उगाच काहितरी..

मी हा ब्लॉग का सुरु केला? खरी गोष्ट म्हणजे माझं मराठी अगदीच सामान्य. जसं आपण बोलतो, तसंच लिहिता येतं. अलंकारिक भाषा, कठीण कठिण शब्द – की ज्यांचा अर्थ कळण्यासाठी डिक्शनरी बघावी लागेल.. किंवा ’ह्याचा अर्थं काय असेल बरं?’ असा विचार करित बसावे लागेल असे शब्द पण मला येत नाहित.थॊडक्यात म्हणजे साहित्यिक लिखाण करण्याची   माझा पिंड नाही-लायकी नाही-.पण जे काही मनात येइल ते सरळ टाइप करतो.

तर काय झालं एकदा सौ. चा एक लेख छापून आला होता एका साप्ताहिकात ( तसा नेहेमीच येत असतो) . घरी आल्यावर मला वाचायला दिला, माझी पुन्हा एक वाईट सवय आहे, प्रतिक्रिया कोणीही मागितली तरीही अगदी खरी खरी प्रतिक्रिया देतो.त्यातल्या त्यात सौ च्या लेखावरची प्रतिक्रिया जरा जास्तच जहाल असते. तर लेखावरची माझी परखड प्रतिक्रिया ऐकल्यावर, ती मला म्हणाली, दुसऱ्याने लिहिलेल्या लेखाला नावं ठेवणं सोपं आहे, तुम्ही एक पान तरी लिहुन दाखवा!

एकदम चॅलेंज… आणि ते पण मला?? अरे मी आयुष्यात ऑफिशिअल पत्रा खेरीज कधीच काही लिहिलं नाही,  तीच रटाळ पत्रं कधी कस्टमरला, तर कधी इंटर ऑफिस-फार तर लिगल नोटीसेस ला उत्तरं ,इतकाच काय तो लिखाणाशी संबंध..

त्यानंतर दोन दिवस काय करावं तेच कळत नव्हतं. खरं सांगायचं तर काय लिहावं तेच सुचत नव्हतं. आयला, किती कठिण आहे ना काहीतरी लिहिणं? आणि संकल्प केला होता कमीत कमी ३० दिवस दररोज एक आर्टिकल टाकायचं नेटवर..

पण काहीही  सुचत नव्हतं. वाटत होत, की आपली भाषा अगदीच साधी  आहे, मराठी व्याकरण अजिबात कळत नाही. कसं लिहायचं?  तेंव्हा तर शांत बसलो, पण नंतर मात्र विचार केला , काय हरकत आहे? लिहायचा प्रयत्न करायला? आणि कागद पेन घेउन बसलो. पहिला कागद, वर श्री राम लिहिलं, आणि पेन ने उगाच  रेघा ओढल्या..जवळपास तासभर बसलो होतो, पण डोक्या मधे विषयच येत नव्हता, नंतर काहीच जमलं नाही म्हणून शेवटी  चुरगळून फेकून दिला.आता हे जे लिहायचे फॅड घेतले आहे डोक्यात त्याचं काहीतरी केलंच पाहिजे.पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, पण नाही जमलं… म्हणून उगाच दोन चार कागद खराब करुन  फाडून फेकले.. 🙂 पण लेख काही तयार झाला नाही.

खरं सांगु का, सौ.चे लिखाण माझ्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे , म्हणून तर तिला पैसे मिळतात प्रत्येक लेखाचे आणि मी इथे फुकट खरडत असतो :).  अर्थात   त्या मधे मला काही कमीपणा वाटत नाही, कारण लिहिणे हा माझा प्रांत नाही.आजपर्यंत फक्त मशिन्स दुरुस्त करणे हे एकच काम केलंय आयुष्यभर. तसं मार्केटींग पण केलं ६-७ वर्षं..पण कस्टमर सर्व्हिस हा पोर्टफोलियो जे चिकटला तो चिकटलाच.

मोठा प्रश्न होता , ब्लॉग तर सुरु करायचा ठरवलं.  ( 13 जानेवारी २००९ ला) पण पहिलं पोस्ट लिहायला २-३ दिवस लागले. अहो, काय लिहावं तेच सुचत नव्हतं. बरं तरीही ब्लॉग चं नाव ’काय वाटेल ते ठेवलं’ होतं, विषयाचं बंधन नसावं म्हणून.तरी पण विषय मिळत नव्हता लिहायला.

नेमका मी त्याच काळात टूरला गेलो होतो इंदोर, ग्वालियर आणि भोपाळला. लिहायचं म्हटल्या नंतर प्रत्येक गोष्टी मधे ’स्टॊरी’ धुंडाळणं सुरु केलं. तरीही काहीच जमत नव्हत. पण नर्मदेच्या पात्रातुन ओंकारेश्वराचे दर्शन घेउन येतांना ठरवलं की जे काही मनात येइल ते लिहायचं…

पहिला लेख लिहायला म्हणून कम्प्युटर सुरु केला आणि जे मनात येइल ते टाइप करित गेलो.  अक्षरशः २० मिनिटात की बोर्ड बडवत होतो. मग लक्षात आलं की पहिला लेख तयार झालाय..शेवटी एकदाचं जमलं लिहिणं ,आणि मग झाले लिखाण सुरु..!

आणि अजुन एक गोष्ट लक्षात आली, की कॉम्प्युटरवर टाईप करायला बसलं की जमतं लिहायला.   विचार करण्याची स्पिड आणि टाय़पिंगची स्पिड मॅच होते म्हणून असेल कदाचित.

माझा पहिला लेख ह्या ब्लॉग वर लिहिलेला इथे आहे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव. Bookmark the permalink.

4 Responses to उगाच काहितरी..

 1. fanfare says:

  Hmm… kharach lokanvar tika karayala apaN kase nehami tayar asato. I used to follow another blog earlier by Puneri Pandit, and I wrote such strong comments that he suggested I was being reactive and I should start my own blog- which I find very hard to do!!:-)) I wanted to say sorry to Puneri pandit, but that blog has not been active for some time now. So if he is following this one, I apologize to him, Pandita, tuzya blog var tu kahi ( kayvatelte) lihavas, mee koN bolNar he tuza mhanana kharach hota..
  ANyway, cngrats -you crossed 15000 visitors, not a small feat. Sou na sorry mhanalat ki nahi? Tyanchya lekhache adhun madhun taree koutuk karat ja- tika paN kara .. OK anahut salle baas zale mala vatate

  blog is shaping up really well and the variety is commendable!!!

  • अगदी खरं सांगु का, सौ. ला अजुनही माहिती नाही की मी लिहितो म्हणुन. आता सांगावं म्हणतोय. 🙂
   शेवटी प्रेरणा स्थान तेच आहे नां…

 2. Pingback: २ लक्ष आभार… | काय वाटेल ते……..

 3. हंऽऽ… लिहिणं कठीण आहे खरं. एकाच विषयावर सलग दोन-तीन परिच्छेद (आणि तेही मुद्देसूद) लिहायचे म्हणजे तसं कठीणच काम आहे. पण तुमचं लिखाण सुधारतंय काका. (प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.. ;-)) आधीचे लेख बरेचसे विस्कळीत होते. इकडून तिकडे गाडी भरकटायची. पण मार्चपासूनचे लेख चांगले आहेत. मुद्देसूद आणि वैचारिक. पण एवढे लेख आहेत की तुमचा सगळा ब्लॉग वाचायला आणखी चार-पाच दिवस लागतील.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s