स्त्री-पुरुष इक्वॅलिटी

गेला आठवडा पुर्ण असाच गेला. पाकिस्तानातील टेररिस्ट ऍक्टीव्हिटीज, वरुण गांधी वर रासुका, मनेका आणि मायावती मधली रस्सीखेच…इतका तणावपुर्ण आठवडा गेल्यावर थोडी करमणूक आवश्यक आहे नाही का? म्हणून हे एक   पोस्ट  .

स्त्रियांची विशेषतः बायकोची मला खूप भीती वाटते.(का? असं काय आश्चर्याने पहाता?) आजकाल दिवसच असे आले आहेत ना , त्याला मी तरी  काय करणार 🙂 . इंग्लंडमधे पण स्त्री पुरुष समान ते बद्दल मोनार्की मधे काही तरी वाद सुरु आहेच. त्यामुळे आमच्या घरी पण जी काही थोडी फार कुरबुर सुरु असते त्याचं मला काहीच वाटत नाही..

रविवार सकाळी टीव्ही पहात बसलो होतो.रोज सकाळी   भाजी चिरलेली असली तर वेळ वाचतो, असं ती टिव्हीतली बाई म्हणाली. म्हणून  सहज सौ.ला म्हंटलं , अगं   रविवारी भाजी चिरुन ठेवशील तर तुलाच रोज सकाळी त्रास कमी होईल. माझा उद्देश चांगलाच होता,रोज सकाळी मी ७-१५ ला घरुन नि्घतो, धाकटी छोकरी पण   पण सकाळी ६-१५ ला शाळेत जाते. माझं ऐकुन  सौ. एकदम वैतागली .. तर मला म्हणते, म्हणजे काय? रोज सकाळी मेलं ५ वाजता उठावं लागतं, रविवारी पण मी लवकर उठून कामं च करत बसायचं  का?

आय जस्ट गॉट द मेसेज.. मी एखाद्या पाळीव नवऱ्या प्रमाणे  म्हंटलं ,की बरं ठीक आहे,  मी निवडून ठेवतो , आणि मेथीची जुडी घेउन बसलो टिव्ही समोर. १००टक्के संघ परिवारातिल असुन सुध्दा एन डी टि व्ही लावला आणि बरखाताईंची बाष्कळ वटवट ऐकणं सुरु केलं.संजय दत्तचा इंटर्व्ह्यु घेत होती ती. बरा टाइम पास होता.

थोड्या वेळात मेथी निवडून झाली. विचारलं अजुन काही आहे का निवडायचं? …अगदी साधं सरळ बोललं तरीही   गैरसमज करुन घ्यायची सवयच असते स्त्रियांना. …म्हंटलं अगं स्त्री पुरुष समानता हा मुद्दा आत्ता उचलला जातोय   ब्रिटिश मोनार्की मधे.. इथे सुरु व्हायला वेळ लागेल ना अजुन? (रागामधे असली की मग तिला विनोद पण कळत नाही..आणि मग अजूनच चिडते.

धोक्याची पातळी जवळ आली किंवा गोरा रंगं गुलाबी रंगावर गेला, नाकाचा शेंडा लाल झालेला दिसला , आपण समोर गेल्यावर पण आपल्या कडे दुर्लक्ष करुन नजर शून्यात लागलेली दिसली की मग मी मात्र हत्यार टाकुन सपशेल शरण जातो.बस्स! …शेवटी आपण काय शेपूट घालुन गप्प बसायचं किंवा मोरासारखा पिसारा काढून लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायचा . ( इथे पिसारा पक्षी नोटांचा पिसारा 🙂 )अशा प्रसंगातून बाहेर निघण्याचा एक साधा मार्ग म्हणजे सरळ संध्याकाळी शॉपिंगला घेउन जायचं.शॉपिंग झालं की बाहेर हॉटेलमधे जेवायला जायचं. काय करणार , रविवारच्या दिवशी भांडणं झाली की दिवस पार बोंबलतो.

हा एक फोटॊ बघा. मला फक्त हा फोटॊ आला होता. मी फक्त त्या फोटोला कॅप्शन टाकलं.

slide1

काय मग? पटलं की नाही? नक्कीच पटलं असेल. हा तर एक लहानसा प्रसंग आहे घरातला, असे प्रसंग कित्येकदा प्रत्येकच घरामधे येतात. म्हणतात ना पातेल्यातले वादळ पेल्यातच शांत होतं..
तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? स्त्री असण्याचे फायदे भरपूर  आहेत..

ऑफिसमधे उशिरा गेलं तरीही बॉस काही बोलत नाही. असंही कुठेतरी वाचनात आलं आहे की सुंदर स्त्रियांना प्रमोशन्स लवकर दिली जातात ऍज कम्पेअर्ड टु देअर कलिग्स! ( हा तर मोठ्ठा पॉइंट ऑफ डिबेट आहे…. )खरं की खोटं ते मला माहिती नाही.. 🙂

स्त्री पुरुष समानते मुळे मुलींनी मुलासारखे जिन्स- टिशर्ट, किंवा ट्राउझर – शर्ट,  कपडे घातले तरीही चालतं आणि ते फॅशन च्या नावाखाली खपून जातं . पण , जेंव्हा हीच गोष्ट एखाद्या मुलाने केली तर त्याला सरळ मेंटल हॉस्पिटल मधे किंवा सायकिऍट्रीस्ट कडे नेले जाते.  .किती लिबर्टी असते बघा मुलींना.  खरं की नाही?

स्त्री पुरुष समानते  बद्दल बोलतोय आपण, पण बघा ना, तरी पण -बस मधे सिट्स आरक्षित, ट्रेन मधे बर्थ’स आरक्षित, प्रत्येक ठिकाणी वेगळी रांग, इतकं सगळं तर आहेच, पण ह्या व्यतिरिक्त, आता राजकारणातही ३३ टक्के रिझर्वेशन्स बद्दल बोललं जातंय..कुठे आहे जेंडर इक्वॅलिटी? मला तर दिसत नाही कुठे.. 🙂 बरं ठरावीक सिट्स स्त्रियांसाठी रिझर्व असून सुध्दा इतर सिटवर त्यांना बसणं आलाउड आहे. पण एखादा पुरुष जर स्त्रियांच्या सिट वर बसला तर मात्र त्याला लगेच उठवता येतं.

ऑफिस मधे उशिरा गेल्यावर बॉस कडे गेल्यावर थोडंसं हसलं आणि कित्ती कित्ती बसला गर्दी होती म्हंटलं की झालं

आजकाल एक नविन टुल हाती लागलंय स्त्रियांच्या. एखाद्या कलिगने सेक्स्युअली इम्प्रॉपर पिक्चर्स दाखवले , किंवा तसे ऍडव्हान्सेस केले, असा काही आरोप केला की झालं.   जरा त्या स्त्री चे इतर सगळे गुन्हे, म्हणजे कामावर लवकर ना येणं, कामं न करणं, इत्यादी इत्यादी माफ.. कोणाची आहे हिंम्मत काही बोलायची? पण मला वाटतं की भारतामधे ह्या कायद्याचा फारसा उपयोग करुन घेतला जात नाही.

जाता जाता सहज एक गोष्ट आठवली.. इथे देतोय, बघा आवडते कां ते….

एकदा काय झालं एकदा एका सिंहाची वरात जात होती. वराती मधे एक लहानसा उंदीर नाचत होता. लोकांना अगदी खुप आश्चर्य वाटलं . सिंहाच्या  लग्नात उंदीर का नाचतो  बरं?? शेवटी, जेंव्हा तो उंदीर थकून नाचायचं थांबला, तेंव्हा त्याला एका माणसाने विचारले, ’तू का नाचतोस सिंहाच्या लग्नात, तो सिंह म्हणजे जंगलाचा राजा आणि तू  उंदीर , तुला का इतका आनंद होतोय सिंहाच्या लग्नाचा?? तुझा काय संबंध?’ तर उंदीर  म्हणाला …..
तो सिंह माझा भाउ आहे.
तो कसा बुवा? तो सिंह आणि तू उंदीर…
तर उंदीर म्हणाला,  लग्नाच्या पूर्वी मी पण सींहच होतो रे….

म्हणून मी म्हणतो, आजच्या ह्या स्त्री प्रधान संस्कृती मधे पुरुषांकडे कोणाचेच लक्ष नाही, मी एक संघटना काढतोय, स्त्री पिडीत पुरुषांची.. मग काय जॉइन करणार नां??

इतकं काही वाईट वाटून घेउन नका, पुरुष असण्याचे पण खूप फायदे  वाचले आहेत कुठेतरी .त्यातलेच काही इथे लिहितोय. तुम्हाला वॉटर पार्क मधे शर्ट नं घालतां फिरता येते :).तुमची कार खराब झाली की बोनेटे उघडून आतल्या इंजिन ला काय झालं असेल त्या विषयी थोडंफार तरी कळतं. नट बोल्ट फिरवतांना तो कुठल्या दिशेला फिरवायचा याचा तुम्हाला उपजतच ज्ञान असतं.चेहेऱ्या वरच्या सुरकुत्यांची  किंवा गळणाऱ्या केसांची तुम्हाला फारशी काळजी नसते.तुम्हाला तुमचा मित्र जरी पार्टीला बोलवायचा विसरला तरीही तो तुमचा मित्र रहातो 🙂 .सगळ्यात महत्वाचे तुम्ही प्रेग्नंट होऊ शकत नाही. आठवड्याभराच्या सुटी करता दोन जिन्स ४ टी शर्ट्स पुरतात.तुम्हाला उंचावरचा डबा, काढता येतो.  कुठलाही जार, जामची बाटली उघडता येते. औषधाच्या बाटलीचे ते पत्र्याचं सिल तोडुन तिथे ड्रॉपर बसवता येतं.एक बूटांचा जोड, एक बेल्ट आणि एक पाकीट तुम्हाला वर्षभर पुरतं- फार तर एखादा स्निकर एक्स्ट्रॉ असला तरी तुम्ही आनंदी असता.तुम्हाला आपली कंबरेचे माप वाढले का  म्हणून फार विचार करण्याची जरुरी नसते.डोळ्याखालच्या सुरुकुत्या तुम्हाला विचलित करित नाहीत.

शनिवारची  लोकसत्ता चतुरंग पुरवणी  वाचलित कां? समानतेच्या वाटेवरिल पाउल खुणा म्हणून एक लेख आहे स्त्री पुरुष समानतेवर. आणि त्यामधे बऱ्याच लोकांनी आपण कसे जेंडर इक्वॅलिटी साठी कसे प्रयत्न केलेत ते दिलंय.मस्त करमणूक आहे.. जेंडर इक्वॅलिटीवरच्या कल्पना वाचून माझी तर हसून हसून पुरेवाट झाली.. इथे वाचा

एक म्हणतो, बायको नोकरी करते म्हणून मी घरी बसून घर सांभाळतो, दुसरा एक म्हणतो, की बायकोने मंगळसुत्र किंवा कुंकू लावू नये अशी अट घातली होती लग्ना पुर्वीच, आणि बायकोच्या मागे स्कुटीवर बसतो .   मुलांवर कुठलेही धार्मिक संस्कार करित नाही, आणि बायकोला नोकरी सोडायला लावली कौटूंबीक अडचणीमुळे. एक मत असंही आहे, मुलाच्या लग्नात हुंडा घेतला नाही.. ( कसा घेणार कायद्याने गुन्हा आहे तो) आणि लग्नाचा खर्च अर्धा वाटून घेतला.सहावे मत असेही आहे, की मी नवऱ्याला ट्रेंड केला घरकामात मदत करायला.. म्हणजे भांडी मी घासते, नवरा, मुलं  विसळतात….

इन शॉर्ट , घरची कामं करणं, भांडी धुणं , कपडे पिळणे, बायकांनी कुंकु किंवा मंगळसूत्र न घालणे, धार्मिक संस्कार मुलांवर न करणं, म्हणजे स्त्री पुरुष समानता ‘ अशी व्याख्या करता येइल त्या लेखावरून. बौद्धिक दिवाळखोरीचा लेख आहे तो….लोकसत्ता कडून इतक्या चीप लेखाची अपेक्षा नव्हती. पण माझ्या सौ. ला तो लेख खूप आवडला बरं का..असो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in विनोदी and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

17 Responses to स्त्री-पुरुष इक्वॅलिटी

 1. sadhana raje says:

  Me roj tumchya sitela bhet dete, khoop chhan lihita tumhi, aaj tar lajawab.

 2. Amol says:

  they are establishing inequality to be fair, if there is equality, then men is laughed if he wears those fancy dresses.Why theere is no MEN FIRST policy any where ? :))

  • Amol
   join my brigade.. purush mukti sanghatana. 🙂

   • saheb geli satra varshe me hyach vishyavar lokana lihayla bhag padtoy.aani swatahi hya vishyavar khup likhan keley .me navimumbait auto chalvato.majhya rickshwachya kachevar PURUSHMUKTI lihley.aani mala navimumbait barechjan hyach navane oolkhatat.aaj.sahaj type kele aani aapli bhet jhali..mala aaplyat sahbhagi karun ghetle tar me aapla sahkari hoeeal.

 3. fanfare says:

  Sihin shikar karun aNate anee sinh tee shikaricha wata swta:la priority ne gheta asato ase kuthetaree vachale ahe. Tyamule sinhin angawar oradalee taree tyala gupchup ( tumhi caption dilelya chitrata dakhavalyapramane) basaNe bhaag ahe, paN ithe mee roj sakalee daba gheun mukatyane niyameet ‘shikareela jato taree sinhin gurgurtech … :-)) Ata kay karave bare? Mee paN tumchi sanghatana join karato zale! chorun..
  jase tumhi blog lihit ahat tasech:-))

 4. A response says:

  hmm mala nahi vatat sri pradhan sanskruti aali aahe ase purush khup hushar astat ase ghabarlya sarkhe karay che aani mag sagale sadhya karun ghayche ……….

  • घाबरल्यासारखं दाखवायचं आणि आपल्याच मनासारखं करुन घ्यायचं, अशी कम्प्लेंट सगळ्यच स्त्रीया करतात. काही अंशी खरंही आहे. पण त्यामूळेच स्त्रियांना एक वेगळाच कंट्रोलिंग द सिच्युएशन चा फिल येतो .. हो की नाही??

 5. A response says:

  hahahah don’t know might be true

 6. ajayshripad says:

  दादा या बाबतित आम्ही जरा मगे आहोत. लग्न नाही झालं ना. पण एक गोष्ट मी पण मान्य करतो, या स्त्रि पुरुष समानतेमुळे स्त्रीयांच काहीच बिघडलेलं नाही पण बर्‍याच ठिकाणी पंचाईत होते. उदाहरण सांगायच झालच तर मागच्या आठवड्यात शनिवारी आमची मित्रांची पार्टि झाली. दुसर्‍या दिवशी दिवशी मैत्रिण म्हणते मलाही पार्टि करायची आहे, आणी तिही जशी तु तुझ्या मित्रांबरोबर करतोस. आता सांगा काय करवं माणसाने, एक बंपर रम पिउ शकतिल का या स्त्रीया..? 😀

 7. खरं आहे. समानता आजकाल हळूहळू कमीच होत चालली आहे. 😦

  आजच्या काळात पुरुषांना काही व्हॉईसच उरलेला नाही
  स्त्रियांचं ऐकण्यावाचून दुसरा काही चॉईसच उरलेला नाही… 😉

  • khare aahe pan doghe hi kamavtat na tyamule sansarasathi aaikave lagtey .pan mhanun tya shree ne tichya maitreenit ha samaj nako aahe karayla ki navra majhech aaiktoy.sangkamyasarkhe.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s