शाहरुख खान व्हर्सेस गावस्कर

क्रिकेट म्हणजे आता १०० टक्के बिझिनेस झालेला आहे. मागच्या वर्षी राहुल द्रवीड ला ज्या तर्हेने ट्रिटमेंट विजय मल्ल्याने दिली.. तेंव्हाच एक गोष्ट क्लिअर झाली होती, की बिसिसिआय करता खेळणे वेगळे आणि ह्या प्रायव्हेट मालकासाठी खेळणे वेगळे.ह्या लोकांच्या साठी खेळणं म्हणजे एखाद्या  कंपनी मधे काम करण्यासारखं आहे. एक तर रिझल्ट दाखवा, नाहीतर परिणामास तयार रहा. 

आयपीएल हा एक नवीन बिझिनेस आहे. प्रत्येक खेळाडूला भरपूर पैसा मिळणार आहे.  तसेस मॅचेस च्या ऑर्गनायझर्स ला पण भरपूर पैसे मिळणार आहे  – ऍडव्हर्टाइझमेंट्स , आणि टिव्ही वर दाखवायच्या मालकीहक्कामुळे.

हे जे सगळे खेळाडू आहेत ते आता थोडक्यात विकले गेले आहेत. स्वतः हून.. त्यामुळे त्यांना आता अजिबात कम्प्लेंट करण्याची जागा शिल्लक नाही.ज्या प्रमाणे स्टड फॉर्म चा मालक घॊडे विकत घेतो तसाच प्रकार इथे आहे. घोड्यांच्या ऐवजी क्रिकेट पटू आहेत. फरक फक्त इतकाच की घोड्यांना पैसे द्यावे लागत नाहीत , आणि क्रिकेट पटूना ते द्यावे लागतात.

ज्या कोणी मालकांनी क्रिकेटची टीम विकत घेतली आहे त्यांच्या दृष्टीने हा एक निव्वळ पैसे कमावण्याचा बिझिनेस आहे. नो पर्सनल फिलिंग्स अबाउट द गेम्स ऍंड प्लेअर्स!

गावस्करांनी जेंव्हा ऐकलं की जॉन बुकानन यांनी प्रत्येक मॅच साठी वेगळा कप्तान ठेवण्याची घॊषणा केली ,तेंव्हा केवळ खेळावरच्या प्रेमापायी गावस्करांनी कॉमेंट केली की हे बरोबर नाही.त्यांचा इतर काही उद्देश नव्हता. एखाद्या माणसाने, आयुष्यभर क्रिकेटकरता आयुष्य घालवल्यावर, जर त्याला एखादी गोष्ट जरा ऑड वाटली आणि त्यावर त्याने एखादी कॉमेंट केली तर , शाहरुख ने इतके ओव्हर रिऍक्ट करायला नको होते.

काय झालं? गावस्करने असं काय म्हंटलं की त्याचा शाहरुखला इतका राग यावा? तसं म्हंटलं तर शाहरुख ला काय अक्कल आहे क्रिकेट मधली? तरी पण कॉमेंट्स करायला चुकला नाही तो. पैशाचा माज म्हणतात ना तो हाच!

मला वाटते की शाहरुख हा गेम म्हणजे एक बिझिनेस म्हणून घेतोय, आणि त्याच्या बिझिनेस मधे ढवळाढवळ केलेली त्याला मान्य नाही, इतर खेळाडू अजूनही ह्या खेळाकडे खेळ म्हणूनच पहातात. त्यामुळे त्यांना ह्या गेम कडे एक कार्पोरेट म्हणून पहाण्यासाठी त्रास होतो.

गावस्कर ला या पेक्षा चांगली वागणूक देणे आवश्यक होते. गावस्करांचा खेळ ’ऐकत’ आमचं लहानपण गेलंय..  आमचा हिरो म्हणजे सुनिल गावस्कर होते. त्यांचा अपमान कराण्याचे शाहरुखला काहीच कारण नव्हते- आणि क्रिकेट संदर्भात बोलायचं तर लायकी पण नाही. भाषा तरी कमीतकमी  जरा चांगली वापरता आली असती..

माजोर्डा  शाहरुख असंही म्हणतो , की २०-२० च्या मॅचेसचा अनुभव नाही सुनीलला, म्हणून त्याने उगाच जास्त बोलू नये. जर एखादी गोष्ट सुनीलला ट्राय करायची असेल तर सुनीलने आपली टीम विकत घ्यावी.. शाहरुख चे सुनिल ला २०-२० अनुभव नाही  हे म्हणणे म्हणजे सूर्याला काजव्याने प्रकाश दाखवणे आहे. शाहरुख ने आज गावस्कर विरुद्ध बोलण्याची हिंम्मत केली आहे, मल्ल्याने द्रविडशी वाईट वागणूक दिलेली आहे, तेंव्हा जर आता अंबानीने सचिनबद्दल लुझ कॉमेंट केली तरीही सचिनला पण ऐकुन घेण्याशिवाय काही उपाय नाही..

माझ्या मते, स्वतःला विकून, स्वतःचे ‘स्वत्व’ ( सेल्फ रिस्पेक्ट ) गमावले आहे पैशासाठी टिम च्या प्लेअर्स नी..जेंव्हा खेळाडूंना करोडॊ रुपये दिले जात आहेत खेळण्यासाठी .जर ते बरोबर खेळले नाहीत तर   त्यांचे ’मालक’ त्यांना शिव्या घालणारच.. आणि ह्या गोष्टी ची पण खेळाडूंनी सवय करुनच घेतली पाहिजे.

थोडक्यात ’प्रॉस्टीट्य़ुट शुड नॉट कम्प्लेन अबाउट द व्हिनरल डिसिजेस’ तसं आहे सगळं.. प्रॉस्टीट्य़ुट म्हंट्लं की  व्हिनरल डिसिजेस होणारंच.. तसंच आहे आयपिएल खेळणार नां? मग हे मालकाच्या शिव्या खाणं , अपमान करुन घेणं हे पार्ट ऑफ कॉंट्रॅक्ट आहे.हे खेळाडू अक्षरशः  शाहरुख, मल्ल्या इत्यादी मालकांच्या नोकरासारखे आहेत ऍज फार ऍज आय पी एल इज कन्सर्न्ड ! मला माहिती आहे , तुम्हाला हे वाचतांना अवघडल्यासारखे  किंवा वाईट वाटत असेल, पण हेच त्रिकाल बाधित सत्य आहे… ऍंड वुई शुड लर्न टु लिव्ह विथ इट..

द्वारकानाथ सांझगिरी चा लेख छान आलाय लोकसत्ता मधे. पण थोडा एकांगी आहे. अर्थात क्रिकेटवर्च्या प्रेमापोटी त्याने लिहिले आहे हे विसरुन चालणार नाही..
द्वारकानाथ सांझगिरी म्हणाले, की आजपर्यंत अमिरखानने आपल्या कुत्र्याचे नांव शाह्ररुख, ठेवलं म्हणुन मला आधी वाईट वाटलं होतं पण आता असं वाटतं की आमिरने अजुन एक कुत्रा पाळावा आणि त्याचं नांव  ठेवावं.. ..जॉन बुकानन!

शेवटी काय, तर पैसे के आगे दुनिया झुकती है..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , , . Bookmark the permalink.

5 Responses to शाहरुख खान व्हर्सेस गावस्कर

  1. Pingback: मोदी-थरूर…. थरार « काय वाटेल ते……..

  2. suresh pethe says:

    उधळपट्टी असते एव्हढेच ऐकिवात . तसेच क्रिकेट संबंधीही ! इटस्‌ ए गेम ऑफ चान्स असेच कायसे ऐकले होते . आणि फटाके वाजले की इंडिया हरली एव्हढे माहीत असायचे . त्यामुळे वर्तमान पत्रा ची शेवटची स्पोर्ट ची पाने लगेच रद्दीत जमा व्हायची.! आता हे काय काय ऐकतॊय/ वाचतोय सगळंच अगम्य ! आता क्रिकेट ह्या खेळाचे नियम वगैरे काही बदलले आहेत की काय समजत नाही . कारण क्रिकेटीयरांच्या नावां ऐवजी बडे बडे उद्योग पती, सिनेमातील नट नट्या, मोठे मोठे सरकारी बिन सरकारी अधिकारी, नाणावलेले पट्टीचे राजकारणी ह्यांचीच भरती झालेली दिसत्येय ह्या खेळात ! म्हणजे आता ह्या आखाड्यातही लक्ष घालावे लागणार तर!

    • सुरेशजी
      नुसता पैशाचा खेळ आहे. खेळाडू पण लालबत्ती लावलेल्या पिंजऱ्यातल्या प्रमाणे विकले जात आहेत. खेळ राहिला तरी कुठे खेळ कुठे आहे?

  3. ब्लॉगच नवीन रुपड मस्त 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s