बहुतेक युट्युबवर दिसेल.
  सुरेशजी थोर आहेतच. का कोण जाणे पण अशा कार्यक्रमांमधून आजकाल ते काहिसे वेगळेच वाटतात. असो.

 9. Anoop says:

  Pushkar is my classmate from engg college. He has sweet voice. I am proud of his achievements. I am seeing him on Zee tv recently and he has taken a good leap forward. I wish him best of luck for this program.

  Thanks Mahendraji for sharing this. Looking forward for more reports on this program.

 10. VINOD says:

  SAREGAMA…. IS EVER GREEN PROGRAM.EVERYBODY INVOLVED IN ‘AAJACHA AWAZ’ IS VERY TALENTED & GIFTED WITH UNIQUE QUALITY.SHRI HRIDAYNATH MANGESHKARJI’S COMMENTS ARE VERY INTERESTING. AFTERALL IT IS THE EXPERIENCE THAT MATTERS.’PALLAVI JOSHI’, THE CHEER LADY, IS BACKBONE OF THE PROGRAM.SONGS OF PUSHKAR LELE & YOGITA GODBOLE-PATHAK WERE THE BEST OF LAST EPISODE.
  WHERE CAN I GET REPLAYS OF THESE SONGS ON THE NET. PLS GUIDE.

  • As of now, nothing is available on net. since Zee wants to bring their CD in market they are very perticular about not uploading the songs on net. as of now, no songs are available on the net.

 11. VINOD says:

  THANKS FOR THE QUICKER REPLY.
  ALL THE BEST TO THE PARTICIPANTS OF ‘AAJACHA AWAZ’

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s