लोकशाहीची मॉकरी

210392_chidu4जर्नेल सिंग ह्या दैनिक जागरण च्या पत्रकाराने चिदंबरम ह्यांना जोडा फेकून मारला. ही झाली बातमी. इथे व्यक्ती विशेष म्हणून किंवा कॉंग्रेसच्या नेत्याला बुट मारला अशी ही बातमी नाही.  तर गृहमंत्र्याला जोडा मारला ही खरी  बातमी आहे आणि ती  जास्त महत्वाची वाटते.मी जरी कॉंग्रेसचा फॉलोअर नसलो तरिही मी दोन नेत्यांना मनापासुन मान देतो, ते म्हणजे मनमोहन सिंग आणि पिसी चिदंबरम. केवळ पंतप्रधान किंवा गृहमंत्री म्हणुनच नव्हे तर एक सुशिक्षित आणि हुशार असलेले नेते म्हणुन !

कोणी एक माथेफिरू गृहमंत्र्यावर जोडा फेकून मारतो, आणि तो गृहमंत्री ज्या रुलिंग पार्टीचा मेंबर आहे, ती त्या माणसावर काही कारवाई न करता त्याला सोडून देते ते सभ्यपणाचे लक्षण नाही आणि जर ज्याने हा गुन्हा केला तो सरळ सुटून जात असेल तर इट विल गिव्ह अ रॉंग मेसेज .

माझ्या मते त्या जर्नॅलिस्टला सरळ गजाआड घालणे जरूर आहे, परंतु , हाकेच्या अंतरावर असलेल्या इलेक्शन मुळे त्या समाजाची मतं जाउ नये म्हणून त्याच्यावर काहीच कारवाई न करता त्याला सोडून देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला.त्या माणसाच्या विरुध्द इव्हन पोलिस कम्प्लेंट पण करण्यात आलेली नाही.

१९८४ च्या दंगलीची चौकशी आत्ता पुर्ण झाली आणि त्या समितीच्या रिपोर्ट मधे जगदीश टायटलर 2103844_chidu4आणि सज्जन कुमार निर्दोष असल्याचे सांगण्यात आलेले आहे. हा रिपोर्ट आता सुप्रीम कोर्टापुढे ठेवण्यात येणार आहे, तो निर्णय मान्य करायचा की नाही , हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. मला वाटतं लोकशाहीचा इतक्या मोठ्या प्रमाणात दुरुपयोग /मॉकरी अजुन तरी दुसऱ्या कुठल्याही देशात केला गेला नसेल. २४ वर्ष एका रिपोर्ट साठी?? काय चेष्टा आहे का?  आता सुप्रीम कोर्ट किती वर्षं घेते निर्णय घ्यायला ते पण नक्की माहिती नाही….. डिलेड डिसिजन इज डिनाइड डिसिजन असे म्हणतात ते खोटे नाही.

एखाद्या निर्णयाला लागणारा वेळ आणि कायद्या मधिल पळवाटा ह्या इतक्या आहेत की, आजपर्यंत आपल्या पंतप्रधानांना मारणाऱ्या खुन्याला अजूनही शिक्षा दिल्या गेलेली नाही,एके ४७ बाळगणारा आणि पॅरोल वर बाहेर आलेला संजय दत्त आज नेता होण्याची स्वप्नं पहातोय, अफझल गुरु अजुनही तिहारमधे तुकडे तोडत बसलाय, मुंबई बॉंब स्फोटाचे आरोपी काही नॅचरल डेथ ने मेले तर काही अजुनही पॅरोल वर बाहेर आहेत, अबु सालेम, अशी कित्तेक उदाहरणे आहेत…   … लिहिलेली उदाहरणे केवळ   वानगीदाखल  .

लोकशाही मधे अशी घटना निंदनीय आहे. आणि ह्या माणसाने जोडा फेकून मारला म्हणुन त्या  शिरोमणी अकाल तख्ताने  दोन लाखाचे पारितोषिक पण  जाहीर केले हे  कितपत योग्य आहे? आज त्याने जोडा फेकून मारला, उद्या बॉंब पण फेकू शकतो. अशा प्रवृत्तींना ताबडतोब आळा घातला गेला पाहिजे.आज चिदंबरम आहेत, उद्या प्रतिभा ताई , मनमोहन, किंवा मोदी पण असू शकतात.

सरकारने न्यायदानाच्या साठी जर विलंब लावला तर अशाही  प्रतिक्रिया येउ शकतात हे आता नेत्यांना समजले पाहिजे..

सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याने हे काम केले म्हणून जर्नेलसिंग ह्याला अकाली दल मान तर्फे लोकसभेचे तिकिट पण ऑफर करण्यात आलेले आहे.  ह्या माणसाला अमृतसर हुन तिकिट देण्याची ऑफर आहे.ह्या सिटवर भाजपा तर्फे नवजोत सिंग सिद्दु उभा रहाणार आहे.  तसेच नोकरी पण ऑफर करण्यात आली आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , . Bookmark the permalink.

7 Responses to लोकशाहीची मॉकरी

 1. स्मिता जोशी says:

  तुम्ही इतकं छान लिहीता, पण मग खूपसारे इंग्रजी शब्द का वापरता? योग्य ते मराठी शब्दच वापरलेत तर वाचायला अजून मजा येईल. हे असे इंग्रजी घुसडून मराठी लिहीणे फ़क्त ’महाराष्ट्र टाईम्स’ वाल्यांनाच करू देत.

  ह्याच पोस्ट चे उदाहरण बघा —

  मॉकरी, फॉलोअर, रुलिंग पार्टी, मेंबर, इट विल गिव्ह अ रॉंग मेसेज, जर्नॅलिस्ट, इलेक्षन, इव्हन, कम्प्लेंट, रिपोर्ट, सुप्रिम कोर्ट, पॅरोल, नॅचरल डेथ, ऑफर,

  • तुमचं म्हणणं एकदम मान्य. मी अगदी जसं मनात येइल तसं लिहितो. आणि जर मराठी शब्द आठवायला थांबलो तर मग पुढचं काहीच आठवत नाही , एकदम सगळं ब्लॅंक होऊन जातं.आठवत नाही काय लिहिणार होतो ते.. लिंक तुटून जाते लिहिण्याची.केव्ळ याच कारणासाठी अगदी जे काही मनात येइल ते लिहितो. अगदी आपण जसं मराठी बोलतो, तसंच लिहिल्या जातं.आधी पण प्रयत्न केलाय इंग्रजी शब्द न वापरण्याचा, पण नाही जमत, आणि मग सगळं ओढुन ताणुन लिहिल्यासारखं वाटतं.

 2. स्मिता जोशी says:

  अच्छा. हम्म.. पण मग सर्व पोस्ट सटासट लिहून झाल्यावर प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यात लिहीले गेलेले इंग्रजी शब्द वेचून त्याऐवजी मराठीतले लिहा. अजून छान होतील तुमची पोस्ट्स, असं वाटतं.

  • स्मिता, अभिजीत
   प्रतिक्रियेबद्दल आभार. बरेच काढलेत्त शब्द!
   बुश वर जोडा फेकणारा दोन वर्षासाठी जेल मधे गेलाय. आणि भारतात गृहमंत्र्यावर जोडा फेकणारा ’नेता’ होण्याच्या मार्गावर आहे, दोन -दोन लाखाची बक्षिसं मिळवतो.. खरंच.. कठिण आहे भवितव्य या देशाचं.

 3. abhijit says:

  @ ब्लॉग: मुद्दा बरोबर आहे तुमचा. असं व्हायला नको. झालं तरी शिक्षा व्हायला हवी.पण कॉंग्रेस मतांसाठी काहीही करु शकते.अकाली दल पण राजकारण करत आहे. निवडणुका जवळ आल्यावर राजकारण करणार नाही तर केव्हा करणार?

  @ इंग्रजी शब्द: आले तर येउ द्यात. मुद्दा महत्त्वाचा.

 4. vishal says:

  “तुम्ही इतकं छान लिहीता, पण मग खूपसारे इंग्रजी शब्द का वापरता? योग्य ते मराठी शब्दच वापरलेत तर वाचायला अजून मजा येईल. हे असे इंग्रजी घुसडून मराठी लिहीणे फ़क्त ’महाराष्ट्र टाईम्स’ वाल्यांनाच करू देत.”

  100 % sahmat!! asla dhedgujari marathi vachtna kasasch vatta!! tumhala tyach kahich vatat nahi ka?

  • विशाल,
   आता बरेच चांगलं लिहिता येउ लागलंय मराठी.. ब्लॉग सुरु केला होता ४ महिन्यापुर्वी, तेंव्हा मात्र इतकी सवय नव्हती मराठी लिहायची, त्यामुळे बरेच इंग्रजी शब्द यायचे. हल्ली ते प्रमाण खुप कमी झालंय. पुर्णपणे बंद होइल काही दिवसांत असे वाटते.. बघु या.. काय होतं ते..

Leave a Reply to Mahendra Kulkarni Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s